पुणे- येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संपन्न होणाऱ्या १३७ वा वर्धापनदिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवनच्या पटांगणावर ‘‘छायाचित्र प्रदर्शन’’ चे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात ॲड. अभय छाजेड यांनी सांगितले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेपर्यंत १३७ वर्षांच्या काळातील काँग्रेस पक्षाने केलेल्या कार्याचे छायाचित्र प्रदर्शन सादर करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात १८८५ ते १९४७ पर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्वाच्या घडामोडी, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान झालेले पं. जवाहरलाल नेहरू, स्व. लालबहाद्दूर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्व. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालखंडातील देशहितासाठी व देशाच्या उन्नतीसाठी झालेल्या कार्यांचा अहवाल व भारत जोडो यात्रेतील विविध प्रसंग छायाचित्रांद्वारे दाखविला आहे.
भारत जोडो यात्रेत वेगवेगळ्या प्रसंगांचा अनुभव आला. त्यातील विशेष उल्लेख जळगाव जामुद येथे एक महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढत होती तिला विचारले असता तिने फक्त राहुल गांधींची यात्रा असे उत्तर दिले तसेच एक शेतकरी वडिल आपल्या लहान मुलाला घेवून यात्रेत सहभागी झाला त्याला विचारले असता ते म्हणाले माझ्या मुलाने त्याच्या आयुष्यात चांगल्या लोकांना भेटले पाहिजे आणि राहुल गांधी चांगला माणूस आहे जो द्वेषाच्या राजकारणाला प्रेमाने हरवू शकतो, या उद्देशाने ही साडेतीन हजार कि. मी. ची न भूतो न भविष्य यात्रेद्वारे संदेश देत आहे. मला असे सांगावसे वाटते की या अनुभवातच भारत जोडो यात्रेचा उद्देश सफल झाला. काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १३७ वर्षांच्या कालखंडातील काँग्रेसचे उध्दिष्ट हे सुरूवातीपासून आजपर्यंत सर्व धर्म समभाव, सर्वांगिण विकास या सूत्रावर आधारीत आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देश विकसित केला व एक बलशाली संविधान दिले तेच आज धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत धोक्यात आलेल्या देशाचे संविधान, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार, धर्मद्वेष इ. साठी काँग्रेस संघटन अधिक मजबूत केले पाहिजे.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नीता रजपूत, अजीत दरेकर, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, संदिप मोकाटे, हेमंत राजभोज, मनोहर गाडेकर, रजिया बल्लारी, नलिनी दोरगे, चंद्रकांत नार्वेकर, दिपक ओव्हाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष स्थापना ते भारत जोडो यात्रा छायाचित्र प्रदर्शन.
ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली
पुणे, दि. २६: ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे प्रबंधक एस. एम. अबूज यांनी दिली.
ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयाने तसेच पुणे डी.आर.टी. बार असोशिएशनच्या सहकार्याने शनिवारी (२४ डिसेंबर) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष तथा केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक मेनन आणि पुणे ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पिठासीन न्यायाधीश तथा निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिलीप मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकन्यायालयामध्ये १ हजार ३८ खटले तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३० खटले तडजोडीने मिटविण्यात यश आले. या तडजोडीतून बँकाची एकूण ६०४ कोटी रूपयांची वसुली झाली आहे. त्यापैकी एक खटल्यामध्येच १४९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
या लोकन्यायालयामध्ये न्यायाधिशांचे ५ पॅनेल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये पॅनेल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधिश एस. जे. काळे, एस. बी. जगताप, डी. डी. कांबळे, अभय पटनी आणि करण चंद्रनारायण यांनी काम पाहिले. पॅनेल सभासद म्हणून ॲड. नारायण खामकर, ॲड. विजय राऊत, ॲड. स्मिता घोडके, ॲड. श्रुती किराड, ॲड. रेश्मा माळवदे आणि ॲड. प्रियंका मानकर यांनी काम पाहिले.
या लोकन्यायालयामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आय. डी. बी. आय. बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व इतर बँका व वित्तीय संस्थानी भाग घेतला, असेही श्री. अबूज यांनी कळवले आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान
‘शिवराय अष्टक’ जगणाऱ्या साकारणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिटबरोबर चित्रीकरण स्थळी ‘गुरुकुल’ पुरस्काराने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना हा दुर्मिळातील दुर्मिळ योग असल्याचे प्रतिपादन चित्रपटसृष्टीचे पितामह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. आद्य संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशीर्वाद म्हणून विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे श्री राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत शूटिंग दरम्यान हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी दिग्पाल लांजेकर यांचे गुरु ज्येष्ठ लोकशाहीर दादा पासलकर, दिग्पाल यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर , ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे , अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मिलिंद कांबळे, संकलक भक्ती मायाळू, योगेश फुलफगर आणि युनिटचे तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते. प्रस्तावना व सूत्रसंचालन माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी केले तर मानपत्राचे वाचन अमृता धायरकर यांनी केले.
‘शिवराय अष्टका’चे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून समर्थपणे पेलले आहे. ‘आज नव्वदीत त्यांनी दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने मी पार पाडत आहे, असे मनोगत राजदत्त यांनी व्यक्त केले. वेगवेगळी आव्हाने, अनेक अडचणीतून मार्ग काढताना माझ्यासह संपूर्ण युनिटलाच या ‘गुरुकुल’ पुरस्काराने मोठी उमेद, ऊर्जा मिळेल असं मनोगत दिग्पाल लांजेकर यांनी याप्रसंगी मांडलं. मुळात कुणीतरी कोणाच्यातरी भावनांचा आदर करत नाही म्हणून वाद निर्माण होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च दैवत आहे. आठ ते ऐंशी अशा सर्वच वयोगटातील प्रत्येकाच्या भावना संवेदना शिवचरित्राशी निगडीत आहेत. या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याने ‘शिवराय अष्टक’ कोणताही वाद न होता पूर्णत्वास गेले आहे. दिग्पालचे यश हे उत्तम सांघिक कार्यात आहे. हे कोणा एकाचे कामच नाही, अशी भावना श्रीमती सुनीता लांजेकर यांनी व्यक्त केली.
आयटीआय विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
नागपूर, दि. 26 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सन १९८२ पासून ४० रुपये आहे. यात वाढ करुन पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही विभागाच्या स्तरावर सुरू आहे. खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेश शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करून १०० टक्के प्रवेश होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात/ तालुक्यात मागणीनुसार एमआयडीसी आणि उद्योगपुरक अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. स्थानिक कुशल कामगार आणि आयटीआयमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सभागृहात सांगितले.
आयटीआयचे नूतनीकरण करणार; बाराशे कोटींची तरतूद
राज्यात ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. या आयटीआयमध्ये सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण-प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी वर्ग (व्हर्चुअल क्लास रुम), ग्रंथालय, जीम अशा विविध सुविधा देण्यात येईल. येत्या सहा महिन्यात याबाबत अंमलबजावणी होईल, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सतीश चव्हाण, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, अभिजीत अरुण लाड आदींनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.
सत्तारुढ आणि विरोधी पक्ष सदस्यांकडून सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय – आमदार रोहित पवार
नागपूर, दि. 26 : “संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे संसदीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे”, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आमदार रोहित पवार यांनी ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, “समाजकारण व राजकारणात युवकांना संधी ही अचानक येऊ शकते. या संधीमध्ये युवकांनी जबाबदारीने व योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. संसदीय अभ्यासवर्गात मलाही आज अचानक संधी मिळाली. तुम्हालाही राज्यातील निवडक विद्यार्थ्यांमधून संसदीय अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या सभागृहात बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य ती सामाजिक भूमिका घेणे, ही तुमची जबाबदारी आहे. आपण चांगले नागरिक होणे महत्त्वाचे आहे. मतदान प्रक्रियेत लोकशाहीसाठी सर्वांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे”.
“सभागृहामध्ये सत्तारुढ व विरोधी सदस्य हे आपआपल्या परीने जनसामान्यांचे प्रश्न मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्याच्या मुद्यांवरुन काही वेळेस सत्तारुढ व विरोधी पक्षांत मतभेद निर्माण होतात. अशा वेळी दोन्ही पक्षांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य व सामंजस्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असते. राज्याच्या विधिमंडळाने यापूर्वी सत्तारुढ व विरोधी पक्षांच्या सहमतीने व सहकार्याने अनेक महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. ते पुढे देशपातळीवरही घेण्यात आलेले आहेत. संसदीय लोकशाहीसाठी सत्तारुढ व विरोधी पक्षांत संतुलन असणे आवश्यक आहे. सत्तारुढ पक्षाने राज्याच्या हिताच्या दृष्टीने विरोधी पक्षाच्या सूचनांचा व मुद्यांचा आदर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनीही जनहिताच्या निर्णयांना सहकार्य करणे आवश्यक आहे. यातूनच संसदीय लोकशाही सक्षम होण्यास मदत होणार आहे” असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री. पवार यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. पवार यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.चिन्मयी तळेकर यांनी आभार व्यक्त केले.
युवा पिढीच्या प्रगत शिक्षणासाठी खास शैक्षणिक पोर्टलचा शुभारंभ -अकरावी कॉर्मस व सायन्सच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ
मुंबई, दि. २५ डिसेंबर- भारताला महासत्ता बनविण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीने जास्तीत शिक्षित व प्रगत होऊन विकासाच्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे या एका उदिदष्टयाने प्रेरित होऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या संकल्पनेतून युवा पिढीच्या शिक्षणासाठी डिजिटल माध्यमाचे नवीन दालन सुरु केले आहे. डिजिटल मिडियाच्या माध्यमातून युवकांना सहज व सोपे शिक्षण मिळावे यादृष्टीने मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अकरावीच्या कॉर्मस व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरसाठी विशेष सुविधा सुरु केली आहे. या ऑनलाईन सुविधेचा शुभारंभ आज माजी पंतप्रधान,भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या https://ravindrachavan.in या वेबसाईटवरील बीजेपी फॉर युथ या व्यासपिठावरून अकरावीच्या कॉर्मस व विज्ञान शाखेच्या महाविदयलयीन विद्यार्थ्यांसाठी खास सुरु करण्यात आलेल्या या वेबसाईटमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. सहा विषयांमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बुक किपिंग अँण्ड अकाऊंटन्सी,ऑर्गनायझेशन ऑफ कॉर्मस अँण्ड मॅनेजमेंट,सेकेट्ररिअल प्रॅक्टीस, याचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचे स्वतंत्रपणे ऑनलाईन लेक्चर देणार आहेत. वेबसाईट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही लेक्चर विद्यार्थ्यांना युटयुबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध होणार आहे. एकदा लॉगीन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कधीही व कुठेही या लेक्चरवरुन अभ्यास करता येऊ शकेल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेबसाईटवरील नोंदणी प्रक्रिया ही युझर फ्रेंडली स्वरुपात असेल, जेणेकरुन अगदी कमी वेळेत विद्यार्थी आपली नोंदणी पूर्ण करुन त्याला या शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळणार आहे.
उत्तम शिक्षण हा त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पासपोर्ट आहे. दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळालेली युवा पिढी स्पर्धात्मक युगात अग्रेसर राहणे हे भाजपचे उदिदष्टय आहे. भारत आणि भारतीयांना जागतिक शक्तीत रूपांतर करण्याचं ध्येय ठेवून युवा पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त डिजिटल व्यासपीठ सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व अधिक प्रमाणात प्रगत व्हावे असे आवाहन यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले आहे.
विविध विषयातील नामवंत शिक्षक व प्रशिक्षकांच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन देणारे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे व्रत रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारले आहे. गेल्या काही वर्षात अकरावी व अन्य विषयांचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन स्वरुपाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. भविष्यात ही सुविधा सर्व विदयार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठीच ही सुविधा सुरु करण्यात आली असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
भविष्यामध्ये ही सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी या ऑनलाईन सुविधेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहे व या ऑनलाईन सुविधेचा लाभ अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा सकारत्मक प्रयत्न करण्यात येईल असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया करावी.
https://ravindrachavan.in ही वेबसाईट उघडल्यावर तेथे असलेल्या BJP for youth या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर नोंदणीची पुढील प्रक्रिया सुरु होते.
१) जर तुम्ही नोंदणी केली असेल तर कृपया वापरकर्ता नाव & पासर्वड तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या ईमेलमध्ये मिळू शेकल. अन्यथा खालील स्टेप्स फॉलो करा.
२) फोटो अपलोड करा आणि डेटा भरा ( नावे, लिंग, जन्मतारीख इ. )
३) Verify and Register या बटणावर क्लिक करा
४) तुम्हाला खालीलप्रमाणे OTP मिळेल
५) टेक्स्ट बॉक्समध्ये OTP भरा
६) एकदा तुम्ही तपशील सेव्ह केल्यानंतर तुम्हाला वापरकर्तानाव मिळेल & पासवर्ड.
७) युजरनेम & पासवर्ड द्वारे लॉगिन करा जे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेलमध्ये मिळेल.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना युटुयबच्या लिंक मार्फत लेक्चरचा लाभ घेता येईल असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले आहे
अजित पवार कडाडले- अब्दुल सत्तार राजीनामा द्या, महिला खासदाराला शिवीगाळ हा निर्लज्जपणाचा कळस
नागपूर -महसूलराज्यमंत्री असताना वाशिममधील गायरान जमीन अब्दुल सत्तार यांनी बेकायदेशीररित्या विकली. तब्बल दीडशे कोटींची किंमत असलेली 37 एकर जमीन अब्दुल सत्तार यांनी कवडीमोल भावाने एकाला विकली. कोर्टानेही या प्रकरणात संबंधित मंत्री दोषी असल्याचे म्हटले आहे. हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा-उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी
नागपूर –
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, असा ठराव विधानपरिषदेने मंजूर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
विधानसभा व विधानपरिषदेत एकमताने सीमावादाबाबत असा ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ग्रामपंचायती बरखास्त करणार का?
विधानपरिषदेत आज उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर आपली भूमिका मांडली. यावेळी सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, अशा ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहे. अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज काय? दिल्लीत गेले असले तरी सीमाप्रश्नी महाराष्ट्राला या भेटीचा काही फायदा होईल काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, सीमाप्रश्नी आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? मात्र, सीमावादावरुन मराठी माणसाने आजही लाठ्याच खायच्या काय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
कर्नाटकविरोधात साधा ‘ब्र’ बोलत नाही
तसेच, तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प आहेत का? एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तोंडून कर्नाटकविरोधात साधा ब्रदेखील निघत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आपल्याकडे मराठी पाट्यांना विरोध
उद्धव ठाकरे म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणी हा खरे तर कर्नाटकव्यापत महाराष्ट्र आहे. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सीमावादावर कर्नाटकात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एकजूट आहे. हे खरे तर आपण शिकण्यासारखे आहे. मात्र, महाराष्ट्रात उलटे चित्र आहे. आपण राज्यात दुकानांवर मराठी पाट्या बंधनकार केल्या की, त्याला आपल्याच लोकांकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाते. या विरोधीभासाला काय म्हणायचे?
ठाकरेंकडून सभागृहात पेन ड्राईव्ह
यावेळी उद्धव ठाकरेंनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर केला. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ‘केस फॉर जस्टीस’ हा चित्रपट होता. हा चित्रपट सर्वांनी पाहावा. या चित्रपटात कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कसे अत्याचार केले जातात, हे दाखवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
CBIची ICICI बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई:उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना अटक
मुंबई-
ICICI बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIने सोमवारी व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयने गत आठवड्यातच आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँकेने 2012 मध्ये व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले होते. हे कर्ज नियमबाह्य देण्यात आल्याचा आरोप आहे. चंदा कोचर यांच्या हाती आयसीआयसीआय बँकेची सुत्रे असताना व्हिडिओकॉनला हे कर्ज देण्यात आले होते. या मोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबलला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती.
मुंबईच्या विशेष न्यायालयाने शनिवारी ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना 3 दिवसांच्या (24 ते 26 डिसेबंर) सीबीआय कोठडीत पाठवले होते. चंदा व दीपक कोचर यांना शुक्रवारी अटक केली होती. व्हिडिओकॉन समुहाला रेग्युलेशनविरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.
आरोप आहे की, चंदा कोचर यांनी देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असणार्या आयसीआयसीआय बँकेची सुत्रे सांभाळल्यानंतर व्हिडिओकॉनच्या विविध कंपन्यांना 6 कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी 2 कर्ज प्रकरणे चंदा कोचर सदस्या असणार्या समितीने मंजूर केली होती. त्यांच्यावर व्हिडिओकॉन समुहाला कर्ज मंजूर करण्यासाठी अन्य समित्यांवर प्रभाव टाकल्याचाही आरोप आहे.
आगामी काळात शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण- डॉ. सुहास दिवसे
पुणे दि.२४- आगामी कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये १० ते १२ खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र, तर जिल्हा व विभागीय संकुलांमध्ये विविध खेळांची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यावर भर देण्यात येणार आहेत,असे प्रतिपादन क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतिने शिवछत्रपती क्रीडा संकुलात २४ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे उदघाटन क्रीडा आयुक्त डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. दिवसे म्हणाले, सध्या खेळ व क्रीडा क्षेत्राचे महत्व वाढलेले दिसून येत आहे. क्रीडा प्रशिक्षक हा खेळाडूसाठी आदर्श असतो, त्यांचा क्रीडा मुल्ये रुजविण्यात मोठा वाटा असतो. खेळाडू हा केंद्रबिंदू मानून खेळाडूंच्या हिताच्या योजना, दर्जेदार क्रीडा मार्गदर्शक व आवश्यक क्रीडा सुविधा निर्मीतीवर भर देऊन खेळाडू उपयोगी योजना कार्यान्वित केल्या जातील.
यावेळी महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे उपाध्यक्ष संदिप जोशी , क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तांत्रिक अधिकारी प्रमुख सविता मराठे, स्पर्धा संचालक प्रविण ढगे व योगेश शिर्के हे उपस्थित होते.
स्पर्धेत राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून ६०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.
स्पर्धेच्या प्रारंभी क्रीडा आयुक्त यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. तर पुणे जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू हर्ष धुमाळे याने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजचे निकालः-
१४ वर्षाखालील मुलेः- सांघिक १) मुंबई विभाग- श्रेयस पाटील, अनिष भारद्वाज, आश्रव वर्तक, प्रसन्न कुचेकर, समिरन जोशी, प्रसाद सालप, वरद गुरव २) नाशिक विभाग- यश पाटील, आयुष दळवी, श्लोक सिरसाठ, सुशांत पिंगळे, मानस खिंवसरा, स्वानंद आग्रवाल, पलाश गायधनी ३) पुणे विभाग- निशाद नरवणे, प्रज्ञान मेश्राम, आदेश वाघचौरे, आर्यन बेळंबे, संकेत नाईकवाडी, श्लोक भुतकर, सुरज काळे
१४ वर्षाखालील मुलेः- ऑल राउंड चॅम्पियन- १) श्रीयश पाटील, मुंबई (७१.४००) २) निशाद नरवणे, पुणे ३)प्रसन्न कुचेकर, मुंबई
१४ वर्षाखालील मुलीः- ऑल राउंड चॅम्पियन- १) श्रावणी पाठक, पुणे (४७.१०) २) सारा राऊळ, मुंबई ३) अनन्या शेट्टी, मुंबई
१४ वर्षाखालील मुलीः- सांघिकः- १) मुंबई विभाग- सारा राऊळ, अनन्या शेट्टी, साक्षी दळवी, क्रीशा शहा, रितिका प्रभुदेसाई, आर्चा खोपकर, दामिणी शिरोडकर २) पुणे विभाग- श्रावणी पाठक, स्तुती हुंडरे, रितिषा ईनामदार, सई निकम, संस्क्रीती सामंत, जान्हवी सपकाळ, शरयु कदम ३) औरंगाबाद विभाग- रिध्दी जट्टी, अनुष्का गोंजारी, धनश्री खंडारे, शिवॉन देसाई, श्रेया गायकवाड, सोनक्षी गुंजाळे, गौरी पाटील
अरारा..तात्या बी हतबल ..म्हणालं,निवडणुका कधी घेतील माहिती नाय बाबा.. आपलं लागा उद्योगधंद्याला ..
पुणे- महाराष्ट्र आणि दिल्ली भाजपा,२ शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आपसातील ताणाताणीत..आता ह्याला गँगवॉर ही कोणी म्हटलं तर आपण काय करावं..राजकीय चढाओढ नाहीच, हे राजकीय युद्धच म्हणावं लागंल..अशा परिस्थितीत कोरोना ची साथ आणि मंग काय निवडणुकीला लाथ…अशी स्थिती झालीय सध्याला…
व्हय तर..तुमास्नी तात्या ठाऊक आहे कि नाय ? अहो तात्या.. त्याच्या पक्षाचा हाय त्यो वाघ…पण त्योही हतबल झालाय…
अहो नाय ओ..त्यांच्या पक्षाचं जाऊ द्यात..तात्या.या पुढे पुढे जाणाऱ्या महापालिका निवडणुकांबद्दल बोललात बघा…काय बोललात,ठाऊक हाय काय ?
ऐकाच तात्याच्याच शब्दात…
राजकारणाच काय खरे नाही,निवडणुका ही लोकं कधी घेतील माहिती नाय बाबा…जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो…लग्न,पार्टी,स्वागतसमारंभ,वाढदिवस यांसाठी अमुक तमुक कार्यालय संपर्क – नाव आणि मोबाईल नंबर
आता वेताळाच्या पाठीवर बसलाय..कोण ? व्हय…प्रशासक..काय त्याच नांव ते तुमीच बघा…
आता म्हनं त्याचंच राज्य..त्योच करतो,ठरवतो सारं..अर्थात..कोणतीबी कार्पोरेशन असू द्यात किती बी हजार कोटीचे बजाट असू द्यात पहा..त्ये सारं कुणाच्या हुकुमाबरं चालतंय…
अहो दीड दोनशे नगरसेवक बसविण्यापेक्षा त्यांना ह्योच प्रशासकीय कारभार बरा वाटणार नव्हं..
अगदी बराबर,बघा म्हणून तर अगदी..तात्यांनी पण..टाकली बघा…
हतबल झालेत सारेच..आता म्हणे कामंधंद्याला लागा…करू द्यात त्यांना काय करायचं त्ये..
आता बघा लोकशाहीची तर..कायच नाय उरली तमा…अन दरवेळी म्हणं..निवडणुकीला जरा दमा..
नेते म्हनं खुदकेच लियेही जिते..
कार्यकर्ता को क्या,कहीभी छोड देते..
पुस्तक खरेदी योजनेस स्थगिती, त्रिस्तरीय समिती स्थापन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे स्पष्टिकरण
पुणे दि.२४-समाज कल्याण विभागातर्फे समाजमंदिरामध्ये पुस्तक पुरवठा प्रकरणी पुरवठा धारकास अद्याप कोणताही निधी दिलेला नाही. शासनाचे आदेश येईपर्यंत योजनेस स्थगिती देण्यात आलेली असून या प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याचे स्पष्टिकरण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व समाज मंदिरांच्या व ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीकरीता यादीसह प्रति जिल्हा १ कोटी या प्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी ३६ कोटी या प्रमाणात तरतूद वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.
शासनाने पुस्तकांची यादी समाज कल्याण आयुक्तालयास दिली. या यादीप्रमाणे पुस्तकांच्या निवडीसाठी तज्ज्ञांची त्रिसदस्यीय निवड समिती गठीत करण्यात आली. शासनाच्या जेम्स पोर्टलद्वारे प्राप्त निविदाधारकांपैकी मे. शब्दालय, पब्लिकेशन हाऊस अहमदनगर यांची निवीदा रक्कम सर्वात कमी असल्याने सदर निवीदाधारकाच्या न्युनतम दरास पुस्तक पुरवठासाठीच्या प्राप्त तरतुदीस खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सदर प्रक्रीया अधिक पारदर्शी पध्दतीने पार पाडावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पुस्तक पुरवठाबाबत शासनाच्या आदेशानुसार एकच सहायक आयुक्त म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापुर यांना आहरण व संवितरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले.
पुस्तक पुरवठाबाबत विविध माध्यमांमध्ये पुस्तकांच्या किंमती अवाजवी स्वरुपाच्या असल्याबाबत व त्या अनुषंगीक इतर बाबतीत बातम्या प्रसारीत होत असल्याने समाजकल्याण आयुक्त यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी पुरवठाधारकांस कोणत्याही देयकांची अदायगी न करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबत शासनाचे आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आलेली असून सदर प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
पुस्तक संच पुरवठा प्रक्रीया अद्याप पुर्ण झालेली नाही. सद्यस्थितीत मे. शब्दालय पब्लिकेशन हाऊस अहमदनगर यांनी आयुक्त समाज कल्याण यांनी पुस्तक पुरवठ्यास दिलेल्या स्थगिती आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केलेली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे सहायक आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
20 वर्षीय अभिनेत्री टुनिशा शर्माची शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या
मुंबई-टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने शनिवारी मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 वर्षीय टुनिशा एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार होती. सेटवरील लोकांनी तिला फासावर लटकलेले पाहून खाली उतरवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येपर्यंत टुनिशा पूर्णपणे सामान्य होती आणि 5 तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो आणि काही नोट्स शेअर केल्या होत्या.
टुनिशाने कतरिना कैफच्या फितूर या चित्रपटात तिच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अलीबाबा दास्तान ए काबुलमध्ये ती राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. याशिवाय टुनिशाने बार बार देखो, कहानी-2, दबंग-3 यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.
सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु एस.आर. चौधरी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, विद्यापीठाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरु एस.आर. चौधरी यांनी सादरीकरणातून पूर्वतयारीची माहिती दिली. दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. देशातील 7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा विविध 14 शाखांमधील नवनवीन शोध प्रबंध, प्रदर्शन, मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ विज्ञानस्नेही विद्यार्थ्यांना होईल.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा उभारा. राज्यातील अन्य ठिकाणावरूनही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बाहेरुन येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, प्रवासाची उत्तम व्यवस्था ठेवा. विदेशातून येणाऱ्या शास्रज्ञांच्या निवास व्यवस्थेबाबत विशेष काळजी घ्या, अशी सुचना त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, यंदा विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा प्रमुख कार्यक्रम समजून उत्तम प्रसिद्धी करा. या आयोजनाचे यजमान पद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राने विज्ञान, तंत्रज्ञान व सर्व क्षेत्रातील प्रगतीची भरारी प्रतिबिंबीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर संपन्न
मुंबई, दि.24 : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड, साने गुरूजी येथे आज बालकांसाठी मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये बालकांची दंत तपासणी आणि उपचार तसेच वैद्कीय तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरासाठी मोठ्या प्रमाणत बालके उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा उपस्थित होत्या.
