पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आचारसंहितेचा भंग करीत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आचारसंहितेचे उल्लंघन करीत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सर्व नियमांचे उल्लंघन करून वागत आहेत. निवडणुकीत मतदारांना आवाहन करताना जातीयवादी प्रचार केला जात आहे. मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आज प्रचार संपलेला असताना कसबा गणपती जवळ जमावबंदी मोडून केवळ स्टंट करून जमाव एकत्र करून कुठलाही पुरावाने देता आरोप केले गेले. हे करण्यापूर्वी कुठलीही रीतसर तक्रार केली नाही. हे आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न आहे .आम्ही आपल्याकडे मागणी करीत आहोत की रविंद्र धांगेकर यांना याविषयी जाब विचारण्यात यावा. आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी
कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होत आहे जिजामाता शाळा तांबट आळी येथे असलेल्या केंद्रावर एकल नावे असून यामध्ये कुटुंबातील इतर व्यक्तींची नावे नाहीत. हे शंकास्पद वाटते त्यामुळे अशी नावे आढळतील त्यावेळेस त्यांची कसून तपासणी व्हावी. तसेच इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते तरी अधिकचा बंदोबस्त देण्यात यावा. पुणे महापालिकेच्या लोणार आळी तसेच दारूवाला पोलीस चौकीशेजारी येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याने आधार कार्ड मतदान कार्ड याबाबतची सत्यता कडकपणे तपासली जावी. गुजराती शाळा सिटी पोस्ट मागे या मतदान केंद्राचा परिसर संवेदनशील असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.