मला चिंता पक्षाची नाही , पक्षाला डावलून भाजप समवेत सत्तेत गेलेल्यांच्या भवितव्याची ….
पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयात जाणार नाही , ते काय असतं , लोकांचा विश्वास महत्वाचा ,
शरद पवार हाच चेहरा घेऊन पुढील निवडणुकीत नवी टीम करेल
पुणे- दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी केलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे.हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे असा जो उल्लेख केला. मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रश्न आता दुसरा आहे की आमचे काही सहकारी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला मी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. संघटनात्मक बदल करण्याचे काही प्रश्न होते त्याचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत असं त्यांनी सांगितलं. माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य, खासकरुन विधीमंडळाचे कितपत वेगळी भूमिका घेतली आहे याचं चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
ज्यांची नावं आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मला जे सांगत आहेत त्यांनी जनतेसमोर हे मांडलं तर मी ते मान्य करेन अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असं मी समजेन.
आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. १९८० मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होता. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली की त्यात आमची संख्या ६९ वर गेली ही दिसलं असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर काढून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी काम करणार आहे. ही माझी भूमिका केली. पक्षावर कोणीही दावा करावा. काही म्हणण नाही, माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाणार असे मत शरद पवारांनी व्यक्त केली. मी एवढेच सांगेन की, राष्ट्रवादी पक्ष नव्हता, कॉंग्रेसची मतभेद झाले त्यामुळे हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला. त्यामुळे माझा विचार हा लोकांशी जोडलेला आहे.
पक्षाच्या चौकटीच्या बाहेर ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. माझे कोणाशीही बोललो नाही, विधानसभेत सदस्य त्यांच्यातील काही लोकांनी मला फोन केला. जाण्यापूर्वी भुजबळ मला भेटून गेले, तेव्हा त्यांनी शपथ घेतली हे कळाले. गुगली अजिबात नाही, दरोडा आहे, पार्टीच्या काही लोक भ्रष्ट्राचाराच्या आरोप केले त्यांच्यातील कार्यकर्त्यांना मुक्तता करण्याचे काम केले.
अजित पवार, छगन भुजबळ यासह अनेक लोकांवर ईडीची नोटीस आहे. त्यामुळे हे सर्व लोक सत्तेत सहभागी झाले. मग यांना ईडी सरकार म्हणायचे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. यावर लोकांवर काही कारवाई झाली नाही तर त्यावर निर्णय घेतला जाईल.
विचारधारेची बांधणी घेऊन आमचे टारगेट पक्षबांधणी करायची आहे. दुसरे म्हणजे सामाजिक, धार्मिक, ऐतिहासीक सामाजिक ऐक्याला सुरूंग लावते त्याला विरोध करण्यासाठी आम्ही भाजपविरोधात लढा देत राहणार नाही.
राज्याचे अध्यक्ष, जिल्हा कमिटी यांच्यानुसार सर्वांवर कारवाई केली जाईल, ही कारवाई प्रकियानुसार केली जाईल. मुंबईच्या पक्ष कार्यालयात जयंत पाटील सकाळी 11 वाजेपासून बसलेले आहेत. त्यामुळे जे गेले त्यांच्यावर निश्चित कारवाई केली.