नागपूर -महसूलराज्यमंत्री असताना वाशिममधील गायरान जमीन अब्दुल सत्तार यांनी बेकायदेशीररित्या विकली. तब्बल दीडशे कोटींची किंमत असलेली 37 एकर जमीन अब्दुल सत्तार यांनी कवडीमोल भावाने एकाला विकली. कोर्टानेही या प्रकरणात संबंधित मंत्री दोषी असल्याचे म्हटले आहे. हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.