Home Blog Page 1432

योगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

उज्जैन
योगासन प्रकारात गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची कमाई केली.
यामध्ये मुलींच्या १८ वर्षांखालील गटात कलात्मक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखताना विजयमंचावरील पहिली तिनही स्थाने पटकावली. यामध्ये रुद्राक्षी भावे ही सुवर्ण, तर निरल वाडेकर ही रौप्य आणि स्वरा गुजर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पारंपरिक प्रकारात निरलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तृप्ती डोंगरे आणि देवांशी वाकळेने तालबद्ध प्रकारातील दुहेरीत सोनेरी यशाची कामगिरी केली. या प्रकारात स्वरा गुजर आणि प्रांजल वहान्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या विभागात पारंपरिक प्रकारात सुमित बंडाळे हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. स्वराज फिस्केने ब्रॉंझपदक मिळविले. स्वराजने पारंपरिक प्रकारात हुकलेले सोनेरी यश कलात्मक प्रकारात साध्य केले. निबोध पाटील या प्रकारात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. तालबद्ध प्रकारात दुहेरीतअंश मयेकर-नानक अभंगने रौप्य, तर रुपेश सांघे आणि सुमित बंडाळे जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

योगापटूंची कामगिरी उत्साहवर्धक – गिरीश महाजन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत योगापटूंच्या यशाचा सर्वांत मोठा वाटा होता. त्याचीच परिणती खेलो इंडिया युवा स्पर्धेत आली. येथेही योगपटूंनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्राची मान ताठ राखली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. चौथ्या पर्वाची आता कुठे सुरुवात झाली आहे. योगपटूंची ही दुहेरी पदकसंख्या निश्चितच उर्वरित स्पर्धेत खेळाडूंच्या उत्साहात भर घालेल यात शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

एयर इंडिया ने मिलानसाठी थेट विमानसेवा चालू केली; यूरोपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली 

नवी दिल्ली फेब्रुवारी२०२३भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने कालपासून आठवड्यातून चार वेळा दिल्ली ते मिलान थेट विमानसेवा सुरू केली. नुकत्याच सुरू केलेल्या दिल्ली ते कोपेनहेगन आणि दिल्ली ते विएन्नाला या एयरइंडियाच्या उड्डाणांसह या नवीन विमानसेवेमुळे यूरोपमध्ये एअरइंडियाच्या पाऊलखुणा लक्षणीयरीत्या मजबूत होतील. परतीचे विमान AI १३८ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले.

            दिल्ली ते मिलान हे विमान AI १३७  दर बुधवार, शुक्रवार, रविवार आणि सोमवारी चालते. ते दिल्लीहून दुपारी १४:२० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निघून १८:३० वाजता (LT) मिलान येथे उतरते. परतीचे विमान AI १३८ त्याच दिवशी २०:०० वाजता मिलानहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता दिल्लीला पोहोचते.

            १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीटस् असलेल्या या आधुनिक पुढच्या पिढीच्या B787-8 ड्रिमलाइनर विमानामार्फत दिली जाणारी दिल्ली-मिलान-दिल्ली सेवा दोन्ही देशातील लाखों पर्यटक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवाश्यांच्या आकांक्षा पूर्ण करते.

            भारतातील पर्यटकांना मिलान हून झ्यूरिक, रोम, फ्लॉरेन्स, व्हिएन्ना, व्हेनिस, मॉन्टेकार्लो, म्यूनिक, बुडापेस्ट, जिनिव्हा, कॅन्झ आणि कोपेनहेगन या लोकप्रिय शहरांमध्ये रस्त्याच्या मार्गाने सहज प्रवेश मिळेल. इटलीमध्ये असलेले भारतीय वंशाचे लोक आणि भारतीय उपखंडातील विविध शहरांना भेट देण्याचा विचार असलेले आणि आग्नेय आशिया, पूर्व आशिया, काठमांडू आणि अगदी ऑस्ट्रेलियामधील गंतव्य स्थानांवर प्रवास करण्याचा इरादा असलेले इटालियन पर्यटकांना या दिल्ली ते मिलान थेट विमानसेवेचा लाभ होईल. दोन्ही देशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला सलाम म्हणून एयर इंडिया या मार्गाच्या भाड्यावर प्रचारात्मक आकर्षक सूट ही देणार आहे.

            काल एयर इंडियाच्या ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख आणि ग्राउंड हॅन्डलिंग ग्लोबल प्रमुख श्री.राजेश डोग्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभानंतर २०४ प्रवाश्यांसह विमान AI १३७ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मिलान कडे वेळेवर निघाले. एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, जीएमआर आणि एआयएसएटीएस अधिकाऱ्यांसमवेत श्री. राजेश डोग्रा यांनी समारंभपूर्वक दीप प्रज्वलन केले आणि फीत कापून नवीन विमान सेवेचे उद्घाटन केले.  टर्मिनल ३ वर एका सजवलेल्या समर्पित काऊंटर वर विमानासाठी रिपोर्टिंग करणाऱ्या पहिल्या प्रवाश्याला एक मोठे सजवलेले आकर्षक बोर्डिंग कार्ड दिले गेले. या पहिल्या विमान सेवेचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे प्रवाश्यांना जेवणाचा एक संपूर्ण व आनंददायी अनुभव देण्यासाठी अस्सल इटालियन खाद्य पदार्थांसह भारतीय पदार्थांची विशेष समृद्ध चव यांना मिळवून खास बनवलेला केलेला मेन्यू हे होते.

            मिलान येथील मालपेन्सा विमानतळावर या सोहळ्याच्या स्मरणार्थ उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या विमानाचे जोरदार स्वागत केले. परतीचे विमान AI १३८ २४९ प्रवाश्यांसह मिलानहून निघून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ०८:०० वाजता दिल्ली येथे पोहोचले.

            ही उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने एयर इंडिया आता ७९, – ४८ यूनायटेड किंगडम कडे जाणाऱ्या आणि ३१ अन्य यूरोप खंडात जाणाऱ्या-,  साप्ताहिक थेट विमानसेवेमार्फत यूरोप मधील सात शहरांना विमानसेवा देईल.

            भाडे तत्वावर घेतलेल्या विमानांच्या ताफ्यात वाढ करणे आणि विद्यमान विमाने सक्रिय सेवेत परत चालू करणे यावर एयर इंडियाने सातत्याने भर दिल्यामुळे हा विस्तार शक्य झाला आहे.

            या विस्तारावर भाष्य करताना एयर इंडिया चे मुख्य वाणिज्य अधिकारी श्रीनिपुण अग्रवाल म्हणाले, या मिलान कडे जाणाऱ्या नवीन विमानसेवेतून  आम्ही यूरोप मधील प्रमुख स्थळे व्यापण्यासाठी आमचे पंख पसरणार आहोत आणि आमच्या भारताचे जागतिक नेटवर्क मजबूत करण्यासाठी योजलेल्या पंच वर्षीय (विहान.एआयVihaan.AI या योजनेच्या एक महत्त्वाच्या घटकाची पूर्तता करणार आहोतया नवीन उड्डाणांची सुरुवात हा या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे , जो आमच्या विमानांच्या ताफ्याच्या विस्ताराला पूरक आणि सुसंगत आहेआम्ही नवीन प्रवाश्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे खास एयर इंडियाचे खास भारतीय आदरातिथ्य करण्यास उत्सुक आहोत.”

भारत हे जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल -उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल

एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. २ फेब्रुवारी:“ भारतीय उच्च शिक्षण पद्धतीत सुधारणा केल्यास हा देश लवकरच जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल. तसेच देशातील सर्व विद्यापीठांनी आपल्या कल्याणकारी योजना गरीब आणि वंचितांपर्यत पोहचविण्यासाठी गांवे दत्तक घेऊन त्या गावाचा शैक्षणिक विकास करावा.”असे विचार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ बिजनेस (चाणक्य)इमारतीचे उद्घाटन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्र्रशांत गिरबाने आणि आरएफआयडी आयटेकचे सीईओ असिम पाटील हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्ष स्थानी होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडा आणि प्रवीण पाटील उपस्थित होतेेेेे.
आनंदीबेन पटेल म्हणाल्या,“ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक स्पर्धात्मक होईल. उच्च शिक्षणात सुधारणा केल्या तर भारत महासत्ता बनेल. विद्यार्थ्यांनी समाजातील संधी आणि आव्हाने समजून घेऊन नाविण्यपूर्ण उपाय उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच विद्यार्थी शिक्षीत व जाणकार झाल्यामुळे भारत लवकरच जागतिक शैक्षणिक गंतव्यवस्था बनेल. आपल्या शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे.”
“स्वदेशी उत्पादने आणि त्यांची रचना बनविण्याचे पारंपारिक कौशल्य ओळखले पाहिजे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील गरीबांपर्यत पोहचतील यासाठी विद्यार्थी आणि विद्यापीठांनी सक्र्रिय सहभाग घ्यावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यापीठाचे ध्येय म्हणजे जीवन परिवर्तन आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्याामध्ये रुजविण्याचे कार्य सतत सुरू आहे. विद्यार्थ्यांनमध्ये शिस्त आणि चारित्र्य असणे गरजेचे आहे. त्या मुळे जीवनाला नवी दिशा मिळते.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यांचा पायंडा डब्ल्यूपीयूने घातला आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील नवनर्मित या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच येथे सामाजिक कार्याचे धडे शिकविले जाते.”
दीपक करंदीकर म्हणाले, “शिक्षण संस्थांनी उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी अधिक जोडले पाहिजे. या उपक्रमाला फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि उद्योगांना समस्या सोडवण्यासाठी हात आणि बुद्धि मिळेल. विद्यार्थ्यांना व्यवसाय ऑपरेशन्सचे तंत्रज्ञान, वित्त, नियामक अनुपालन आणि स्वदेशीकरण या बाबी समजून घेतल्यास रोजगारक्षम होतील. ”
प्रशांत गिरबाने म्हणाले,“आपल्याला कुठे जायचे आहे हे आपण ओळखावे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. कठोर परिश्रम केले पाहिजे आणि आपली टीम, संस्था व समाजासाठी काय करता येईल यावर लक्ष द्यावे.”
असीम पाटील म्हणाले,“व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आंत्रप्रेन्यूअरशीप मध्ये कार्य करावे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. तपण पांडा यांनी आभार मानले.

सलग पाचव्या सुवर्णपदकापासून एका पावलावर

खेलो इंडिया युथ गेम्स 2023

  • विजयी चाैकारासह महाराष्ट्राचे खाे-खाे संघ पाचव्यांदा फायनलमध्ये
  • महिला संघाची उपांत्य सामन्यात कर्नाटकवर डावाने मात
  • महाराष्ट्र पुरुष संघाचा ६ गुणांनी ओडिसावर विजय उपांत्य सामन्यात कर्नाटकवर डावाने विजय;

जबलपूर
जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठे आणि नरेंद्रच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र खाे-खाे संघांनी पाचव्यांदा खेलाे इंडिया युथ गेम्सच्या फायनलमध्ये धडक मारली. महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांनी सलग चाैथा विजय संपादन करत अंतिम फेरीचा पल्ला गाठला. यासह आता महाराष्ट्राचे संघ पाचव्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा १ डाव आणि १ गुणांनी पराभव केला. तसेच महाराष्ट्र पुरुष संघाने उपांत्य लढतीत अवघ्या ६ गुणांनी ओडिसाचा पराभव केला.
राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, अश्विनी शिंदे, दीपाली राठाेड यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र महिला खाे-खाे संघाला पाचव्या सत्राच्या खेलाे इंडिया युथ गेम्सची फायनल गाठून दिली. चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र महिला संघाने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्र महिला संघाने गुरुवारी उपांत्य सामन्यात कर्नाटकला डावाने धूळ चारली. जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने १ डाव आणि १ गुणाने सामना जिंकला. यासह टीमला किताबावरचे आपले वर्चस्व राखून ठेवण्याची संधी आहे. आता सलग पाचव्या किताबापासून महाराष्ट्र महिला संघ अवघ्या एका पावलावर आहे.
उस्मानाबादची अश्विनी शिंदे, साेलापूरच्या प्रीती आणि दीपालीने सर्वोत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान दीपालीने १.२० मिनिटे संरक्षण केले. तसेच अश्विनी शिंदेने २.४० मिनिटे पळती करत प्रतिस्पर्धी कर्नाटक टीमच्या खेळाडूंची दमछाक केली. तसेच प्रीति काळेने २. ४० मिनिटे पळती केेली.
महाराष्ट्र महिला संघाचा पाचव्या किताबाचा दावा मजबूत : कोच साप्ते
यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाची आगेकुच लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे आता संघाला पाचव्या किताबासाठी माेठी संधी आहे. यासाठीचा दावाही संघाने मजबूत केला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र महिला संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

अशी रंगणार फायनल:
महाराष्ट्र पुरुष संघाचा अंतिम सामना दिल्ली संघाशी हाेणार आहे. तसेच महिला गटामध्ये महाराष्ट्र – ओडिसा यांच्यात फायनल रंगणार आहे.

मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राची दोन पदके निश्चित-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

भोपाळ
महाराष्ट्राच्या अन्वर शेख व उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन पदके निश्चित केली.
तात्या टोपे क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ४८ किलो गटात अन्वर याने मध्य प्रदेशच्या लोकेश पाल याचा ५-० असा पराभव केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक ठोसे व उत्कृष्ट बचाव अशा दोन्ही तंत्रांचा कल्पकतेने उपयोग केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही. अठरा वर्षाचा हा खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते व माजी ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथम सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्याची सिदरा व साद ही भावंडे देखील मुष्टियुद्ध खेळातच करिअर करीत आहेत. या भावंडांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.‌

उस्मान याने ५१ किलो गटात हरियाणाच्या गंगा कुमार याचा चुरशीच्या लढतीनंतर ४-१ असा पराभव केला. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली मात्र उस्मान याने अतिशय शांत चित्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्यास चांगला प्रतिकार करीत विजयश्री खेचून आणली. तो बारावी येथे शिकत असून सध्या औरंगाबाद येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत सनी गहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट स्पर्धेत रुपेरी कामगिरी करतानाच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचाही किताब मिळवला आहे. त्याखेरीस त्याने राष्ट्रीय युवा स्पर्धेत रौप्य पदक तर कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तो मुंबई येथील बीएमसी प्रशालेचा विद्यार्थी आहे.

नेमबाजीत ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३

भोपाळ
महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले.

मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर आपले नाव कोरले. ती पनवेल येथे ज्येष्ठ प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती यंदा दहावीची परीक्षा देत असूनही शाळा, अभ्यास आणि नेमबाजीचा सराव या तीनही गोष्टी व्यवस्थित सांभाळून वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते. ती दररोज साडेतीन तास नेमबाजीचा सराव करीत आहे. तिने आजपर्यंत राज्य व अखिल भारतीय स्तरावर भरघोस पदकांची कमाई केली आहे. नेमबाजीतच करिअर करण्याबाबत तिला घरच्यांकडून सतत पाठिंबा मिळत आहे. ती मुंबई येथील एम एन आर विद्यालयात शिकत असून शाळेकडूनही तिला चांगले सहकार्य मिळत आहे.
मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराजला कांस्यपदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला असून पदार्पणातच त्याने पदकाचे स्वप्न साकार केले आहे. तो पुण्यातील गन फॉर ग्लोरी अकादमीत श्री. सी के चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने नेमबाजीच्या खेळात सुरुवात केली आणि या छोट्याशा काळामध्ये त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. मिटकॉन इंटरनॅशनल प्रशालेत तो शिकत असून शाळेकडूनही त्याला खेळासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवा-अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा

मुंबई, दि. २ : मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावेत असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महापालिका शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करावे

महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा

मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेकडून लागणाऱ्या इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या आवश्यक त्या परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देताहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुंबई महानगराच्या सुशोभिकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टेबल टेनिस मध्ये तनिषा अंतिम फेरीत, जश मोदी याला कास्यपदकासाठी लढावे लागणार

इंदूर
महाराष्ट्राचे पदकांचे आव्हान कायम राखताना तनिषा कोटेचा हिने मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेबल टेनिस मध्ये आणखी एक पदक निश्चित केले.
तनिषा हिने उपांत्य फेरीतील रंगतदार लढतीत हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती हिचा ४-३ अशा गेम्स मध्ये पराभव केला. शेवटपर्यंत चुरशीने झालेला हा सामना तिने १२-१०,६-११,५-११,१२-१०, ११-१३, ११-८,११-९ असा जिंकला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. चक्रवर्ती हिने उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर हिचे आव्हान संपुष्टात आणले. उत्कंठा पूर्ण लढतीत पृथा हिला हा सामना ११-८,८-११,११-८,७-११,११-९,७-११,८-११ असा गमवावा लागला. एकेरीच्या अंतिम फेरीत तनिषा हिला दिल्लीच्या लक्षिता नारंग हिच्याशी खेळावे लागणार आहे. तनिषा हिने याआधी या स्पर्धेतील दुहेरीत रिशा मीरचंदानी हिच्या साथीत रौप्य पदक पटकाविले आहे.
मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदी याला उत्तर प्रदेशा दिव्यांश श्रीवास्तव याने १२-१०,११-२,११-५, ११-२ असे पराभूत केले. मात्र मोदी याला कांस्यपदकासाठी खेळण्याची अजूनही संधी आहे.‌

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच

महाराष्ट्राच्या सारा राऊळ व रिया केळकर तसेच मुलांमध्ये आर्यन दवंडे व मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
मुलांच्या गटात आर्यन याने प्राथमिक फेरीत पहिले स्थान घेताना ६९.७० गुणांची कमाई केली. प्राथमिक फेरीअखेर मानस हा चौथ्या स्थानावर असून त्याचे ६६.६० गुण झाले आहेत. मुलींमध्ये सारा हिने ४०.४० गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रिया हिने ४०.२० गुण घेतले आहेत.

स्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. २: कुष्ठरोग निवारण पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित स्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवावे. कुष्ठरोग रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्श अभियानाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ.हुकुमचंद आबा पाटोळे, किसन भुजबळ, डॉ.वर्षा आहेर, डॉ.ए.व्ही.मोहोळ, जिल्हा पर्यवेक्षक दिपक कुकडे आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, महापालिकेने झोपडपट्टी भागात आणि कुष्ठरोगाचे रुग्ण असलेल्या परिसरात विशेष मोहिम राबवावी. या भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती द्यावी. आतापर्यंत औषधोपचाराद्वारे बरे झालेल्यांची मोहिमेच्या निमित्ताने एकदा तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.पोटोळे यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची माहिती दिली. जिल्ह्यात 699 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते क्राफ्टरुट्स प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन

पुणे, दि. २: उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते क्राफ्टरुट्स प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन डच पॅलेस येथे करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला सशक्तीकरणाचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे, असे मत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाला ग्रामश्री ट्रस्ट तसेच क्राफ्टरुटसच्या मुख्य विश्वस्त अनारबेन पटेल, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, एमक्युअर कंपनीच्या संचालक भावना मेहता, पीडीलाईट इंडस्ट्रीजचे वरीष्ठ उपाध्यक्ष पी. के. शुक्ला, उत्तर प्रदेश राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्रीमती पटेल म्हणाल्या, कला ही सर्वांना जोडते. ग्रामीण कारागीर हे शालेय शिक्षणात कमी असले तरी कलेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतात. कलाकुसरीच्या वस्तूंद्वारे आपल्या राज्यातील सांस्कृतिक परंपरा देशभरात पोहोचवतात. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार होण्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. गावांच्या विकासासाठी विद्यापीठे गावांशी जोडली गेली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, हस्तकला ही भारताची परंपरा आहे. भारताच्या परंपरेला आणि ग्रामीण कौशल्यांना जगासमोर आणण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने देशातील ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्राफ्टरुट्सच्या माध्यमातून चांगले काम होत आहे.

यावेळी अनारबेन पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. क्राफ्टरुटशी देशातील विविध राज्यातील सुमारे 25 हजार कारागीर जोडलेले आहेत असे त्या म्हणाल्या.

यावेळी श्रीमती पटेल आणि श्री. केसरकर यांनी स्टॉल ला भेट देऊन करागिरांशी संवाद साधला तसेच श्री. केसरकर यांनी हस्तकलेच्या वस्तूंची खरेदीदेखील केली.

2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते-जाणकारांचा अंदाज ; आज सोने ५८६८९ रुपयांवर

सोन्याने प्रथमच आपला सार्वकालिक उच्चांक बनवत 59 हजारांच्या जवळ पोहोचले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सराफा बाजारात सोने 779 रुपयांनी महाग होऊन 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. काल सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता.चांदीबद्दल सांगायचे तर आज किमतीत मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागून 71 हजार 250 रुपये किलो झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी ती 69 हजार 445 हजारांवर होता.आजपासून एक वर्ष आधी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी सोने 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते, ते आता 58 हजार 689 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 10,681 रुपयांनी (20%) वाढली आहे.केंद्रीय बँकांकडून सोन्याची वाढती खरेदी हे सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळेल. 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आता जाणून घ्या, बजेटनंतर किमतीत वाढ का झाली?

सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% वरून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% पर्यंत वाढली आहे. शुल्क वाढल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. याशिवाय, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात RBI सारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढवला आहे.

RBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ;संसद वा सुप्रीम कोर्टाच्या समितीने चौकशीची मागणी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह 13 पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अदानी ग्रुपविरोधात चौकशीची मागणी केली.

नवी दिल्ली-RBIने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ला दिलेल्या कर्जाबाबत सर्व बँकांकडून माहिती मागवली आहे. हे वृत्त देणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले की, RBIच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, नावे न घेता ही माहिती देण्यात आली आहे. पूर्णपणे सबस्क्राइब्ड झालेला FPO रद्द केल्यानंतर गुरुवारी समूहाचे शेअर्स 10% पर्यंत घसरताना दिसत आहेत.दुसरीकडे, या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयांचा पूर्ण सबस्क्राइब झालेला FPO रद्द केला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील, असे कंपनीने सांगितले होते. याआधी बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 26.70% घसरून 2179.75 वर बंद झाले. यामुळेच अदानी समूहाने FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू एक रुपया आहे.

गौतम अदानींनी एफपीओ रद्द केल्यानंतर एक व्हिडिओ संदेश दिला. यात गुंतवणुकदारांचे आभार मानले. म्हटले, ‘गेल्या आठवड्यात स्कॉटकमध्ये झालेल्या चढ-उतारानंतरही कंपनीचा व्यवसाय आणि त्याच्या व्यवस्थापनातील आमच्याविषयीचा विश्वास आश्वासक आहे. माझ्यासाठी गुंतवणुकदारांचे हित सर्वोपरी आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. म्हणून गुंतवणुकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे.’ते म्हणाले, ‘या निर्णयाचा आमचे विद्यमान ऑपरेशन्स आणि भविष्याच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही योजनांच्या कालबद्ध परिचालनाकडे लक्ष देऊ. बोर्डाला वाटले की एफपीओसह पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. बाजारात स्थिरता आल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आमचे ईएसजीवर विशेष लक्ष आहे. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील.’

काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, सपा, द्रमुक, जनता दल आणि डाव्यांसह तेरा विरोधी पक्षांनी अदानी समूहावरील हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमधून झालेल्या आरोपांवर बैठक घेतली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक झाली. यापैकी 9 पक्षांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकांच्या कष्टाचा पैसा वाया जात आहे. लोकांचा बँक आणि एलआयसीवरील विश्वास उडेल. काही कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटनांवर सभागृहात आवाज उठवायचा आहे, असा निर्णय सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून घेतला आहे, म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्हाला या नोटीसवर चर्चा हवी होती, पण आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस देतो, तेव्हा ती फेटाळली जाते.

गुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांचा होता एकनाथ शिंदेंना फोनवरून आशीर्वाद

जालना-गुवाहाटी बंडावेळी गुरुदेव श्री. श्री. रवीशंकर यांनी आपल्याला आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते गुरुवारी जालना येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रवीशंकर गुरुजी यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी श्री. श्री. रवीशंकर गुरुजींच्या यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचेही ते म्हणाले.

तो ‘कार्यक्रम’ झाल्यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा गुरुदेवांनी मला फोनवर आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना एक लढाई आम्ही सुरू केलेली आहे, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बिलकुल चांगले आहे. चांगले काम करत राहा. अच्छा, सफल व्हा. गुरुदेवजी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. त्यावेळी तो ‘कार्यक्रम’ झाल्यामुळे आता हे ‘कार्यक्रम’ सुरू आहेत. गुरुदेव आमचे सरकार जे आम्हाला चांगला सल्ला देतील, त्याचा सन्मान करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जलसंधारणाचे मोठे काम

एकनाथ शिंदे म्हणाले की, श्री. श्री. रवीशंकर यांचे अध्यात्म, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती, नैसर्गिक शेती, जलसंधारणातही त्यांचे फार मोठे काम आहे. आपल्याला जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचे आहे.

उद्योगांनी दाखवला विश्वास

आम्ही दाओसमध्ये गेलो तेव्हा एक लाख 37 हजारांचे एमएओ केले. हे दाखवण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात आणण्यासाठी. या राज्यासाठी त्याचा खूप फायदा होईल. राज्यात आणि केंद्रात विकासाचा विचार करणारे समविचारी सरकार आहे. त्यामुळे अनेक उद्योग आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. लोकांना विश्वास पाहिजे. तो विश्वास मोदी साहेबांनी या जगाला दिला असल्याचे शिंदे म्हणाले.

एक लाख गावांत जलतारा

गुरुदेवांनी दाओसमध्ये येऊनही आम्हाला आशीर्वाद दिला. गेल्या सहा महिन्यांत आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यातला एकही निर्णय वैयक्तिक लाभ देणारा नाही. गणपती, नवरात्रोत्सव, दीपावली सगळे सण आम्ही पुन्हा सुरू केले. शेवटी माणसाने मनमोकळेपणाने आपले सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. ही आपली परंपरा आहे. एक लाख गावांमध्ये जलतारा प्रकल्प राबवण्याचा श्री श्री रवीशंकर यांचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दैवाश्रय आणि राजाश्रय

श्री. श्री. रवीशंकर म्हणाले की, पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारचे काम केले. तेव्हा ते म्हणाले होते की, आमचे ७० टक्के काम हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून झाले आहे. स्वयंसेवक जेव्हा कोणते काम हाती घेतात. तेव्हा ते सफल होतेच. कारण दैवाश्रय आणि राजाश्रय सोबत घेऊन चालतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात आलेले डॉ. अभय एकनाथ वाघ आणि डॉ. सतीश माधवराव देशपांडे यांना आज आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्यासह आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. निंबाळकर यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली. मार्च 2023 पर्यंत सरळ सेवा आणि राज्य सेवा परीक्षांच्या मुलाखती पूर्ण करण्याचे लक्ष्य आयोगाने ठेवले असून याबाबतही श्री. निंबाळकर यांनी सदस्यांना माहिती दिली.

डॉ. दिघावकर यांनीही यावेळी नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत: राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

मुंबई, दि. 2 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.

राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥