पुणे-कसबा मतदारांचा असं पोस्ट करत ईव्हीएममध्ये मतदान करतानाचा फोटो रूपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो त्यांचाच आहे असे समजून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केली. त्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.आपण मतदान केलेच नाही तर फोटो काढू कसा? हा फोटो अन्य कुणी तरी पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यानंतर त्यांनी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान फेसबुक वर एक फोटो पोस्ट केला आहे , आणि त्यात हेमंत रासने कमळ चिन्ह असलेली मफलर गळ्यात पांघरून काही जणांच्या समवेत दिसत आहेत. त्यावर रुपाली पाटील यांनी असे म्हटले आहे कि,’
कसबा पोटनिवडणूक:मतदान केंद्रावर उमेदवार पक्षाचा मफलर घालून मतदान करणे गुन्हा नाही का? .नूमवी मतदान केंद्रातील फोटो आहे.आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी.सत्ताधारी यांनी कायद्यानी राज्य चालवावे.
मी शेंगा खाल्ल्या नाहीत ,मी टरफले उचलणार नाही
रुपाली पाटील त्यांच्या वरील गोपनीयतेचा भंग या आरोपाबद्दल बोलताना म्हणाल्या की, कसबा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.त्याच दरम्यान एका मतदाराने मला रविंद्र धंगेकर यांना मतदान केल्याचा फोटो शेअर केला.त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर आणि माझा व्हॉटस स्टेटस ठेवला.त्यावरून भाजपकडून टीका करण्यात येत आहे.पण मी अजून मतदान केल नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्या व्यक्तीनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावे की मी मतदान केले की नाही. त्यामुळे मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. सकाळी ७ च्या दरम्यानच त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचंही म्हटलं जातं आहे. तसंच विविध आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावर केले जात आहेत. अशात रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसंच हा फोटो मी पोस्ट केला आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भाजपाच्या गुंडांवर करा असंही रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असते. मतदाराला त्याने कुणाला मतदान केले, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.
मुंबई, दि, 26 : राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शोचे आयेाजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली. कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
श्री. लोढा यांनी सांगितले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लाइट ॲण्ड साऊंड शोला 28 फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात येत आहे. प्रथम आठवड्यातून दोन वेळेस म्हणजे शनिवारी आणि रविवारी शो होईल. शो आझादी का अमृत महोत्सव’ आणि प्रगतीशील भारत संकल्पनेवर आधारित आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान यावरही या शोच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, इंडियन ऑइलचे निदेशक (विपणन) व्ही. सतीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव असा उपक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी आवाहन केले आहे.
पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आचारसंहितेचा भंग करीत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आचारसंहितेचे उल्लंघन करीत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सर्व नियमांचे उल्लंघन करून वागत आहेत. निवडणुकीत मतदारांना आवाहन करताना जातीयवादी प्रचार केला जात आहे. मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आज प्रचार संपलेला असताना कसबा गणपती जवळ जमावबंदी मोडून केवळ स्टंट करून जमाव एकत्र करून कुठलाही पुरावाने देता आरोप केले गेले. हे करण्यापूर्वी कुठलीही रीतसर तक्रार केली नाही. हे आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न आहे .आम्ही आपल्याकडे मागणी करीत आहोत की रविंद्र धांगेकर यांना याविषयी जाब विचारण्यात यावा. आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी
कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होत आहे जिजामाता शाळा तांबट आळी येथे असलेल्या केंद्रावर एकल नावे असून यामध्ये कुटुंबातील इतर व्यक्तींची नावे नाहीत. हे शंकास्पद वाटते त्यामुळे अशी नावे आढळतील त्यावेळेस त्यांची कसून तपासणी व्हावी. तसेच इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते तरी अधिकचा बंदोबस्त देण्यात यावा. पुणे महापालिकेच्या लोणार आळी तसेच दारूवाला पोलीस चौकीशेजारी येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याने आधार कार्ड मतदान कार्ड याबाबतची सत्यता कडकपणे तपासली जावी. गुजराती शाळा सिटी पोस्ट मागे या मतदान केंद्राचा परिसर संवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.
पुणे- हाय प्रोफाईल एरिया मध्ये महागड्या गाड्यांमधून फिरत घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून १ कोटी २१ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
हायप्रोफाईल एरियामध्ये महागडया गाडयांचा वापर करुन घरफोडी करणारी आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीस जेरबंद करून पोलिसांनी त्यांचे कडून १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती येथे दिली .या संद्रभात पोलिसांनी सांगितले कि,’एक फिर्यादी यांच्या सिंध सोसायटी, बाणेर रोड, पुणे येथील घरात दिनांक १० / ०२/२०२३ रोजी अज्ञात चोरांनीरात्रीच्या वेळी हॉलच्या खिडकीचा कोयंडा उचकटून त्याव्दारे घरात प्रवेश करुन घरातील कपाटातून परदेशी बनावटीचे पिस्टल व जिंवत काडतुसे, ३ किंमती घडयाळे, ४ तोळे वजनाची सोन्याची चैन आणि २ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज घरफोडी करुन चोरी केली. त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. नं. १२७ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयामध्ये अज्ञात चोरटयाने पिस्टल आणि १२ जिवंत काडतुसे चोरल्यामूळे त्यांच्याकडून अजुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या होत्या. सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ३ पथके तयार करुन सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातुन एक संशियत जग्वार कार आरोपीतांनी गुन्हा करण्याकरीता वापरल्याचे दिसुन आले. सदर कारवर आरोपीनी बनावट नंबर प्लेटचा वापर केला होता. पुणे ते नाशिक पर्यंत २०० सिसिटीव्ही फुटेज कॅमे-याची पडताळणी करुन गुन्हयात वापरलेल्या जग्वार कारचा खरा नंबर प्राप्त करुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे आरोपी नामे १) मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड रा. गाव जोगिया, पो. गाढा, थाना पुपरी, जि. सीतामढी राज्य- बिहार, २) सुनिल यादव, ३) पुनित यादव, ४) राजेश यादव रा. सर्व राहणार गाजियाबाद राज्य उत्तरप्रदेश यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे २ पथके तातडीने गाजियाबाद राज्य उत्तरप्रदेश येथे पाठवुन नमूद गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड रा. दिल्ली उत्तरप्रदेश हरियाना राज्यामध्ये फिरुन राहण्याचे ठिकाणे बदलत होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ८ दिवस सतत आरोपीचा माग काढत मुख सुत्रधार मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड हा जालंधर राज्य पंजाब येथे असलेबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, सहा. पोलीस फौजदार विजय गुरव, पोलीस हवा. शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, पोलीस नाईक सारस साळवी, अमोल आव्हाड हे तात्काळ जालंधर येथे गेले. आरोपी मोहम्मद उजाला हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने तसेच तो पोलीसांची जराशी चाहुल लागताच पसार होत असल्याची माहिती तपास पथकास असल्याने जालंधर येथील आरोपी राहत असलेल्या परिसराचा बारकाईन अभ्यास करुन सदर ठिकाणी बांधकाम चालु असल्याने तपास पथकाने बिगारी कामगारांचे वेषांतर करुन आरोपीच्या घराजवळ जावुन सापळा रचुन त्यास दिनांक २३/०२/२०२३ रोजी शिताफीने ताब्यात घेतले व आरोपी कडून गुन्हयात वापरलेली जग्वार कार व चोरी केलेले पिस्टल व सोन्याचे दागिने हस्तगत केले.आरोपी मोहम्मद उजाला याने गुन्हयातील चोरलेली किंमती घडयाळे त्याचा मित्र शमीम शेख यास मुंबई येथे विक्री करीता दिले असल्याचे सांगत असल्याने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व अंमलदार यांचे पथकतात्काळ मुंबईला पाठवले. नमूद पथकाने तांत्रिक विश्लेषणाव्दारे मुंबई येथे घडयाळे विक्रीस आलेल्या १) शमीम शेख मुळराहणार बिहार, २) अब्रार शेख, ३) राजु म्हात्रे दोघे राहणार धारावी मुंबई यांना दिनांक २५/०२/२०२३ रोजी मुंबई येथुन ताब्यात घेवुन नमूद गुन्हयातील चोरीस गेलेली ३ किंमती घडयाळे तसेच आरोपीने दिनांक ०६/०२/२०२३ रोजी विशाखापटटनम येथील घरफोडी चोरीतील ७ किंमती घडयाळे अशी एकुण १० घडयाळे हस्तगत केली. आरोपी हा साथीदारासह विविध राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जाऊन हाय प्रोफाईल बंगलो, पॉश सोसायटी इन सिटी असे गुगल सर्च करुन त्याठिकाणी महागाडया कार मधुन जाऊन घरफोडी चोरी करतो. मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड याचेविरुध्द उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडू येथे गॅगस्टर अॅक्ट, आर्म अॅक्ट व व घरफोडीचे असे एकुण २७ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी सुनिल यादव विरुद्ध गगस्टर अॅक्ट, खुन व इतर असे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद उजाला याचा पुर्वइतिहास पाहता तो सहजासहजी पोलीसांना सापडत नसुन पोलीसांना गुंगारा देत असतो. तरी देखील गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने आरोपींच्या कार्यपद्धतींचा बारकाईने अभ्यास करुन तसचे कौशल्यपुर्ण तपास व अचुक माहिती प्राप्त करुन, प्रसंगी वेषांतर करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन एकुण १ कोटी २१ लाख रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गणेश माने, अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, अस्लम आत्तार, शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, सारस साळवी, हरीष मोरे, प्रविण भालचिम, राजेद्र लांडगे, विनोद महाजन,अशोक शेलार, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे यानी वरिष्ठांचे मार्गदर्शन व सू चनांप्रमाणे केली आहे.
शताब्दीनिमित्त बालशिक्षण मंदिर शाळेत २७ व २८ फेब्रुवारीला आयोजन
पुणे : मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती अवतरणार आहे. भांडारकर रस्त्यावरील मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त खास दोन दिवसांचे ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘बाशिम’गाव साकारण्यात आहे. सोमवारी (दि. २७) व मंगळवारी (दि. २८) या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन होईल. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
या बाशिम गावात गावाकडची शेती, घरे, मंदिरे, चावडी, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, सुतार-कुंभार-लोहार यासारखे ग्रामव्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा असणार आहे. मुलांना रानमेव्याची ओळख करून देण्यासह त्याचा स्वाद चाखता येणार आहे. डॉक्टरांच्या टीमकडून रानमेव्याची महत्त्व सांगितले जाणार आहे. बैलगाडीची सफर या मुलांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण यांनी दिली.
डॉ. कामठेज पाईल्स क्लिनिक व संशोधन केंद्राचे उद्घाटन
पुणे : “कोरोना काळात डॉक्टर आणि शेतकरी यांनी ईश्वरी कार्य केले. अशा डॉक्टर, रुग्णालयावर होणारे हल्ले चिंतेची बाब आहे. डॉक्टरांना संरक्षण देणारे विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत प्रलंबित आहे. केंद्र सरकारने हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी सातत्याने करत आहोत,” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. हल्ला आणि कायद्यापेक्षा संवाद व सामंजस्याची भाषा अधिक प्रभावी असते, असेही त्यांनी नमूद केले.
आयुर्वेद, ऍलोपॅथी आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून डॉ. कामठेज् पाईल्स क्लिनिक या सर्जिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे मूळव्याध, भगंदर, फिशर, फिस्तुला यांसारख्या मलमार्गाशी संबंधित आजारावर अत्याधुनिक लेजर उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. डॉ. कामठेज् पाईल्स क्लिनिकचे प्रमुख डॉ. कुणाल कामठे व डॉ. शर्मिला कामठे यांच्या पुढाकारातून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक क्षारकर्म, क्षारक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. इंद्रप्रस्थ लँडमार्क, कोंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार चेतन तुपे, सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. शिवकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “डॉक्टरांवर हल्ला करणे हा उपाय नाही. अन्याय झाला असल्यास संवादातून, कायद्याच्या मार्गाने दाद मागायला हवी. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्य सेवा सुलभ व अत्याधुनिक होत आहेत. कामठे दाम्पत्य आयुर्वेद, ऍलोपॅथी व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा अवघड आजारांवर उपचार देत आहे. सर्व सोयींनी, अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त असे हे संशोधन केंद्र आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा यातील भेद ओळखून विज्ञान व संशोधनाचा मार्ग अवलंबल्यास देश आणखी वेगाने प्रगतीपथावर जाईल.” प्रास्ताविकात डॉ. कुणाल कामठे म्हणाले, “आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड देत मलमार्गाशी संबंधित व्याधींवर उपचार देत आहोत. फिरते मूळव्याध क्लिनिक उपक्रमातून गोरगरीब रुग्णांना दर आठवड्याला मोफत तपासणी व उपचार दिले जातात. क्षारसुत्र व क्षारकर्म पद्धतीने हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. २०१९ मध्ये २०८ रुग्णांवर ११ तासांत मोफत शस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम नोंदवला होता. हॉस्पिटल आणि मंगल फाउंडेशनच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्य वर्षभर सुरू असते.” चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्मिला कामठे यांनी आभार मानले.
म्हणून कांदा सडतोय
जगभरात कांद्याला मोठी मागणी असतानाही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कांदा सडत आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही त्याची निर्यात होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असून, हा कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशावेळी कृषी आणि वाणिज्य मंत्रालय नेमके काय करतेय, हा प्रश्न आहे. केंद्र सरकारने त्वरित याबाबत धोरण बनवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
फडणवीसांनी दिलदारपणा दाखवावा
मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सरसकट विजेच्या बिलाची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे वीज दरवाढ करण्याचा प्रश्नच येत नाही. आज फडणवीस स्वतः ऊर्जामंत्री आहेत. त्यामुळे थोडासा दिलदारपणा दाखवून त्यांनी वीजबिलाची कर्जमाफी करावी, अशी विनम्रपणे आठवण व विनंती त्यांना करावी वाटते, असेही सुप्रिया सुळे यांनी प्रस्तावित ३७ टक्के वीजदरवाढीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सन २०२२-२०२३ मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत ४ था मजला, चेंबूर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक ११६, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे १ मार्च २०२३ पर्यंत होईल. प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी :
विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन २०२२-२०२३ मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा पुणे : अव्वल मानांकित आणि अनुभवी एच.एस. प्रणॉय आणि दुसरा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांचा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कस लागला. स्पर्धेत प्रणॉयला किरण जॉर्जकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. श्रीकांतला विजयासाठी मणिपूरच्या मेईराबाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे.
महिला विभागात आकर्षी कश्यपनेही जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत दुसऱ्या मानांकित तान्या हेमंतचे आव्हान संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या नेहा पंडित, आर्य भिवपाठकी आणि हर्षिल दाणी यांनी आपली आगेकूच कायम राखत तिसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या लढतींना दुसऱ्या फेरीला सनसनाटी सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या किरण जॉर्जने अव्वल मानांकित एच.एस. प्रणॉयचा २१-१२, २१-१५ असा पराभव केला. प्रणॉयच्या खेळात थकवा जाणवत होता. पुढील व्यग्र कार्यक्रमही लक्षात घेऊन प्रणॉयने फारसा जोरकस खेळ केला नाही. याचा फायदा किरणने अचूक उठवत सनसनाटी विजयाची नोंद केली. दुसऱ्या मानांकित श्रीकांतने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यालाही विजयासाठी तीन गेम झुंजावे लागले. मणिपूरच्या मेईस्नाम मेईराबाविरुद्ध श्रीकांतने १ तास ८ मिनिटांनंतर २१-१९, १८-२१, २१-१७ अशी जिंकली.
तीनही गेमला गुणांसाठी जबरदस्त चुरस झाली. आक्रमक, वेगवान आणि ताकदवान स्मॅशचा खेळ या लढतीत पहायला मिळाला. श्रीकांतने बरोबरीत चालणारी पहिली गेम बरोबरीच्या कोंडीतून अगदी अखेरच्या क्षणी गेम पॉइंट वाचवत जिंकली. दुसरी गेम अशाच बरोबरीच्या नाट्यानंतर मेईराबाने जिंकली. गेमच्या मध्यानंतर १२-१२ अशी बरोबरीनंतर मेईराबाने श्रीकांतला फारशी संधी दिली नाही. तिसरा गेमही असाच रंगला. गेमच्या मध्याला आणि त्यानंतरही बरोबरीची कोंडी सुटू शकली नाही. गेममधील १३-१३ अशी बरोबरीनंतर सलग चार गुण घेत श्रीकांतने १७-१३ अशी बरोबरी साधली. पण, मेईराबाने प्रतिआक्रमण करत १७-१७ असी बरोबरी साधली. यावेळी अनुभवी श्रीकांतने सलग चार गुणांची कमाई करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला एकेरीत आकर्षि काश्यपने दुसऱ्या मानांकित तान्या हेमंतचे आव्हान १ तास १२ मिनिटांच्या लढतीनंतर २१-२३, २२-२०, २१-१७ असे मोडून काढले. पहिल्या गेमला सुरुवातीच्या बरोबरीनंतर तान्याने गेमच्या मध्याला ११-७ अशी आघाडी मिळविली होती. पण, त्यानंतर १२-११, १३-१२ अशा स्थितीनंतर आकर्षीने १४-१२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यापर्यंत एक दोन गुणांच्या फरकाने आघाडीचे पारड सतत बदलत राहिले. आकर्षिने २०-१९ अशा स्थितीत एक गेम पॉइंट गमावला. पण, बरोबरी साधल्यावर तान्याने दोन्ही गेम पॉइंट सार्थकी लावताना पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमला आकर्षीने ५-५ अशा बरोबरीनंतर सलग ५ गुणांची कमाई करताना १०-५, नंतर १२-६ अशी आघाडी मोठी आघाडी मिळवली. मात्र, तान्याने सलग पाच गुण घेत पिछाडी १२-११ अशी भरून काढली. पुढे १६-१६ अशी बरोबरी राहिली. या वेळी दोघींनी एकेक गेम पॉइंट गमावला. मात्र, २०-२० अशी बरोबरीनंतर आकर्षिने सलग दोन गुण घेत गेम जिंकली. निर्णायक तिसऱ्या गेमला ८-८ अशी बरोबरीनंतर आकर्षीने सातत्याने दोन-चार गुणांची आघाडी राखत ती निसटणार नाही याची काळजी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
अर्जून पुरस्कार विजेत्या अंकिता रैना, शांताराम जाधव व हेमंत बेंद्रे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
पुणे,दिः२५ फेब्रुवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १६व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला (१०४ गुण) मिळाले, तर उपविजेतेपद भारती विद्यापीठ, नवी मुंबई (४२ गुण) यांना मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे दि. २० ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला. स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरणप्रसंगी भारतीय लाँग टेनिस पटू व अर्जून पुरस्कार विजेत्या अंकिता रैना, कब्बडीतील अर्जून पुरस्कार विजेता शांताराम जाधव व प्रसिद्ध भारतीय लाँग टेनिस प्रशिक्षक हेमंत बेंद्रे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस होते. याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रविण पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ. पी. जी. धनवे , योगेश नातू, विलास कथुरे आणि महेश थोरवे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२३’ मध्ये देशभरातील ७४ संघांच्या माध्यमातून ३६०० विद्यार्थ्यांनी एकूण १६ क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख १५ लाख रुपये रकमेची पारितोषिके देण्यात आली. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलिबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्क्वॅश, वॉटरपोलो, स्विमिंग, रोईंग, ई स्पोर्टस व कबड्डी या १६ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ३० हजार ते ८ हजार रोख. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये १८ हजार ते ५ हजार देण्यात आले. शांताराम जाधव म्हणाले,“ खेळ जीवनाचा अविभाज्य अंग असून खेळामुळे आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही खेळामुळे स्वतःला फिट ठेवता येते. आपल्यात धीटपणा वाढून जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते. माझ्या जीवनाला कब्बडीमुळे कलाटणी मिळाली, त्यामुळेच सरकारी नोकरी सुध्दा मिळाली. रोज खूप प्रॅक्टिस केल्याने यश नक्कीच मिळेल. कष्टाचे फळ नेहमीच मिळते.” हेमंत बेेंद्रे म्हणाले,“महाविद्यालयीन जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळामुळे जीवनाला शिस्त लागते. तसेच शारीरिक व मानसीक आरोग्य उत्तम ठेवता येते.” अंकिता रैना म्हणाल्या,“ कोणताही खेळ हा आपल्या जीवनाला वेगळा आकार देत असतो. त्यामुळे खेळताना खिलाडूवृत्ती असावी. रोज भरपूर प्रॅक्टिस करा. खेळासाठी १०० टक्के समर्पण भावनेने कार्य केल्यास त्या खेळात नक्कीच यश मिळविता येते. खेळाबरोबर शिक्षण ही महत्वाचे आहे.” डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“शिस्त आणि चरित्र्य या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा. देशासाठी हे अत्यंत महत्वाचे असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. कौशल्य, खिलाडीवृत्ती, समर्पण या गुणांबरोबरच खेळामध्ये शिस्तही महत्वाची आहे.” प्रविण पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थी जान्हवी भोसले व सिध्दार्थ गाडीलकर यांनी सूत्रसंचालन केले.श्रृती देशमुख यांनी आभार मानले.
१६ व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘राष्ट्रीय पातळीवरील एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२३’ चा सविस्तर निकाल
टेबल टेनिस (महिला) विजेता – एमएमसीओई उपविजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, उत्कृष्ठ खेळाडू – अदिती सिन्हा
टेबल टेनिस (पुरुष) विजेता – एमएमसीओई , पुणे उपविजेता – बिट्स पिलाई गोवा, उत्कृष्ठ खेळाडू – अर्चन आपटे
बॅडमिंटन (पुरुष) विजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे उपविजेता – व्हिआयटी, पुणे उत्कृष्ठ खेळाडू – सस्मीत पाटील
बॅडमिंटन (महिला) विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, उपविजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणेे उत्कृष्ठ खेळाडू – आर्या देशपांडे
व्हॉलिबॉल (पुरुष) विजेता – बिव्हिडियू, उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे उत्कृष्ट खेळाडू – आदित्य भिलारे, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – आर्यान सिन्हा, बेस्ट सेटर – निनाद भिलारे
व्हॉलिबॉल (महिला) विजेता – भारतीय विद्यापीठ, पुणे उपविजेता – सिंहगढ कॉलेज, पुणे उत्कृष्ट खेळाडू – ऐश्वर्या जोशी, उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – श्रृती बेस्ट सेटर – ईश्वरी शिंदे
बास्केटबॉल (पुरुष) विजेता – एआयटी उपविजेताः एमआयटी, सर्वोत्कृष्ठ स्कोररः अमरिश सोलंकी उत्कृष्ट खेळाडू – दीपक बरूणवाल
बास्केटबॉल (महिला) विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे उपविजेताः मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्कृष्ट खेळाडू – सानिका शिंकर
फूटबॉल (पुरुष) विजेता – भारतीय विद्यापीठ, पुणे उपविजेता – एआयएसएसएमएस , उत्कृष्ट खेळाडू – केथॉस्तो लोहो गोल किपर ः सिध्दांत चव्हाण
फूटबॉल (महिला) विजेता – एमआयटी एडीटी, पुणे उपविजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे उत्कृष्ट खेळाडू – अर्चीशा शर्मा, एडीटी, गोलकिपरः व्ही पुष्पांजली गोल्डन बूट ः मैत्रेय बिरासदार, एडीटी, पुणे
क्रिकेट विजेता ः एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे उपविजेताः सोमया विद्याविहार युनिव्हर्सिटी, मॅन ऑफ द मॅच ः दविड सहारे उत्कृष्ट गोलंदाज – कन्हैया लढ्ढा उत्कृष्ट फलंदाज ः दविड सहारे सामनावीरः आदर्श बोथरा
बुध्दिबळ विजेता – पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे उत्कृष्ट खेळाडू – शंकश शेकले, पीसीसीओई
पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३४ वा स्नेहमेळावा उद्या रविवारी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व कोकण आणि मुंबई विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह सुनील चोरे व मेळावा समन्वयक संजीव पाध्ये यांनी दिली. ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रसाद रायकर हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी, तर अमोल शहाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी संजीव पाध्ये (९७६३३३९८१०), गणेश काळे (९८२२७७८३२६), मनीषा गोसावी (९९२३४६२४४९), गणेश ननावरे (८३८०८५१७३०) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली ६८ वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले.
पुणे- कसबा प्रचारादरम्यान भाजपाने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात आज(शनिवार) ते सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदीरासमोर सपत्नीक उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उपोषण करून पॉलिटिकल स्टंट असल्याचं आणि आचारसंहितेचा भंग असल्याचेही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे.”कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले आहेत.
पुणे -कसब्याची प्रचाराची मुदत संपली असताना भाजपाच्या नेत्यांनी मतदारसंघात रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत होते. भाजपाचे वरिष्ठ नेते, पालकमंत्र्यासह अनेक मंत्री पोलिसांच्या उपस्थित प्रचार व पैस्यांचे वाटप केले. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या होत आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग, पोलिसांसमोर होत आहे. मात्र तरीही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. पोलिसांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील होत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, अशा संतप्त भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सपत्नीक कसबा गणपती मंदिरासमोर धरणे धरले. रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या मागणीची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील यांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी दुपारी आपले धरणे मागे घेतले.
कसबा पोटनिवणूकीचा 24 फेबुवारी हा शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपर्यातून मतदारांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपाला आपला पराभव दिसून येत असल्याने प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतर भाजप नेत्यांनी पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. या विरोधात सकाळी 10 वाजता कसबा गणपती मंदिरासमोर सपत्नीक धरणे धरले होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, पुजा आनंद, बाळासाहेब आमराळे, रमेश अय्यर, विक्रम खन्ना, सौरभ आमराळे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, अमर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे, गणेश नलावडे, अशोक राठी, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, प्रदीप गायकवाड, सारिका पारिख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, प्रशांत बधे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, विशाल धनवडे, संतोष भूतकर, मुकूंद चव्हाण, जितेंद्र निजामपूरकर, महेश पवार यांच्या सह पदाधिकारी, कायकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या 30 वर्षापासून माझ्या कार्यकर्त्यांना संभाळत असून कार्यकर्ते माझं घर आहे. त्यांना जर कोणी त्रास देत असतील तर ते मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, अशा संतप्त भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मी नियम पाळतो आहे, पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे असेही यावेळी ते म्हणाले.
प्रचार संपला तरीदेखील भाजपा नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. तसेच भाजपाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करीत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना मतदार संघ सोडून बाहेर जाण्याचे सांगत पोलिस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असा आरोप यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात, हे अनेकदा पुराव्यासहीत उघड केले आहे. पोलिसासमवेत ते भाजपा कार्यकर्त्यांचा बिनधास्तपणे वावर होत असल्याने भाजपाकडून सर्व यंत्रणाचा वापर होत असून हा लोकशाहीचा खून होत असल्याची संतप्त भावनादेखील यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली.
प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, रविंद्र धंगेकर यांना कसब्यातून सर्वत्र मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. त्यांच्या कामामुळे मतदारांकडून त्यांना पसंती आहे, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपाच्या उमेदवारांचा पराभव दिसत असल्याने निवडणूक आयोगासह, पोलिस यंत्रणेचा वापर त्यांच्याकडून होत आहे. पोलिसांच्या यंत्रणेत सुरक्षितपणे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून होत आहे. मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करुन कमीत कमी मतदान होण्यासाठी त्यांच्याकडून संपुर्ण प्रयत्न होत आहे. यासंदर्भात आम्ही चित्रफीतीचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र पोलिस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून कोणती कारवाई केली जात नाही. मतदार संघातील भाजपाचे झेंडे, पोस्टर काढले नाहीत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मतदार संघात पैशांचे महापूर भाजपाकडून होत आहे. पुणे शहरात युपी-बिहार सारखे वातावरण भाजपाने केले आहे. आम्ही संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. या निवडणूकीतून जतना भाजपाला नक्कीच धडा शिकवतील. आमच्या दिलेल्या तक्रारची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले असेही यावेळी जोशी यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, कसब्यात मतदारांना पैसे वाटून लोकशाहीचा गळा घोटण्यात येत असून यात पोलिसांचा देखील समावेश आहे. पैसे वाटण्याची व्हिडियो क्लिप पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पैसे वाटण्याचे प्रकार त्वरित थांबवावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
माजी राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले, भाजपाला कोणतीही नितीमत्ता राहिली नाही. आपला पराभव दिसत असल्याने जीवे मारण्याची धमकी, दडपशाही त्यांच्याकडून होत आहे. प्रचार संपला तरीदेखील पोलिस व अधिकाऱ्यांच्या मदतीने पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून सुरु आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्यासाठी पुढे येण्याची हिंमत नसल्याने लोकशाहीचा खून त्यांच्याकडून होत आहे. भाजपा गैर मार्गाने निवडणूकीला सामोरे जात आहे. मात्र जनता तुमचा पराभव करुन तुमची जागा दाखवून देणार आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना नाहक अटक करून दहशत निर्माण केली जात आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजप आपल्या सर्व शक्तीचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे, नागरिक भाजपाला मतदानातून धडा शिकवणार आहे.
अभय छाजेड म्हणाले, कसब्यात वाहतुकीपासून, डे्रनेजलाईन अनेक समस्यांना नागरिक वैतागले आहे. भाजपाची सत्ता असून देखील ते प्रश्न सोडवू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पैश्याचे अमिश दाखविण्याची वेळ आली आहे. रविंद्र धंगेकर हे त्यांच्या कामातून घराघरांमध्ये पोहचले आहेत, त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळणार असल्याने भाजपाने सर्व नियमांचे उल्लंघन करुन प्रचारयंत्रणा व पैश्यांचे वाटप, दमदाटी, धमक्या देण्याचे काम सुरु आहे. कसब्यात गैरप्रकार करणार्या सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या सामिल असणार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी त्यांनी केली.
संगीता तिवारी म्हणाल्या, कसब्यात हिंदू-मुस्लिम एैक्य, सलोखा आहे. मात्र भाजपाला निवडूकीत पराभव दिसल्याने त्यांच्यात भांडण लावण्यासाठी शहराला धोका पोहचिविणारे काम भाजपा करत आहे. सर्व जाती, धर्माचे लोक रविंद्र धंगेकर यांच्या पाठीमागे असल्याने भाजप गोंधळले आहेत.
रुपाली पाटील म्हणाल्या, हिंदू-मूस्लिममध्ये तेढ लावण्याचे काम भाजपाकडून होत आहे. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आपल्या सत्तेचा गैरवापर करीत आहे. पोलिस यंत्रणाच भाजपाने आपल्या धावणीला बांधली असल्याने मतदार भयभयीत झाला आहे. भाजपाचे उमेदवारांनी पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जनतेचा पैसा लुटला आहे. हाच पैसा त्यांनी आपला पराभव दिसल्याने बाहेर काढला आहे. त्यांना साथ देणार्या पोलिसांची, मंत्र्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
भाजपा गैरमार्गाने प्रचार यंत्रणा राबवित असल्याने सर्वत्र टिकेची झोड उमटत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत मतदानातून आपली ताकद दाखूवन देणार असल्याचे सांगितले.
पुणे-पाषाण येथील एक जमीन विकसनाकरिता देण्यात आली असता, विकसनचा करार माेडून एका बांधकाम व्यवसायिकाची तब्बल 14 काेटी 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (वय 65,रा.पुणे) यांनी चतुश्रृंगी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दाेन जणांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.
अशाेक शिवनारायण थेपडे (वय 74) व अमित अशाेक थेपडे (वय 47, दाेघे रा.भाेसलेनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार 2006 पासून आतापर्यंत घडलेला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील एक जमीन 8 ऑगस्ट 2006 राेजी घेतली हाेती.
आराेपी अशाेक थेपडे व अमित थेपडे यांचे मे.गॅलक्सी कन्स्ट्रक्शन अँड काॅन्ट्रॅक्टर प्रा.लि. यांना विकसनासाठी त्यांनी सदर जमीन दिली हाेती. तेथे विकसन करुन 55 टक्के तक्रारदार यांना व 45 टक्के आराेपी यांचे कंपनीला देण्याचे निश्चित झाले हाेते. सदर बांधकामाचा ताबा 15 महिन्यात देण्याचे ठरले असताना, ताे न देता तक्रारदार यांनी मुदतवाढ दिली असता, आराेपींनी त्यानंतर सुध्दा ताबा दिला नाही.
तक्रारदार यांनी 2016 मध्ये आराेपी यांना नाेटीस पाठवून सर्व हक्क व पाॅवर ऑफ एटर्नी संपुष्टात आलेली असतानाही, आराेपींनी सदर हक्क स्वत:कडे आहे असे खाेटे व बनावट कागदपत्रे तयार करुन ते खरे असल्याचे भासवले. त्याआधारे त्यांनी सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टी स्टेट काे-ऑप साेसायटीकडून 30 काेटी 75 लाख रुपये घेतले.तक्रारदार यांच्या हिशश्याचे 2500 स्के फुटचे दुकान व 10 हजार 500 स्के फुटचे ऑफीस ज्याची किंमत 14 काेटी 50 लाख रुपये असून सदर मिळकतीचा गैरवापर करुन त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस टुले करत आहे.
पुणे-धनकवडी परिसरात दहा जणांनी अँटी करप्शनचे अधिकारी व न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगत छापेमारी केली. यावेळी त्यांनी 14 हजार रुपये राेख व 70 हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा 84 हजारांचा मुद्देमाल चाेरुन नेला आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलिस ठाण्यात दहा आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली आहे.याबाबत 40 वर्षीय एका महिलेने आराेपी विराेधात सहकारनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सीमा शशिकांत शिंदे (वय-30), अर्चना नायडू व चार महिला व तीन पुरुष अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 फेब्रुवारी राेजी रात्री साडेनऊ ते पावणेबाराच्या सुमारास घडला आहे.
कसे घडले स्पेशल 26?
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या घरी 18 फेब्रुवारी राेजी रात्री अचानक काही अनाेळखी महिला व पुरुष घरी आले. त्यांनी आम्ही अँटी करप्शनचे पाेलिस अधिकारी असून साेबत न्यूज रिपाेर्टर असल्याचे सांगितले.त्यानंतर ‘तुम्ही इथे वेश्या व्यवसाय चालवता, तुमच्या विराेधात केस करताे’ अशी धमकी देऊन त्यांना व त्यांचा मुलांना व भाचीला हाताने मारहाण करण्यात आली. ही केस ताबडताेब मिटविण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 14 हजार रुपये राेख व 70 हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा माैल्यवान ,ऐवज घेऊन फरार झाले.हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून असल्याचे तक्रारदार महिलेस वाटले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांकडे तक्रार केली नाही. परंतु हा प्रकार घडत असताना ओळखीच्या असणाऱ्या आरोपी सिमा शिंदे या साेसायटीच्या बाहेर उभ्या असल्याचे तक्रारदार महिलेच्या मुलाने पाहिले हाेते. त्यावरुन तिने हा छापा घातला असावा अशी शंका आल्याने त्यांनी याबाबत पाेलिसांकडे चाैकशी केली.पाेलिसांनी सिमा शिंदे हिला ताब्यात घेऊन तपासणी केल्यानंतर तिने सहकाऱ्यांचे मदतीने बनावट छापा टाकून लुटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहकारनगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस शेडे पुढील तपास करत आहे.