Home Blog Page 1529

‘पीडी’ वीजग्राहकांकडून ३१ कोटींच्या थकबाकीची वसूली

पुणे परिमंडलामध्ये १७३५ ठिकाणी आढळली ३ कोटींची वीजचोरी

पुणे, दि. २४ मे २०२३: पुणे परिमंडल अंतर्गत विविध कारणांमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित (पर्मनन्ट डिस्कनेक्ट) केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी मोहीम वेगाने सुरु आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात १९ हजार ग्राहकांकडून वीजबिलांपोटी ३० कोटी ५९ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर कायमस्वरुपी खंडित ८० हजार १९९ पैकी ६१ हजार ३९७ वीजजोडण्यांची बुधवार (दि. २४) पर्यंत तपासणी करण्यात आली. त्यात १७३५ ग्राहकांनी ३ कोटी १३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महसूलवाढ व वीजहानी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजजोडण्यांची संख्या कमी करणे व संबंधित ग्राहकांकडून थकबाकीची वसूली करणे ही एक महत्त्वाची मोहीम राबविण्यात येत आहे. संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेत या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या परिमंडलाच्या यादीमध्ये यापुढे नव्या ग्राहकाचा समावेश करण्याचा अधिकार आता थेट फक्त मुख्य अभियंत्यांना देण्यात आला आहे.

प्रामुख्याने वीजबिलांच्या थकबाकीमुळे व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जातो. पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत एकूण २ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ४१७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व वीजजोडण्यांच्या प्रत्यक्ष तपासणीचे काम महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या दोन वर्षांतील ८० हजार १९९ ग्राहकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या वीजजोडण्यांची तपासणी मोहीम वेगाने सुरु आहे. या मोहिमेत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह वरिष्ठ अभियंता, अधिकारी विविध ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहेत. काही भागामध्ये प्रसंगी पोलीस संरक्षण घेण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात कायमस्वरुपी खंडित १९ हजार ग्राहकांकडून ३० कोटी ५९ लाख रुपयांच्या थकबाकीची वसूली करण्यात आली आहे. यात गेल्या दोन महिन्यात ६ हजार ग्राहकांकडील १० कोटी ३७ लाख रुपयांचा समावेश आहे.

       आतापर्यंत पुणे परिमंडलात कायमस्वरुपी खंडित ६१ हजार ३९७ (७६.६ टक्के) वीजजोडण्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी वीजवापर नसणे, वीजजोडणीच असलेल्या जागेवरील इमारत पाडलेली असणे तसेच थकबाकीचा भरणा केलेला आहे मात्र नवीन वीजजोडणी घेतलेली नाही असे निदर्शनास आले आहे. मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला असताना वीजवापर सुरु असल्याचे प्रकार आढळून आले. यात पुणे शहरात ६७५ ठिकाणी १ कोटी ३८ लाख ५६ हजार, पिंपरी चिंचवड शहरात ५८० ठिकाणी ९६ लाख २७ हजार तर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये ४८० ठिकाणी ७९ लाख ४ हजारांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. या वीजचोरीप्रकरणी आतापर्यंत ६९६ ग्राहकांकडून १ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजबिलांची वसूली करण्यात आली आहे तर उर्वरित ग्राहकांविरुद्ध कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

 जागेची मालकी बदलली तरी थकबाकीची वसूली 

जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. जागेच्या नवीन मालकांनी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केले होते. मात्र त्या जागेवर पूर्वीच्या बिलाची थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्याचे वीज वितरण कंपन्यांकडून नाकारण्यात आले. याबाबत महाराष्ट्र व इतर काही राज्यांतून १९ प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिल दाखल झाले होते. यासंदर्भात निकाल देताना जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसूली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

मुली व महिला बेपत्ता:प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) स्ट्रॉंग करा -राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह

मुंबई, दि. 24 : प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह यांनी आज व्यक्त केले.

महिला, बाल अत्याचार, प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांची अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्य अॅड. निलिया चव्हाण उपस्थित होत्या.

अॅड. सुशीबेन शाह म्हणाल्या की, मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटना होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे. या युनिटच्या कामकाजाचा अहवाल व त्यावर देखरेख याबाबत भेटीदरम्यान विस्तृत चर्चा करण्यात आली. लहान मुली आणि महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी आयोगाने माहितीपर पोस्टर्स तयार केलेले असून, हे पोस्टर सर्व पोलीस स्थानकात लावण्यासाठी त्याची प्रत आयोगामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली.

विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे म्हणाले की, या विषयाबाबत सविस्तर अहवाल ते आयोगास सादर करतील. आयोगातील पोलीस विभागाशी संबंधित सर्व प्रकरणे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. पांडे यांनी सांगितले.

****

ख्यातनाम गायक मोहंम्मद अयाज सोलापूरचे ब्रँड अँबेसिडर

सोलापूर – नुकतेच सोलापूर चे ख्यातनाम गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांची सोलापूर चे ब्रंन्ड अंम्बेसिटर म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रशासन व मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा हस्ते सोलापूर ब्रंड अम्बेसिटर निवड पत्र देण्यात आला. मोहम्मद अयाज यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली अयाज यांनी कलेच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्यच नांव देश विदेशात लौकीक केले ‌.कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केले आहे सोलापूर जिल्हा व्यसन मुक्ती व राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक बांधिलकी साठी मोहम्मद अयाज आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार . संगीत जगतचे गुरुवर्य पंडीत हदयनाथ मंगेशकर यांनी साम गुरुकुल या रियालिटी सिंगीग शो मध्ये जेव्हा मोहम्मद अयाज महाराष्ट्राचा महागायक विजेता् ठरला तेव्हा सोलापूर सुरमणी ही उपाधी देऊन गौरविण्यात आले. त्याच पद्धतीने आज जिल्हा प्रशासनाने एक सामान्य कलावंतास ब्रंड अंम्बेसिटर ची उपाधी देऊन सन्मानित केले ही बाब माझ्या साठीच नाही तर माझ्या समस्त सोलापूर रसिकांसाठी सुध्दा अभिमानास्पद आहे. या वेळी मोहम्मद अयाज यांनी एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो हे सादर करुन आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुष्का शर्मा , ओरिसाचे राज्य समन्वयक अभिनव घोलप , जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खामितकर सह अनेक कर्मचारी उपस्थित होते. कलेक्टर मिलींद शंभरकर साहेब व दिलीप स्वामी साहेब , निवासी उपजिल्हाधिकारी शमाताई पवार , सुनिल खामीतकर व सर्व प्रशासनाचे मी सदैव ऋणी राहीन! प्रशासन जे काही माझ्या वर जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार अशी प्रतिक्रिया मोहम्मद अयाज यांनी दिली

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 24 : एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही खात्री केल्यानंतर अशा जमिनींकरिता स्वतंत्रपणे अकृषिक परवानगीची गरज नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महसूल व वन विभागामार्फत 23 मे 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार अकृषि‍क प्रयोजनांचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केल्यानंतर या जमिनींकरिता महाराष्ट्र जमीन संहिता, 1966 च्या कलम 42-अ, 42-ब, 42-क, 42-ड किंवा 44-अ अन्वये स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा जमिनी अकृषिक वापरात रुपांतरित झाल्याचे मानण्यात येत असल्याने, अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास/ भूखंडधारकास/ विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

जमीन भोगवटदार वर्ग-१ या धारणाधिकाराची असल्यास बीपीएमएस (Building Plan Management System (BPMS)) प्रणालीतच आवश्यकता असेल तिथे रुपांतर कर वसूल केला जाईल व विकास परवानगी सोबतच अकृषिक वापराची सनद निर्गमित करण्यात येईल. जमीन वर्ग-२ धारणाधिकाराची असल्यास, नजराणा किंवा अधिमुल्य आणि इतर शासकीय रकमांची देणी इ. रकमांची परिगणना करण्यात यावी आणि या रकमांचा भरणा केल्यावर सक्षम महसूल अधिकारी यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर बीपीएमएस यंत्रणेद्वारे विकास परवानगी देणे बंधनकारक राहील व अशा प्रकरणी सुद्धा अकृषिक वापराची सनद सोबतच निर्गमित होईल. ही सनद स्वयंचलित (System generated) स्वरुपाची असेल व अशा सर्व प्रकरणांमध्ये सनदेची एक प्रत ऑनलाईन (electronically) गाव दप्तरात नोंद घेण्यासाठी जाईल व परवानगी घेणाऱ्यावर पुढे नियमित देय अकृषिक सारा भरणे बंधनकारक राहील.

००००

पुण्यातील बेपत्ता महिला ,मुलींच्या शोधार्थ विशेष कारवाई पथक करण्याची मागणी

पुणे- शहरातील मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत त्यांचा शोध आणि चौकशी साठी खास अनुभवी आणि शोर्यवान पोलिसांच्या खास पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी होत असताना आज याच संदर्भात पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे,त्या म्हणाल्या शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे,युवक काँग्रेस सरचिटणीस पूनमित तिवारी यावेळी उपस्थित होते.  यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त  रितेश कुमार व पुणे शहर पोलीस सहआयुक्त  संदीप कर्णिक यांना निवेदन दिले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे व किशोर जाधव हे उपस्थित होते.  

   पुढे त्या म्हणाल्या ,’ गेले कित्येक दिवस वर्तमानपत्रातून आणि टीव्ही चॅनल वरून आपल्या पुण्यातील मुली आणि महिला बेपत्ता आहेत असे लक्षात आले. १४८ महिला व मुली आपल्या पुण्यामधून बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या ३ महिन्यांत पुणे जिल्ह्यातून सुमारे ४०० महिला व मुली बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. ४०० पैकी १४८ महिला व मुली पुणे शहरातील आहेत. त्यांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दुबईला किंवा ओमान ला नेण्यात आले आहे की काय ? किंवा त्या मागे दुसरे काही कारण आहे की काय? असे प्रश्न आहेत. त्यांचा ठावठिकाणा त्यांच्या कुटुंबीयांना पण माहीत नाही. राज्य महिला आयोगाने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत आणि राज्याच्या गृह विभागाला ही दिले आहेत.

विश्रांतवाडीतील बुद्धविहाराला मिळणार हक्‍काची जागा

  • दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीला महापालिका आयुक्‍तांची मान्यता
  • माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे-

विश्रांतवाडी चौकापासून धानोरीला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने असणाऱ्या बुद्धविहाराला हक्‍काची जागा मिळणार आहे. लवकर या बुद्धविहाराचे इतर जागेत स्थलांतर होणार आहे. त्यासाठी दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीचा ठराव पुणे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी मंजूर केला आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टी पुनवर्सन विभाग, महापालिकेकडे डॉ. धेंडे यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

धानोरी सर्व्हे नंबर 46 विश्रांतवाडी चौक येथे असणारे बुद्ध विहार राधेशाम आगरवाल यांच्या खासगी जागेत असून या जागेतून 60 फुट व 160 फुट नियोजित डीपी रस्ता आहे. त्यामुळे बुद्धविहाराची ही जागा बाधित होणार असल्याने तिचे इतर ठिकाणी योग्य पद्धतीने स्थलांतर होण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सदरच्या जागेपुढेच वॉटर वर्क्‍ससाठी आरक्षित असणाऱ्या जागेत दोन गुंठे जागा बुद्धविहाराला देण्याचे आगरवाल यांनी मंजूर केले होते. त्यासाठी झापडपट्टी पुनवर्सन प्रकल्प विभागाचा आदेश आवश्‍यक होता. त्यासाठी हे काम रखडले होते. त्या बबात माजी यांनी झोनिपुकडे पाठपुरावा केला. जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्या पत्रानुसार पुणे महापालिकेने सदरची जागा ताब्यात घेऊन बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी मार्ग मोकळा करून देण्याची कार्यवाही पुर्ण केली आहे. यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्याने महापालिका, झोपडपट्‌टी पुनर्वसन विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पत्रानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती. अखेर डॉ. धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरच बुद्ध विहाराची उभारणी देखील केली जाणार आहे.

या बरोबरच माजी नगरसेवक अशोक कांबळे, बुद्ध विहार कमिटी अध्यक्ष राजेश बेंगळे, सर्व पदाधिकारी, विकसक प्रमोद अग्रवाल हे पाठपुरावा करत होते. तसेच पुणे मनपाच्या ताब्यात जागा आलेली आहे सर्व सभासद मिळुन वास्तुविशारद यांच्या मार्फत नविन विहाराच्या नकाशाला पसंती देऊन लवकरच काम चालु होणार आहे.

महापालिकेच्या बैठकीत निर्णय-

डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्यावरून महापालिकेत आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली 2021 मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चार मुद्‌द्‌यांवर निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये सध्याच्या विश्रांतवाडी येथील बुद्ध विहाराच्या जागेच्या बदल्यात मुळ मालक आगरवाल यांनी त्यांच्या सर्व्हे नंबर 46 मधील वॉटर वर्क्‍सकरिता आरक्षित असलेल्या जागेमधील झोपडपट्ट्या काढून दोन आर क्षेत्र बुद्धविहारासाठी पर्यायी जागा देऊन बांधकाम करावे. पर्यायी जागेमध्ये बुद्ध विहाराचे बांधकाम मिळकतधारक राधेशाम आगरवाल यांनी करून द्यावे. वॉटर वर्क्‍ससाठी आरक्षित क्षेत्राचा मोबदला आगरवाल यांनी टीडीआर स्वरूपात द्यावा. 60 फुट डीपी रस्ता मधील बुद्ध विहाराची जागा रिकामी झाल्यावर उर्वरीत क्षेत्राचा प्रलंबित टीडीआर देणेची कार्यवाही करावी.

पुणे महापालिका आयुक्‍तांनी विश्रांतवाडी येथील बुद्ध विहारासाठी मागणीनूसार दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी पाठपुरावा करत आहे. त्याला यश मिळाले आहे. लवकर पर्यायी जागेवर भव्य दिव्य बुद्ध विहार बांधण्यात येईल .

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

अतिक्रमणे,बेकायदा बांधकामेबाबत महापालिका आयुक्तांची भूमिका कधी इकडे तर कधी तिकडे..

एकेका पथारीवाल्याकडून महिना १५ हजाराची वसुली भाड्याच्या नावाने करतोय कोण ? याची चौकशी स्थानिक पोलीसाकरवी का करत नाहीत ?

पुणे- रस्तोरस्ती पथारीवाले ज्या दुकानाच्या समोर,बाजूला बसतात अशा मागील दुकानदारांना त्यांच्या समोर असलेल्या महापालिकेची जागा वापरण्यास देऊन महापालिकेच्या जागेचे भाडे बेकायदेशीरपणे वसूल करत असताना,त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई कधीही झाली नाही, काही ठिकाणी तर माजी नगरसेवक महापालिकेच्या जागांवर बिनधास्तपणे पथारीवाल्यांना सुरु करा धंदा सांगून त्यांच्याकडून दरमहा हप्ते गोळा करत आहेत.यांच्यावर कधीही कानाडोळा न करणाऱ्या आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे खरोखर काढायची कि नाही काढायची याबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने आता यापुढे महापालिकेतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाला काम करणे म्हणजे फक्त पाट्या टाकणे एवढेच करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माधव जगताप यांच्याकडील ४० टक्के कार्यभार काढला .

वारंवार कारवाई करूनही पुढे पुन्हा पुन्हा उभ्या ठाकणाऱ्या अतिक्रमणांवर कडक कारवाईचे धोरण घेताना एका व्हायरल व्हिडीओ ने अडचणीत आणलेल्या अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्याकडील परिमंडल १ व परिमंडल २ येथील कार्यभार काढून तो आयुक्त कार्यालयातील राजू नंदकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर परिमंडल ३,४ आणि ५ येथील अतिक्रमण निर्मूलनाचा कार्यभार मात्र जगताप यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.या मुळे आयुक्तांची भूमिका ठाम नसल्याचे स्पष्ट झालेआहे.राजू नंदकर यांच्याकडे मोटार वाहन,प्राथमिक शिक्षण,माध्यमिक व तांत्रिक शिक्षण,आणि प्रशिक्षण प्रबोधिनी यांचाही काय्भर सोपविण्यात आल्याने अतिक्रमण निर्मूलनाचे नेमके काय होणार ? हा प्रश्नच आहे. तर माधव जगताप यांच्याकडे ३/४/५ परिमंडळातील अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी असताना आकाश चिन्ह परवाना विभाग आणि सुरक्षा विभागाची जबाबदारी सुद्धा आहे .

महापालिका आयुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीशी भक्कम उभे नाहीत ?

अतिक्रमण अधिकारी,कर्मचारी यांना कारवाई करताना मोठ्या रोषाला आणि संतापला सामोरे जावे लागते अशा वेळी महापालिका आयुक्त जर..अशी..तशी भूमिका घेऊन स्पष्ट ठाम भूमिका घेणार नसतील तर हे कर्मचारी आता यापुढे कशा पद्धतीने कारवाई करतील हे सांगणे नको.हाताने नौकरीवर गदा आणि बदनामी सहन करण्यापेक्षा..चाललेय ते चालू देत,आमचेही भरा आणि तुमचेही भरा.शहराचे होऊ द्यात काय व्हायचे ते अशी धारणा बोकाळते हे वारंवार दिसून आले आहे.राजीव अग्रवाल, अरुण भाटिया अशा फार कमी आयुक्तांची नावे घेता येतील ज्यांनी ठाम भूमिका घेऊन बड्याबड्या धेंडांची देखील अतिक्रमणे उध्वस्त केली होती.. हे काय करणार.ते काळानेच स्पष्ट केले आहे…

-आमदार माधुरी मिसाळांनी अधिकाऱ्यांना दिली डेडलाईन ..

पुणे- पुण्याच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागेल अशी ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या आमदार माधुरी मिसाळ यांनी आज विविध खात्यातील अधिकाऱ्यांना बरोबर नेऊन पर्वती मतदारसंघातील विविध विकास कामांची पाहणी केली आणि कोणत्याही परिस्थितीत १५ जून पूर्वी रस्ते, ड्रेनेज आदी कामे पूर्ण झालीच पाहिजेत असे स्पष्ट निर्देश देखील दिले.

आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे सुरु असून या काही कामे लवकरच सुरु होत आहेत. या कामांची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह केली.मुख्य बिबवेवाडी ते गुरुराज सोसायटी भगली हॉस्पिटल समोरील रस्ता, महेश सोसायटी चौकातील कल्व्हार्ड कामाबाबत, बिबवेवाडी मुख्य रस्ता, डॉल्फिन चौक, गंगाधाम उड्डाणपूल, गंगाधाम चौक तसेच आई माता मंदिर येथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून, अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला.

दरम्यान बिबवेवाडी मुख्य रस्त्याचे काम १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनादेखील विकास ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी पथ विभाग प्रमुख विजय कुलकर्णी, बिबवेवाडी येथील सहाय्यक महापालिका आयुक्त प्रकाश पवार, अमर शिंदे, ड्रेनेज उपअभियंता सुनील अहिरे, उपअभियंता देवेंद्र पाथरे, मालमत्ता विभाग उपअभियंता राजेश जाधव, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाप्पू खेंगरे तसेच इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पुणे, दि. २४: येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी व कर्मचारी यांची मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे संचालक परवेज बिलिमोरिया, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते.

सुधारणा व पुनर्वसन या धोरणा अंतर्गत कारागृहातील बंद्यांकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून बंदी तसेच कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात आले. तसेच चष्मा आवश्यक असलेल्या बंद्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरात एकूण १५९ बंद्यांची तसेच २५ कारागृह कर्मचाऱ्यांनी या नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
00000

औंध , बोपोडीतील विद्यार्थीशाळाप्रवेशापासून वंचित राहू नयेत

पालिका आयुक्तांकडे
आमदार शिरोळे यांची मागणी

पुणे – काही संस्थांनी चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी झटकल्याने बोपोडी, चिखलवाडी आणि औंध मधील विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळा प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे आज (बुधवारी) केली आहे.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील चिखलवाडी येथे महापालिकेची माता रमाबाई आंबेडकर शाळा आहे. या शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग चालविण्याची जबाबदारी पुणे महापालिकेने एका संस्थेकडे दिली होती. परंतु, महापालिकेसोबत काम करण्यासाठी इच्छुक नसल्याचे संबंधित संस्थेने कळविल्याने इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग अचानक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बोपोडी, चिखलवाडी आणि औंध येथील प्राथमिक शाळांमधून माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे समजताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांची भेट घेतली आणि कोणताही विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशीही आमदार शिरोळे यांनी बोलणे केले. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी आमदार शिरोळे यांना दिले.

या भेटीच्या वेळेस आमदार शिरोळे यांचे समवेत माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, आनंद छाजेड आदी उपस्थित होते.

हिंदुजा परिवाराने संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये पाचव्यांदा सर्वात वरचे स्थान पटकावले

मुंबई२४ मे २०२३: हिंदुजा परिवार आणि हिंदुजा ग्रुप या १०८ वर्षांची समृद्ध परंपरा पुढे चालवत असलेल्याकित्येक बिलियन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे सह-अध्यक्ष श्री. गोपीचंद हिंदुजा यांनी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये ३५ बिलियन पाउंडसह सर्वात वरचे स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये युनायटेड किंग्डममध्ये राहणाऱ्या टॉप १००० व्यक्ती किंवा परिवारांच्या निव्वळ संपत्ती रँकिंग्सचे संकलन करून त्यांच्यापैकी सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा परिवारांची नावे अधोरेखित केली जातात. हे प्रतिष्ठित रँकिंग हिंदुजा ग्रुपने उद्योगजगतामध्ये मिळवलेले लक्षणीय यश दर्शवते.

ऑटोमोटिव्हवित्तऊर्जा आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा परिवाराच्या योगदानामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील मापदंड उंचावले आहेत इतकेच नव्हे तरजागतिक अर्थव्यवस्थेवर त्यांनी स्वतःचा कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्री. एसपी हिंदुजा यांच्या दुःखद निधनानंतर अवघ्या काही तासांत संडे टाइम्स रिच लिस्ट प्रकाशित करण्यात आली. दिवंगत एसपी हिंदुजा आणि जीपी हिंदुजा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि धोरणात्मक मार्गदर्शनाखालीहिंदुजा ग्रुपने विविध उद्योगांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे.

श्री गोपीचंद हिंदुजा यांनी या उल्लेखनीय यशाविषयी सांगितलेप्रतिष्ठित संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळाल्याबद्दल मी व माझा संपूर्ण परिवार मनःपूर्वक आभारी आहोत. माझे माझ्या भावांवर अतिशय प्रेम आहे. आम्हा चौघांची शरीरे वेगवेगळी असली तरी आत्मा एक आहे. हा सन्मान आमच्या परिवाराची उत्कृष्टतेप्रती बांधिलकी दर्शवतो. आम्ही एकजुटीने करत असलेले प्रयत्नआमची अखंड समर्पण वृत्ती आणि हिंदुजा परिवारातील प्रत्येक सदस्याच्या आणि आमच्या संघटनेतील अतुलनीय प्रतिभावंतांच्या उल्लेखनीय क्षमता यांचे हे फलित आहे.”

उद्योगव्यवसायांमध्ये बजावल्या जात असलेल्या दमदार कामगिरीबरोबरीनेच हिंदुजा परिवार हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या परोपकारी उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. शिक्षणआरोग्यसेवा आणि समुदाय विकास यावर लक्ष केंद्रित करत हिंदुजा फाउंडेशनने असंख्य व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणला आहे.

संडे टाइम्स रिच लिस्टमधील इतर धनवंतांमध्ये सर जिम रॅटक्लिफ – २९.६८८ बिलियन पाउंडसर लिओनार्ड ब्लावातनिक – २८.६२५ बिलियन पाउंडडेव्हिड व सायमन रेउबेन आणि परिवार – २४.३९९ बिलियन पाउंडसर जेम्स डायसन आणि परिवार – २३ बिलियन पाउंडलक्ष्मी मित्तल आणि परिवार – १६ बिलियन पाउंड आणि गायजॉर्जअॅलन आणि ग्लेन वेस्टन यांचा वेस्टन परिवार यांचा समावेश आहे.

नगरसचिव पदावर आता योगिता भोसले-निकम

पुणे- विद्यमान नगरसचिव आणि मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर ३१ मे रोजी निवृत्त होत असल्याने आता महापौर कार्यालयातील प्रोटोकॉल अधिकारी म्हणून नवे पद निर्माण करून त्यावर नियुक्त करण्यात आलेला योगिता भोसले-निकम यांची निवड आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरसचिव पदी केली आहे.

पुणे महापालिकेचे नगरसचिव हे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. ते अजूनही भरण्यात आलेले नाही. दरम्यान या पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्याकडे दिला जात आहे. सद्यस्थितीत मुख्य कामगार अधिकारी तथा सहायक आयुक्त शिवाजी दौंडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. दौंडकर हे 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 1 जून पासून या पदाचा अतिरिक्त पदभार राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त यांनी जारी केले आहेत.

महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. जे महापालिका आयुक्तांच्या तोडीचे  हे पद महत्त्वाचे आहे. गेली१० वर्षे या पदावरील अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय घेत पक्षपाती कारभार करत आल्याचा,तर महापौरांच्या हातचं बाहुलं झाल्याचा आरोप वेळोवेळी असलेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आहे. लोकशाहीच्या रक्षणाची आणि कोणतीही गोपनीयता न पाळता पारदर्शक कारभाराची जबाबदारी या पदावर बसलेल्या अधिकाऱ्याकडे असते .  प्रशासनाच्या आणि महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते.  महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्यांचे विषयपत्र प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.  यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.अनिरुद्ध नाईक यांच्यानंतर या महापालिकेला चांगला , वादात न सापडलेला नगरसचिव मिळणे दुरापास्त झाल्याचे दिसले . पुणे महापालिकेचे पूर्ण वेळ नगरसचिव असणारे सुनील पारखी हे नगरसचिव कार्यालयातच कारकून पदावर जॉईन झाले होते त्यांच्या अनुभावानुसार त्यांना नगरसचिव पदाची संधी मिळाली , 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच शेवाळे नामक उप नगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.नगरसचिव कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीलाच शिक्षण आणि सेवा ज्येष्ठता पाहून हि या पदावर संधी द्यायला हवी असा प्रघात आणि प्रवाह असताना ,  नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती.  या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली तरी देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. महापालिकेने प्रभारी पदभार देऊन काम चालवले. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत आहे. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आधार

शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून शासकीय योजनांची माहिती, त्यांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरीता वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना राबवित आहे.

या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ४५९ प्रकरणे मंजूर झाली असून विविध बँकांनी २८४ कोटी ३७ लाख रूपये कर्ज रक्कम ‍वितरीत केली आहे. तर २४ कोटी ३६ लाख रूपये व्याज परतावा महामंडळाकडून दिलेला आहे.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR1)

या योजनेची मर्यादा १० लाख रूपयांवरून १५ लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आली असून महामंडळामार्फत ४ लाख ५० हजार रूपये व्याज मर्यादेत परतावा करण्यात येतो. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त ७ वर्षे व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२ टक्के आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे.

गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR2)

या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन दोन व्यक्तींसाठी कमाल २५ लाख रूपये मर्यादेवर, ३ व्यक्तींसाठी ३५ लाख रूपयांच्या मर्यादेवर, ४ व्यक्तींसाठी ४५ लाख रूपयांच्या मर्यादेवर व ५ व ५ पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ५० लाख रूपये पर्यंतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा १५ लाख रूपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.

महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर www.udyog.mahaswayam.gov.in  अपलोड करीत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

 महामंडळाच्या योजनांकरीता सामाईक अटी व शर्ती

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशांकरीता आहेत. योजनेकरीताची वयोमर्यादेची अट स्त्री-पुरूषांकरीता कमाल ६० वर्षे आहे. लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांच्या आत असावे (८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदारांचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तींक I.T.R. (पती व पत्नीचे). लाभार्थीने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.  दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन  निर्णय  दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ नुसार करण्यात येईल.

योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती

पात्रता प्रमाणपत्र (LOI) करीता महत्त्वाची कागदपत्रे – आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला / लाईट बिल/रेशनकार्ड/गॅस बिल/बँक पास बुक), उत्पन्नाचा पुरावा (उत्पनाचा दाखला/आयटी रिटर्न (जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचं व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल (नमुना वे प्रणालीवर उपलब्ध आहे).

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, LOI समवेत लाभार्थ्याने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते. यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी.

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट सही व शिक्यानिशी). त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण EMI  हफ्ता विहीत कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यमाध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यास अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरूपात वितरीत करण्यात येईल.

या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्याकरीता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती / संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

संकलन –  जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावा,अतिक्रमणे काढा -विक्रम कुमारांचे आदेश

पुणे-रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावा,अतिक्रमणे काढा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे दिले आहेत. पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणे व स्वच्छता विषयक कामे यांना गती द्या असेही त्यांनी म्हटले आहे.

यंदाचे वर्षी श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात सोमवार, दिनांक १२ जून २०२३ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली .यावेळी त्यांच्यासमवेत अति महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे,उपायुक्त (दक्षता विभाग) महेश पाटील,उपायुक्त (घनकचरा विभाग)आशा राऊत, अधिक्षक अभियंता(पाणी पुरवठा विभाग) अनिरुध्द पावसकर, , मुख्य उदयान अधिक्षक अशोक घोरपडे, किशोरी शिंदे, उपायुक्त (परिमंडळ क्र. १), कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, चंद्रसेन नागटिळक, महापालिका सहाय्यक आयुक्त (येरवडा कळस – धानोरी क्षेत्रिय – कार्यालय), संतोष वारुळे, उपायुक्त, संदिप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त ( औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय), रवि खंदारे, महापालिका सहाय्यक आयुक्त (शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय) आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन संबंधितांना पालखीचे आगमनप्रसंगी करावयाच्या नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करणेसंबंधी प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

रस्त्यावरील बेवारस गाड्या तसेच अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याबाबत तसेच पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.पालखी पुणे मुक्कामी असताना विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही याबाबत संबंधितांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी या परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपतकालीन कक्षांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करण्याबाबत आदेशित केलेले आहे. सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओ. आर. एसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांची आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सुचना केलेली आहे.

वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत रहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. सुरक्षेच्या कारणास्तव भवानी पेठेतील मंडपांमध्ये विसाव्याच्या ठिकाणीं सी. सी. टि. व्ही. लावण्याबाबत आयुक्त यांनी सुचित केलेले आहे.

पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करून घेणेस सांगितले आहे. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती रंगविण्यात येणार आहे.पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.

विसाव्याचा ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि गेरसोय होऊ नये याकरिता पालखी दर्शन व्यवस्था व बॅरिकेडस बाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास सांगितले आहे.

पालखी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढणेचे आदेश अतिक्रमण विभागास दिले आहेत.

पालखी सोहळ्यानिमित्त पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग व पालखी तसेच दिंड्यांच्या मुक्कामांची ठिकाणे विचारात घेऊन पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार असून, देखभाल दुरुस्तीकामी २४ तास दुरूस्ती यंत्रणा ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मंडळामार्फत वारकऱ्यांना जेवण / नाश्ता देण्यात येतो त्या ठिकाणीही स्वच्छता राहावी यासाठी पुरेसे कचरा वेचक सेवक उपस्थित ठेवण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पालखी मुक्कामाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत असून विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्या दिंड्या मनपाच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात त्या ठिकाणी पाणीपुरवठा तसेच पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्या बाबत आदेशित केलेले आहे. आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावर तसेच सर्व शाळांमध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात येणार असून फिरती शौचालये ठेवणेत येणार आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

बाणेर – औंध लिंक रोडवर बांधकाम आणि अतिक्रमणची पुन्हा धडक कारवाई

पुणे- बाणेर येथील बाणेर – औंध लिंक रोड ( मेडि पॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक ) व मुळा नदीचे निळया पूर रेषेतील येथे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली . या अगोदर देखील येथे कारवाई करण्यात आली होती तथापि नागरिकांनी पुन्हा निळया पूर रेषेतील यापुर्वी पाडलेली बांधकामे व नव्याने बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने या रोडवर पुन:श्च कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई मधे सुमारे ६७,०००चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता – श्री. युवराज देशमुख,सह महापालिका आयुक्त – श्री. खलाटे,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – मा. श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली,उप अभियंता – श्री. निवृत्ती उतळे,,कनिष्ठ अभियंता – श्री. संदेश कुवळमोडे, श्री. अजित सणस, श्री. विश्वनाथ बोटे, श्री. डी. एन. जगताप,आरेखक – श्री. नविन महेत्रे,टूलीप इंजिनियर-सुरज शिंदे, प्राची सर्वगोड
दोन अतिक्रमण निरक्षक व स्टाफ,पोलीस निरीक्षक – श्री. राजू अडागळे , श्री. राजकुमार केंद्रे
व स्टाफ यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, एक अग्निशमन व्हॅन, एक क्रेन, १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.