Home Blog Page 1466

“महाराष्ट्राला आता नवीन मुख्यमंत्री मिळेल, शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार”

मुंबई – महाराष्ट्रात आज ज्या घडामोडी घडल्या त्याला मी भूकंप मानत नाही. हे असेच घडणार हे सगळ्यांनाच माहिती होते. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे सोळा आमदार अपात्र ठरणार, त्यांना कोणीच वाचवू शकत नाही हे स्पष्ट आहे.त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लवकरच मिळणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपचे जे पोपटलाल राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांच्या विरोधात आरोप करीत आहेत, ज्यांच्यासाठी तुरुंगाची दारे उघडी करण्यात आली होती, त्यांनीच आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपने आमच्या बाबतीत जे केले होते तेच त्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर केले आहे.

पण आजच मी स्वताः आणि उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते आमच्या बरोबरच आहेत. आणि यापुढील काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित लढू आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहून सत्ता स्थापन करू असा दावाही राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे आणि जे ताशेरे मारले आहेत, ते पहाता त्यांना अपात्र ठरवण्याखेरीज दुसरा मार्ग उरलेला नाही. शिंदे आणि अन्य सोळा आमदार अपात्र ठरतीलच पण नंतर भाजप बरोबर गेलेले शिंदे गटाचे सारेच आमदार अपात्र ठरतील असा दावाही राऊत यांनी केला.

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी: बाळासाहेब थोरात

जनता सर्व पाहते आहे, जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल

संगमनेर ( प्रतिनिधी ) २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटने करता ही दुर्दैवाची आहे . पुढील काळात देश कसा चालेल हे काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत ,विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल.

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे .जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे. त्यांच्या मागच्या वाक्यांची तुलना केली तर किती टोकाची होऊ शकते हे आता जनता पाहते.

राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सर्वेनी दिला आहे .त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी आणि टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेले हे नक्कीच काळजी वाटणारे आहे.

काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासू भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत – नाना पटोले

मुंबई-

पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत भाजपचा घरोबा.

एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्यामुळेच भाजपाकडून सत्तेच्या खुर्चीचा खेळ?

एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटासोबत सुखात नांदणार !

काँग्रेसच एकमेव विश्वासार्ह पक्ष, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालचे सरकार.

मुंबई, दि. २ जुलै २०२३
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात व केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती पण आमागी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय नव्हता त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला आहे.

उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजपा, नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागणार आहे.
कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने व जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

संकटे येतात…पवार साहेब ताकदीने उठतात,भाजप-शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही

अजित पवारांसह त्या ९ आमदारांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले

मुंबई-आज राष्ट्रवादीतील काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काही कृती केली आहे. सरकारमध्ये जाऊन त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याला पक्षाचा मुळीच पाठिंबा नव्हता, त्यामुळे त्यांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. मुंबईत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर पाटील यांनी पक्षाची भूमीका मांडली. पाटील म्हणाले की, चीफ व्हिप यांनीच पक्ष सोडल्याने त्यामुळे आता शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्षनेते पदी व मुख्य प्रतोतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संकटे येतात…पवार साहेब ताकदीने उठतात
जेव्हा जेव्हा पक्षावर असे संकट येतात तेव्हा शरद पवार साहेब मोठ्या ताकदीने कामाला लागतात आणि अनेक सत्तांमध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चालू राहील. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

ईडीच्या दबावावर निवांत बोलेन
ईडीने बोलावल्यावर काय दबाव आणला जातो त्यावर नंतर निवांत बोलेन, असे विधान जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे जे काही लोक आज सोडून गेले आहे. त्यांच्याबाबतीत देखील असेच काही घडले असेल, असे जयंत पाटील म्हणाले.

अजितदादांसोबत गेलेले साहेबांच्या संपर्कात
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार, लोकप्रतिनिधी सद्याही शरद पवार यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आत्ता किती लोक दादांसोबत गेले, हे सांगता येत नाही. एक दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.

शिंदेंना पर्याय म्हणून अजित पवारांना घेतले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून अजित पवार यांना भाजपने सरकारमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे शिंदेंना यातून भविष्यात धोका आहे.

5 तारखेला पक्षाची बैठक
आज जो शपथविधी झाला. त्यातीच बरेच सदस्यांनी शरद पवार साहेबांना भेटून आम्ही गोंधळलेलो आहे. या आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा अजिबात पाठिंबा नाही. त्यामुळे तालुका ते महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य 5 तारखेला बैठक बोलावली आहे. उपलब्ध असणार हॉल निश्चित केला आहे. चव्हाण सेक्टरच्या आसपासची जागेत कार्यकर्ते बसू शकतील. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट मांडतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या बंडाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना,काळ ७० हजर कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांना मंत्रिपदे दिली … शरद पवार हाच चेहरा घेऊन पुन्हा लोकांपुढे जाईल

मला चिंता पक्षाची नाही , पक्षाला डावलून भाजप समवेत सत्तेत गेलेल्यांच्या भवितव्याची ….

पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयात जाणार नाही , ते काय असतं , लोकांचा विश्वास महत्वाचा ,

शरद पवार हाच चेहरा घेऊन पुढील निवडणुकीत नवी टीम करेल

पुणे- दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी केलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे.हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे असा जो उल्लेख केला. मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रश्न आता दुसरा आहे की आमचे काही सहकारी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला मी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. संघटनात्मक बदल करण्याचे काही प्रश्न होते त्याचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत असं त्यांनी सांगितलं. माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य, खासकरुन विधीमंडळाचे कितपत वेगळी भूमिका घेतली आहे याचं चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.

ज्यांची नावं आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मला जे सांगत आहेत त्यांनी जनतेसमोर हे मांडलं तर मी ते मान्य करेन अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असं मी समजेन.

आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. १९८० मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होता. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली की त्यात आमची संख्या ६९ वर गेली ही दिसलं असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर काढून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी काम करणार आहे. ही माझी भूमिका केली. पक्षावर कोणीही दावा करावा. काही म्हणण नाही, माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार असे मत शरद पवारांनी व्यक्त केली. मी एवढेच सांगेन की, राष्ट्रवादी पक्ष नव्हता, कॉंग्रेसची मतभेद झाले त्यामुळे हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला. त्यामुळे माझा विचार हा लोकांशी जोडलेला आहे.

पक्षाच्या चौकटीच्या बाहेर ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. माझे कोणाशीही बोललो नाही, विधानसभेत सदस्य त्यांच्यातील काही लोकांनी मला फोन केला. जाण्यापूर्वी भुजबळ मला भेटून गेले, तेव्हा त्यांनी शपथ घेतली हे कळाले. गुगली अजिबात नाही, दरोडा आहे, पार्टीच्या काही लोक भ्रष्ट्राचाराच्या आरोप केले त्यांच्यातील कार्यकर्त्यांना मुक्तता करण्याचे काम केले.

अजित पवार, छगन भुजबळ यासह अनेक लोकांवर ईडीची नोटीस आहे. त्यामुळे हे सर्व लोक सत्तेत सहभागी झाले. मग यांना ईडी सरकार म्हणायचे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. यावर लोकांवर काही कारवाई झाली नाही तर त्यावर निर्णय घेतला जाईल.

​​​​​​विचारधारेची बांधणी घेऊन आमचे टारगेट पक्षबांधणी करायची आहे. दुसरे म्हणजे सामाजिक, धार्मिक, ऐतिहासीक सामाजिक ऐक्याला सुरूंग लावते त्याला विरोध करण्यासाठी आम्ही भाजपविरोधात लढा देत राहणार नाही.

राज्याचे अध्यक्ष, जिल्हा कमिटी यांच्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाईल, ही कारवाई प्रकियानुसार केली जाईल. मुंबईच्या पक्ष कार्यालयात जयंत पाटील सकाळी 11 वाजेपासून बसलेले आहेत. त्यामुळे जे गेले त्यांच्यावर निश्चित कारवाई केली.

काकांवर कुरघोडी: अजित पवारांचा चिन्हासह,राष्ट्रवादीवर दावा…

मुंबई- शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासह आम्ही सरकारला पाठिंबा दिला असून पक्षाच्या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवू असे अजित पवार यावेळी म्हणाले.शरद पवारांना याची कल्पना आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर आम्हाला पक्षाच्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद आहे असे अजित पवार म्हणाले. तसेच जर आम्ही शिवसेनेसोबत जर जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले, अजित पवार?

  • हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला.
  • राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती.
  • देशपातळीवरील राजकीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती बघता विकासाला महत्व दिलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं स्पष्ट मत आलं.
  • अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न मोदीसाहेब करत आहे. त्यामुळे आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आम्हाला वाटलं.
  • शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे.
  • जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य.
  • पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
  • मंत्रिमंडळात आदिवासी, अनुसूचित जाती, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सर्वांना प्रतिनिधित्व मिळेल याकडे आम्ही लक्ष दिले आहे.
  • सर्व जण आमच्यासोबत, पक्ष आमच्यासोबत. नेतृत्वालाही आम्ही सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. पक्षाने अनेकवेळा वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. हे आपण पाहिले आहे. नवीन नेतृत्वाला आता संधी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचे राज्याचे प्रश्न सुटले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काम करू.
  • वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे निर्णय राजकीय पक्षांना घ्यावे लागतात. मात्र हे करत असताना राज्याचं हित बघावे लागते. ते बघूनच आम्ही निर्णय घेतला.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि नावावरच आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवणार.
  • आम्हाला पाठिंबा आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे.
  • महाविकास आघाडीचं काय होणार या प्रश्नावर अजित पवार म्हणाले ते तुम्हाला सर्वांना भविष्यात बघायला मिळेलच. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेऊ.
  • मी जे सांगितलं ते अधिकृत आहे.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सकारात्मकतेने काम करणे गरजेचे आहे. आज अतिशय मजबुतीने देशाचं नेतृत्व मोदींच्या हातात आहे, हे नाकारता येणार नाही. विकासाच्या प्रश्नावर ताबडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे. जर मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होणार असतील तर आपण त्यांच्यासोबत गेले पाहिजे. आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. अनेक जण आरोप करतात केसेसमुळे गेले. शपथ घेतलेल्यांपैकी अनेकांवर केसेस नाही. उगीच कुणीतरी आमच्यावर आरोप करू नये. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही सरकारसोबत राहुन जनतेचे प्रश्न सोडवू.

अजित पवार उपमुख्यमंत्री झालेही…सोबत मातब्बर नेलेही,भाजपसमवेत सत्तेत दाखल

अजित पवार  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली  आहे.

मुंबई- अजित पवार  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली  आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहेराज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

मी अजित अनंतराव पवार शपथ घेतो की…अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री; शिंदे-फडणवीसांसमोर शपथविधी

राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.

विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

अजित अनंतराव पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीपराव वळसे पाटील – मंत्री
हसन मुश्रिफ – मंत्री
धनंजय मुंडे – मंत्री
धर्मरावबाबा आत्राम – मंत्री
आदिती तटकरे – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री

जे घडले ते महाराष्ट्राच्य हिताचे- फडणवीस

शपथविधीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज जे घडले ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा नवीन अध्याय लिहू. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती देऊ. राज्याला अतिशय प्रगल्भ सरकार देऊ.

आमचे आता ट्रिपल इंजिन सरकार- शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे पूर्वी डबल इंजिनचे सरकार होते. ते आता ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. आमच्या डबल इंजिनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेचाच फायदा होणार आहे.

अजित पवार आणि समर्थक आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार ; शपथविधीची तयारी ,अजित पवार मुख्यमंत्री कि उपमुख्यमंत्री ?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फुट …

मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे हे सर्व नेते सरकारमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर आमची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची शपथविधी होण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आदि शंकराचार्यांच्या अष्टकांना नृत्याचा विलोभनीय साज !

पुणे -‘कलावर्धिनी ,पुणे ‘आणि डॉ.उषा आर.के.( मॉस्को )यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या  ‘आदी अष्टकम’ या आदी शंकराचार्यांच्या  रचनांवर आधारित भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम १ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात झाला .अरुंधती पटवर्धन,वैदेही रेळे-लाल,प्राची सावे-साठी,कीर्थना रवी,आनंद सच्चिदानंद,मिथुन श्याम या  देशभरातील नामवंत भरतनाट्यम कलाकारांनी नृत्याविष्काराने मने जिंकली.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा १७० वा कार्यक्रम होता.  भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. डॉ.उषा आर. के. यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.या वेळी डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांची विशेष उपस्थिती होती.

आदि शंकराचार्य द्वारा संपादित कालभैरवाष्ट्क हे संस्कृत भाषेत संपादित केले  गेलेले अष्टक असून, या अष्टकात कालभैरव यांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसेच, त्यांची स्तुती करण्यात आली आहे.या कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की, कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रुपी कालभैरव होत.आदि शंकराचार्यांनी देवी – देवतांवर संस्कृत मध्ये लिहिलेल्या आठ कडवी असलेल्या रचनांवरील ‘आदि अष्टकम’ या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे सर्व भाव या नृत्य सादरीकरणातून प्रभावीपणे  व्यक्त झाले.      ‘या अष्टकम मध्ये अनेक दृश्यात्मक संदर्भ आणि जागोजागी नवरस ओतप्रोत भरलेले असल्यानेच त्यावर नृत्य स्वरूप कार्यक्रम बसविण्याचे ठरविले, हा कार्यक्रम पाहून रसिकांना आदि शंकराचार्यांनी देवांवर लिहिलेली संस्कृत काव्य अगदी दृश्यात्मक आणि चित्रमय रित्या लक्षात राहतील’, असे उषा आर. के. यांनी कार्यक्रमाचे निरूपण करताना सांगितले.
कार्यक्रमात सरस्वती, पांडुरंग, गंगाष्टक, कालभैरव दक्षिणमूर्ती आणि गुरू महत्व सांगणारे अष्टकमवर नृत्य सादर करण्यात आले.या वेळी डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांची विशेष उपस्थिती होती.

अरेरे … वरंधा घाट तब्बल ३ महिने सर्वांसाठी बंद

 सार्वजनिक बांधकाम खात्याची लक्तरे वेशीवर ..पर्यटकांत संतापाची लाट

पुणे-सुरक्षिततेच्या कारणासाठी भोरहून महाडकडे जाणारा वरंध घाट शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बस व मोठे ट्रक, इतर सहाचाकी वाहनांना बसणार आहे. या काळात फक्त लहान मोटारी व दुचाकी वाहनांना घाटातून प्रवेश देण्यात येईल.कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आलेला वरंद घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी अद्याप असुरक्षितच असल्याचे स्पष्ट होत आहे. भोर बाजूनेही हा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले होते. गेल्या पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यवधी रुपये खर्चून महाड व भोर तालुक्यांच्या हद्दीत रस्त्याची दुरुस्ती केली.

वरंधा घाट समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर वसलेला आहे आणि हिरवीगार जंगले आणि दऱ्यांनी वेढलेला आहे. ही खिंड सुमारे 23 किमी लांबीची आहे आणि कोकण विभागातील महाड शहरांना दख्खनच्या पठारावरील भोरशी जोडते. या पासची वैशिष्ट्यपूर्ण उतार आणि हेअरपिन बेंड आहेत, ज्यामुळे तो वाहनचालकांसाठी आव्हानात्मक आहे. हा खिंड त्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरून खाली वाहणाऱ्या असंख्य धबधब्यांसाठी आणि प्रवाहांसाठी देखील ओळखला जातो.वरंधा घाटाचा इतिहास 17व्या ते 19व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याचा आहे. हा खिंड हा कोकणातील बंदरांना दख्खनच्या पठारावरील शहरांशी जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. या पासचा उपयोग मराठा सैन्याने दोन प्रदेशांमधील सैन्य आणि पुरवठा करण्यासाठी केला होता. ब्रिटीश वसाहत काळात, मुंबई आणि पुणे दरम्यान रस्ता आणि रेल्वे लिंक म्हणून खिंड पुढे विकसित करण्यात आली. आज, पास हा कोकण विभागाला उर्वरित महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे.निसर्गसौंदर्य आणि नैसर्गिक आकर्षणांमुळे वरंधा घाटात पर्यटनाची अफाट क्षमता आहे. हा पास ट्रेकर्स आणि हायकर्ससाठी एक लोकप्रिय गंतव्यस्थान आहे, जे आजूबाजूच्या टेकड्या आणि जंगले पाहण्यासाठी येथे येतात. हा पास त्याच्या असंख्य धबधब्यांसाठी देखील ओळखला जातो, जे संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षित करतात. परिसरातील काही लोकप्रिय धबधब्यांमध्ये खिंडीपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा आणि खिंडीपासून सुमारे 5 किमी अंतरावर असलेला धोबी धबधबा यांचा समावेश होतो.

धबधब्यांव्यतिरिक्त, वरंधा घाट त्याच्या निसर्गरम्य दृश्यांसाठी देखील ओळखला जातो, जे आजूबाजूच्या डोंगर आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य देतात. परिसरातील काही लोकप्रिय दृश्यांमध्ये लिंगाणा किल्ला व्ह्यूपॉईंट, तोरणा किल्ला व्ह्यूपॉइंट आणि रायगड किल्ला व्ह्यूपॉइंट यांचा समावेश होतो. पश्चिम घाटाचे सौंदर्य अनुभवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी ही दृश्ये आवश्‍यक आहेतवरंधा घाट हे वन्यजीव प्रेमींसाठी देखील एक लोकप्रिय ठिकाण आहे, कारण आजूबाजूच्या जंगलांमध्ये विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. जंगलांमध्ये भारतीय राक्षस गिलहरी, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि भारतीय रॉक अजगर यांसारख्या प्रजातींचे निवासस्थान आहे. जंगलांमध्ये औषधी वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत, ज्या स्थानिक लोक त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरतात.या भागातील आणखी एक लोकप्रिय आकर्षण म्हणजे वरंधा घाट महोत्सव, जो दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा उत्सव आहे आणि त्यात लोक संगीत आणि नृत्य सादरीकरण, स्थानिक पाककृती आणि पारंपारिक हस्तकला यांचा समावेश आहे.वरंधा घाट हा एक सुंदर पर्वतीय खिंड आहे जो नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे मिश्रण प्रदान करतो. पास हा कोकण विभागाला उर्वरित महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे जे धबधबे, दृश्यबिंदू आणि वन्यजीव अभयारण्यांसह अनेक आकर्षणे देते. तुम्ही ट्रेकर असाल, वन्यजीव प्रेमी असाल किंवा संस्कृतीप्रेमी असाल, वरंधा घाटात प्रत्येकाला काहीतरी ऑफर आहे.

आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीने बोलावली बैठक

मुंबई- अजित पवार यांनी आज आपल्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार समर्थक आमदार सकाळीच देवगिरीवर दाखल झाले आहेत.काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी ‘मला आता पक्षसंघटनेत काम द्या’ अशी जाहीरपणे मागणी करून प्रदेशाध्यक्ष पदावर शरद पवारांसमोरच दावा सांगितला होता. त्यादृष्टीने अजित पवारांनी आता जोरदार हाचलाली करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.आजच्या बैठकीत छगन भुजबळही हजर आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनासाठी आपल्या समर्थक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनाही तातडीने मुंबईत बोलावल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादीच्या या बैठकीत काय चर्चा, निर्णय होतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी प्रमुख नेतेही देवगिरीवर हजर झाले असून सध्या बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मात्र या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची भाकरी लवकर फिरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बैठकीत अजित पवार हे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा करत आपली बाजू जोरदारपणे मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रातोरात फोन करून सकाळी लवकर मुंबईत पाचारण होण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे.

राज्यात येत्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासासाठी तिकीट वाटपाचे सर्व अधिकार हे प्रदेशाध्यक्षांना असतात. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, अजित पवार व जयंत पाटील यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लावत महाराष्ट्राची जबाबदारीदेखील सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी असले तरी पक्ष संघटनेत त्यांना फारसे अधिकार नाहीत, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत आगामी निवडणुकांत तिकीट वाटपासारखे इतर अधिकार मिळावेत, यासाठी अजित पवार यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच आता विरोधी पक्षनेतेपदाचे काम बस झाले, मला पक्षसंघटनेत एखादी जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष केले आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाले तर ते यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही ठरू शकतात. म्हणूनच अजित पवारांचा या पदावर डोळा आहे. तसेच विधानसभेच्या तिकीट वाटपातही दादांना त्यांच्या समर्थकांना झुकते माप देऊन निवडून आणता येईल. हेच आमदार नंतर बहुसंख्येने अजित पवारांचे नाव विधिमंडळ नेता म्हणून आग्रही मांडतील, असे दादांचे आडाखे आहेत.

आता विरोधी पक्षनेता अजित पवार आहेत, तर प्रदेशाध्यक्ष ओबीसींना द्यायला हवे. या पदासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ,जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह काही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत .

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विचारात घेता राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे; या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या कामाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या अंगी प्रचंड राष्ट्रभक्ती होती, त्यांनी देशासाठी प्रचंड त्रास सहन केले. असा महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आला याचा आपल्याला अभिमान आहे. हुतात्मा  राजगुरू यांच्या जन्मस्थळाचा विकास करताना तिथल्या प्रत्येक खांबातून, विटेमधून आणि भिंतीतून स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासाची अनुभूती देणारे स्मारक उभारणे गरजेचे आहे. स्मारक करताना सुयोग्य नियोजन करुन  गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, शास्त्रशुद्ध काम व्हावे, तसेच तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबी तपासून वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे. येथे डिजिटल ग्रंथालय तयार करुन त्याला विषयानुसार क्यूआर कोड देण्याची व्यवस्था करावी.

स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या अंगी राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण झाला पाहिजे. शहिदाचे गाव असल्याची जाणीव झाली पाहिजे, यासाठी स्थानिक सार्वजनिक इमारतीच्या भिंतीवर देशभक्तीपर घोषवाक्ये प्रदर्शित करणे, बसस्थानकाचे संकल्पचित्र जे. जे. आर्ट स्कूलकडून तयार करणे, शहरातील रस्त्याचे सुशोभीकरण करणे, पर्यटकांचे निवासस्थान, गर्दीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदी कामांचे नियोजनात समावेश करण्याबाबत विचार करावा. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, नागरिकाची मदत घ्यावी. नागरिकांची मते, कल्पनांचा यामध्ये समावेश करण्यासाठी एक संकेतस्थळ तयार करावे. प्रशासन, सामाजिक संघटना, येथील नागरिकांनी मिळून हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी काम करण्याचे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले.

आमदार श्री. मोहिते पाटील म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचे काम प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांना प्रशासनाने विश्वासात घेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत एकूण सहा बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत केलेल्या सर्वंकष सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या अभिलेखांचा संगम साधून हुतात्मा राजगुरू यांच्या विषयीची माहिती भावी पिढीपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्री. राव म्हणाले.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या समवेत नागरिकांनी सूचना केल्या. या सूचनांचा स्मारक आराखड्यात समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असेही, मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाबाबत समग्र विकास आराखडा पुरातत्व विभागाच्यावतीने तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची आणि थोरलेवाड्याची पाहणी केली.

यावेळी राजगुरूंचे वंशज सत्यशील राजगुरू, हर्षवर्धन राजगुरू, प्रशांत राजगुरू, उप विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार वैशाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, न.प. चे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे आदी उपस्थित होते.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

0

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना  राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 50 वर्षावरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत  निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.21,000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या  पात्र लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.

देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करा-सुधीर मुनगंटीवार

पुणे:-  जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र  देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

एनडीए रस्त्यावरील बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण  कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर, पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार  उपस्थित होते.

वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीतील पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाची आहे. वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड करुन मानवाने वन्यप्राण्यांना उपेक्षित केले आहे. निसर्गरम्य ठिकाणी या उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली असून येथे सुमारे चारशे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार आहे. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

‘जिथे वन, तिथे जीवन’

भारताने वन व्यवस्थापनाचा आदर्श  जगाला दिला आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.  ‘जिथे वन तिथे जीवन’ असल्याने वृक्षारोपणासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘अमृत वन उद्यान’ उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील दुर्मिळ प्रजाती, प्रमुख वृक्ष औषधी वनस्पती असे ४०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे, तळजाई आणि सिंहगड परिसरातील वन विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी आणि नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे सांगितले.

प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्राची आवश्यकता होती आणि महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे उपचार केंद्र असल्याची माहिती  उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी प्रास्ताविकात दिली.

कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि उपचार केंद्रातील विविध सोयी सुविधांची पाहणी करुन माहिती घेतली. वन विभागाच्या अधिकाऱी आणि कर्मचारी यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कान्सपासून दक्षिण कोरियापर्यंतसनी लिओनीची केनडी चा प्रेमियर NIFFF आणि BIFAN येथे होणार स्क्रिनिंग ! 

अभिनेत्री सनी लिओनीचा बहुचर्चित चित्रपट ‘केनडी’ या चित्रपटाचा दोन महत्त्वपूर्ण महोत्सवांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 1 जुलै आणि 4 जुलै (NIFFF) मध्ये आणि 2 जुलै आणि 8 जुलै रोजी Bucheon International Fantastic Film Festival (BIFAN) मध्ये प्रीमियर होणार आहे. या अभिनेत्री चार्ली या स्त्री ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला जागतिक प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असून या घोषणेनंतर स्विस आणि दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीचे रसिक, तसेच सनीचे चाहते तितकेच उत्साही आहेत.
केनडी मधील सनी लिओनच्या अभिनयाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आहे ज्यांनी चित्रपटाच्या मागील स्क्रिनिंगमध्ये आधीच पाहिले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिडनाईट स्क्रीनिंगमध्ये त्याचा प्रीमियर झाला जिथे त्याला सात मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.  तिच्या  उत्कृष्ट अभिनयाच्या पराक्रमाने आणि निर्विवाद सौंदर्याने, सनीने जागतिक स्तरावर सगळ्यांचं मन जिंकल आहे. 
सनी लिओनी च्या केनडी मध्ये मुख्य भूमिकेत राहुल भट्ट आहे. दिग्गज चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. केनडी व्यतिरिक्त, सनीचे आणखी काही रोमांचक प्रोजेक्ट येणार आहेत.