Home Blog Page 1430

 CM एकनाथ शिंदें आहेत आणि तेच राहतील; – 10 तारखेला काहीही होणार नाही-पृथ्वीराज चव्हाणांच्या भाकिताला फडणवीसांचे उत्तर

मुंबई-महायुतीचा एक जबाबदार नेता म्हणून मी सांगतो की, आमच्या युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. कोणीही कितीही दावा केला, भाकित सांगितली तरी त्याला काहीही महत्त्व नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आहेत. याची जाणीव भाजप म्हणून मला आणि राष्ट्रवादी म्हणून अजित दादांना पूर्णपणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीबदलाबाबत सर्व चर्चा खोट्या आहेत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला.

महायुतीतील कोणत्याही नेत्यांच्या मनात कोणत्याही पदाबाबत संभ्रम अजिबात नाही. त्यामुळे कार्यकर्ते अथवा कोणी मंत्र्यांनी बोलताना संभ्रम निर्माण होतील असे विधानं करू नये, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे अजिबात गैर नाही. पण बोलताना वास्तवाचा भान ठेवले पाहिजे, असे त्यांना माझे सांगणे आहे. असे म्हणत फडणवीसांनी मंत्री अनिल पाटील यांना खडसावले.

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले की, 10 ऑगस्टनंतर मुख्यमंत्री अजित पवार होणार आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी महायुतीतील एक जबाबदार नेता म्हणून सांगतो की, काही लोक आजकाल राजकीय भाकित करण्याचे काम करित आहे. 10 ऑगस्टला काहीही होणार नाही. ९ तारखेला नाही तर ११ तारखेला देखील काहीच होणार नाही. झालेच काही तर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या तारखेची निश्चित केली तेव्हाच होईल.

महायुतीतील सर्व नेत्यांमध्ये आमच्या जबाबदाऱ्या, आमची पद याची स्पष्टता आहे. मुख्यमंत्रीबदलाबाबत कधीही काहीही होणार नाही. हे अगदी मी ठामपणे व जबाबदारीने सांगत आहे. त्यामुळे पतंगबाजी करून चर्चांना उधाण करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कारस्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. २४: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. पुणे मनपा हद्दीत ३ हजार ५६५, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत १ हजार ८१२ आणि पुणे ग्रामीण हद्दीत ३ हजार ३६० अशी जिल्ह्यात एकूण ८ हजार ७३६ सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामीण हद्दीत ३९६ एक गाव एक गणपती मंडळे आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता येईल.

सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.

शासन निर्णयातील परिशिष्टानुसार अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील. अर्ज केलेल्या मंडळांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून मंडळाकडून छायाचित्रीकरण करुन तसेच कागदपत्रे जमा करून गुणांक देण्यात येतील.

पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 24:- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगाने सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही. आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत, याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहीतीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.

ओबीसी आरक्षण, महापालिका निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई-ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत उद्या 25 जुलैल सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजात संबंधित प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचा उद्या निर्णय लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी आरक्षण याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेली असून यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय लागलेला नाही. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागतील? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. असं असताना आता काही माध्यमांच्या अहवालानुसार एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी देखील सर्व पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पण ही निवडणूक जाहीर होणे तितके सोपे नाही. कारण या निवडणुकींविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहेत. सुप्रीम कोर्टात याबाबत तिढा सुटला तर महापालिका निवडणुका लगेच जाहीर होऊ शकतात.

विशेष म्हणजे या प्रकरणाशी सलग्न असा ओबीसी आरक्षणाचा देखील मुद्दा प्रलंबित आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आता सुप्रीम कोर्टात या याचिकांवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमधील महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिकांची मुदत दोन ते तीन वर्षांपासून संपली आहे. पण तरीही अद्याप निवडणुका लागलेल्या नाही. या निवडणुका नेमक्या कधी जाहीर होतील, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जातात.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यातील 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. या निवडणुकांमध्ये ओबीसी समजाला आरक्षण मिळावं, अशी सर्वांची भूमिका आहे. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. पण अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

10 ऑगस्टपर्यंत शिंदेंच्या पक्षांतराचा फैसला, त्यानंतर अजित पवार CM- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई-येत्या 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी गोटासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार नाही. कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार येत्या 10 ऑगस्टपर्यंत शिंदे यांच्या पक्षांतराचा निर्णय होईल. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप पक्षश्रेष्ठींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही आकलन केले आहे. त्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल. विशेष म्हणजे वापरा व फेकून द्या ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही काम झाल्यानंतर बाजूला फेकले जाईल.

पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का?

निधी वाटपाच्या मुद्यावरून अजित पवार पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आले आहेत. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना छेडले असता, ते म्हणाले की, शिवसेना व राष्ट्रवादीत पक्षांतर झाले. त्यात काही मोठे आकडे समोर आले. काही रोखीचे विषय झाले. पक्षांतर केलेल्या आमदारांना 25 ते 50 कोटी अगदी 150 कोटींचा निधी देण्यात आला. ही आश्वासन पूर्ती आहे का? पक्षांतर करण्यासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का? राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना झुकत माप दिले गेले का? हे आताच सांगता येत नाही.

गत काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणाविषयी व्यक्त केलेले अनेक अंदाज खरे ठरलेत. त्यातच त्यांनी आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळेही या चर्चेत अधिकची भर पडत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे ब्रुद्रूक येथील ग्रामपंचायत आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

0

मुंबई, दि. २४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक यांनी सन २०२०-२१ व २१-२२ या वर्षात १९ लाख २३ हजार व ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द कोहळे या ठिकाणी सन २०१८-१९ व  सन २०१९-२० या वर्षात ११ लाख ३७ हजार असा जवळपास ३० लाख ५१ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याबाबत त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाने केलेले अपहार प्रकरणी विधानसभा सदस्य वैभव नाईक, भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री. श्री. महाजन म्हणाले, सन २०१७ ते डिसेंबर २०२२ या कालावधीची पुनर्लेखा तपासणी करण्याबाबत ग्रामस्थ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. या प्रकारणांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी अहवालाच्या शिफारशीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

0

मुंबई, दि. २४ : “राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, उभारण्यात येणार आहेत”, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे  यांनी विधानसभेत सांगितले.

धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत झालेला आर्थिक गैरव्यवहार संदर्भात विधानसभा सदस्य कैलास घाडगे- पाटील, यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.खाडे बोलत होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले, कामगारांची अधिकृतपणे नोंदणी करण्यामध्ये अधिक सुलभता आणि पारदर्शकता यावी, कामगारांना हक्काच्या सर्व सोई-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सेतू नोंदणी केंद्र उभारण्यात येणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभवाटप, मध्यान्ह भोजन योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. यामध्ये मध्यान्ह भोजन पुरवठा करण्याकरिता नियुक्त संस्थेने सर्व सर्वेक्षणाअंती निवड केलेल्या बांधकामांच्या ठिकाणावरील नोंदित व अनोंदित कामगारांना भोजन पुरवठ्याबाबत संबंधित विकासक, ठेकेदार यांनी आस्थापनांची सहमती पत्र प्राप्त करून जिल्हा कार्यालयास सादर केलेल्या कामगारांच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यान्ह  भोजनाचा लाभ  २७ हजार ३०१ कामगार जिल्ह्यातील विविध बांधकाम साईट, वीट भट्टी, स्टोन क्रशर, कामगार नाके, मनरेगा अशा विविध ठिकाणी काम करत होते, अशी माहिती मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य नाना पटोले, अनिल देशमुख, आशिष शेलार, राजेश टोपे, विजय वडेट्टीवार, अतुल भातखळकर, भास्कर जाधव, प्रणिती शिंदे, योगेश सागर यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द

मुंबई, दि. 24 : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले  होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 लाख रूपयांचा धनादेश  मंत्री श्री. पाटील यांनी सुपूर्द केला.

मंत्री श्री. पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. संवेदना सोशल फाऊंडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊंडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊंडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडून प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडून प्रत्येकी एक लाख असे एकूण रुपये 11 लाखांचा धनादेश  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

पुण्यात एसीपी ,त्यांची पत्नी आणि पुतण्या तिघांचे मृतदेह मिळाले:खळबळ

पुणे : अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला

गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अमरावती पोलिस दलात कार्यरत असलेले एसीपी भरत गायकवाड हे पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट सापडली नाहीये. तसेच आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबात काही वाद झाल्याची प्राथमिक माहिती देखील मिळत आहे.

महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना धमकाविणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे :महापालिकेमधील कार्यालयात जाऊन उपायुक्त माधव जगताप यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकाविणार्‍या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश खराडे (वय ४५) असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. हा प्रकार पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) मुख्य इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जगताप यांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खराडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती अधिकार सेलचे काम करतात. माधव जगताप हे कार्यालयात काम करत असताना दिनेश खराडे हे मोहमदजी हुसेन लांडगे या दिव्यांग व्यक्तीला घेऊन आले. लांडगे यांच्या प्रश्नाबाबत दिनेश खराडे यांनी मी या व्यक्तीला घेऊन आलो आहे. तक्रार माझी आहे. असे म्हणून मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. असे जोरात ओरडून मारण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावून आला. फिर्यादी यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावले असता फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी देऊन दरवाजात त्यांची वाट अडवली. मी जाणार नाही व तुम्हाला मी जाऊ देणार नाही, असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक म्हस्के (PSI Mhaske) तपास करीत आहेत.

हम साथ साथ करे शहर विकास कि बात..

पुणे- आपापल्या स्तरावरून आजवर आपण पुण्याच्या विकासासाठी झटलो आता एकत्रित रित्या शहराचा विकास घडवू या असा निश्चय करत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी ‘हम साथ साथ ‘ ची जणू घोषणा दिली .

मानकर यांनी आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची कोथरुडमधील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी मानकर यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर हे देखील उपस्थित होते. या सर्वांनी यावेळी पुण्याच्या विकासाच्या योजना , त्यासाठी लागणाऱ्या घटक आणि तांत्रिक बाबी येणाऱ्या अडचणी अशा विविध बाबींवर चर्चा केली .

ओंकारेश्वर घाटावर सीसीटीव्हीची नजर!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-ओंकारेश्वर घाटावरील चोरीच्या घटनांवर चाप बसवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण आज करण्यात आले.

हिंदू चालीरीतींनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी म्हणजे दशक्रिया! पुणे शहरात हा विधी मुठा नदीच्या काठावर आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या घाटावर होतो. शहरातील अनेक नागरिक निधन झालेल्या आपल्या आप्तांना मुक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना करतात.

पण या घाटाला चोरीच्या घटना घडत असल्याचे इथल्या पुजारी मंडळींकडून निदर्शनास आले. घाटावरील दशक्रिया विधीचे साहित्य चोरट्यांनी कपाट फोडून लंपास केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी इथल्या पुजारींकडून सातत्याने करण्यात येत आहे. 

त्यामुळे या घटनांवर चाप बसविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित केले असून, आज त्याचे लोकार्पण केले. यावेळी येथील पुजाऱ्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त करुन, कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी झोन १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, हेमंत रासने,राजेंद्र काकडे, राणी कांबळे, संजय देशमुख, धनंजय जाधव, अमित कंक,यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

एकत्रित आत्महत्येस नकार दिल्याने प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्न

पुणे-एकत्रित आत्महत्या करण्यास नकार दिल्यामुळे एकाने आपल्या प्रेयसी तरुणीचा वायरने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने स्वत:ला जखमी करून घेतल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात घडली.या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून योगेश प्रकाश थोरात (वय २८, रा. साकुर्डी, सातारा) याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश थोरात याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले.काही दिवसांपासून ते दोघे कोंढवा परिसरात राहत होते. १९ जुलै रोजी योगेश याने तरुणीला जातिवाचक शिवीगाळ करून आपण एकत्र आत्महत्या करु, असे सांगितले. त्यावर तरुणीने आत्महत्या करण्यास नकार दिला.त्यामुळे योगेश याने मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर योगेशने स्वत:ला जखमी करून घेत छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. योगेश याला ससून रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा माझाच प्रस्ताव : देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

0

मुंबई- ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही गौफ्यस्फोट केले आहेत. यात विशेष करून एकनाथ शिदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावाला दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मान्य नव्हते. परंतू मी त्यांना विनंती केली. त्यानंतर बराच काळ उलटल्यानंतर त्याला मंजुरी दिली. त्याग आणि समर्पण भावनेने मी वरिष्ठांचा निर्णय मान्य करून मी उपमुख्यमंत्री झालो. पण त्यानंतर राज्यात चांगले सरकार स्थापन झाले.नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात एपिसोड देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांच्या ट्विटद्वारे शेअर केले. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास कसा झाला याविषयी भाष्य केले आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना बॅकफूटवर आणले गेले अशी चर्चा रंगली होती. तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांना देखील धक्का बसला होता. परंतू, शिंदेंना मुख्यमंत्री केले म्हणून त्यांना धक्का बसला नव्हता तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केले. कारण, उद्या लोक काय म्हणतील हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण यामागील गेम प्लॅन वेगळाच होता. असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही.
सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्याला बराच वेळ द्यावा लागला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले

राज्यपालांना या मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींची कल्पनाच नव्हती. जेव्हा शिंदे आणि मी पत्र द्यायला गेलो तेव्हा आम्ही दोघे आणि वरचे तीन नेत्यांनाच हे माहिती होते. राज्यपालांना शिंदे मुख्यमंत्री बनतील असे पत्र दिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना हेच ठरले असल्याचे सांगितले. यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता किंवा दु:ख नव्हते. तर विजयाचा आनंद होता, परंतू तो जास्त वेळ टिकू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले.

जीएसटीच्या नव्या तरतुदीला अग्रवाल मारवाडी चेंबरचा विरोध

पुणे : जीएसटी कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार मनीलाँडरिंग तसेच सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई होऊ शकते. हा व्यापारी वर्गाला भयभीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही तरतूद त्वरित रद्द करावी, अशी मागणी अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड एज्युकेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, नरेंद्र गोयल, कमलराज बन्सल, राकेश आचार्य, प्रदीप अग्रवाल यांनी एका निवेदना द्वारे केली आहे. यासंदर्भात अग्रवाल मारवाडी चेंबरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री, अजित पवार यांना पत्र दिले.
याविषयी चेंबर चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल म्हणाले की, जीएसटी कायद्याचे उल्लंघन झाल्यास, कर चुकविल्यास मनी लाँडरींगची कारवाई होऊ शकते. जे व्यापारी जीएसटी कर नियमित भरतात त्यांच्यावर यामुळे अन्याय होईल. जीएसटीचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतरही कायदा नियमित करणे अयोग्य आहे. अशा कडक कायद्याचा अधिकारी दुरुपयोग करू शकतील. एखाद्या छोट्या चुकीसाठी प्रामाणिक व्यापार्‍यांना त्याचा त्रास होण्याचा धोका उद्भवतो. नवी तरतूद व्यापार्‍यांवर अन्याय करणारी आहे, त्यामुळे ही नवीन तरतूद रद्द करावी असेही राजेश अग्रवाल यांनी नमूद केले आहे. तसेच जे अन्य जाचक जीएसटी नियम आहेत, त्याचाही विचार करण्यात यावा.

Agarwal Marwari Chamber opposes new GST provision

Pune ; National President of Agarwal Marwadi Chamber of commerce and Education Rajesh Agarwal has raised GSt concerns over inclusion of the Goods and services Tax network under the purview of the prevention of Money Laundering Act without any approval of GST Council.

Agarwal said as per the the new provision of GST Act, Enforcement Directorate (ED) action can take action which is an indirect attempt to “scare” the country’s business class.

Agarwal said the Executive body of the chamber has written to Prime Minister Narendra Modi demanding immediate scrapping of the new provision for the benefit of the business communities, who are contributing yo the growth of the country’s economy.

The letter was also marked to Union Finance Minister Nirmala Sitharaman along with Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, and Deputy Chief Minister and Finance Minister, Ajit Pawar.

Agarwal said if the GST Act is violated, money laundering action can be taken in case of tax evasion. So it will be unfair to traders who pay GST regularly.