अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या पेमेंट सुविधेच्या मदतीने राज्यातील डीटुसी ब्रँड्स व उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय
पुणे, २२ जुलै २०२३ – सिंपल या भारतातील आघाडीच्या चेकआउट नेटवर्कने आज महाराष्ट्रातील डायरेक्ट-टु-कस्टमर (डीटुसी) ब्रँडस ४००० उद्योजकांचा आपल्या नेटवर्कमध्ये समावेश करणार असल्याचे जाहीर केले. पुढील २ ते ३ वर्षांत कंपनीच्या फुल-स्टॅक चेकआउट नेटवर्कमध्ये हा समावेश केला जाणार आहे. या धोरणात्मक योजनेद्वारे राज्यातील वेगाने विस्तारत असलेल्या स्टाईट- अप यंत्रणेतील हजारो उद्योजकांना सक्षम करण्याचे ध्येय आहे. ऑनलाइन संवाद वाढवून आणि रिटर्न्सचे प्रमाण कमी करून हे साध्य करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
महाराष्ट्र राज्यात काही वेगाने विकसित होत असलेल्या डीटुसी ब्रँड्स कार्यरत असून राज्यातर्फे त्यांना आपल्या कामात नाविन्य आणण्यासाठी, आपल्या उद्योन्मुख व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. सिंपलने या उद्योजकांना अत्याधुनिक चेकआउट- नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. या तंत्रज्ञानामध्ये या क्षेत्रात प्रथमच उपलब्ध करण्यात आलेल्या वन टॅप पेमेंट सुविधेचा समावेश आहे. राज्यातील काही उद्योग आणि डीटुसी उद्योजक उदा. नर्सरी लाइव्ह हा बागकाम क्षेत्रात कार्यरत असलेला भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म, आद्या हा चांदीचे अँटिक व हँडमेड दागिने बनवणारा ब्रँड, फॅबाऊ हा व्हिगन स्किनकेयर ब्रँड ग्राहकांना जास्त चांगली सेवा देण्यासाठी सिंपलच्या चेकआउट नेटवर्कवर अवलंबून राहातात. म्हणूनच कंपनीने नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रातील अस्तित्व विस्तारण्याचे ठरवले आहे. हे उद्योजक वस्त्रप्रावरणे, फुटवेयर, किराणा व गॉर्मे, पर्सनल केयर आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील असतील.
या घडामोडीविषयी सिंपलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नित्या शर्मा म्हणाले, ‘डीटुसी क्षेत्राचे सखोल आकलन आम्हाला आहे आणि त्याच्या मदतीने या उद्योगाला नाविन्यपूर्ण सुविधा देत त्यांना आपल्यासमोरच्या आव्हानावर मात करण्यासाठी मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक चेकआउट नेटवर्क आणि वन टॅप पे सारखी क्रांतीकारी सुविधा यांच्या मदतीने आम्ही संवाद वाढवण्याचे आणि कॅश-ऑन-डिलीव्हरी व रिटर्न्सचे प्रमाण कमी करून उद्योजकांचे काम सोयीस्कर करण्याचे ठरवले आहे. या दरम्यान त्यांना लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठीही मदत केली जाणार आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे व उद्योजकतेच्या समृद्ध संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातूनच पुढील २ ते ३ वर्षांत ४००० स्टार्ट- अप्सना ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सुविधा पुरवल्या जाणार आहेत.’
आज पुण्यात सिंपलच्या पहिल्या डीटुसी अनलॉक्डच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. ब्रँडच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात पुण्यातील प्रमुख डीटुसी उद्योजक सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्याच्या माध्यमातून ब्रँड उभारणी व विस्तार यावर चर्चा केली. या कार्यक्रमात शहरातील संस्थापकही सहभागी झाले होते व त्यात नंदू सिंग, संस्थापक – नर्सरी लाइव्ह, अनुष्का अय्यर, विगल या बहुमाध्यमिक पेटकेयर ब्रँडच्या संस्थापक, चांदीच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड आद्याच्या संस्थापक सायली मराठे यांचा समावेश होता.
विविध उद्योग आणि डीटुसी ब्रँड्ससह २६,००० उद्योजक तसेच देशभरात पसरलेले १० दशलक्ष युजर्स यांचा समावेश असलेले सिंपलचे नेटवर्क व प्लॅटफॉर्मला उद्योजक तसेच व्यापाऱ्यांची पसंती असते. संवाद वाढवण्यासाठी तसेच ऑनलाइन चेकआउट अनुभव सुरळीत होण्यासाठी ब्रँडला प्राधान्य दिले जाते.
भारतातील डीटुसी क्षेत्राने लक्षणीय विकास अनुभवला असून ग्राहक वेगाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मकडे वळत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाचाही लक्षणीय प्रभाव आहे. मोर्डो इंटेलिजन्सच्या अहवालानुसार डीटुसी क्षेत्र २०२२ ते २०२७ दरम्यान ३४.५ टक्के सीएजीआरने वाढेल असा अंदाज आहे. सिंपलने या क्रांतीकारक बदलाच्या आघाडीवर राहाण्याचे, बदल घडवून आणण्याचे आणि पुण्यातील डीटुसी उद्योजकांना सक्षम करत यश मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे.