Home Blog Page 1432

भाजपाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार

पुणे-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केली. यातील पुणे जिल्ह्यातील शहर व जिल्हाध्यक्ष, तसेच विविध मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज करुन शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीच्या २०२४ मध्ये महाविजयासाठी पक्षाने संघटनात्मक रचनेतील  ७० जिल्हाध्यक्ष तथा विविध मोर्चाच्या प्रमुखांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी नुकतीच केली. यात प्रामुख्याने पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, (बारामती) वासुदेव नाना काळे, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपदी गणेश भेगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, कामगार आघाडी विजय हरगुडे, क्रीडा प्रकोष्ट संदीप आप्पा भोंडवे यांच्याकडे जबाबदारी दिली.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री आणि प्रदेश कार्यालय मंत्री रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भीमराव तापकीर, उमाताई खापरे, सुनील कांबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मोरगाव येथे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

पुणे: ‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, निसर्गाचे आपण देणे लागतो, निसर्गास आपण काहीतरी दिले पाहिजे या हेतूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि शासकीय इमारतींच्या परिसरात जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिव मनिषा म्हैसकर यांनी दिल्या. त्यानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी किमान १० फूट उंचीचे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून संकल्प केला आहे. यामध्ये स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे हा या वृक्षारोपण मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

या मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी १० ते १२ फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. या ठिकाणी किमान ५ किलोमीटर लांबीमध्ये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला १० मीटर अंतरावर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रजातीच्या झाडाची एक वेगळी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने ५०० मीटर पर्यंत एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

श्री. चव्हाण यांनी यावेळी १ हजार झाडे देण्याचे जाहीर केले. अधीक्षक अभियंत्यांकडून प्रत्येकी ४००, कार्यकारी अभियंत्यांकडून प्रत्येकी २००, उपअभियंता प्रत्येकी ७५, शाखा अभियंता प्रत्येकी ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १० तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून इच्छेनुसार वृक्षारोपण करण्यात येईल व पुढील ३ वर्षे ती झाडे जगविण्यात येतील.

पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूरदि.23 :  दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची  लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हा उपक्रम करण कोठारी ज्वेलर्स, नागपूर यांच्या विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी  उपक्रमाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. नागपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने आपल्या घरात संत्र्याचे झाड लावावे या आवानालाही अनेकांनी प्रतिसाद दिला होता. वडवृक्ष लावणीच्या या अभियानात सहभागी व्हावे, निसर्गाच्या हिरवेपण जपण्याची जबाबदारी, आपणा सर्वांची आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीच्या अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पीएमपीएमएल च्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड खराब असल्याने निलंबनाची कारवाई
गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना आरोपपत्र
२ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
पुणे-पीएमपीएमएलच्या एकूण १५ डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड
खराब असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर व ६ ड्रायव्हर्सचा
समावेश आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता दि. २२/०७/२०२३ रोजी गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना
आरोपपत्र देण्यात आले असून यामध्ये ७८ कंडक्टर व ६४ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. याबरोबरच २ ड्रायव्हर व वर्कशॉप
विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
पीएमपीएमएलच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, पीएमपीएमएलच्या
ताफ्यातील जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त
लागावी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांना चोख व उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक .
सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व
चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’, डेपोनिहाय पालक अधिकारी अशा उपक्रमांचा समावेश आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या
उपक्रमांतर्गत प्रवाशी त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना नजीकच्या डेपोमध्ये, पास केंद्रावर किंवा बसस्थानकांवर
जाऊन नोंदवू शकतात. तसेच सर्व डेपोंसाठी डेपोनिहाय पालक अधिकारी नेमलेले असून हे पालक अधिकारी प्रत्येक
शनिवारी पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत डेपोमध्ये समक्ष पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी
यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करतात व त्यानंतर सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत गर्दीच्या मार्गांवर स्वतः
बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला.
पीएमपीएमएलच्या प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी यासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर

महिला बचत गट स्पर्धेत उडान महिला बचत गट अव्वल 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे महिला बचतगटांचा सन्मान सोहळा ; अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांच्या हस्ते सन्मान
पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत काळेपडळ येथील उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांंक पटकाविला.
गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, माजी नगरसेविका रुपाली धाडवे, पल्लवी जावळे, सुशिला नेटके, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, स्पर्धाप्रमुख सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते.
अन्नपूर्णा महिला व्यवसाय बचत गट, समिता महिला बचत गट, उर्जा महिला बचत गट, सावित्री ज्योती महिला बचत गट, स्वाभिमानी महिला बचत गट, हर्ष श्रावणी महिला बचत गट आणि आधार महिला बचत गट या बचतगटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, मिक्सर यांसह १० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. पहिला क्रमांक किरण साळुंके, दुसरा क्रमांक स्वाती प्रसादे, तिसरा क्रमांक जयश्री पिराले, चौथा क्रमांक प्रतिमा इंगवले, पाचवा क्रमांक सविता सगस हे यंदाचे विजेते ठरले. सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धेमध्ये उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ५१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत  गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ३१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये २१ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ ७ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे खुले झाले रोजगाराचे दालन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) केले. मुल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला हरीश शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा,राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, माजी जी.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, अल्का आत्राम,  आदींची उपस्थिती होती.

 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘सोमनाथ गेट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ताडोबा सफारीसाठी गेट निर्माण करावा, अशी सूचना केली होती. या मागणीचा सन्मान करत वन विभागाला सूचना केल्या व पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गेट सुरू करण्यात आला आहे.’ सोमनाथ सफारी गेट पर्यटकांसाठी खुले होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. पावसामुळे ताडोबा येथील कोअरमध्ये प्रवेश बंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे वनराई दिसून येत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वनांच्या बाबतीत भाग्यशाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २५ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. वंदे मातरम 1926 यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसेच कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करता येणार आहे. असेही ना. मुनगंटीवार म्हणाले

जंगलालगतच्या गावांना कुंपण

वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ही चिंतेची बाब आहे. विधीमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार असून या कायद्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. गरीब शेतकरी स्वतःच्या पैशातून कुंपण लावू शकत नाही, त्यामुळे जंगलालगत असणाऱ्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून  रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. सोलर व तारेच्या कुंपणाचाही पर्याय उपलब्ध करून देत कुंपण खरेदीसाठी शेतकऱ्याच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृताच्या कुटुंबियांना आता २५ लाख

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लक्ष रुपयाची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून 25 लक्ष रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास पाच लक्ष रुपयांची मदत तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास 1 लक्ष 25 हजार रुपयांची मदत दिली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.  जंगलात गेल्यामुळेच 90 टक्के मृत्यू वाघाच्या हल्ल्यात होतात. त्यामुळे अकारण जंगलात फिरू नका आणि अवैध वृक्षतोडही करू नका, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले.

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. २३ :– बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात आणि आपत्तीकाळात जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

इरशाळवाडी येथील बचावकार्य कायमस्वरूपी थांबाविले

अलिबाग,दि.23 (जिमाका):- इर्शाळवाडी  दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड‌‌्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.२३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष  पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे , एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले की, दि.१९ जुलै २०२३ रोजी इरर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इरर्शाळवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती.  यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत..

या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही श्री.सामंत यांनी सांगितले.

या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी उत्तमरित्या कामे केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन, असेही श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 याठिकाणी काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या ‘आप’ ची विरोधात निदर्शने

पुणे-मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आप च्या वतीने काल येथे निदर्शनेकरण्यात आली .यावेळी निदर्शक आंदोलकांनी सांगितलेकी,’मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात त्रिव निदर्शने केली आहेत, पुण्यामध्ये आम आदमी पार्टी ने भाजपा वर जोरदार हल्लाबोल केला,त्यानंतर संतप्त कार्यकर्त्याने भाजपा कार्यालय कडे कूच केली. केंद्रातील भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी

मुंबई, दि.२२ : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी केली.

षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘चाइल्ड ट्रॅकिंग’ या सिस्टमच्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून  त्यांचा कायदेशीरदृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा  समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.

प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.

केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा :पुण्याच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम

कुपवाड (सांगली)-
अश्विन कुमार गुरु, कौस्तुभ गिरगावकर शौरेन सोमण यांनी मुलांच्या गटात तर रुचिता दारवटकर व सई कुलकर्णी या पुण्याच्या खेळाडूंनी शानदार विजय मिळवित राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली.सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे.


मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात अश्विन याने आपला सहकारी व नवव्या मानांकित श्रेयस माणकेश्वर याला ११-१३,११-९, ८-११,११-५,११-६ असे पराभूत केले. हा सामना अतिशय चुरशीने खेळला गेला. शेवटच्या दोन गेम्स मध्ये अश्विन याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला आणि विजय मिळविला. सातव्या मानांकित कौस्तुभ याने रिशित बंसल याला ११-३,११-४,९-११,११-९ असे हरविले. तिसरी गेम रिशितने घेत सामन्यातील उत्सुकता वाढली मात्र शेवटच्या गेम मध्ये त्याला मोक्याच्या क्षणी गुण मिळवता आले नाहीत. तिसऱ्या मानांकित शौरेन याने टी एस टी मुंबई संघाच्या रिशान कनानी याच्यावर ११-९,११-३,११-४ असा सफाईदार विजय मिळवला. त्याच्या आक्रमक खेळापुढे कनानी याला फारशी संधी मिळाली नाही. पुण्याच्या आदित्य सामंत यानेही विजयी वाटचाल कायम ठेवली. त्याने कोल्हापूरच्या मृथिय कळमकर याच्यावर १-११,११-९,१४-१२,११-९ अशी मात केली. मुलांच्याच विभागात ठाण्याच्या प्रत्युष बौवा, कुश पाटील, ध्रुव वसईकर या मानांकित खेळाडूंनी चौथ्या फेरीकडे वाटचाल केली.

मुलींच्या गटात सातव्या मानांकित रुचिता हिने ठाण्याच्या सात्विका बौवा हिचा ११-१,११-६,११-४ असा दणदणीत पराभव केला आणि चौथी फेरी गाठली. एकतर्फी लढतीत तिने टॉप स्पिन फटके आणि चॉप्स असा अष्टपैलू खेळ केला. अकरावी मानांकित खेळाडू सई कुलकर्णी हिला टी एस टी संघाची खेळाडू त्रिशा लुदबे हिच्या विरुद्ध विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीचा हा सामना तिने ११-९,१२-१०,९-११,११-८ असा जिंकला.  

MAHARASHTRA STATE TABLE TENNIS ASSOCIATION

1st Maharashtra State Ranking Table Tennis Tournament, 2023Sangli

Venue – Krishna Valley School, Kupwad MIDC, Sangli

19th to 23rd July 2023

Organised By – Suraj Foundation & Sangli District Table Tennis Association

Boys Under 13
RoundNamePlayerNameScore
Round – 2Nilay Pattekar(THN)  [Seed – 1] Bt Yuvraj Khandwala(TST)11/3,11/7,11/7
Round – 2Rishi Bhangadia(TST) Bt Rishabh Samag(TST)11/6,11/3,11/3
Round – 2Aaradhaya Tidke(THN) Bt Mann Parmar(TST)11/9,11/5,11/9
Round – 2Mohil Thakur(PNA) Bt Harshal Patil(THN)11/4,12/10,11/8
Round – 2Aakarshan Yadav(TST)  [Seed – 9] Bt Shreeparna Mahorkar(AUR)11/5,11/5,11/6
Round – 2Karan Kashyap(NGP) Bt Anav Yadav(THN)11/9,11/6,14/12
Round – 2Moksh Shahri(TST) Bt Swanand Kulkarni(SNG)13/11,11/5,11/6
Round – 2Sharang Gavali(PNA)  [Seed – 8] Bt Pushpam Shah(KOL)11/4,11/2,11/5
Round – 2Zain Shaikh(TST)  [Seed – 5] Bt Yash Bhandari(NSK)11/8,11/9,11/7
Round – 2Aarav Vora(TST) Bt Ridant Verulkar(TST)11/4,5/11,11/6,11/8
Round – 2Nivaan Sheth(TST) Bt Saarth Shastry(NGP)6/11,11/8,12/10,12/10
Round – 2Shlok Jhaveri(MCD)  [Seed – 12] Bt Aavish Kevalramani(NSK)11/3,11/3,11/7
Round – 2Juned Magdum(KOL)  [Seed – 13] Bt Devansh Soman(THN)11/4,11/7,11/3
Round – 2Swaraj Redkar(TST) Bt Aadit Sonawane(TST)11/9,11/8,11/6
Round – 2Arnav Sarpotdar(PNA) Bt Darsheel Pawar(PNA)11/3,11/6,11/3
Round – 2Prateek Tulsani(THN)  [Seed – 4] Bt Vedant Khalade(SOL)11/2,11/3,11/4
Round – 2Param Bhiwandkar(TST)  [Seed – 3] Bt Adhish Pednekar(SND)11/7,11/1,11/5
Round – 2Harshad Kadam(PNA) Bt Archis Athawale(AUR)11/7,11/9,6/11,11/7
Round – 2Pranil Ajgaonkar(THN) Bt Aarush Tathe(PRB)11/1,11/7,13/11
Round – 2Pushkar Chakradeo(PNA) Bt Ansh Patel(AUR)11/1,11/7,11/9
Round – 2Ekansh Madane(THN)  [Seed – 11] Bt Jay Kunte(PNA)11/7,6/11,11/6,8/11,11/6
Round – 2Aarav Keniya(THN) Bt Nirav Mulye(PNA)4/11,11/6,11/7,7/11,11/7
Round – 2Elvis Tom(PNA) Bt Shivam Dakh(PRB)11/2,11/3,11/4
Round – 2Purab Singh Renu(NGP)  [Seed – 6] Bt Parth Bhanushali(THN)11/1,11/7,11/5
Round – 2Vihaan Haldankar(THN) Bt Rishikesh Patil (ngp)(NGP) [Seed – 7]12/10,11/8,12/10
Round – 2Ayaan Athar(TST) Bt Harsh Naidu(THN)11/4,11/3,11/6
Round – 2Zihan Beddingwala(TST) Bt Tanveer Singh(THN)11/7,11/6,11/5
Round – 2Ishaan Naik(TST)  [Seed – 10] Bt Abeer Rokde(THN)11/7,9/11,11/5,11/13,11/8
Round – 2Hridhaan Vora(TST) Bt Malhaar Talwalkar(TST)9/11,11/9,6/11,11/6,11/7
Round – 2Anuj Phulsundar(PNA) Bt Rajveer Gaikwad(KOL)11/3,11/2,11/5
Round – 2Vihaan Ghatkar(PNA) Bt Ved Kulkarni(THN)4/11,11/5,4/11,11/8,11/9
Round – 2Shreyas Mankeshwar(PNA)  [Seed – 2] Bt Sankalp Bandivdekar(KOL)11/7,11/8,11/6
Girls Under 13
RoundNamePlayerNameScore
Round – 2Naisha Rewaskar(PNA)  [Seed – 1] Bt Kavya Shejwal(STR)11/1,11/2,11/5
Round – 2Vedankita Patil(SOL) Bt Shravani Main(STR)9/11,11/9,11/7,11/7
Round – 2Ayaana Beddingwala(TST) Bt Spruha Gogate(THN)11/2,11/6,11/3
Round – 2Aarohee Chafekar(THN)  [Seed – 8] Bt Shrinika Umekar(PNA)11/2,11/5,11/7
Round – 2Arshia Rai(TST)  [Seed – 5] Bt Anika Nene(THN)11/6,11/3,14/12
Round – 2Samiksha Wagh(THN) Bt Vedika Jaiswal(TST)4/11,11/6,14/12,11/9
Round – 2Purvi Renu(NGP) Bt Dnyanashree Tarde(THN)11/5,11/2,11/7
Round – 2Myraa Sangelkar(TST)  [Seed – 4] Bt Avani Mane(KOL)11/9,11/3,11/13,11/4
Round – 2Aadya Baheti(PRB)  [Seed – 3] Bt Aarushi Naik(THN)9/11,11/6,11/5,11/2
Round – 2Sara Ramaiya(TST) Bt Owee Baheti(PRB)7/11,11/9,11/9,6/11,11/5
Round – 2Vidhii Kumre(NGP) Bt Adhvika Prabhune(THN)11/4,10/12,12/10,11/8
Round – 2Trissha Ludbe(TST)  [Seed – 6] Bt Palakh Jhawar(TST)11/9,11/6,11/7
Round – 2Prisha Daga(TST) Bt Spruha Borgaonkar(PNA)11/6,11/2,11/9
Round – 2Nirank Patil(THN) Bt Navya Shejwal(STR)3/11,6/11,11/7,11/5,11/5
Round – 2Sanvi Puranik(THN)  [Seed – 2] Bt Jinaya Vadhan(THN)11/3,11/6,11/7
Girls Under 15
RoundNamePlayerNameScore
Round – 3Divyanshi Bhowmick(TST)  [Seed – 1] Bt Prisha Daga(TST)11/2,11/3,11/2
Round – 3Annisha Patra(RGD)  [Seed – 16] Bt Anvi Karambelkar(THN) [Seed – 17]11/6,11/5,9/11,15/13
Round – 3Swara Karmarkar(NSK)  [Seed – 9] Bt Myraa Sangelkar(TST)11/7,9/11,11/5,11/3
Round – 3Kavya Bhatt(THN)  [Seed – 8] Bt Niva Chaughule(TST)11/6,10/12,11/7,11/4
Round – 3Anvi Gupte(THN)  [Seed – 5] Bt Sharwari Khobragade(NGP)11/2,11/5,11/3
Round – 3Sanvi Puranik(THN)  [Seed – 12] Bt Tanayaa Abhyankar(PNA)11/7,11/8,11/2
Round – 3Sukrati Sharma(THN)  [Seed – 13] Bt Sara Ramaiya(TST)11/5,11/6,11/3
Round – 3Riana Bhoota(THN)  [Seed – 4] Bt Samiksha Wagh(THN)11/5,11/3,11/5
Round – 3Hrithika Madhur(THN)  [Seed – 3] Bt Tanvi Chukkal(TST)11/4,11/9,12/10
Round – 3Anannya Joshi(KOL)  [Seed – 19] Bt Varsha Parulekar(SND)11/4,11/0,11/4
Round – 3Saee Kulkarni(PNA)  [Seed – 11] Bt Trissha Ludbe(TST)11/9,12/10,9/11,11/8
Round – 3Vaishnavi Jaiswal(TST)  [Seed – 6] Bt Anushka Kothari(BID)11/2,11/4,11/4
Round – 3Ruchita Darvatkar(PNA)  [Seed – 7] Bt Saanvika Bauva(THN)11/1,11/6,11/4
Round – 3Ayaana Beddingwala(TST) Bt Swarada Sane(JAL)11/7,7/11,8/11,11/4,12/10
Round – 3Anvi Thorat(THN)  [Seed – 15] Bt Anvaya Ranade(THN)11/6,11/6,11/2
Round – 3Ikshika Umate(NGP)  [Seed – 2] Bt Palak Jeswani(PNA)11/5,11/7,11/5
Boys Under 15
RoundNamePlayerNameScore
Round – 3Pratiyush Bauva(THN)  [Seed – 1] Bt Aarya Panchal(TST)6/11,11/7,11/6,11/3
Round – 3Vivaan Thakkar(TST) Bt Akanksh Sahoo(TST)11/4,11/9,11/8
Round – 3Ashwin Kumaraguru(PNA) Bt Shreyas Mankeshwar(PNA) [Seed – 9]11/13,11/9,8/11,11/5,11/6
Round – 3Kaustubh Girgaonkar(PNA)  [Seed – 7] Bt Rishit Bansal(PNA)11/3,11/4,9/11,11/9
Round – 3Kush Patil(THN)  [Seed – 6] Bt Yash Bhandari(NSK)11/3,11/4,8/11,11/7
Round – 3Vivek Rohera(TST) Bt Samyak Jain(THN)12/10,11/2,11/5
Round – 3Param Bhiwandkar(TST) Bt Sahil Mohite(MCD)12/10,11/6,11/3
Round – 3Aditya Samant(PNA) Bt Mrithey Kalamkar(KOL)1/11,11/9,14/12,11/9
Round – 3Shouren Soman(PNA)  [Seed – 3] Bt Rishaan Kanani(TST)11/9,11/3,11/4
Round – 3Zihan Beddingwala(TST) Bt Ekansh Madane(THN)11/6,11/8,11/4
Round – 3Ishaan Mane(KOL) Bt Swaroop Bhadalkar(PNA)12/10,10/12,11/9,9/11,11/6
Round – 3Dhruv Vasaikar(THN)  [Seed – 5] Bt Arnav Wagh(MCD)11/4,11/4,11/3
Round – 3Yashwin Gade(THN) Bt Neel Navare(PNA)11/8,11/7,11/7
Round – 3Johan Cheliparmbil(THN)  [Seed – 8] Bt Arjun Kumaraguru(PNA)11/9,11/9,11/5
Round – 3Nilay Pattekar(THN) Bt Onkar Mule(SOL)11/2,11/3,11/4

5 दिवस मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता,मुंबईच्या समुद्रात भरतीचा इशारा, किनारपट्टीवर ४.१४ मीटर लाटा उसळण्याची शक्यता

हवामान विभागाने मुंबईला हायटाईडचा (भरती) इशारा दिला आहे,मुंबईच्या किनारपट्टीवर ४.१४ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशारा,मुंबईत आज कमी पाऊस असल्याने मोठा फटका बसणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.आज उपनगरात काही प्रमाणात पाऊस आहेतर नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबई : महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशात आज ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई IMD ने जारी केलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांना आज २४ तासांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग,दि.22 :- इरशाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी. या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

इरशाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नढळ गावात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलबद्ध सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती.  विधानभवनात माझी भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी आपादग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व आपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.  कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसिलदार आयुब तांबोळी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, अप्पर तहसिलदार पूनम कदम, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, मंगेश चिवटे उपस्थित होते.

यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ २६ जुलै रोजी खुला होणार

  • प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
  • आयपीओसाठी बोलीची सुरुवात २६ जुलै २०२३ रोजी होईल व शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी ऑफर समाप्त होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी खुली होईल.
  • कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.

पुणे-:  यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडने (कंपनी) आपला आयपीओ बुधवार २६ जुलै २०२३ रोजी खुला करण्याचे ठरवले आहेयामध्ये प्रत्येक इक्विटी शेयरचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. आयपीओमध्ये ४९०० मिलियन रुपयांचे इक्विटी शेयर्स नव्याने जारी करण्यात आलेले (फ्रेश इश्यू) असतीलतसेच ६५५१६९० इक्विटी शेयर्स (ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू व ऑफर ऑफ सेल यांना एकत्रितपणे ऑफर असे संबोधण्यात आले आहे) विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यातय येणार आहेत. अँकर गुंतवणूकदार मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी बोली लावू शकतील. बुधवार २६ जुलै २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होणारी असलेली ऑफर शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी बंद होईल.

प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.  कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.

फ्रेश इश्यूच्या निव्वळ विक्रीमधून जे फंड्स उभारले जातील त्यांचा वापर पुढीलप्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – (१) कंपनीच्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड१००० मिलियन रुपयांपर्यंत; (२) कंपनीच्या उपकंपन्या एकेएस मेडिकल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (एकेएस) आणि रामराजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (रामराजा) यांनी घेतलेल्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड – १४५० मिलियन रुपयांपर्यंत (३) नोयडा हॉस्पिटल व ग्रेटर नोयडा हॉस्पिटल या दोन रुग्णालयांसाठी कंपनीच्या भांडवली खर्चांना फंडिंग करणे – २५६.४४ मिलियन रुपयांपर्यंत (४) एकेएस आणि रामराजा या कंपनीच्या उपकंपन्यांकडून चालवल्या जात असलेलया हॉस्पिटलसाठी भांडवली खर्चांचे फंडिंग – १०६९.६६ मिलियन रुपयांपर्यंत (५) अधिग्रहण व इतर धोरणात्मक उपक्रमांमार्फत इनऑरगॅनिक वृद्धी उपक्रमांना फंडिंग – ६५० मिलियन रुपयांपर्यंत आणि (६) उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी खर्च केली जाईल. 

विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या ऑफरमध्ये विमल त्यागी यांच्याकडून ३७४३००० पर्यंत इक्विटी शेयर्सप्रेम नारायण त्यागी यांच्याकडून २०२१२०० पर्यंत इक्विटी शेयर्स आणि नीना त्यागी यांच्याकडून ७८७४९० पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. (या सर्वांना मिळून प्रमोटर ग्रुप सेलिंग शेयरहोल्डर्स असे संबोधण्यात आले आहे)

१८ जुलै २०२३ रोजी कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीजनॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अँड हरियाणा यांच्याकडे रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस सादर केले असून त्यानुसार हे इक्विटी शेयर्स ऑफर केले जात आहेत.  हे इक्विटी शेयर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.  ऑफरसाठी बीएसई हे डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम१९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”)सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईलयासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहेपण त्यासाठी अशा उप-विभागांपैकी एकातील सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग  नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सच्या इतर उप-विभागातील अर्जदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरपैकी कमीत कमी ३५% भाग हा सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बिडर्सना (“रिटेल पोर्शन”) सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.

सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी आरएचपीचे पान क्रमांक ३८४ वर “ऑफर प्रोसिजर” वाचावे.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स इन्टेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडऍम्बीट प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या स्टार्टअप यंत्रणेला सक्षम करण्यासाठी – सिंपल पुढील २-३ वर्षांत ४००० उद्योजकांचा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समावेश करणार

अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या पेमेंट सुविधेच्या मदतीने राज्यातील डीटुसी ब्रँड्स व उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय

पुणे२२ जुलै २०२३ – सिंपल या भारतातील आघाडीच्या चेकआउट नेटवर्कने आज महाराष्ट्रातील डायरेक्ट-टु-कस्टमर (डीटुसी) ब्रँडस ४००० उद्योजकांचा आपल्या नेटवर्कमध्ये समावेश करणार असल्याचे जाहीर केले. पुढील २ ते ३ वर्षांत कंपनीच्या फुल-स्टॅक चेकआउट नेटवर्कमध्ये हा समावेश केला जाणार आहे. या धोरणात्मक योजनेद्वारे राज्यातील वेगाने विस्तारत असलेल्या स्टाईट- अप यंत्रणेतील हजारो उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय आहे. ऑनलाइन संवाद वाढवून आणि रिटर्न्सचे प्रमाण कमी करून हे साध्य करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

महाराष्ट्र राज्यात काही वेगाने विकसित होत असलेल्या डीटुसी ब्रँड्स कार्यरत असून राज्यातर्फे त्यांना आपल्या कामात नाविन्य आणण्यासाठीआपल्या उद्योन्मुख व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. सिंपलने या उद्योजकांना अत्याधुनिक चेकआउट- नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानामध्ये या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या वन टॅप पेमेंट सुविधेचा समावेश आहे. राज्यातील काही उद्योग आणि डीटुसी उद्योजक उदा. नर्सरी लाइव्ह हा बागकाम क्षेत्रात कार्यरत असलेला भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्मआद्या हा चांदीचे अँटिक व हँडमेड दागिने बनवणारा ब्रँडफॅबाऊ हा व्हिगन स्किनकेयर ब्रँड ग्राहकांना जास्त चांगली सेवा देण्यासाठी सिंपलच्या चेकआउट नेटवर्कवर अवलंबून राहातात. म्हणूनच कंपनीने नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रातील अस्तित्व विस्तारण्याचे ठरवले आहे. हे उद्योजक वस्त्रप्रावरणेफुटवेयरकिराणा व गॉर्मेपर्सनल केयर आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील असतील.

या घडामोडीविषयी सिंपलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नित्या शर्मा म्हणाले, डीटुसी क्षेत्राचे सखोल आकलन आम्हाला आहे आणि त्याच्या मदतीने या उद्योगाला नाविन्यपूर्ण सुविधा देत त्यांना आपल्यासमोरच्या आव्हानावर मात करण्यासाठी मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि वन टॅप पे सारखी क्रांतीकारी सुविधा यांच्या मदतीने आम्ही संवाद वाढवण्याचे आणि कॅश-ऑन-डिलीव्हरी व रिटर्न्सचे प्रमाण कमी करून उद्योजकांचे काम सोयीस्कर करण्याचे ठरवले आहे. या दरम्यान त्यांना लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठीही मदत केली जाणार आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे व उद्योजकतेच्या समृद्ध संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातूनच पुढील २ ते ३ वर्षांत ४००० स्टार्ट- अप्सना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

आज पुण्यात सिंपलच्या पहिल्या डीटुसी अनलॉक्डच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. ब्रँडच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात पुण्यातील प्रमुख डीटुसी उद्योजक सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्याच्या माध्यमातून ब्रँड उभारणी व विस्तार यावर चर्चा केली. या कार्यक्रमात शहरातील संस्थापकही सहभागी झाले होते व त्यात नंदू सिंगसंस्थापक – नर्सरी लाइव्ह, अनुष्का अय्यरविगल या बहुमाध्यमिक पेटकेयर ब्रँडच्या संस्थापकचांदीच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड आद्याच्या संस्थापक सायली मराठे यांचा समावेश होता.

विविध उद्योग आणि डीटुसी ब्रँड्ससह २६,००० उद्योजक तसेच देशभरात पसरलेले १० दशलक्ष युजर्स यांचा समावेश असलेले सिंपलचे नेटवर्क व प्लॅटफॉर्मला उद्योजक तसेच व्यापाऱ्यांची पसंती असते. संवाद वाढवण्यासाठी तसेच ऑनलाइन चेकआउट अनुभव सुरळीत होण्यासाठी ब्रँडला प्राधान्य दिले जाते.

भारतातील डीटुसी क्षेत्राने लक्षणीय विकास अनुभवला असून ग्राहक वेगाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मकडे वळत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाचाही लक्षणीय प्रभाव आहे. मोर्डो इंटेलिजन्सच्या अहवालानुसार डीटुसी क्षेत्र २०२२ ते २०२७ दरम्यान ३४.५ टक्के सीएजीआरने वाढेल असा अंदाज आहे. सिंपलने या क्रांतीकारक बदलाच्या आघाडीवर राहाण्याचे, बदल घडवून आणण्याचे आणि पुण्यातील डीटुसी उद्योजकांना सक्षम करत यश मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.