Home Blog Page 1431

ओंकारेश्वर घाटावर सीसीटीव्हीची नजर!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-ओंकारेश्वर घाटावरील चोरीच्या घटनांवर चाप बसवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण आज करण्यात आले.

हिंदू चालीरीतींनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी म्हणजे दशक्रिया! पुणे शहरात हा विधी मुठा नदीच्या काठावर आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या घाटावर होतो. शहरातील अनेक नागरिक निधन झालेल्या आपल्या आप्तांना मुक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना करतात.

पण या घाटाला चोरीच्या घटना घडत असल्याचे इथल्या पुजारी मंडळींकडून निदर्शनास आले. घाटावरील दशक्रिया विधीचे साहित्य चोरट्यांनी कपाट फोडून लंपास केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी इथल्या पुजारींकडून सातत्याने करण्यात येत आहे. 

त्यामुळे या घटनांवर चाप बसविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित केले असून, आज त्याचे लोकार्पण केले. यावेळी येथील पुजाऱ्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त करुन, कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी झोन १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, हेमंत रासने,राजेंद्र काकडे, राणी कांबळे, संजय देशमुख, धनंजय जाधव, अमित कंक,यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

एकत्रित आत्महत्येस नकार दिल्याने प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्न

पुणे-एकत्रित आत्महत्या करण्यास नकार दिल्यामुळे एकाने आपल्या प्रेयसी तरुणीचा वायरने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने स्वत:ला जखमी करून घेतल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात घडली.या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून योगेश प्रकाश थोरात (वय २८, रा. साकुर्डी, सातारा) याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश थोरात याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले.काही दिवसांपासून ते दोघे कोंढवा परिसरात राहत होते. १९ जुलै रोजी योगेश याने तरुणीला जातिवाचक शिवीगाळ करून आपण एकत्र आत्महत्या करु, असे सांगितले. त्यावर तरुणीने आत्महत्या करण्यास नकार दिला.त्यामुळे योगेश याने मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर योगेशने स्वत:ला जखमी करून घेत छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. योगेश याला ससून रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा माझाच प्रस्ताव : देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

0

मुंबई- ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गौफ्यस्फोट केले आहेत. यात विशेष करून एकनाथ शिदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावाला दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मान्य नव्हते. परंतू मी त्यांना विनंती केली. त्यानंतर बराच काळ उलटल्यानंतर त्याला मंजुरी दिली. त्याग आणि समर्पण भावनेने मी वरिष्ठांचा निर्णय मान्य करून मी उपमुख्यमंत्री झालो. पण त्यानंतर राज्यात चांगले सरकार स्थापन झाले.नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात एपिसोड देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांच्या ट्विटद्वारे शेअर केले. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास कसा झाला याविषयी भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना बॅकफूटवर आणले गेले अशी चर्चा रंगली होती. तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांना देखील धक्का बसला होता. परंतू, शिंदेंना मुख्यमंत्री केले म्हणून त्यांना धक्का बसला नव्हता तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केले. कारण, उद्या लोक काय म्हणतील हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण यामागील गेम प्लॅन वेगळाच होता. असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही.
सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्याला बराच वेळ द्यावा लागला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले

राज्यपालांना या मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींची कल्पनाच नव्हती. जेव्हा शिंदे आणि मी पत्र द्यायला गेलो तेव्हा आम्ही दोघे आणि वरचे तीन नेत्यांनाच हे माहिती होते. राज्यपालांना शिंदे मुख्यमंत्री बनतील असे पत्र दिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना हेच ठरले असल्याचे सांगितले. यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता किंवा दु:ख नव्हते. तर विजयाचा आनंद होता, परंतू तो जास्त वेळ टिकू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले.

जीएसटीच्या नव्या तरतुदीला अग्रवाल मारवाडी चेंबरचा विरोध

पुणे : जीएसटी कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार मनीलाँडरिंग तसेच सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई होऊ शकते. हा व्यापारी वर्गाला भयभीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही तरतूद त्वरित रद्द करावी, अशी मागणी अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, नरेंद्र गोयल, कमलराज बन्सल, राकेश आचार्य, प्रदीप अग्रवाल यांनी एका निवेदना द्वारे केली आहे. यासंदर्भात अग्रवाल मारवाडी चेंबरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री, अजित पवार यांना पत्र दिले.
याविषयी चेंबर चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल म्हणाले की, जीएसटी कायद्याचे उल्लंघन झाल्यास, कर चुकविल्यास मनी लाँडरींगची कारवाई होऊ शकते. जे व्यापारी जीएसटी कर नियमित भरतात त्यांच्यावर यामुळे अन्याय होईल. जीएसटीचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतरही कायदा नियमित करणे अयोग्य आहे. अशा कडक कायद्याचा अधिकारी दुरुपयोग करू शकतील. एखाद्या छोट्या चुकीसाठी प्रामाणिक व्यापार्‍यांना त्याचा त्रास होण्याचा धोका उद्भवतो. नवी तरतूद व्यापार्‍यांवर अन्याय करणारी आहे, त्यामुळे ही नवीन तरतूद रद्द करावी असेही राजेश अग्रवाल यांनी नमूद केले आहे. तसेच जे अन्य जाचक जीएसटी नियम आहेत, त्याचाही विचार करण्यात यावा.

Agarwal Marwari Chamber opposes new GST provision

Pune ; National President of Agarwal Marwadi Chamber of commerce and Education Rajesh Agarwal has raised GSt concerns over inclusion of the Goods and services Tax network under the purview of the prevention of Money Laundering Act without any approval of GST Council.

Agarwal said as per the the new provision of GST Act, Enforcement Directorate (ED) action can take action which is an indirect attempt to “scare” the country’s business class.

Agarwal said the Executive body of the chamber has written to Prime Minister Narendra Modi demanding immediate scrapping of the new provision for the benefit of the business communities, who are contributing yo the growth of the country’s economy.

The letter was also marked to Union Finance Minister Nirmala Sitharaman along with Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, and Deputy Chief Minister and Finance Minister, Ajit Pawar.

Agarwal said if the GST Act is violated, money laundering action can be taken in case of tax evasion. So it will be unfair to traders who pay GST regularly.

‘ संयुक्ता ‘ मधून घडले शक्तीस्वरूप स्त्रीचे भाव दर्शन !

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ संयुक्ता’ या कथा,कविता,नाट्यगीत सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अरुणिमा’ संस्थेने हा कार्यक्रम प्रस्तुत केला. निर्मिती,संहिता,लेखन अरुणा अनगळ यांची होती. ज्योती करंदीकर,मीनल परांजपे,शेफाली साकुरीकर सहभागी झाले. संकटावर मात करून स्वतःबरोबर इतरांचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या महिलांच्या कथा या कार्यक्रमात प्रभावीपणे मांडल्या गेल्या.

सूत्रधार अरूणा अनगळ, कथा व नाट्य सादरीकरण मीनल परांजपे, ज्योती करंदीकर यांनी केले, तर शेफाली कुलकर्णी साकुरकर यांनी कार्यक्रमातील कविता व गीतांचे सुमधुर गायन केले, या वेळी सिंथेसायझरवर तुषार दिक्षित यांनी साथ संगत केली.

हा कार्यक्रम शनीवार,२२ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.

पूर्वी पासून आजवर समाजाकडून, पुरुषी वर्चस्वातून स्त्रीयांवर अनेकानेक अत्याचार झाले, अन्याय झाले, त्याला धीराने, धैर्याने सामोरे जाणाऱ्या विविध क्षेत्रातील स्त्रियांची चरित्रे, कथा, नाट्य प्रवेश, कविता, काल्पनिक मुलाखतींमधून कधी रंजक, कधी थरारक अनुभवांतून मांडल्या गेल्या. उत्कंठावर्धक उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!

स्त्री ही स्वयंभू आहे, शक्तीरूप आहे तिला अबला नाही तर अभया म्हणायला हवे, असे मत संयुक्ता या कार्यक्रमाच्या सूत्रसधार यांनी गार्गी, द्रौपदी, जिजाबाई, कवयित्री बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, साधना आमटे आदी महिलांचे चरित्र उलगडून दाखवताना व्यक्त केले.

शेफाली साकुरीकर यांनी या वेळी नको देवराया अंत आता पाहू, मुडके ना देखो दिलबरो, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अशी विविध महिला रुपे उलगडून दाखविण्याच्या वळणावर सुमधुर गीत गायनाने हा प्रवास आणखी रंजक केला.

हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १७३ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

तळजाईला दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई

पुणे-सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.आतापर्यंत पोलिस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील 39 गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

१) मयुर रंगनाथ आरडे वय २२ वर्षे रा. गल्ली नं.६० तळजाई वसाहत पद्मावती पुणे. ( टोळी प्रमुख) २) ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे, वय २३ वर्षे रा.माने गिरणी पाठीमागे तळजाई वसाहत पद्मावती पुणे ३) रोहन ऊर्फ गायसोन्या राजु आरडे, वय २१ रा.गल्ली नं.६० तळजाई वसाहत पद्मावती पुणे ४) आदित्य ऊर्फ सॅण्डी पद्माकर डाकले, वय २० वर्षे रा.विनायक हॉटेलसमोर महात्मा गांधी सोसायटी पद्मावती, पुणे ५) आकाश मनोज डाकले, वय २३ वर्षे रा. विनायक हॉटेलसमोर महात्मा गांधी सोसायटी पद्मावती पुणे ६) अनिकेत ऊर्फ गुड्डु रविंद्र शिंदे, वय २४ वर्षे रा. विनायक हॉटेलजवळ महात्मा गांधी सोसायटी पद्मावती, पुणे ७) वृषभ शंकर कांबळे, वय २३ वर्षे रा. गल्ली नं.७६ तळजाई वसाहत पद्मावती पुणे. ८) जयेश ऊर्फ जयडया दत्ता ढावरे वय १९ वर्षे रा. गल्ली नं. ७ तळजाई वसाहत पद्मावती, पुणे (आरोपी क्र. १ ते ८ यांना अटक करण्यात आली आहे) व ९) एक विधी संघर्षीत बालक यास ताब्यात घेतले असुन १०) दोन विधीसंघर्षीत बालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तळजाई वसाहतीत मयूर आरडे टोळीने दहशत माजविली होती. लुंकड शाळेजवळ एका तरुणाला मारहाण करुन टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. मयुर रंगनाथ आरडे (टोळी प्रमुख) हा मागील 5 वर्षांपासून आपल्या गुन्हेगारी कारवाया करीत आहे.

त्याचेवर व त्याचे साथीदारांवर प्राण घातक शस्त्र जवळ बाळगणे सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून, लोकांमध्ये हल्ले करून, घातक शस्त्र जवळ बाळगणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे व दहशत निर्माण करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे, गुन्हयासाठी बेकायदेशीर घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करुन तळजाई वसाहत, खंडाळे चौक, वनशिव वस्ती रोड, सहकारनगर येथील नागरीकांशी वाद करून आपले टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत राहावी हाच उद्देश ठेवून त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

आरडे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने, संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पूजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी आरडे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.

सरकार तिसऱ्या ई-लिलावात 284 शहरांतील 808 वाहिन्यांचा लिलाव करणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी केले जाहीर 

नवी दिल्ली-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते 8 व्या आणि 9व्या समुदाय  रेडिओ पुरस्कारांचे वितरण ; प्रादेशिक समुदाय  रेडिओ संमेलनाचे केले  उद्घाटन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी  8 व्या आणि 9 व्या राष्ट्रीय समुदाय  रेडिओ पुरस्कारांचे वितरण केले. दोन दिवसीय प्रादेशिक समुदाय  रेडिओ संमेलनाच्या (उत्तर) उद्घाटन सत्रादरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, या संमेलनाचे  उद्घाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारतीय जनसंवाद संस्था येथे करण्यात आले.

लोक भागीदारी ते लोकचळवळ हे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात समुदाय रेडिओ केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही केंद्रे आकाशवाणीच्या  प्रयत्नांना जोड देतात  आणि  आपत्तीच्या वेळी त्यांच्या श्रोत्यांना माहिती देण्यात या केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

मनुष्यबळाची   कमतरता, आर्थिक ताण आणि बाह्य पाठबळाचा अभाव यासह अनेक आव्हाने असूनही समुदाय  रेडिओ केंद्र  आपली सेवा देतात आणि राष्ट्रसेवेच्या या भावनेसाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे ठाकूर म्हणाले. हे पुरस्कार केंद्रांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगत , त्यांनी भारताच्या दुर्गम भागात  शिक्षण, जागरूकता निर्माण आणि समस्या सोडवण्यासाठीसमुदाय रेडिओचे महत्त्व देखील ओळखले आहे असे ते म्हणाले. या पुरस्कारामुळे इतरांनाही या क्षेत्रात पाऊल ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी  या क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि अशी समुदाय  रेडिओ केंद्रे स्थापन  करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने,  सरकारने आटोकाट प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. जिथे  पूर्वी समुदाय  रेडिओ केंद्रे स्थापन करण्यासाठी परवाना घेणे ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया होती याला  सुमारे चार वर्षे लागत  आणि त्यात तेरा प्रक्रियांचा समावेश होता, आज त्या  प्रक्रियांपर्यंत आठ  पर्यंत कमी करण्यात आल्या असून  सहा महिन्यांत आता परवाना मिळू शकतो. हा कालावधी आणखी कमी करण्यासाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अर्ज प्रक्रिया आता प्रसारण  सेवा पोर्टलवर ऑनलाइन आहे आणि सरल संचार पोर्टलशी जोडलेली आहे,  माहिती त्यांनी दिली.

आज रेडिओची व्याप्ती  देशातील 80% भौगोलिक क्षेत्र आणि 90% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत असताना , ही पोहोच आणखी वाढवण्याचे काम  सरकार करत आहे आणि तिसऱ्या  ई-लिलावा अंतर्गत 284 शहरांमधील 808 वाहिन्यांचा लिलाव हे  त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे मंत्र्यांनी भारतात रेडिओच्या विस्तारावर भाष्य करताना सांगितले.

समुदाय  रेडिओ केंद्रांची वाढती संख्या हे त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक समुदाय  रेडिओ केंद्र असावे आणि पुढे त्याचा विस्तार  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झाला  पाहिजे हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  दृष्टीकोन  साकार करण्यासाठी भारत सरकार कार्यरत आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. या समुदाय  रेडिओ केंद्रांच्या अनुभवांची देवाणघेवाण करताना  व्यासपीठाच्या गरजेवर  बोलताना,समुदाय सेवांच्या क्षेत्रातील विविध प्रयोग आणि नवनवीन उपक्रम या रेडिओ केंद्रांद्वारे संपूर्ण भारतामध्ये स्वतंत्रपणे  केले जात आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. जिथे हे केंद्र त्यांच्या कल्पना आणि अनुभव सामायिक करू शकतील असे एक  नेटवर्क तयार केले जाऊ शकते याद्वारे सर्वोत्कृष्ट गोष्टी देशभरात अंमलात आणता येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  त्यांनी एका समुदायाची संकल्पना मांडली ज्या माध्यमातून केंद्रांच्या  कल्पनांमधून एक ऊर्जाकेंद्र  तयार होईल.

दूरचित्रवाणी  संच  नंतर इंटरनेट आणि आता ओटीटीच्या रूपात दळणवळणाच्या क्षेत्रात अनेक प्रगती झाली असली तरी  रेडिओची लोकप्रियता आणि पोहोच कमी झालेले नाही, याकडे माहिती आणि प्रसारण सचिव  अपूर्व चंद्रा यांनी लक्ष वेधले. समुदाय  रेडिओ अशा ठिकाणी अस्तित्वात आहे ज्याला इतर मंचांनी   स्पर्श केलेला  नाही आणि अधिक आधुनिक माध्यमांद्वारे जी सेवा मिळत नाही त्या कनेक्टिव्हिटीची गरज समुदाय रेडिओ केंद्र पूर्ण करतात असे ते म्हणाले. कोविड 19 महामारीमुळे या पुरस्कार वितरण समारंभाचे  आयोजन करता आले नाही  त्यामुळे   मंत्रालय यावर्षी 8 वा आणि 9वा राष्ट्रीय समुदाय रेडिओ पुरस्कार प्रदान करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या 2 वर्षात 120 हून अधिक समुदाय रेडिओ केंद्राची भर पडली असून अतिरिक्त 100 हून अधिक इरादा पत्रांसह  त्यांची संख्या 450 हून अधिक झाली आहे,अशी माहिती त्यांनी  उपस्थितांना दिली

9व्या राष्ट्रीय समुदाय  रेडिओ पुरस्कारांसाठी 4 श्रेणींमध्ये एकूण 12 पुरस्कार प्रदान करण्यात आले . पुरस्कार विजेती समुदाय  रेडिओ केंद्रे हरयाणा, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आहेत.

जिथे मुख्य प्रवाहातील माध्यमांची संख्या कमी आहे तिथे   प्रसारमाध्यमांचे हे स्वरूप शेवटच्या मैलापर्यंत पोहोचण्यासाठीभारतातील समुदाय  रेडिओ चळवळीला सरकार मोठ्या प्रमाणात  पाठबळ  देत आहे,

राष्ट्रीय समुदाय  रेडिओ पुरस्कारांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा पुरस्कार अनुक्रमे 1 लाख, 75 हजार  आणि 50 हजार रुपये आहे.

अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळाचे महत्त्व प्रोत्साहनापासून निधीपर्यंत सर्वच बाबतीत वाढले आहे: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर

फिट इंडिया क्विझ 2022 च्या माध्यमातून देशभरातील शाळा आणि विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देणार

मुंबई-केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी (23 जुलै 2023) मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार केला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने विजेत्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या विजेत्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 72 शालेय विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फिट इंडिया क्विझ अंतर्गत शाळा आणि विद्यार्थ्यांना एकूण 3.25 कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

क्रीडा आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करत अनुराग सिंह ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळाचे महत्त्व प्रोत्साहनापासून ते निधीपर्यंत सर्वच बाबींमध्ये उंचावले आहे यावर भर दिला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये असामान्य कामगिरीचे दर्शन घडवत देशाचा अभिमान वाढवला आहे. आगामी आशियाई खेळांमध्ये देशाच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके जिंकावीत, अनेक विक्रम मोडीत काढावेत आणि देशाचा सन्मान मिळवून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तरुण पिढीतील आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर अधोरेखित करताना, त्यांनी तंदुरुस्तीच्या व्यायामांसाठी दररोज काही वेळ देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि ते सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी योगाभ्यासाचे फायदे सांगून देशातील तरुणांना फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या फिट इंडिया क्विझचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702 शाळांमधील 61,981 विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद दिला. अंदमान आणि निकोबार, कारगिल, लक्षदीप, अरुणाचल प्रदेश आणि इतर अनेक भागांसह देशाच्या विविध भागातून विद्यार्थी यात सहभागी झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे, दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत उल्लेखनीय 70% वाढ झाली आहे, ज्यामुळे युवकांमध्ये खेळ आणि फिटनेसबद्दलची वाढती आवड आणि उत्साह दिसून येतो. दुसऱ्या आवृत्तीतही विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता, कारण  सर्व स्पर्धकांमध्ये त्यांचे प्रमाण 39% इतके होते.

या फेरीतील विजेते आता स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या फिट इंडिया क्विझच्या राष्ट्रीय फेरीत भाग घेतील. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील विजेत्या शाळेला पारितोषिकाची रक्कम एकूण 2.5 लाख रुपये, तर शाळेतील 2 विद्यार्थ्यांच्या संघाला एकूण 25,000 रुपये देण्यात आले. राज्यातील प्रथम उपविजेत्या शाळेला 1 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. तसेच द्वितीय उपविजेत्या शाळेला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना एकूण 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.

महाराष्ट्रामध्ये या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते आणि स्पर्धेच्या पाच फेऱ्या झाल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणची बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल ही शाळा आणि त्यांचे अभिनव भोसेकर आणि अक्षय बियाणी हे विद्यार्थी विजेते ठरले.

फिट इंडिया क्विझ हा फिट इंडिया चळवळीचा एक भाग असून याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केली होती. भारताला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. फिट इंडिया क्विझ 2022 ही शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करणारी क्रीडा आणि तंदुरुस्तीशी संबंधित भारतातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा आहे.

गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शाळांसाठी फिट इंडिया नॅशनल फिटनेस अँड स्पोर्ट्स क्विझच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली होती, त्यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, युवा व्यवहार, क्रीडा आणि गृह मंत्रालय राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते. या प्रश्नमंजुषेत भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे.

भाजपाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार

पुणे-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केली. यातील पुणे जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्ष, तसेच विविध मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीच्या २०२४ मध्ये महाविजयासाठी पक्षाने संघटनात्मक रचनेतील  ७० जिल्हाध्यक्ष तथा विविध मोर्चाच्या प्रमुखांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी नुकतीच केली. यात प्रामुख्याने पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, (बारामती) वासुदेव नाना काळे, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपदी गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, कामगार आघाडी विजय हरगुडे, क्रीडा प्रकोष्ट संदीप आप्पा भोंडवे यांच्याकडे जबाबदारी दिली.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री आणि प्रदेश कार्यालय मंत्री रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भीमराव तापकीर, उमाताई खापरे, सुनील कांबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मोरगाव येथे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

पुणे: ‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, निसर्गाचे आपण देणे लागतो, निसर्गास आपण काहीतरी दिले पाहिजे या हेतूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि शासकीय इमारतींच्या परिसरात जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिव मनिषा म्हैसकर यांनी दिल्या. त्यानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी किमान १० फूट उंचीचे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून संकल्प केला आहे. यामध्ये स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे हा या वृक्षारोपण मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

या मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी १० ते १२ फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. या ठिकाणी किमान ५ किलोमीटर लांबीमध्ये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला १० मीटर अंतरावर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रजातीच्या झाडाची एक वेगळी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने ५०० मीटर पर्यंत एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

श्री. चव्हाण यांनी यावेळी १ हजार झाडे देण्याचे जाहीर केले. अधीक्षक अभियंत्यांकडून प्रत्येकी ४००, कार्यकारी अभियंत्यांकडून प्रत्येकी २००, उपअभियंता प्रत्येकी ७५, शाखा अभियंता प्रत्येकी ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १० तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून इच्छेनुसार वृक्षारोपण करण्यात येईल व पुढील ३ वर्षे ती झाडे जगविण्यात येतील.

पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूरदि.23 :  दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची  लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हा उपक्रम करण कोठारी ज्वेलर्स, नागपूर यांच्या विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी  उपक्रमाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. नागपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने आपल्या घरात संत्र्याचे झाड लावावे या आवानालाही अनेकांनी प्रतिसाद दिला होता. वडवृक्ष लावणीच्या या अभियानात सहभागी व्हावे, निसर्गाच्या हिरवेपण जपण्याची जबाबदारी, आपणा सर्वांची आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीच्या अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पीएमपीएमएल च्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड खराब असल्याने निलंबनाची कारवाई
गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना आरोपपत्र
२ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
पुणे-पीएमपीएमएलच्या एकूण १५ डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड
खराब असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर व ६ ड्रायव्हर्सचा
समावेश आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता दि. २२/०७/२०२३ रोजी गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना
आरोपपत्र देण्यात आले असून यामध्ये ७८ कंडक्टर व ६४ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. याबरोबरच २ ड्रायव्हर व वर्कशॉप
विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
पीएमपीएमएलच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, पीएमपीएमएलच्या
ताफ्यातील जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त
लागावी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांना चोख व उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक .
सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व
चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’, डेपोनिहाय पालक अधिकारी अशा उपक्रमांचा समावेश आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या
उपक्रमांतर्गत प्रवाशी त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना नजीकच्या डेपोमध्ये, पास केंद्रावर किंवा बसस्थानकांवर
जाऊन नोंदवू शकतात. तसेच सर्व डेपोंसाठी डेपोनिहाय पालक अधिकारी नेमलेले असून हे पालक अधिकारी प्रत्येक
शनिवारी पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत डेपोमध्ये समक्ष पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी
यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करतात व त्यानंतर सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत गर्दीच्या मार्गांवर स्वतः
बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला.
पीएमपीएमएलच्या प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी यासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर

महिला बचत गट स्पर्धेत उडान महिला बचत गट अव्वल 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे महिला बचतगटांचा सन्मान सोहळा ; अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांच्या हस्ते सन्मान
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत काळेपडळ येथील उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांंक पटकाविला.
गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, माजी नगरसेविका रुपाली धाडवे, पल्लवी जावळे, सुशिला नेटके, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, स्पर्धाप्रमुख सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते.
अन्नपूर्णा महिला व्यवसाय बचत गट, समिता महिला बचत गट, उर्जा महिला बचत गट, सावित्री ज्योती महिला बचत गट, स्वाभिमानी महिला बचत गट, हर्ष श्रावणी महिला बचत गट आणि आधार महिला बचत गट या बचतगटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, मिक्सर यांसह १० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. पहिला क्रमांक किरण साळुंके, दुसरा क्रमांक स्वाती प्रसादे, तिसरा क्रमांक जयश्री पिराले, चौथा क्रमांक प्रतिमा इंगवले, पाचवा क्रमांक सविता सगस हे यंदाचे विजेते ठरले. सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धेमध्ये उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ५१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत  गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ३१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये २१ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ ७ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) केले. मुल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला हरीश शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा,राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, माजी जी.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, अल्का आत्राम,  आदींची उपस्थिती होती.

 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘सोमनाथ गेट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ताडोबा सफारीसाठी गेट निर्माण करावा, अशी सूचना केली होती. या मागणीचा सन्मान करत वन विभागाला सूचना केल्या व पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गेट सुरू करण्यात आला आहे.’ सोमनाथ सफारी गेट पर्यटकांसाठी खुले होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. पावसामुळे ताडोबा येथील कोअरमध्ये प्रवेश बंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे वनराई दिसून येत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वनांच्या बाबतीत भाग्यशाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २५ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वंदे मातरम 1926 यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसेच कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करता येणार आहे. असेही ना. मुनगंटीवार म्हणाले

जंगलालगतच्या गावांना कुंपण

वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ही चिंतेची बाब आहे. विधीमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार असून या कायद्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. गरीब शेतकरी स्वतःच्या पैशातून कुंपण लावू शकत नाही, त्यामुळे जंगलालगत असणाऱ्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून  रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. सोलर व तारेच्या कुंपणाचाही पर्याय उपलब्ध करून देत कुंपण खरेदीसाठी शेतकऱ्याच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृताच्या कुटुंबियांना आता २५ लाख

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लक्ष रुपयाची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून 25 लक्ष रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास पाच लक्ष रुपयांची मदत तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास 1 लक्ष 25 हजार रुपयांची मदत दिली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.  जंगलात गेल्यामुळेच 90 टक्के मृत्यू वाघाच्या हल्ल्यात होतात. त्यामुळे अकारण जंगलात फिरू नका आणि अवैध वृक्षतोडही करू नका, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले.

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. २३ :– बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.