पुणे- हाय प्रोफाईल एरिया मध्ये महागड्या गाड्यांमधून फिरत घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून १ कोटी २१ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
हायप्रोफाईल एरियामध्ये महागडया गाडयांचा वापर करुन घरफोडी करणारी आंतरराज्यीय गुन्हेगारी
टोळीस जेरबंद करून पोलिसांनी त्यांचे कडून १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती येथे दिली .या संद्रभात पोलिसांनी सांगितले कि,’एक फिर्यादी यांच्या सिंध सोसायटी, बाणेर रोड, पुणे येथील घरात दिनांक १० / ०२/२०२३ रोजी अज्ञात चोरांनीरात्रीच्या वेळी हॉलच्या खिडकीचा कोयंडा उचकटून त्याव्दारे घरात प्रवेश करुन घरातील कपाटातून परदेशी बनावटीचे
पिस्टल व जिंवत काडतुसे, ३ किंमती घडयाळे, ४ तोळे वजनाची सोन्याची चैन आणि २ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज
घरफोडी करुन चोरी केली. त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. नं. १२७ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७,
३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयामध्ये अज्ञात चोरटयाने पिस्टल आणि १२ जिवंत काडतुसे चोरल्यामूळे
त्यांच्याकडून अजुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त
यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या
होत्या.
सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे, पोलीस
उप आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ३ पथके तयार
करुन सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातुन एक संशियत जग्वार कार आरोपीतांनी गुन्हा करण्याकरीता वापरल्याचे दिसुन आले.
सदर कारवर आरोपीनी बनावट नंबर प्लेटचा वापर केला होता. पुणे ते नाशिक पर्यंत २०० सिसिटीव्ही फुटेज कॅमे-याची
पडताळणी करुन गुन्हयात वापरलेल्या जग्वार कारचा खरा नंबर प्राप्त करुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे आरोपी नामे १) मोहम्मद
इरफान ऊर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड रा. गाव जोगिया, पो. गाढा, थाना पुपरी, जि. सीतामढी राज्य- बिहार, २) सुनिल
यादव, ३) पुनित यादव, ४) राजेश यादव रा. सर्व राहणार गाजियाबाद राज्य उत्तरप्रदेश यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न
केले.
वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे २ पथके तातडीने गाजियाबाद राज्य उत्तरप्रदेश येथे पाठवुन नमूद
गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड रा. दिल्ली उत्तरप्रदेश हरियाना राज्यामध्ये
फिरुन राहण्याचे ठिकाणे बदलत होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ८ दिवस सतत आरोपीचा माग काढत मुख सुत्रधार
मोहम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबीन हुड हा जालंधर राज्य पंजाब येथे असलेबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हे शाखेचे
पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, सहा. पोलीस फौजदार विजय गुरव, पोलीस हवा. शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण,
पोलीस नाईक सारस साळवी, अमोल आव्हाड हे तात्काळ जालंधर येथे गेले. आरोपी मोहम्मद उजाला हा रेकॉर्डवरील
सराईत गुन्हेगार असल्याने तसेच तो पोलीसांची जराशी चाहुल लागताच पसार होत असल्याची माहिती तपास पथकास
असल्याने जालंधर येथील आरोपी राहत असलेल्या परिसराचा बारकाईन अभ्यास करुन सदर ठिकाणी बांधकाम चालु
असल्याने तपास पथकाने बिगारी कामगारांचे वेषांतर करुन आरोपीच्या घराजवळ जावुन सापळा रचुन त्यास दिनांक
२३/०२/२०२३ रोजी शिताफीने ताब्यात घेतले व आरोपी कडून गुन्हयात वापरलेली जग्वार कार व चोरी केलेले पिस्टल व
सोन्याचे दागिने हस्तगत केले.आरोपी मोहम्मद उजाला याने गुन्हयातील चोरलेली किंमती घडयाळे त्याचा मित्र शमीम शेख यास
मुंबई येथे विक्री करीता दिले असल्याचे सांगत असल्याने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व अंमलदार यांचे पथकतात्काळ मुंबईला पाठवले. नमूद पथकाने तांत्रिक विश्लेषणाव्दारे मुंबई येथे घडयाळे विक्रीस आलेल्या १) शमीम शेख मुळराहणार बिहार, २) अब्रार शेख, ३) राजु म्हात्रे दोघे राहणार धारावी मुंबई यांना दिनांक २५/०२/२०२३ रोजी मुंबई येथुन
ताब्यात घेवुन नमूद गुन्हयातील चोरीस गेलेली ३ किंमती घडयाळे तसेच आरोपीने दिनांक ०६/०२/२०२३ रोजी
विशाखापटटनम येथील घरफोडी चोरीतील ७ किंमती घडयाळे अशी एकुण १० घडयाळे हस्तगत केली.
आरोपी हा साथीदारासह विविध राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जाऊन हाय प्रोफाईल बंगलो, पॉश सोसायटी
इन सिटी असे गुगल सर्च करुन त्याठिकाणी महागाडया कार मधुन जाऊन घरफोडी चोरी करतो. मोहम्मद इरफान ऊर्फ
उजाला ऊर्फ रॉबीन हुड याचेविरुध्द उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडू येथे गॅगस्टर अॅक्ट, आर्म अॅक्ट व
व घरफोडीचे असे एकुण २७ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेत असल्याचे तपासात निष्पन्न
झाले आहे. तसेच आरोपी सुनिल यादव विरुद्ध गगस्टर अॅक्ट, खुन व इतर असे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील
मुख्य आरोपी मोहम्मद उजाला याचा पुर्वइतिहास पाहता तो सहजासहजी पोलीसांना सापडत नसुन पोलीसांना गुंगारा देत
असतो. तरी देखील गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाने आरोपींच्या कार्यपद्धतींचा बारकाईने अभ्यास करुन तसचे कौशल्यपुर्ण
तपास व अचुक माहिती प्राप्त करुन, प्रसंगी वेषांतर करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन एकुण १ कोटी २१ लाख
रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप
कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस
आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गणेश माने, अजय वाघमारे, सहायक
पोलीस निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव,
अस्लम आत्तार, शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, सारस साळवी, हरीष मोरे, प्रविण भालचिम, राजेद्र लांडगे,
विनोद महाजन,अशोक शेलार, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे यानी वरिष्ठांचे मार्गदर्शन
व सू चनांप्रमाणे केली आहे.