Home Blog Page 1518

उपमुख्यमंत्री रामदेवबाबाच्या वक्तव्याशी सहमत आहेत काय ? राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांचा सवाल

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने

पुणे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर बाबा रामदेव यांच्या वक्तव्याशी सहमत नसतील तर त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

कथीत योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “बाबा रामदेव – बाबा कामदेव” ,”बाबा रामदेव चा धिक्कार असो” , महिलांच्या सन्मानात……राष्ट्रवादी मैदानात” या घोषणा महिला भगिनींच्या वतीने करण्यात आल्या.या आंदोलप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख,अर्चना कांबळे मुणालीनी वाणी,किशोर कांबळे , संतोष नांगरे , वैष्णवी सातव स्वाती चिटणीस, विनोद पवार प्राजक्ता जाधव विपुल मैसूरकर , सुशांत ढमढेरे , अर्जुन गांजे, शिवाजी पाडाळे ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले,’ भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीचे आदिशक्ती आणि देवी म्हणून पूजन करतो. स्त्री शक्तीचा जागर व सन्मान हा फक्त नवरात्री पुरता किंवा महिला दिनापुरता मर्यादित विषय नसून ३६५ दिवस स्त्रियांचा सन्मान राखणे त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक देणे, हीच यापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण आहे. परंतु दुर्दैव असे की महाराष्ट्रात बाबा रामदेव सारखा भोंदू बाबा या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी मध्ये महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीचे विधान करतात.

जगताप पुढे म्हणाले,’ ठाण्यामध्ये रामदेव बाबा यांनी तमाम माता-भगिनींच्या पोशाखाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीर निषेध करतेहे त्यांच्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन घडवणारे वक्तव्य होते. याच्यापेक्षा सर्वात धक्कादायक बाब आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे , असे म्हणत अमृता फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेल्या असताना तसेच अनेक माता भगिनी समोर बसलेल्या असताना काल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले, असे होत देखील असताना अमृता फडणवीस शेजारी बसून हसत होत्या.

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

0

मुंबई, दि. २६ : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन संचलन कार्यक्रमास मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सर्वं उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली.

000

ग्राहकांना सर्वोत्तम  सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाचीनियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

0


नागपूर, दि. २६ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या वीज ग्राहकांना ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल व ग्राहकांनी  वापरलेल्या वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच असून संबंधित अधिकाऱ्यांनी यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी असे निर्देश  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नागपूर प्रादेशिक विभागातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. 
ऊर्जाक्षेत्रात पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. आता वीज खरेदीचे पैसे नियमीत द्यावेच लागतात. ते न दिल्यास महावितरणला मिळणाऱ्या विजेत कपात केली जाऊ शकते. त्यामुळे महावितरणला वीज निर्मिती कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे तातडीने व नियमित  देणे गरजेचे असते. महावितरणला मिळणाऱ्या कर्जावरही मर्यादा आली आहे. ही सर्व वस्तुस्थिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या वस्तुस्थितीची जाणीव ग्राहकांनाही करून देणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांशी सातत्याने संवाद साधा असे निर्देश विजय सिंघल यांनी बैठकीत दिले. 
ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याची सवय लावण्याची गरज आहे. ग्राहक मोबाईल,केबल टीव्ही सारख्या इतर कंपन्यांचे बिल भरणे टाळत  नाही.महावितरणचे वीज बिल भरणे मात्र टाळतात.अशा ग्राहकांकडे महावितरणच्या वीज बिलाची अजिबात थकबाकी राहणार नाही  यासाठी नियमितपणे वसुली मोहीम राबवा,वीजचोरी विरुद्ध कठोरपणे कारवाई करा असेही निर्देश त्यांनी या आढावा बैठकीत दिले. 
या बैठकीमध्ये नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंते सर्वश्री सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर),अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता  उपस्थित होते.

दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा “एकदा काय झालं” हा कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्याची अनोखी पद्धत सांगणारा चित्रपट

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

मुलांसाठीच्या   मराठीतल्या  अनेक कथा, “एकदा काय झालं..’ या उद्गारांनी सुरु होतात. संगीतकार,गायक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटाचे हेच शीर्षक देखील, आपल्यासमोर अशीच एक सुंदर कथा सादर करते. फरक इतकाच, की ही कथा केवळ लहान मुलांसाठी नाही, तर मोठ्ठ्या माणसांसाठी पण आहे.

53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला चित्रपट, “एकदा काय झालं” ही अशा एका व्यक्तीची कथा आहे, जो एक वेगळी शाळा चालवत असतो. त्याला असा विश्वास असतो, की कथेच्या माध्यमातून आपण जगातला कोणताही विचार, इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, मग तो विचार कितीही मोठा असू देत किंवा लहान. त्याच्या या शाळेत- जिथे त्याचा मुलगाही शिकत असतो- तो  सगळे विषय कथेच्या माध्यमातूनच शिकवत असतो. जेव्हा त्याच्या आयुष्यात एक अत्यंत कठीण प्रसंग येतो, आणि त्याला त्याविषयी आपल्या मुलाला सांगायचं असतं, तेव्हाही तो, कथेच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या आपल्या तत्वज्ञानाचाच वापर करतो.

इफ्फीच्या ‘टेबल टॉक्स’ या पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या  संवाद सत्रात, माध्यमे आणि महोत्सवातील प्रतिनिधींना या चित्रपटाविषयी माहिती  देतांना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, ‘आपण प्रौढ लोक अनेकदा असे गृहीत धरतो की त्यांनी मुलांना काही सांगितलं तर मुलं त्यावर अमुकतमुक पद्धतीनं प्रतिक्रिया देतील. पण एखादी अवघड परिस्थिती किंवा प्रसंग कसा हाताळायचा हे मोठ्या माणसांनाच कठीण जात असेल,  तर अशावेळी त्या परिस्थितीविषयी मुलांना कल्पना देणं आणखी अवघड होऊन बसतं. या चित्रपटातून, मुलांना चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी कशा वेगळ्या पद्धतीने, हळुवारपणे सांगता येतील, हे उलगडून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. यावर मुलं नेमकी कशी प्रतिक्रिया देतील,असलं काहीही गृहीत न धरता, गोष्टी त्यांना सांगण्याचा मार्ग यातून दाखवला आहे.”

आपला हा चित्रपट, 53 व्या इफ्फीमधे निवडला गेल्याबद्दल, डॉ सलील कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला. हा चित्रपट बघून प्रेक्षकांच्या ओलावलेल्या डोळ्यांकडे पहिल्यावर मन हेलावून गेले, असे ते म्हणाले. लता मंगेशकर यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करतांना त्यांना अनुभव आला, तोच अनुभव इथे घेतल्याचं सांगत या दोन्ही प्रसंगी, आपलं मन भरून आल्याचं त्यांनी सांगितलं.

स्वतः संगीतकारही, असलेल्या डॉ कुलकर्णी यांनी या चित्रपटाला संगीत देण्याचा आपला अनुभव यावेळी शेअर केला. ते म्हणाले, की ही गाणी कशी चित्रित होणार आहेत, हे त्यांनाच व्यवस्थित माहिती होतं त्यामुळे, त्यांचं संगीत दिग्दर्शन करणे अतिशय कठीण काम होतं. “कारण, जेव्हा इतर लोक ते गाणं चित्रित करतात, तेव्हा त्यात तुमच्यासाठी काहीतरी विस्मयकारक असतं-कधी खूप छान अनुभव येतो, तर कधी अपेक्षेपेक्षा वेगळा!” असे ते पुढे म्हणाले.

चित्रपट निर्मितीविषयीचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करतांना सलील कुलकर्णी म्हणाले, की मी असं ठरवलं आहे, की माझ्या चित्रपटात कोणी खलनायक नसेल. “आपल्याला आधीच खूप समस्या आहे; त्यामुळे आपल्याला वाईट लोकांची गरज नाही. परिस्थितीच कधीकधी वाईट होत असते, तेवढं पुरेसं आहे.” असं मत त्यांनी वव्यक्त केलं.

आपल्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड कशी केली, हे सांगतांना,  सलील कुलकर्णी म्हणाले, की त्यांनी, लहान मुलांच्या भूमिकेसाठी निवड करतांना 1700 पेक्षा जास्त मुलांची ऑडीशन घेतली, आणि, त्यानंतर अर्जुन पूर्णपात्रेची निवड केली, त्याने या चित्रपटात चिंतन ची भूमिका साकारली आहे. सुमित राघवनने यात चिंतनच्या वडिलांची तर उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी आईची भूमिका केली आहे.

आपल्या या भूमिकेविषयी बोलतांना सुमित राघवन ने सांगितलं की जेव्हा सलील कुलकर्णी यांनी त्यांना ही पटकथा ऐकवली, तेव्हा लगेचच त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला, कारण, अशा इतक्या उत्तम पटकथा अभिनेत्यांच्या वाट्याला नेहमी नेहमी येत नाहीत.

एक अभिनेता म्हणून, भूमिका निवडण्याचा आपला विचार सांगतांना सुमित राघवन म्हणाले, की जरी आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता असतांनाही, उत्तम संहिता किंवा उत्तम भूमिकेसाठी, वाट बघणे मला आवडतं. “मला नेहमीच असं वाटत आलं आहे, की अभिनेत्याच्या कारकीर्दीचा काळ मर्यादित असतो. पण आपल्या कामासाठी संयम ठेवून वाट बघण्यावर माझा विश्वास आहे. आणि जेव्हा अशा उत्तम चित्रपटात काम करण्याची संधी मिळते, तेव्हा हा विश्वास अधिकच दृढ होतो.”

मुलांसाठी डॉ सलील कुलकर्णी करत असलेल्या कामाचं कौतूक करत, सुमित राघवन म्हणाले, “ सलीलला मुलांची नाडी अचूक ओळखता येते. अनेक वर्षांपासून तो मुलांसोबत काम करतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल, सुमित यांनी सांगितलं की, “चित्रपटाचा विषय अत्यंत सार्वत्रिक आहे त्यामुळे कोणीही स्वतःला त्या व्यक्तिरेखांमध्ये बघू शकतो. त्यात चित्रपटातले सगळे कलाकार अतिशय उत्तम असल्याने चित्रपट उत्तम बनला आहे. या चित्रपटाने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षक परीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.”

53 व्या इफफीमध्ये, भारतीय पानोरमा विभागात, ‘एकदा काय झालं’ चित्रपट आज, म्हणजे 26 नोव्हेंबर 2022 ला दाखवला गेला.

‘पीएमपीएमएल’ च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत “संविधान दिन” साजरा

पुणे-
भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता दरवर्षी २६
नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो. आज दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पीएमपीएमएलच्या
मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून “संविधान दिन” साजरा करण्यात
आला. पीएमपीएमएलचे अधिकारी तसेच अॅडमिन व सेंट्रल वर्कशॉप विभागातील कर्मचारी यांनी संविधानाच्या
प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती
शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांनी भारतीय संविधानाचे महत्व व
संविधानाने सामान्य नागरिकांना दिलेले अधिकार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पीएमपीएमएलचे चिफ
ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) श्री. दत्तात्रय झेंडे, झोनल मॅनेजर श्री. राजेश कुदळे, डेप्युटी चिफ मॅनेजर (अॅडमिन) श्री.
सुभाष गायकवाड, कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे, स्टोअर ऑफिसर श्री. चंद्रशेखर कदम, मार्केटयार्ड
डेपो मॅनेजर श्री. नारायण भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संविधानाची निर्मिती करून आपल्याला मूलभूत हक्क व त्यांचे रक्षण करण्याचा अधिकार देवून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केले आहे असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)
श्री. दत्तात्रय झेंडे यांनी केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दत्तात्रय झेंडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून संविधान दिनानिमित्त आयोजित
कार्यक्रमाचा समारोप केला.

अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

 ‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन ही कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी, रंगभूमी, दूरचित्रवाणीवरील आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते, असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला. अभिनयात ‘निशब्द-निश्चल’अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणाऱ्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणाऱ्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मालिका क्षेत्रदेखील गाजवले. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

0

मुंबई, दि. 26 : २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे २६/११ हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यासह देशाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वार झालेला हल्ला आहे. हा हल्ला परतविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दलातील वीर शहिदांप्रती सहसंवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.  आज आपण मोठ्या संख्येने येथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत, असे ते म्हणाले.

ज्या समाजात वीरांचा सन्मान होतो तोच समाज प्रगती करतो. पोलीस, सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही समाजात वावरतांना अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत सुरक्षिततेच्यादृष्टिने नेहमी सतर्क राहिले पाहिजे.  या निमित्ताने आपण सर्वजण सदैव सतर्क राहण्याचा  निर्धार  करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्र्यांकडून कमांडर सुनील जोधा यांचा सन्मान

२६/११  च्या ताज हॉटेलवरील हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या नेतृत्त्वात झालेल्या ऑपरेशनमध्ये कमांडर सुनील जोधा यांनी 7 गोळ्या अंगावर झेलून ताज हॉटेलमधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्‍न केले होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सुनील जोधा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कमांडर श्री.जोधा यांनी आजही एक गोळी त्यांच्या शरीरामध्ये असल्याचे  यावेळी सांगितले.

शहीद पोलीस अधिकारीकर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई शहीद दौड

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई मशालीसह ‘शहीद दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील सुमारे 25 तरुणांनी या हल्यातील शहिदांना या वेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली वाहिली. २६/११  च्या हल्ल्यातील शहिदांसाठी केलेल्या या विशेष उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तरुणांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करा : रमेश बागवे,मोहन जोशी,आबा बागुल यांची मागणी

पतंजली दुकानासमोर काँग्रेसची तीव्र निदर्शने
पुणे : भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी वक्तव्ये आणि महिलांचा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या रामदेवबाबा यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले. तसेच रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत लाजिरवाणे विधान रामदेव बाबा यांनी केले. फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेऊन रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रमेश बागवे, मोहन जोशी,आबा बागुल यांनी केली.

महिलांविषयी असभ्य आणि विकृत उद्गार काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने मुकुंदनगर येथील पतंजली दुकांनासमोर तीव्र निदर्शने शनिवारी करण्यात आली. रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला चपला आणि बांगड्यांचा हार घालण्यात आला. काळी शाई फासून निषेध करण्यात आला. आधुनिक दुर्योधन रामदेवबाबाचा निषेध असो, नारी शक्तीचा अवमान करणाऱ्या बाबावर बहिष्कार घाला, अशा घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.या निदर्शनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे,प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अभय छाजेड, आबा बागुल, रमेश अय्यर, प्रवीण करपे, प्रशांत सुरसे, चेतन आगरवाल,अक्षय जैन, रोहन सुरवसे पाटील,सुरेश कांबळे, विश्वास दिघे, स्वाती शिंदे, पल्लवी सुरसे, सीमा महाडिक, अनुसया गायकवाड, अंजली सोलापुरे, सोनिया ओव्हाळ, आयेशा शेख, मनीषा सुपकडे, पपिता सोनवणे, बेबी ताई राऊत, योगिता सुराणा आदी सामील झाले होते.

बाबा रामदेव यांनी आपली संकुचित आणि विकृत मनोवृत्ती वेळोवेळी दाखवली आहे. या बेताल बाबांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या पतंजली उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे तरच त्याला आळा बसेल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

रामदेव बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा:तृप्ती देसाईंची मागणी

महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर सुमोटो अ‌ॅक्शन घेत महिला आयोग, सरकार आणि पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, योगगुरू रामदेव बाबा यांचे महिलांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, महिला साडी नेसली की छान दिसतात. ड्रेस घातला की छान दिसतात आणि त्यांच्या नजरेने पाहिले, तर महिलांनी काहीही घातले नाही, तरी त्या छान दिसतात. तुम्ही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुमोटो अ‌ॅक्शन घेऊन महिला आयोग, सरकारने आणि पोलिसांनी त्यांचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

स्टेजवर जाब विचारणार

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, रामदेव बाबांबरोबर स्टेजवर जे लोक होते किंवा खाली जे लोक होते, अशा वक्तव्यानंतर ते हसतात. महिलांवर होणारे विनयभंग, बलात्कार यासारख्या ज्या घटना आहेत त्यानंतर मेणबत्त्या जाळणारे मोठ्या व्यक्तींना जेव्हा पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत लाजीरवाणे आहे. मला रामदेव बाबांना सांगायचे आहे की, त्यांनी महिलांना लज्जा उत्पन्न होईल असेच वक्तव्य केले आहे. त्यामागे नेमके तुमचे काय कारण होते, तुम्हाला काय म्हणायचे होते, याचे स्पष्टीकरण जर नीट मिळाले नाही, तर तुमच्या कार्यक्रमात स्टेजवर येऊन मी जाब विचारणार असल्याचा इशारा दिला.

अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?:सणसणीत कानाखाली द्यायला पाहिजे होती, रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊत संतापले

ठाण्यातील महिलांच्या एका कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रामदेवबाबांनी महिलांबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्या गप्प कशा बसल्या? असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसल्या पाहिजेत.

रामदेवबाबांचे नेमके वक्तव्य काय?

“माझ्यासारखा आपण (महिला) काहीही परिधान केले नाही तरीही चांगले दिसतात!”, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले होते. त्यावरून रामदेवबाबांवर आता टीका करण्यात येत आहे.

ऐकून कसे घेतले?

खासदार संजय राऊत म्हणाले, रामदेवबाबांनी केलेले विधान अतिशय लज्जास्पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरे तर मुख्यमंत्रीच आहेत. त्यांच्या पत्नी अमृता वहिनीदेखील रामदेवबाबांच्या या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांनी हे वाक्य ऐकून कसे घेतले? एकीकडे महिला रक्षण, सबलीकरणाच्या गप्पा करता, यावर ज्ञान पाजळता. दुसरीकडे, असंख्य महिलांसमोर भगव्या वस्त्रातील एक जण महिलांचा असा अपमान करतो. असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या कानाखाली बसली पाहीजे.

जीभ दिल्लीला गहाण ठेवली

मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगलीतील काही गावांवर दावा केला, तेव्हाही शिंदे शांत बसले. आता भाजपचे प्रचारक असलेले रामदेवबाबा महिलांविषयी त्यांच्याच जिल्ह्यात अभद्र बोलत आहेत. तरीही शिंदे काही बोलत नाहीत. त्यांनी जीभ दिल्लीला गहाण ठेवली आहे का?

३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला यंदा ३५ लाख रुपयांची बक्षिसे

पुणे-३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी ’नाईट मॅरेथॉन‘ म्हणून संपन्न होत असून, ४२.१९५ कि.मी. च्या या मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटूंना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनची पूर्वतयारी पूर्ण होत आली असून सुमारे १५,००० हून अधिक महिला व पुरुष धावपटूंचा सहभाग यंदा या मॅरेथॉनमध्ये असेल. तसेच ८० हून अधिक परदेशी महिला व पुरुष धावपटूंचा देखील सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, या मॅरेथॉनच्या आयोजनातील विविध विभागांचे प्रमुख, तांत्रिक अधिकारी, पंच, डॉक्टर्स, नर्सेस, व्हॉलेंटिअर्स, रायडर्स इत्यादींच्या बैठका नियमीतपणे होत असून यंदाच्या मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण पुण्याचे ज्येष्ठ ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अक्कोटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, गेम डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट डायरेक्टर रोहन मोरे आणि जॉइंट डायरेक्टर गुर्बंस कौर उपस्थित होते. गुरुवार १ डिसेंबर पासून परदेशी धावपटूंचे आगमन होण्यास सुरुवात होणार असून, १ डिसेंबर पासून ३ डिसेंबर दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सहभागी धावपटूंना घळीं देण्यात येणार आहे. यामध्ये चेस्ट क्रमांक, बॅग, टी-शर्ट, रनर्स चिप इत्यादी दिले जाईल.

ते पुढे म्हणाले की, या मॅरेथॉनच्या वेळी आवश्यक वैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यासाठी सर्व सहभागींची व्यापक बैठक कालच घेण्यात आली असून, या वैद्यकीय सुविधेत मॅरेथॉनच्या मार्गावर क्रमांक १०८ यंत्रणेतील १५ अ‍ॅम्ब्युलन्स, सुमारे २०० डॉक्टर्स, २०० अधिक नर्सेस यांचा समावेश असेल. यामध्ये संचेती हॉस्पिटल, सिम्बॉयोसीस, काशीबाई नवले फिजिओथेरपी सेंटर, भारती विद्यापीठ, चखढ कॉलेज ऑफ नर्सेस यांचा मोठा सहयोग लाभला आहे. अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर्सही यामध्ये सहभागी असून, त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. सणस गाऊंड येथे १ डिसेंबर पासून मीनी हॉस्पिटल्स व फिजीओ थेरपी सेंटर उभारले जाणार आहेत.

प्रत्यक्ष मॅरेथॉनच्यावेळी धावपटूंना मार्गदर्शन करणारे रायडर्स यांची रिअर्सल पुर्ण झाली असून, संपुर्ण मार्गावरील स्पॉट, एल.इ.डी लाईटस् यांच्या जागा आदिही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पोलीस व वाहतूक पोलीस यंत्रणांबरोबर बंदोबस्त व समन्वय साधण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून, या नाईट मॅरेथॉनला देखील दरवर्षी प्रमाणे मोठा प्रतिसाद लाभत आहे. पुणेकर नागरिकांनी देखील या पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गावर धावपटूंचे स्वागत मोठ्या प्रमाणात करावे असे आवाहन अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले.

पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना 

सारसबागेत चित्रकलेतून ११ हजार चिमुकल्यांनी  वाहिली आदरांजली
पुणे :  जो शहीद हुए है उनकी, जरा यॉंद करो कुर्बानी… या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही मोठया संख्येने सारसबागेत जमले. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या ठेक्यामध्ये मानवंदना देत त्यांच्या हौताम्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांनी दिलेली मानवंदना अनुभवताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि भारत माता की जय…चा जयघोष करुन पोलिसांसह उपस्थित नागरिकांनी अशा दहशतवादी शक्तींचा सामना करण्याकरीता एकत्र राहण्याचा निर्धारही केला. पोलिसांसह ११ हजार शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना चित्ररुपी श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, रामनाथ पोकळे, स्मार्तना पाटील, संदीपसिंह गिल, विक्रांत देशमुख, श्रीनिवास घाडगे, आर. राजा, सुषमा चव्हाण, आर.एन.राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, श्रीहरि बहिरट, सोमनाथ जाधव, संगीता यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे यांसह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, शिरीष मोहिते, अ‍ॅड. सुभाष मोहिते अध्यक्ष पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, राजाभाऊ कदम, प्रताप निकम, सूर्यकांत पाठक, अ‍ॅड. शिरीष शिंदे, बाळासाहेब अमराळे यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. 


स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी संविधान वाचन केले. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यासोबतच जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर व पर्यावरण जागृतीच्या कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभाग घेणा-या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सर्वाधिक मुलांच्या सहभागाबद्दल श्री विजय वल्लभ शाळेचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीष चरवड, संदीप गायकवाड, गोपाळ परदेशी, नितीन होले, शेखर देडगावकर, मनोहर जाधव, प्रा. सागर पानसरे, विनोद क्षीरसागर, कृत्रिका मोहिते यांनी केले. मंडळाचे तन्मय तोडमल, अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, अ‍ॅड. हेमंत झंजाड, सागर पवार, जगदीश शेटे, अजय पंडित, लाला परदेशी यांनी संयोजनात सहभाग घेतला. पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांसाठी खाऊची व्यवस्था करण्यात आली होती.

* चित्रकला स्पर्धेचा निकाल :-
अ गट (इयत्ता १ली ते २री) – रियांश शिंदे, संचित मगर, ज्योशवा ठोभारे, आर्यन दगडे, मारुश सय्यद, प्रांजवी काळे, ब गट (इयत्ता ३री ते ४ थी) – अलभिष सय्यद, अंकिता केंजळे, स्वरा भोकरे, रिद्धी झिंगाडे, तन्मय शिंदे, मनस्वी येनपुरे, क गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) – राहिन कच्छी, मोईन शेख, पूर्वा पोळ, सानिका भागवत, पूनित वड्डीपेल्ली, तनय घाडगे, ड गट (इयत्ता ८वी ते १० वी) – मिलिंद घाटे, प्राची सतवानी, भाग्येश मचकूरी, पूजा ढिर, रिद्धी गर्जे, अभिश शेख, , खुला गट – निकीता श्रीसुंदर, दिपाली दगडे, वैष्णवी पवार.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ‘संविधान सन्मान दौड’ चा शुभारंभ

पुणे, दि.२६: भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अविनाश महातेकर, कर्नल विजय कुमार, कर्नल मुखर्जी आदी उपस्थित होते.

यावेळी संविधनातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवान तर आर्मीचे साठ जवान सहभागी झाले होते.

संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे – चंद्रकांत पाटील

भारताच्या संविधानाबाबत प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. नवीन शिक्षण पद्धतीत सर्व अनुकूल बदलांचा समावेश असेल असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, संविधानाने आपल्याला दिलेल्या ताकदीचे आकलन करून त्याचा उपयोग आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा. संविधानाने आपल्याला जो विचार दिला आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे.

अमिताभ गुप्ता म्हणाले, आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी संविधान अभ्यासतो, ही संविधानाची ताकद आहे. या दौडमध्ये सहभागी झालेल्यांनी आपले शारीरिक स्वास्थ सुदृढ ठेवावे.

यावेळी अनुक्रमे १०, ५ व ३ किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. कार्यक्रमाला आर्मी व सदर्न कमांडचे सहकार्य लाभले.

अखेर विक्रम गोखले यांची एक्झिट ..

पुणे- मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या १७ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय.
जन्म. ३० ऑक्टोबर १९४५
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक होते विक्रम गोखले!
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले होते. तसेच रंगभूमीवर पण त्यांनी एक मोठा काळ गाजवला.पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले.
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना विजया बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. २०१० मध्ये त्यांनी आघात या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या #अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत असत. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं.
सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केले होते.
 दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला होता. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात.
कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यांनी काही काळा पुर्वीदोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला होता. वडिल चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
२०१६ मध्ये राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे विक्रम गोखले यांना ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व धर्मिय प्रार्थना वसंविधानाची शपथ घेऊन ‘‘संविधान दिन’’ साजरा.

पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘‘संविधान दिन’’ निमित्त सर्व धर्मिय प्रार्थना व संविधानाची शपथ घेण्यात आली.

      यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संविधानाने या देशामध्ये सर्व धर्मिय लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये संविधानाने सरकार स्थापन झाल्यानंतर हे संविधान सांभाळण्याचे काम व संविधानाने देश चालविण्याचे काम हे काँग्रेस पक्षाने केले. महात्मा गांधींच्या दूरदृष्टीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगविख्यात विद्वानाने या देशाची घटना तयार करून या देशाच्या जडण घडणीला सुरूवात केली. आज सर्वधर्मांचे ग्रंथ जेवढे पवित्र आहेत त्याचपध्दतीने संविधानालाही सर्वधर्मिय ग्रंथ म्हणून पुजले गेले पाहिजे. संविधान हा या भारताचा आत्मा असून यासाठी सर्व देशातील देशप्रेमींनी एकत्र येऊन जाती पाती व धर्मा धर्मातील द्वेष विसरून देशाच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. हेच खरे संविधान वाचविण्यासाठीचे उचित कार्य ठरेल.’’ 

      यानंतर हिंदू धर्माचे वेदमूर्ती श्री. गणेश कुलकर्णी, बौध्द समाजाचे भन्ते संघपाल, ख्रिस्ती समाजाचे पास्टर पीटर जार्ज, शिख धर्माचे ग्यानी सुखवीरसिंग व मुस्लिम धर्मचे मौलाना मुफती अहमद हुसेन काझमी यांनी सर्व धर्मिय प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद यांनी मानले.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, पुजा आनंद,  लता राजगुरू, अजित दरेकर, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, रजनी त्रिभुवन, मेहबुब नदाफ, राजेंद्र शिरसाट, शिलार रतनगिरी, सुजित यादव, राहुल शिरसाट,द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, भरत सुराणा, अरूण कटारिया, विठ्ठल गायकवाड, अन्थोनी जेकब, रजिया बल्लारी, गुलाम हुसेन, लतेंद्र भिंगारे, अजय खुळे, भगवान कडू, बाळू कांबळे, दिलीप लोळगे, विल्सन चंदेलवेल, प्रकाश पवार, मुन्ना खंडेलवाल, फिरोज शेख, सचिन सुडगे, दयानंद तानवडे, रमाकांत साठे, साजिद खान, जॉन्सन हिरे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.