- प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
- आयपीओसाठी बोलीची सुरुवात २६ जुलै २०२३ रोजी होईल व शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी ऑफर समाप्त होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी खुली होईल.
- कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.
पुणे-: यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडने (कंपनी) आपला आयपीओ बुधवार २६ जुलै २०२३ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे, यामध्ये प्रत्येक इक्विटी शेयरचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. आयपीओमध्ये ४९०० मिलियन रुपयांचे इक्विटी शेयर्स नव्याने जारी करण्यात आलेले (फ्रेश इश्यू) असतील, तसेच ६५५१६९० इक्विटी शेयर्स (ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू व ऑफर ऑफ सेल यांना एकत्रितपणे ऑफर असे संबोधण्यात आले आहे) विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यातय येणार आहेत. अँकर गुंतवणूकदार मंगळवार २५ जुलै २०२३ रोजी बोली लावू शकतील. बुधवार २६ जुलै २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होणारी असलेली ऑफर शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी बंद होईल.
प्राईस बँड प्रति इक्विटी शेयर २८५ ते ३०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ५० इक्विटी शेयर्ससाठी व त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ५० च्या पटीत बोली लावता येईल.
फ्रेश इश्यूच्या निव्वळ विक्रीमधून जे फंड्स उभारले जातील त्यांचा वापर पुढीलप्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – (१) कंपनीच्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड, १००० मिलियन रुपयांपर्यंत; (२) कंपनीच्या उपकंपन्या एकेएस मेडिकल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (एकेएस) आणि रामराजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (रामराजा) यांनी घेतलेल्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड – १४५० मिलियन रुपयांपर्यंत (३) नोयडा हॉस्पिटल व ग्रेटर नोयडा हॉस्पिटल या दोन रुग्णालयांसाठी कंपनीच्या भांडवली खर्चांना फंडिंग करणे – २५६.४४ मिलियन रुपयांपर्यंत (४) एकेएस आणि रामराजा या कंपनीच्या उपकंपन्यांकडून चालवल्या जात असलेलया हॉस्पिटलसाठी भांडवली खर्चांचे फंडिंग – १०६९.६६ मिलियन रुपयांपर्यंत (५) अधिग्रहण व इतर धोरणात्मक उपक्रमांमार्फत इनऑरगॅनिक वृद्धी उपक्रमांना फंडिंग – ६५० मिलियन रुपयांपर्यंत आणि (६) उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी खर्च केली जाईल.
विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या ऑफरमध्ये विमल त्यागी यांच्याकडून ३७४३००० पर्यंत इक्विटी शेयर्स, प्रेम नारायण त्यागी यांच्याकडून २०२१२०० पर्यंत इक्विटी शेयर्स आणि नीना त्यागी यांच्याकडून ७८७४९० पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. (या सर्वांना मिळून प्रमोटर ग्रुप सेलिंग शेयरहोल्डर्स असे संबोधण्यात आले आहे)
१८ जुलै २०२३ रोजी कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अँड हरियाणा यांच्याकडे रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस सादर केले असून त्यानुसार हे इक्विटी शेयर्स ऑफर केले जात आहेत. हे इक्विटी शेयर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ऑफरसाठी बीएसई हे डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, पण त्यासाठी अशा उप-विभागांपैकी एकातील सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सच्या इतर उप-विभागातील अर्जदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरपैकी कमीत कमी ३५% भाग हा सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बिडर्सना (“रिटेल पोर्शन”) सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.
सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी आरएचपीचे पान क्रमांक ३८४ वर “ऑफर प्रोसिजर” वाचावे.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स इन्टेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ऍम्बीट प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.