एकेका पथारीवाल्याकडून महिना १५ हजाराची वसुली भाड्याच्या नावाने करतोय कोण ? याची चौकशी स्थानिक पोलीसाकरवी का करत नाहीत ?
पुणे- रस्तोरस्ती पथारीवाले ज्या दुकानाच्या समोर,बाजूला बसतात अशा मागील दुकानदारांना त्यांच्या समोर असलेल्या महापालिकेची जागा वापरण्यास देऊन महापालिकेच्या जागेचे भाडे बेकायदेशीरपणे वसूल करत असताना,त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई कधीही झाली नाही, काही ठिकाणी तर माजी नगरसेवक महापालिकेच्या जागांवर बिनधास्तपणे पथारीवाल्यांना सुरु करा धंदा सांगून त्यांच्याकडून दरमहा हप्ते गोळा करत आहेत.यांच्यावर कधीही कानाडोळा न करणाऱ्या आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे खरोखर काढायची कि नाही काढायची याबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने आता यापुढे महापालिकेतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाला काम करणे म्हणजे फक्त पाट्या टाकणे एवढेच करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माधव जगताप यांच्याकडील ४० टक्के कार्यभार काढला .
वारंवार कारवाई करूनही पुढे पुन्हा पुन्हा उभ्या ठाकणाऱ्या अतिक्रमणांवर कडक कारवाईचे धोरण घेताना एका व्हायरल व्हिडीओ ने अडचणीत आणलेल्या अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्याकडील परिमंडल १ व परिमंडल २ येथील कार्यभार काढून तो आयुक्त कार्यालयातील राजू नंदकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर परिमंडल ३,४ आणि ५ येथील अतिक्रमण निर्मूलनाचा कार्यभार मात्र जगताप यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.या मुळे आयुक्तांची भूमिका ठाम नसल्याचे स्पष्ट झालेआहे.राजू नंदकर यांच्याकडे मोटार वाहन,प्राथमिक शिक्षण,माध्यमिक व तांत्रिक शिक्षण,आणि प्रशिक्षण प्रबोधिनी यांचाही काय्भर सोपविण्यात आल्याने अतिक्रमण निर्मूलनाचे नेमके काय होणार ? हा प्रश्नच आहे. तर माधव जगताप यांच्याकडे ३/४/५ परिमंडळातील अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी असताना आकाश चिन्ह परवाना विभाग आणि सुरक्षा विभागाची जबाबदारी सुद्धा आहे .
महापालिका आयुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीशी भक्कम उभे नाहीत ?
अतिक्रमण अधिकारी,कर्मचारी यांना कारवाई करताना मोठ्या रोषाला आणि संतापला सामोरे जावे लागते अशा वेळी महापालिका आयुक्त जर..अशी..तशी भूमिका घेऊन स्पष्ट ठाम भूमिका घेणार नसतील तर हे कर्मचारी आता यापुढे कशा पद्धतीने कारवाई करतील हे सांगणे नको.हाताने नौकरीवर गदा आणि बदनामी सहन करण्यापेक्षा..चाललेय ते चालू देत,आमचेही भरा आणि तुमचेही भरा.शहराचे होऊ द्यात काय व्हायचे ते अशी धारणा बोकाळते हे वारंवार दिसून आले आहे.राजीव अग्रवाल, अरुण भाटिया अशा फार कमी आयुक्तांची नावे घेता येतील ज्यांनी ठाम भूमिका घेऊन बड्याबड्या धेंडांची देखील अतिक्रमणे उध्वस्त केली होती.. हे काय करणार.ते काळानेच स्पष्ट केले आहे…