पुणे -‘कलावर्धिनी ,पुणे ‘आणि डॉ.उषा आर.के.( मॉस्को )यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘आदी अष्टकम’ या आदी शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम १ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात झाला .अरुंधती पटवर्धन,वैदेही रेळे-लाल,प्राची सावे-साठी,कीर्थना रवी,आनंद सच्चिदानंद,मिथुन श्याम या देशभरातील नामवंत भरतनाट्यम कलाकारांनी नृत्याविष्काराने मने जिंकली.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा १७० वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. डॉ.उषा आर. के. यांनी कार्यक्रमाचे निरूपण केले.या वेळी डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांची विशेष उपस्थिती होती.
आदि शंकराचार्य द्वारा संपादित कालभैरवाष्ट्क हे संस्कृत भाषेत संपादित केले गेलेले अष्टक असून, या अष्टकात कालभैरव यांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसेच, त्यांची स्तुती करण्यात आली आहे.या कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की, कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रुपी कालभैरव होत.आदि शंकराचार्यांनी देवी – देवतांवर संस्कृत मध्ये लिहिलेल्या आठ कडवी असलेल्या रचनांवरील ‘आदि अष्टकम’ या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे सर्व भाव या नृत्य सादरीकरणातून प्रभावीपणे व्यक्त झाले. ‘या अष्टकम मध्ये अनेक दृश्यात्मक संदर्भ आणि जागोजागी नवरस ओतप्रोत भरलेले असल्यानेच त्यावर नृत्य स्वरूप कार्यक्रम बसविण्याचे ठरविले, हा कार्यक्रम पाहून रसिकांना आदि शंकराचार्यांनी देवांवर लिहिलेली संस्कृत काव्य अगदी दृश्यात्मक आणि चित्रमय रित्या लक्षात राहतील’, असे उषा आर. के. यांनी कार्यक्रमाचे निरूपण करताना सांगितले.
कार्यक्रमात सरस्वती, पांडुरंग, गंगाष्टक, कालभैरव दक्षिणमूर्ती आणि गुरू महत्व सांगणारे अष्टकमवर नृत्य सादर करण्यात आले.या वेळी डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांची विशेष उपस्थिती होती.