Home Blog Page 1488

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून सुसंस्कृत युवा पिढी राजकारणात येईल – विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

0

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून  मिळालेल्या ज्ञानाद्वारे राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवा पिढी राजकारणात येईल. ही युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  व्यक्त केला.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री.दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ सभागृह व विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे कायदे केले जातात. या सभागृहांचे प्रतिनिधित्व करण्याची अनेकांची इच्छा असते. आपले द्विसभागृह अमेरिका, इंग्लड येथील सभागृहाप्रमाणे समन्वय साधण्याचे काम करीत असतात. दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. कनिष्ठ सभागृहात एखादा कायदा करताना त्यामध्ये काही सूचना, बदल वरिष्ठ सभागृह सुचविते. त्यानंतर पाठिंबा दिला जातो. त्याबाबत कुठलीही कटुता ठेवली जात नाही. हे राज्यातील द्विसभागृहाचे वैशिष्ट्य असल्याचे श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.दानवे यांनी विधानपरिषदेतील आजी माजी ज्येष्ठ व श्रेष्ठ सदस्यांचा त्यांच्या कामकाजाबाबतचा उल्लेख केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.दानवे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.दानवे यांचा परिचय करुन दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.गायत्री डुकरे-पाटील यांनी आभार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर…

उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल-मंत्री शंभूराज देसाई

पुणे – नागपूरचे राज्यविधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा सुरू झालीय.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळाप्रकरणी ‘आयएल’ दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

दिशा सालियानप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, फडणवीस यांनी दिशा सालियानप्रकरणी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर सोमवारी हक्कभं प्रस्ताव आणण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल-मंत्री शंभूराज देसाई

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल, अशी घोषणा केलीय.

पुणे आरटीओ ची कार्यवाही अतिरेकी :रॅपिडोचा दावा

पुणे- पुणे आर टी ओ ने आमच्या विषयी केलेली कार्यवाही हि अतिरेकी आणि अस्वीकार्य व न्यायालयाने जारी केलेल्या संरक्षणात्मक आदेशात हस्तक्षेप करणारी आहे असा दावा रॅपिडो च्या वतीने माध्यमांकडे करण्यात आला आहे .

रॅपिडोच्या प्रवक्त्याने सांगितले कि,’पुणे आरटीओकडून आम्हाला ऑर्डर मिळाली आहे आणि या अस्वीकार्य आदेशाला विरोध करण्यासाठी कायदेशीर पर्यायांसह सर्व पर्यायांवर आम्ही विचार करत आहोत. रोज प्रवास करणाऱ्या लाखो पुणेकरांना वाहतुकीची सुविधाजनक, सक्षम आणि किफायतशीर पद्धत उपलब्ध करवून देण्याच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५७००० रॅपिड कॅप्टन्स व त्यांच्या कुटुंबियांना उपजीविका प्रदान करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अनुसरून आम्ही पुढील कृती करणार आहोत. आमच्या विरोधात जबरदस्तीने जर काही कारवाई केली गेली तर ती पुणे आरटीओची अतिरेकी कार्यवाही ठरेल तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या संरक्षणात्मक आदेशात तो एक हस्तक्षेप ठरेल.

मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या माजी महापौर आणि महाराष्ट्राच्या आमदार मुक्ता टिळक  यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे ;

‘मुक्ता टिळक जी यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून  त्यांनी आपला ठसा उमटवला. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमी संस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती

जयंत पाटलांच्या निलंबनामुळे आजही विरोधक आक्रमक; विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार

 नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घातला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एकही इंच जागा देणार नाही, असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. तर महाराष्ट्र सरकार अजूनही गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत आहे तशी भूमिका आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का मांडत नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.गेली 32 वर्षे भवनाचे सदस्य असणाऱ्या जयंत पाटील यांचे बोलणे सर्वांनी पाहिले आहे. सरकारच्याबद्दल अनेकदा अशी वक्तव्यस केली गेली आहे. मात्र सत्ताधारी सोयीचे वागत आहेत. आम्ही सभागृहात का नाही हे थोड्या वेळात ठरवू असे सांगताना अजित पवार म्हणाले की छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्य हे मुंबईचे महापौर, माजगावचे 10 वर्षे आमदार होते. त्यांच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यामुळे इवढा मोठा गोंधळ करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी हा शब्द मुंबईबद्दल वापरला आहे, प्रवीण दरेकर यांनीही असाच उल्लेख केला होता असेही अजित पवारांनी म्हटले आहे. यांची लोक बोलली की सगळे योग्य आणि आम्ही बोललो तर गोंधळ घालायचे हे चुकीचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे. महागाई, बेरोजगारी, मराठवाडा आणि विदर्भ यांचा विकास यासवर बोलाण्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. मात्र तरीही दिक्षा सालियान, पुजा चव्हाण सारखे मुद्दे काढून दुयऱ्याच मुद्यावर चर्चा सुरू आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.सरकारविरोधात काही सुरू आहे, त्याला बगल देण्यासाठी हे सर्व विषयाला फाटे फोडले जात आहे, असा आरोप अजित पवारांनी केला .

पुढे ते म्हणाले की “छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात असं विधान केल्याने इतका गोंधळ घालण्यात आला. पण याआधी विरोधी पक्षनेते म्हणून फडणीसांनी काम पाहिलं तेव्हा मुंबईला सोन्याची कोंबडी अशी उपमा दिली होती. सागर म्हणून आमदार आहेत त्यांनी तशीच उपमा दिली आहे. प्रवीण दरेकरांनीही तसा उल्लेख केला होती. यांची लोकं बोलली की सगळं योग्य आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातील काही सहकारी बोलले की सत्तेच्या, बहुमताच्या जोरावर कामकाज थांबवायचं. मग माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा अशा वल्गना करणं हे योग्य नाही”.

यावेळी अजित पवारांनी कर्नाटकमधील ठरावाचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले की “आम्ही मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे ठराव करत असून त्यामुळे बेळगावमधील मराठी माणूस नाराज होत असल्याची माहिती दिली. तिथे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जात आहे. तशाच पद्धतीने आपल्याकडे सोमवारी दोन्ही सभागृहात कडक भाषेत ठराव मांडला गेला पाहिजे. आमचं एकमत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात कोणतीच अडचण नसेल”.

सभागृहात मिळवणारी वागणूक लोकशाहीसाठी मारक आहे. सत्ताधारी पक्षाला मी कधीच वेलमध्ये येताना, कामकाज बंद पाडताना पाहिलेलं नाही. आम्ही ‘सत्यमेव जयते’च्या बाजूने उभे राहत असून, सत्ताधारींची मात्र ‘सत्तामेव जयते’ची बाजू आहे. ती कधीच जिंकणार नाही. आमचा आवाज कितीही दाबला तरी महाराष्ट्र, भूखंड विकू देणार नाही, कर्नाटकला घाबरणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक हे चित्रपट निर्मात्यांचे सर्वाधिक पसंतीचे शूटिंग ठिकाण

२०२२ मध्ये मध्य रेल्वेने २.३२ कोटी रुपयांचा चित्रपटाच्या शूटिंग मधून महसूल प्राप्त केला

पुणे –

मध्य रेल्वेने कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध ट्रेन्स आणि रेल्वे कोच ऑफर करून २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त केला आहे. हा महसूल गत वर्षातील कोणत्याही कॅलेंडर वर्षात मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. ८ फीचर फिल्म्स, ३ वेब सिरीज, एक डॉक्युमेंटरी, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिरातीसह सुमारे १४ चित्रपटांचे चित्रीकरण मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी विविध चित्रपट निर्माते, प्रॉडक्शन हाऊसद्वारे केले आहे.

मध्य रेल्वेने सर्वाधिक १.२७ कोटी रुपयांचा महसूल ‘२ ब्राइड्स’ या चित्रपटाद्वारे मिळवला आहे. ज्याचे येवला येथे चित्रीकरण करण्यात आले होते, कान्हेगाव स्थानकावर विशेष गाडी द्वारे १८ दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वे स्थानकावर तीन दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या शूटिंग द्वारे रु. २९.४० लाख महसूल प्राप्त केला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२२ या एका कॅलेंडर वर्षात चित्रपटाच्या शूटिंगद्वारे मध्य रेल्वेने रुपये २.३२ कोटी केलेली कमाई ही, गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या तुलनेत ( रु. १.१७ कोटी) ९९ % एवढी जास्त आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थान आहे, सनफिस्ट मॉम्स मॅजिकच्या जाहिरात चित्रपटासह ५ चित्रपटांचे चित्रीकरण या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वे स्थानकावर करण्यात आले आहे. पनवेलजवळील आपटा स्टेशन, पुणे ते कोल्हापूर मार्गावरील वाठार स्टेशन, मुंबईकरांसाठी उन्हाळ्यात ‘माथेरान’, परळ येथील सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स अकॅडमी कॉम्प्लेक्स, दादर, कर्जत, जुनी वाडीबंदर ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत , तसेच अहमदनगरमधील येवला, मनमाड आणि कान्हेगाव स्टेशन, अहमदनगर आणि आष्टी दरम्यान नवीन विभागातील नारायण डोहो यासारखे यार्ड लोकप्रिये आहेत .

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, जुने वाडीबंदर यार्ड, वाठार (सातारा जवळ) आणि आपटा स्टेशन (पनवेल परिसरातील) यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांबद्दल धन्यवाद आणि त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल,” एका वरिष्ठ अधिकाऱ्याने धन्यवाद व्यक्त केले. स्लम डॉग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, दिलवाले दुलानिया ले जायेंगे कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि इतर अनेक हिट चित्रपट मध्य रेल्वेवर शूट झाले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही सर्वाधिक लोकप्रिय स्थानठरले आहे तसेच आपटा, पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा , तुर्भे आणि वाडीबंदर सारखी रेल्वे यार्ड ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत . मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून चित्रपटा शूटिंगला परवानगी दिली जाते , अलीकडेच चित्रपटाच्या शूटिंगच्या परवानगीला गती देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आले आहेत , या सोप्या प्रक्रियेमुळे चित्रपट कंपन्यांना आवश्यक कागदपत्रांसह स्क्रिप्ट आणि अर्जासह आवश्यकता नमूद केल्या वर परवानगी मिळणे शक्य होत आहे.


लष्कराच्या वतीने तेहतीस शहरांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

पुणे-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे साजऱ्या होणार्‍या लष्कर दीना निमित्त, भारतीय लष्कराने 24 डिसेंबर 22 रोजी प्रथमच, अकरा राज्यांमधील तेहतीस शहरांमध्ये रक्तदान मोहिमेचे आयोजन केले आहे. या दिवशी भारतीय लष्कराचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय मानवी प्राण वाचवण्यासाठी ऐच्छिक रक्तदान करणार आहेत. यावेळी संकलित झालेले रक्त आणि रक्त घटक गरजू रुग्णांपर्यंत वेळेवर पोहोचावे, यासाठी भारतीय लष्कर, ही मानवतावादी मोहीम प्रमुख सरकारी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाने राबवत आहे.

‘रक्तदान करा – प्राण वाचवा’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली ही रक्तदान शिबिरे 15 जानेवारी 23 रोजी होणाऱ्या 75 व्या लष्कर दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण कमांड तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इतर विविध कार्यक्रमांचा एक भाग आहेत. भारतीय सैन्याची, ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून 7,500 युनिट रक्ताची व्यवस्था करण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी, त्या दिवशी 75,000 स्वयंसेवकांची डेटा बँक तयार करण्याची योजना आहे. या शिबिरामध्ये लष्कराचे जवान, त्यांचे कुटुंबीय, एनसीसी कॅडेट, नागरी संरक्षण कर्मचारी, आर्मी पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि समाजाच्या सर्व स्तरांमधील निरोगी स्वयंसेवक रक्तदान करतील. ही शिबिरे दक्षिण कमांडच्या अखत्यारीतील सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पणजी, जोधपूर, जैसलमेर, भुज, नाशिक, अहमदनगर, भोपाळ, झाशी, नासिराबाद, सिकंदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या आणि अन्य शहरांचा समावेश आहे.
पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटल पुणे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), लष्करी रुग्णालय खडकी आणि लष्करी रुग्णालय खडकवासला या चार प्रमुख ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केली जाणार असून या अंतर्गत, केवळ एका दिवसात सुमारे 500 युनिट रक्त संकलित केले जाणार आहे.

राष्ट्र उभारणीसाठीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांचा एक भाग म्हणून, भारतीय लष्कर आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. या रक्तदान मोहिमेमुळे समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिक, विशेषतः युवा वर्गाला त्यांचे समाजाप्रति असलेले कर्तव्य बजावण्याची आणि अमूल्य प्राण वाचवणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल

गुंठेवारी फी अवाजवी भरमसाट,प्रक्रीया कीचकट- नाना भानगिरे यांची मुख्यमंत्र्यांकडे बदल करण्याची मागणी

पुणे – महाराष्ट्र शासनाने गुंठेवारी कायद्या अन्वये महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरातील अनियमित बांधकामे नियमित करण्याचे निश्‍चित केले आहे.मात्र, त्यासाठीची प्रक्रीया कीचकट असल्याने तसेच तसेच शासनाने शासनाने निश्‍चित केलेली गुंठेवारी फी अवाजवी भरमसाट आहे. अशी बांधकामे नियमात बसत असतानाही गुंठेवारी करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे शासनाने गुंठेवारी प्रक्रीया सुटसुटीत करावी तसेच त्यासाठीचे शुल्क नागरिकांना परवडणारे असावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच, तो पर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भानगिरे यांनी दिलेल्या पत्रानुसार, सद्यस्थितीत पुणे मनपा सरसकट सर्व अनधिकृत बांधकामे यांना कारवाई नोटिसा देत आहे. ही बाब गुंठेवारी अंतर्गत नियमित होऊ शकणाऱ्या बांधकाम धारकांवर नैसर्गिक न्याय तत्व अन्वये अन्यायकारक आहे. गुंठेवारी प्रकरणांसाठी झोन निहाय स्वतंत्र यंत्रणा तातडीने उभी करण्यात यावी.टीडीआर तपासणी साठी मनपाने उभारलेल्या ऑनलाइन यंत्रणेच्या धर्तीवर गुंठेवारी प्रकरणे देखील ऑनलाइन पद्धतीने स्वीकारून जलदगतीने नागरिकांची बांधकामे कायद्याच्या चौकटीत नियमित करावीत.

पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने समाविष्ट गावातील अनाधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पोकलेन मशीन भाडेतत्वावर घेण्यासाठी टेंडर मागविले आहे नियमित होऊ शकणारी बांधकामे पाडण्यासाठी पुणे मनपा करीत असलेली त्वरितता निश्‍चितच चिंताजनक आहे सद्यस्थिती गुंठेवारी साठी आवश्‍यक असलेला स्टाफ पुणे मनपाकडे नसल्यामुळे गुंठेवारी योजना राबवण्याची पुणे मनपा ची मानसिकता नाही . तामुळे या प्रकरणी शासनानेच पुढाकार घेऊन शासनाने गुंठेवारी कायद्यात नागरीहिताच्या दृष्टीने सुधारणा कराव्यात. गुंठेवारी फी सामान्य नागरिकांना परवडेल अशी निश्‍चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

लढवय्या नेतृत्व आज गमावलं-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. २२:- ‘लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्या नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, “लोकमान्य टिळकांचा वारसा असला, तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका, नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतानाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्यभावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्या नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

पक्षासाठी मोठे योगदान-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करूनसुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला मुकलो : सुधीर मुनगंटीवार

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे एका निष्ठावान कार्यकर्तीला आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुक्ता टिळक गेले काही महिने गंभीर आजाराशी झुंजत होत्या. त्याही परिस्थितीत त्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी स्ट्रेचरवरून उपस्थित राहिल्या होत्या, असे सांगून श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की मुक्ताताईंनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सून म्हणून वावरतांना जनसेवेचा आणि जनजागरणाचा लोकमान्यांचा वसा त्यांनी पुढे चालविला. भाजपाचे काम करतांना त्यांचे सेवाव्रती व्यक्तिमत्व बहरून आले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी आपला ठसा जसा उमटवला तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार म्हणून मिळालेल्या अल्पकाळातही त्यांनी आपले नाव जनमानसात कोरले. कोरोना काळात आणि त्यापूर्वी त्यांनी केलेली जनसेवा पुणेकर आणि भाजपा कार्यकर्ते विसरणार नाहीत.

आम्ही टिळक कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मुक्ताताईंना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवार व कार्यकर्त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या सदैव कार्यमग्न राहिल्या. उत्तम संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाखाणण्याजोगे गुण होते. महापालिकेच्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या, विरोधीपक्षनेते पद आदी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. २०१७ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश मिळाल्यानंतर पक्षाने मुक्ताताईंकडे महापौरपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्याच्या विकासात भरीव योगदान दिलं.

मुक्ताताईंच्या जाण्याने एका प्रामाणिक कार्यकर्तीला आणि कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधीला मुकलो, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे-संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

0

नागपूर, दि. 22 :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.
संसदीय कार्य मंत्री श्री.पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामांबाबत दूरदृष्टी असली पाहिजे. मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील निधी मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून त्यांच्यासाठी नियोजनबद्ध वेळ दिला पाहिजे, त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. निवडणूकीची समिकरणे आता बदलली आहेत. विकासकामांबरोबरच जनतेशी सतत जनसंपर्क ठेवणे महत्त्वाचे झाले आहे. लोकप्रतिनिधींनी कर्तव्य, जबाबदाऱ्या व विकासकामांचे नियोजन यांचा समन्वय ठेवला पाहिजे. एका बाजूला विकासकामे, दुसऱ्या बाजूला संपर्क आणि तिसऱ्या बाजूला व्यक्तिगत वागणे यांचा समन्वय असेल तर मतदारसंघही सुरक्षित राहतो.
मतदार संघातील प्रत्येक विकासकाम करीत असतांना लोकप्रतिनिधींनी कुटुंबप्रमुख म्हणून नागरिकांना प्रत्येक कामात सहभागी करुन घेतले पाहिजे. मतदार संघातील सार्वजनिक कामांबरोबरच नागरिकांच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सगळीकडे शहरीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांना नागरी सुविधा देताना भविष्यातील समस्यांचा विचार करून विकासकामे करताना योग्य ते नियोजन करावे. विशेषत: आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिलांसाठी नागरी सुविधा यासाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे, श्री.पाटील यांनी सांगितले.
‘राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन’ हा विषय विकासासाठी फार महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सगळे निर्णय राज्यकर्तेच घेत असतात. चांगले राज्यकर्ते तयार होण्यासाठीही युवकांनी राजकारणात व चळवळीत सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत श्री.पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.पाटील यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.पाटील यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.प्रियांका मोहिते यांनी आभार व्यक्त केले.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.२२: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश  देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,  पोलीस अधीक्षक अंकित गोयल , प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब साळुंके, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात आली आहे. अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी आणि सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन आणि दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे. सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्या येईल.

यावर्षी अधिक संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असल्याने वाहनतळाची संख्या वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या टँकर्सची संख्या वाढविण्यात येणार असून १५० टँकर असतील. दीड हजार फिरती शौचालये, पीएमपीएमएलच्या ३६० बसेस, ३० रुग्णवाहिका, दुचाकी आरोग्य पथके, अग्निशमन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधेसाठी १४० वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि ५ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परिसरातील खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाला सोहळ्याच्या वेळी परिसरातील वाहतूक वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.कर्णिक म्हणाले,नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा व्हावा यासाठी पोलीस नागरिकांशी समन्वय ठेऊन काम करेल.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

२४ डिसेंबर रोजी कर्ज वसुली लोकअदालतीचे आयोजन

पुणे, दि. २२ : पुणे जिल्हा विधी प्राधिकरण व डीआरटी वकील संघटना यांच्यावतीने २४ डिसेंबर रोजी कर्ज वसुली न्यायाधिकरणाच्या काकडे बिझ आयकॉन पुणे विद्यापीठ मार्ग येथील कार्यालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकन्यायालयाचे उद्घाटन कर्ज वसुली अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोक मेनन यांच्या हस्ते होणार आहे.

या लोकन्यायालयामध्ये संबंधित पक्षकारांनी सहभाग घेऊन आपले दावे मिटवावे, असे आवाहन कर्ज न्यायाधिकरणाचे रजिस्ट्रार एस.एम. अबुज यांनी केले आहे.

‘आपत्ती मित्र’ प्रशिक्षण सत्राचे आयोजन

पुणे, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्यावतीने आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथे ‘आपत्ती मित्र’ प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे माजी संचालक कर्नल व्हि. एन. सुपणेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षण सत्रात भूकंप, त्सुनामी, महापूर, शोध व बचाव, रस्ते अपघात, प्रथमोपचार, रेस्क्यु बोट, सर्पदंश, आग, व प्रात्यक्षिके आदी विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या तुकडीत जिल्ह्यातील ५०० आपत्ती मित्रांना प्रशिक्षित केले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र व ५ लाख रुपयांचा विमा, रेस्क्यू बॅग, आपत्ती मित्रचे ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली आहे.

आरोग्य विद्यापीठात अविष्कार – 2022 आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 46 स्पर्धेकांना पारितोषिक  

0

नाशिक: (दि.22) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार -2022’ आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील विजेते 46 स्पर्धेकांना मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)   प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
       अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 52 महाविद्यालयातील 282 विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे 152, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 102, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) व शिक्षक(टिचर)चे 28 स्पर्धक सहभागी होते अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षाणाअंती विविध गटातील एकूण 46 स्पर्धेकांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
  विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, स्पर्धेच्या माध्यमातून संशोधकांना नवीन संशोधन कल्पनेला चालना मिळते. स्पर्धकांना विविध विषयातील संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष पहाता येतात त्याचा त्यांना संशोधन कार्यात उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती व उत्साह कौतुकास्पद आहे. समाजोपयोगी व जागतिकस्तरावर नावलौकिक होईल असे संशोधन कार्य विद्यार्थ्यांनी करावे असे त्यांनी सांगितले.
  विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आविष्कार- 2022 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यानी करमणूकीत फारसे न गुंतता संशोधनावर लक्ष द्यायलाच हवे. विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन काम करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव कल्पना घेऊन संशोधन कार्यात सहभाग वाहून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

 याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाडून विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच याकरीता आर्थिक मदत करण्यात येते याची माहिती सर्वानी घ्यावी. विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती वाढीस लागावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. सामाजिक आरोग्यासाठी आपले संशोधन महत्वपूर्ण ठरेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.
 अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक   डॉ. मनोजकुुमार मोरे यांनी मानले. अविष्कार – 2022 आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेकरीता विद्यापीठातील   श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्रीमती प्रतिभा बोडके, श्री. आबाजी शिंदे आदींनी कर्मचाÚयांनी परिश्रम घेतले.
अविष्कार – 2022 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुवर्णा गणवीर, डॉ. प्रिती बजाज, डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. राजेश वानखेडे, डॉ. गणेश घुगे, डॉ. परशुराम पवार, डॉ. त्रिवेणी काळे, डॉ. तापस कुंडू, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. शर्मिला सूर्यवंशी, डॉ. अपूर्व शिंपी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. स्पर्धेत विजेते विद्यार्थी व शिक्षकांचे विद्यापीठ परिवार व मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

सहकार क्षेत्रातील बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील- राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे, दि. २२: सहकार क्षेत्रातील बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार विभागाच्यावतीने नेहमीच प्रयत्न करण्यात येतो. नागरी सहकारी बँकेला येणाऱ्या अडचणी विभागाकडे पाठवाव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आवाहन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर व ग्रामीण कार्यालय आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका समोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्था अप्पर निबंधक शैलेश कोतिमिरे, विभागीय सहनिबंधक संजयकुमार भोसले, सहकारी संस्था पुणे शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक मिलींद सोबले, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहिते, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, गणेश निमकर, नागरी सहकारी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. कवडे म्हणाले, सहकार व्यवस्था बळकटीकरणासोबतच बदलत्या काळानुरुप आवाहनाला सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सहकार व्यवस्था टिकविण्यासाठी सहकारी बँकानी त्रुटीचा शोध घेऊन त्या कमी करण्यासाठी नियोजन करावे.
बँकाना येणाऱ्या अडचणीवर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आणि त्या आधारे प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षणामुळे ज्ञानात भर पडून क्षमतावृद्धी होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावयत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कर्ज वितरण प्रक्रियेत सुलभता आणावी.

बँकानी ग्राहकांला उत्तम बँकिंग सुविधा देत त्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्राहक समृद्ध झाल्यास आपोआपच बँकेची प्रगती होईल. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे कामकाजात बदल करुन ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. एकूणच बँकिंग व्यवस्था वृद्धिंगत करण्यसाठी प्रयत्नशील रहावे.

 आरबीआयकडून निर्गमित होणाऱ्या परिपत्रकाचा बारकाईने अभ्यास करावा. आरबीआयसोबत सहकारी नागरी बँकांनी मिळून प्रशिक्षण आयोजित करावे. संचालकांनी बँकिंग संकल्पनाचा बारकाईने अभ्यास करुन आपल्याकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्याचा वापर करुन ग्राहकाभिमूख बँकिंग सुविधा दिली पाहिजे. बँकेची विश्वार्हता, पारदर्शकता जपली पाहिजे. ग्राहकांची फसवणुक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.  नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकाला डिजीटल सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे,  असे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले कामगिरी कौतुकास्पद असल्याचे श्री.कवडे म्हणाले.

श्री. कोतिमिरे म्हणाले, शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून नवीन खातेदार करण्यासाठी प्रयत्न करावे. शाखाअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करावे. बँकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचव्यात. नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. बँकांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळाप्रमाणे कामकाजात बदल करावे.

श्री.अनास्कर व श्री. निमकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

यावेळी सहकार आयुक्त श्री. कवडे यांच्या हस्ते शुक्रवार पेठ येथील विद्या सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी सहकारी बँकेच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.