Home Blog Page 1355

अकराव्या रोजगार मेळ्याअंतर्गत महाराष्ट्रात 400 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

0

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 51,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आयोजित आजच्या या अकराव्या रोजगार मेळ्यात एकूण 437 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. आजच्या या रोजगार मेळाव्यात नोकरीची नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या विभागामध्ये केंद्रीय सीमा शुक्क विभाग, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सेना दल, आय टी बीपी, केंद्रीय विद्यालय संगठन, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया, आणि आरोग्य विभागांचा समावेश आहे.

नवनियुक्त सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी विकसित भारत बनवण्यासाठी विश्वासपूर्ण सेवा द्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न -नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात केले.

प्रत्येकाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला बदल दिसून येईल. आपण सर्वांनी देशहितासाठी कार्य केले तर देश निश्चितच आपल्या हाती सुरक्षित राहिल. आगामी काळात विकसित भारत होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही असे गोयल म्हणाले.

आज मुंबईतल्या राँयल ऑपेरा हाऊस चर्नी रोड येथे आयोजित रोजगार मेळ्यात 86 युवक -युवतींना सरकारी सेवेतल्या नियुक्तीचे पत्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न -नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त पी के अग्रवाल,  सीजीएसटीचे मुख्य आयुक्त एस एम टाटा उपस्थित होते.

एकुण 135 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून आज 86 जणांना प्रत्यक्ष तर 49 उमेदवारांना ई-मेलद्वारे नियुक्ती पत्रे देण्यात आली. या सर्व 135  उमेदवारांना केंद्रीय सीमा शुक्क विभाग, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सेना दल, आय टी बीपी, केंद्रीय विद्यालय संगठन, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया, आणि आरोग्य विभागात सेवेची संधी मिळाली आहे.

मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त संजयकुमार उपस्थित होते.

लोकसंख्या अधिक असल्याने भारतात बेरोजगारीची समस्या आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 10 लाख रोजगार देण्याची घोषणा केली होती आणि आतापर्यंत झालेल्या 10 रोजगार मेळ्यात 7 लाखांहून अधिक जणांना रोजगार देण्यात आला. सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावर काम करत आहे आणि सगळ्यांना घेऊन पुढे जात आहे असे असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले कि नोकरीबरोबर स्वयंरोजगारही महत्वाचा आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्टार्ट अप इंडिया आणि तत्सम योजनांद्वारे त्याला प्रोत्साहन देत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 25 जणांना तर एकूण 78 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

आज नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया -5, बँक ऑफ बडोदा-1, सीजीएचएस-1, डाक विभाग-17, आयआयटी मुंबई-2, आयकर विभाग-26, आर सी एफ -2,  केंद्रीय विद्यालय-10, संरक्षण मंत्रालय- 4 अशा एकूण 78 जणांचा समावेश आहे.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात  143 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आगामी काळात सशक्त आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन यावेळी राणे यांनी केले.

नागपूर मध्ये राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नागपूर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त जयंत दिद्दि,  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आयकर विभाग, रेल्वे विभाग, निमलष्करी दल, एम्स, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था -ट्रिपल आयट , यासारख्या केंद्र शासनाच्या विभागांमध्ये 81 उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रधान आयकर आयुक्त जयंत दिद्दी यांनी नवनियुक्त उमेदवारांना शासन सेवेत निष्ठेने काम करण्याचे त्याचप्रमाणे प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन केले. आपल्या विभागाचे नाव उंचावेल अशी कामगिरी करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.

८ महिन्यात ,६७६ ठिकाणी कारवाई,७०९आरोपींना अटक,१७ कोटी ६४ लाख ७४ हजार ६७४ रुपयांचा गुटखा,पानमसाला,तंबाखू ,सुपारी जप्त

0

मुंबई, दि. 30: संपूर्ण राज्यात २० ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान संपूर्ण राज्यात एकूण २२० ठिकाणी कारवाई करण्यात आली असून तीन वाहने जप्त केली आहेत. याशिवाय १८० आस्थापना सील करून एकूण २९ लाख ६६ हजार ९२८ रुपयांचा साठा जप्त करून या सर्व प्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण २२२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एप्रिल २०२३ पासून २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने राज्यात एकूण ६७६ ठिकाणी कारवाई करून ९५ वाहने जप्त केली असून ४१३ आस्थापना सीलबंद केल्या आहेत. तसेच एकूण १७ कोटी ६४ लाख ७४ हजार ६७४ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.  सर्वप्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण ७०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने  केलेल्या कारवाईचे स्वरूप व व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण राज्यात जुलै २०१२ पासून गुटखा, पानमसाला,  सुगंधीत सुपारी, सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून) व विक्रीस जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्यानुसार, २० जुलै २०२३ पासून या अन्न पदार्थावर एक वर्षाच्या कालावधीसाठी  प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या अन्न पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यातून व विक्रीस प्रतिबंध असला तरीही काही असामाजिक तत्वे चोरीछुपे मार्गाने सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीचा व्यवसाय आर्थिक लाभाच्या हेतूने करत असतात. या असामाजिक तत्त्वावर आळा बसावा तसेच बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन सदैव तत्पर असून सदर प्रतिबंधित पदार्थाचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व नियम, २०११ नुसार निरंतर कारवाई करण्यात येत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

0

अहमदनगर दि. 30 :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री  (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर  त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला.अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 30 : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे.

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Digital_Advertising_Guidelines_03_11_23.pdf या लिंकवर हा प्राथमिक मसुदा उपलब्ध आहे. या मसुद्याबाबत अभिप्राय, सूचना आणि शिफारशी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत dgiprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या ‘नवयुग कंपनी’वर सरकार काय कारवाई करणार? गोपाळ तिवारींचा सवाल

‘ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी..।
मुंबई दि ३० – उत्तराखंड टनेल मधील खोदकाम करणाऱ्या ४१ कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातुन’ सुटका झाल्याचे सर्व देशाने पाहीले. त्याबद्दल १७ दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांचे अभिनंदन व आभार..! मात्र ‘मजुरांवर ही जीवधेणी परिस्थिती कां ओढावली? याची चौकशी ही झाली पाहीजे.
सदर टनेल’चे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरींग कंपनीवर’ सरकार काय कारवाई करणार ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
सदर टनेल’चे खोदकाम ‘नवयुग कंपनीस’ देतांना, त्यांची तांत्रिक क्षमता व अनुभव पाहीले गेले काय.? सदर ‘नवयुग कंपनी’ या मजुरांच्या जीवाशी खेळत होती काय? मजुरांच्या जीवाच्या सुरक्षेच्या कोणत्याही ऊपाय योजनांची आखणी करणे सदर कंपनीस गरजेचे का वाटले नाही..? नैसर्गिक व पर्यावरणाचे नियम व संकेत तुडवले गेले काय ?असे अनेक प्रश्न समोर येत असुन, मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या व अड़ानी ग्रुप’च्या अघिपत्याखाली असल्याचा आरोप होणाऱ्या ‘नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’वर सरकार काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करून या दुर्घटनेची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार?हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली.
सदर टनेल’च्या कामात, ‘मजुरांच्या सुरक्षेची तांत्रीक पुर्व तयारी’ सदर कंपनीने काय व कशा प्रकारे केली होती..(?) त्या ठीकाणी अत्यावश्यक असणारे ह्युम पाईप का लावले गेले नाहीत..? सदरचे खोदकाम करण्याच्या कामातील तांत्रिक सुरक्षेच्या बाबींकडे का दुर्लक्ष करण्यात आले ? या बाबी स्पष्ट होऊन दोषींवर तातडीने सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा कोणाच्या तरी अक्षम्य बेपर्वाई मुळे असे प्रकार पुढील काळात ही घडू शकतात. त्यामुळेच “ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी” अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळ तिवारी यांनी केली.
मध्यंतरी गुजरात मधील मोरवी पुलाची दुर्घटना ही दुर्लक्षीत होऊन दोषींवर कारवाई झाल्याचे पहावयास मिळाले नाही, ही दुर्दैवी बाब असुन, संकट पश्चात काळजी घेण्या ऐवजी, संकट पुर्व खबरदारी व नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या ‘जबाबदार सरकारांची’च देशाला खरी तर गरज आहे.
गेल्या ७० वर्षात सरकारच्या बेर्पाईमुळेच, देशांतर्गत पुलवामा, मोरवी, रेल्वे अपघात, ऊत्तराखंड टनेल इ दुर्घटना घडल्याचे पहायला मिळाल्या नाहीत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

कशाला हवाय पीटी 3 …बंद करा ही थेरं..

पुणे- मिळकत कर आकारणी करताना ४० टक्के सवलत म्हणजेच पूर्वीप्रमाणेच कर आकारणी व्हावी,म्हणजेच करात वाढ होऊ नये म्हणून पीटी 3चे फॉर्म भरून घेण्याची करदात्यांना सक्ती करणे अन्याय कारक असून हि थेरं बंद करा असा स्पष्ट इशारा आता लोकप्रतिनिधी देऊ लागले आहेत रेशन कार्डे,आधार कार्ड,प ॅन कार्ड आणि वेगवेगळ्या कागदपत्रांच्या पत्रावळीत नागरिकांना सातत्याने छळून घेण्यात येत असल्याची भावना तीव्र वेगाने पसरते आहे.नानाविध प्रकारची कार्डे, प्रमाणपत्रे,आणि नानाविध प्रकारचे कर भरता भरता सामान्य माणूस मेटाकुटीला येतो आहे. आणि नागरिकांत याबद्दल संताप निर्माण होतो आहे. राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम आणि सौ आश्विनी कदम यांनी म्हटले आहे कि,’आधीच भरमसाठ टॅक्स त्यात 40% अधिकचे भरणे. त्याशिवाय no due सर्टिफिकेट मिळतच नाही..त्याचबरोबर इतरही खूप अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्चेया आढळून येत आहे..मुळामध्ये शासनाने 40% सवलत देण्याचे आदेश दिले असताना महापालिकेने अर्ज करण्यासाठी मुदत घालणे हेच चुकीचे आहे.त्यामुळे महापालिकेने दिलेली आजची मुदत नुसतीच वाढवणे पेक्षा काढून टाकावी. आज मीतिला जवळजवळ दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही..हा पुणेकरांवर अन्याय आहे..

दरम्यान माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी आता यासंदर्भात पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासह आयुक्त,अतिरिक्त आयुक्त आणि कर आकारणी संकलन प्रमुख यांना पत्र दिले आहे. यात म्हटले आहे कि,’महाराष्ट्र शासनाने प्रामाणिक करदात्यांना 40% रिटेबल व्हॅल्यू मध्ये कर आकारणी करताना सवलत दिली त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि आमच्या कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमध्ये करदात्यांकडून
पीटी 3 अर्ज भरून घेणे २०१९ नंतर ज्यांची कर आकारणी झाली आहे त्यांना सक्तीचे केले हे करण्याची गरज नव्हती हे त्यावेळेला देखील आमचे मत नोंदवले होते आणि आजही आमचे मत कायम आहे.समाविष्ट २३ गावातील लोकांना मुदत १ जानेवारीपर्यंत तर मूळ पुणेकरांना मुदत आजपर्यंत हा अन्याय आहे.मुळात हा फॉर्म भरून घेण्याची गरजच नाही हे आम्ही सर्व प्रमाण सिद्ध करू शकतो परंतु वारंवार विनंती करून देखील याबाबत प्रशासनाने आम्हाला वेळ दिला नाही.
जे करदाते वारंवार amnesty scheme देऊन सुद्धा पैसे भरत नाहीत असे लोक त्यांच्यावर जे व्याज लागले आहे ते रद्द करण्यासाठी एकत्र झाले एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले त्या ठिकाणी मलिदा कुणाला कसा द्यायचा हे ठरले आणि कर आकारणी आणि कर संकलन विभागाने आयुक्त यांच्याकडे पुन्हा एकदा या करबुडव्या लोकांसाठी amnesty scheme सुचवली आहे यापूर्वी तीन वेळा ही योजना सुचवली होती अमलात आणली होती त्यावेळेला कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी स्पष्ट अभिप्राय देऊन अशा प्रकारची योजना आणल्यास कर भरण्याचे प्रमाण कमी होते आणि बुडवणारे शिरजोर होतात असे सांगितले होते त्यावेळेला लोकनियुक्त स्थायी समितीने आग्रह धरून ही योजना आणली त्यावेळेला देखील आम्ही विरोध केला होता आता तर लोकनियुक्त समिती नाही त्यामुळे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा प्रस्ताव हा आयुक्त स्थायी समिती म्हणून मान्य करणार आयुक्तच मुख्य सभा म्हणून मान्यता देणार आणि आयुक्तच प्रशासक म्हणून अंमलबजावणी करणार अशी परिस्थिती आहे आमची आपणास विनंती आहे या विषयात लक्ष घालावे प्रामाणिक करदात्यांना शिक्षा आणि करबुडव्याना बक्षीसी हे धोरण चालू देऊ नये तातडीने महापालिका आयुक्त यांना या योजनेच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये अशा प्रकारचे आदेश द्यावेत ही विनंती प्रामाणिक पुणेकर आणि प्रामाणिक करदाते पुणेकर यांच्या वतीने हात जोडून विनंती आहे.

(PT-३) मुदतीचा संबध नाही-कधीही द्या (PT-३)तपासणी करून निर्णय घेऊ अजित देशमुख

दरम्यान आज पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन उप आयुक्त अजित देशमुख यांनी सत्वर आदेश काढून म्हटले आहेकी ,’ ज्या निवासी मिळकतींची जी. आय. एस. सर्व्हेक्षानांतर्गत सवलत काढली गेली आहे, किंवा ज्या निवासी मिळकतींची नव्याने आकारणी दिनांक ०१/०४/२०१९ नंतर झालेली आहे, अशा स्व-वापर करीत असलेल्या निवासी मिळकतींना दिली जाणारी ४०% सवलतीचा अर्ज (PT-३) करणेकरिता दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आज अखेर ९६,२५७ इतके ४०% सवलतीचे (PT-३ चे) अर्ज प्राप्त झाले आहेत.सदरची मुदत संपली असली तरी, दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ नंतर ज्या मिळकतधारकांचे ४०% सवलतीसाठी PT-३ चे अर्ज प्राप्त होतील, अशा निवासी मिळकतीसाठी पुढील आर्थिक वर्षाकरिता दिनांक ०१/०४/२०२४ पासून पुढील कालावधीकरिता संबंधित मिळकतधारकांचे स्वरहिवास कागदपत्राचे पुरावे तपासणी करून निर्णय घेण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.


वाघाचे अस्तित्व सर्वांसाठी महत्वाचे: सुनील लिमये 

पुणे :भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या  प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे  कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते झाले.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास  सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भुमिका , स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन  माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक  सुनील लिमये  यांच्या हस्ते बुधवार , २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा  वाजता झाले.जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. वृंदा पंडित यांनी आभार मानले. राजेंद्र आवटे,प्रज्ञा सातारकर, अभिजित ताम्हणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘कान्हा द प्रोटेक्टिंग पॅराडाईज ‘ या माहितीपटाचे प्रसारण यावेळी करण्यात आले.संगीता राठी यांनी सूत्रसंचालन केले.
सुनील लिमये म्हणाले,’ भारतात वाघांची संख्या वाढत आहे.पण ही ठिकाणे विखुरलेली आहेत.वाघांना अभयारण्यात राहावेसे वाटणे, पिले देता यावेत असे अधिवास तयार करणे महत्वाचे आहे. नामिबियातून भारतात चित्ते आणणे हा सकारात्मक प्रयोग असून त्याला वेळ दिला पाहिजे. प्राणी विश्वात नवनवीन प्रयोग होत राहिले पाहिजेत.जंगल बघायला शिकले पाहिजे.
 प्राण्यांचे अस्तित्व सगळ्यासाठी गरजेचे आहेत. वाघाचे अस्तित्व हे चांगल्या परिसंस्थेचे लक्षण आहे. म्हणून वाघांचे रक्षण केले पाहिजे. वाघांना एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात जाण्यासाठी आवश्यक कॉरिडॉर जपले पाहिजेत. वाघाकडून माणूस मारला जातो, तेव्हा मानवी चुका त्यात असण्याची शक्यता जास्त असते. अभयारण्यात बंदी असलेल्या भागात माणसांनी जावू नये.बिबट्यापासून जपण्यासाठी काळजी घेण्याचे उपाय लोकांनी ऐकले पाहिजेत.गवा शहरात आला तरी गर्दी करून संकट निर्माण करता कामा नये. वन खात्याला काम करु द्यावे.
वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलात गेले पाहिजे. जंगलं आणि प्राण्यांचे महत्त्व सांगा. पाणी मुरवणे हे जंगलाचे काम आहे. हेही महत्त्वाचे कारण आहे. शहरात झाडाचे आच्छादन वाढवले पाहिजे.

राजीव पंडित म्हणाले, ‘जैव विविधता जपण्यासाठी जागृती आणि लोक शिक्षण करण्याचे काम जिविधा करते. विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो.    अभयारण्यातील गाईड्स ना प्रशिक्षण देत असतो.  १९९० पासून काम करत आहोत.पण,तेच प्रश्न व्याघ्र प्रकल्पात अजून आहेत. नवे विकासाचे प्रश्न ही निर्माण झाले आहेत. कॉरिडॉर खंडित होत आहेत. लोकसहभाग वाढावा यासाठी स्पर्धा घेण्यात आले. गाईड हेच जंगलाचे, अभयारण्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. त्यासाठी गाईड निवडून पारितोषिक देत आहोत.

  त्यासोबतच या वर्षीपासून जीविधा संस्थेचे वतीने ‘महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट गाईड’ हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणून जीविधा ने नेमलेल्या समितीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर मधे काम करणाऱ्या शहनाज बेग यांची निवड केली आहे.  त्यांचा सत्कार शुक्रवार ,१ डिसेंबर रोजी  सायंकाळी साडेपाच ते सात   वाजता  करण्यात येणार आहे. शहनाज बेग महाराष्ट्रातील पहिल्या महिला गाईड आहेत व ताडोबा मधील पुरूष गाईडचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी लढा देऊन महिलांना गाईड बनण्यासाठी प्रोत्साहन दिले व अनेक महिलांना गाईड म्हणून तयार केले.या कार्यक्रमाला वनखात्याचे पुणे शहराचे मुख्य वनसंरक्षक  एन आर प्रविण उपस्थित राहणार आहेत.  त्यांनी ताडोबा चे फिल्ड डायरेक्टर म्हणून काम बघितले आहे. जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित  हे गाईडना ट्रेनिंग देण्याचे व लोकांना जंगलात घेऊन जाण्याचे काम करतात. या सत्कार समारंभा नंतर शहनाज बेग, एन.आर. प्रवीण व राजीव पंडित यांची मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे .
 तीघांच्या एकत्र मुलाखती मधून व्याघ्र प्रकल्पाविषयी विविध अंगाने माहिती पुणेकरांना  मिळेल. 
  या  अभिमानास्पद प्रकल्पाची माहिती मिळवण्यात समाजाचा सहभाग असावा, म्हणून जीविधा संस्थेतर्फे यावर्षी प्रौढांसाठी पोस्टर स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन केले आहे.निबंध, चित्रकला व पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार समारंभ रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा  वाजता माजी नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
‘प्रोजेक्ट टायगर’ची ५० वर्षे  
 पन्नास वर्षे भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या  प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला पंन्नास वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी १ एप्रिल १९७३ ला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाची घोषणा केली. त्यावेळेस ९ जंगलं व्याघ्र प्रकल्पांतर्गत संरक्षित केली गेली. सध्या भारतात ५४ व्याघ्र प्रकल्प आहेत. जगातील ७० टक्के  वन्य वाघ भारतात आहेत हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. भारतात सरकारने आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी  व्याघ्र प्रकल्प निर्माण करणे, शिकारीविरोधात कायदे लागू करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकसमुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देणे  यासारखी अनेक पावले उचलली आहेत.

किर्तन महोत्सवात रंगला कीर्तन संवाद!

भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित  ‘कथा कीर्तन महोत्सव’  ला चांगला प्रतिसाद 
पुणे:
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित  ‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये   तिसऱ्या दिवशी  दि. २९ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता अंजली कऱ्हाडकर, शिवानी कऱ्हाडकर या मायलेकिंचा  पारंपरिक कीर्तन संवाद रंगला! पुणेकर रसिकांचा  चांगला प्रतिसाद मिळाला .

 महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या  कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
 भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आरती सचदेव, रत्ना शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले, स्वागत केले.  उल्हास पवार उद्घाटन प्रसंगी म्हणाले “आज कऱ्हाडकर माय लेकी कीर्तन संवाद सादर करणार आहे, ही एक प्रकारची कीर्तन जुगलबंदीच उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे! लय, विनय आणि अभिनय  यांचा उत्तम संगम म्हणजे कीर्तन होय! जो अध्यात नाही आणि मध्यात नाही तो अध्यात्मिक म्हणावा!”
लक्ष्मीचे भक्त उपासक आणि सरस्वतीचे भक्त उपासक यांच्यातील लक्ष्मी आणि सरस्वती यात श्रेष्ठ कोण या विषयावरील भक्त संवाद हा आजच्या कीर्तनाचा विषय होता.प्रथम कीर्तनकार अंजली कऱ्हाडकर आणि कन्या शिवानी कऱ्हाडकर यांनी रामकृष्ण हरी राजाराम, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम, तसेच जय शारदे वागेश्वरी ही पदे सादर केली.या नंतर पुरंदरदास कथा सादर करण्यात आली, पुरंदरदास हे प्रथम लक्ष्मी मातेचे उपासक होते, नंतर ते सरस्वती देवीचे उपासक झाले, यावरील कथा उभय कीर्तनकार कऱ्हाडकर यांनी सादर केली.कीर्तनकार कऱ्हाडकर यांना प्रिया केळकर गांगुली यांनी संवादिनीवर तर केदार तळणीकर यांनी तबल्यावर साथ दिली. 
सप्ताह भर कथा कीर्तन
   गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद  श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या  नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र  श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे  पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार  आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २  डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ  कीर्तनकार चारुदत्त  आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.
महोत्सवाच्या  अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०  ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यमतज्ञ  प्रा.डॉ. विश्राम ढोले,  तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व  संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
 याच दिवशी सायंकाळी सहा वाजता  कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे  “महाभारतातील किर्तन परंपरा”  यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर  ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा  रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे. 
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे. 

विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

मुंबई, दि. 30 : विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जनआंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित भारत संकल्प यात्रा अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

आज विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सहभागी झारखंड, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यातील लाभार्थ्यांसोबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.

१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत या यात्रेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचादेखील समावेश आहे. या उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष अशा चार वाहनांद्वारे २८ नोव्हेंबर २०२३ ते  १ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मुंबईतील ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कळ दाबून ‘ड्रोन दीदी’ आणि ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना’ यांचे उद्घाटन केले. यावेळी या दोन्ही योजनांवर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. जन औषधी केंद्र 25 हजार करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री यांनी  सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना शुभेच्छा दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती इतर गावांमधे पोहोचविण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व असून, याद्वारे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  महिलांचा या योजनांमधला सहभाग प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. १५ हजार ड्रोन वितरित करण्यात आले आहेत.  महिला बचत गटांच्या सहायाने महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माय भारत अभियानातही सहभाग नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आहवान केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जनजाती दिवसानिमित्त सुरू झालेली संकल्प यात्रा देशातील 12 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमधे पोहचली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामधे सहभाग नोंदविला असून, या यात्रा अभियानाला जनआंदोलनाच्या रूप देऊन भारताच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, सेवाभावाने कार्य करून देशातील सर्व गावांमधे या यात्रेद्वारे शासकीय योजना पोहचविण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. शेतीला आधुनिक बनविणे, जनतेला कमीत कमी दरात औषधांचा पुरवठा करणे, युवकांना रोजगार देणे तसेच गरीबांना मोफत राशन देण्याचे कार्य केंद्र शासन करीत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले.

यात्रेचे उद्द‍िष्ट

मुंबईतील 227 ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड आदी विविध योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.  ही यात्रा राज्यातील एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील 2084 परिसरातून फिरणार आहे.

नवीन गोदरेज इऑन वेल्वेटच्या 4-डोअर रेफ्रिजरेटरसह सोयीचा अनुभव घ्या

गोदरेज इऑन वेल्वेट 4डोअर रेफ्रिजरेटरसह तुमचे स्वयंपाकघर अपग्रेड करातुमच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढेच कूलिंग पर्याय प्रदान करणारे हे प्रॉडक्ट आहे670 लीटरची क्षमताविस्तीर्ण शेल्फ्रुंदखोल आणि सहज स्लाइड ड्रॉवर्ससहहा फ्रीज तुमच्या सर्व खाद्यपदार्थांसाठी पुरेशी जागा देतोआणि भारतीय कुटुंबांसाठी एक आदर्श पर्याय सिद्ध होतो.

याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये तपमान सेट करता येऊ शकते. –18°C ते 5°C दरम्यान आपण तपमान सेट करू शकतोहा फ्रीज 81% स्पेस अनलॉक करतोविशेषतज्या दिवसांमध्ये जास्त भाज्या असताततेव्हा ही जागा निश्चितच उपयोगात येतेसुपर फ्रीझरसुपर कूल आणि हॉलिडे मोड पर्याय अनुक्रमे हेवीड्यूटी कूलिंग आणि ऊर्जा संरक्षण सक्षम करतातड्युअलटेक कूलिंग आणि प्रगत इन्व्हर्टर तंत्रज्ञानाद्वारे समर्थितहे रेफ्रिजरेटर कार्यक्षमताटिकाऊपणा याचे उत्तम उदाहरण आहेदार उघडे राहिल्यावर तुम्हाला अलर्ट देण्यासाठी डोअर अलार्म फंक्शन देखील यात आहे.

नवीन लॉन्च झालेल्या 4-डोअर रेफ्रिजरेटरबद्दल अनुप भार्गवगोदरेज अप्लायन्सेसचे प्रोडक्ट ग्रुप हेड – रेफ्रिजरेटर्सम्हणाले, “आम्हाला गोदरेज इऑन वेल्वेट 4-डोअर रेफ्रिजरेटर सादर करताना आनंद होत आहे. आमच्या प्रीमियम रेफ्रिजरेटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये अत्यंत नवीन उत्पादन आहे. प्रगत कूलिंग वैशिष्ट्ये आणि बहु-कार्यक्षम क्षमतांच्या मिश्रणासह, हे उत्पादन ग्राहकांचे जीवन समृद्ध करण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. आम्ही एक उत्कृष्ट नमुना तयार केला आहे जो केवळ तुमच्या स्वयंपाकघरातील सौंदर्यच वाढवत नाही तर ग्राहकांच्या अनेक गरजांची पूर्तता करतो, ज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारित स्टोरेज आणि विविध सुविधांचा समावेश होतो.”

इऑन वेल्वेट रेफ्रिजरेटर ग्रॅफाइट ब्लॅक आणि आयनॉक्स स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेसध्या याची किंमत  लाख २० हजार एवढी आहेभारतातील अग्रगण्य कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये हा उपलब्ध आहे.

उघडपणे टिपू सुलतानचा उदोउदो करता येईना म्हणून वंचित सोबत आघाडी केली का?मुंबई भाजपतर्फे ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रहार

मुंबई
उघडपणे टिपू सुलतानचा उदोउदो करता येत नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी केली का ? असा सवाल मुंबई भाजपतर्फे ट्विट करून उबाठा गटाला विचारण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र आले आहेत याची प्रचिती आता येत असल्याचेही यावेळी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीची सांगलीतील सभा’ सुरू होण्यापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू नये, असे सांगितले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या सूचना फेटाळत टिपू सुलतान यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच भरसभेत याबाबत सांगत पोलिसांना इशारा दिला. यावरून मुंबई भाजपतर्फे उबाठा गटाला धारेवर धरण्यात आले. ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतानचे पूजन महाराष्ट्रात होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही असा इशारा मुंबई भाजपा कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.

रविवारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0

पिंपरी, पुणे (दि. ३० नोव्हेंबर २०२३) –
३ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पञकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी (दि. ३) सकाळी दहा वाजता, या शिबिराचे उद्घाटन परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लोकमान्य कॅन्सर केअर सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल क्षीरसागर, डाॅ. सहदेव गोळे व तज्ञ महिला डाॅ. मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. याचा सर्व पत्रकार बंधू, भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले आहे.
लोकमान्य हॉस्पिटल, कॅन्सर विभाग बिल्डिंग, चिंचवड रेल्वे पुलाशेजारी, चिंचवड येथे होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी
शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या व्याधीवर आयुर्वेद तपासणी आणि जनरल तपासणी यामधे BP /BMI /BSL-R / Height and weight / Pulse / ECG, महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची पुर्व तपासणी ( IBE & CBE ) तसेच आधुनिक तंत्रज्ञान द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी महिला तज्ञ डॉक्टर करतील आणि वेदना रहित तपासणी होणार आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व सदस्य व शहरातील दैनिक, साप्ताहिक, ऑनलाईन चॅनेलच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असेही आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अनिल वडघुले
9822083064.

पुण्यातील उद्योजक, शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्ड-२०२३’

पुणे : भारतातातील सुपरकपॅसिटरचे जनक, शास्त्रज्ञ व स्पेल टेक्नॉलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना वेस्टमिनिस्टर लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (ब्रिटिश पार्लमेंट) ‘अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्ड-२०२३’ प्रदान करण्यात आला. प्रगत ऊर्जा साठवण यंत्र (ऍडव्हान्स एनर्जी स्टोरेज डिव्हाईस) निर्मितीसाठी डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला असून, सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. सी-मेट लिथियम-आयन बॅटरीचे आणि सोडियम आयन टेक्नॉलॉजीचे ते प्रवर्तक आहेत.
अचिव्हर्स वर्ल्ड मॅगझीन, इंडियन अचिव्हर्स फोरम आणि ग्लोबल इंडियन ऑर्गनायझेशन-युके यांच्या संयुक्त विद्यमाने युरेशियन बिझनेस समिट व अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्डचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘युके’चे सर्वात ज्येष्ठ खासदार वीरेंद्र शर्मा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी केरळच्या कोट्टायमचे खासदार थॉमस चाझीकडन, युगांडाचे युके व आयर्लंडमधील उच्चायुक्त निमिषा माधवा, ‘युके’तील आयसीआयसीआय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकनाथ मिश्रा, ग्लोबल इंडियन ऑर्गनायझेशन युकेचे उपाध्यक्ष महेंद्रसिंह जडेजा, अचिव्हर्स वर्ल्डचे संपादक हरीश चंद्र आदी उपस्थित होते.
जागतिक स्तरावरील या कार्यक्रमामध्ये १०० पेक्षा अधिक विविध देशांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. जागतिक व्यापार, व्यावसायिक संबंध, इनोव्हेशन्स याविषयी चर्चा या व्यासपीठावर करण्यात आली. वीरेंद्र शर्मा यांनी जागतिक स्तरावरील द्विपक्षीय संबंधांच्या महत्त्वावर जोर देत भारत आणि यूके यांच्यातील व्यापार, व्यावसायिक सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. थॉमस चाझीकडन यांनी भारताच्या बहुआयामी विकासाचे कौतुक केले. जगभरातील भारतीयांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकत पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
स्पेल टेक्नॉलॉजीजच्या संचालक संगीता शर्मा यांनी जागतिक स्तरावरील ‘अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्ड २०२३’ पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटत आहे. भारताची मान अभिमानाने उंचावण्यात योगदान देता येत असल्याचा अभिमान वाटतो. 

भारतीय बनावटीच्या ऊर्जा साठवणूक उपकरणांची निर्मिती आम्ही करत आहोत. लिथियम-आयऑन बॅटरीच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय आणि स्पेल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारले आहे. बॅटरी निर्मितीसाठी छोट्या उद्योगांना सहकार्य केले जाते. आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले हे एक पाऊल आहे.”- डॉ. राजेंद्रकुमार शर्मा, शास्त्रज्ञ व मुख्य व्यवस्थापकीय संचालक, स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड

‘कात्रज’कडून दूध दरात दोन रुपयांची कपात

 पुणे -पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) कडून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. दूध दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय कात्रज डेअरीकडून घेण्यात आला आहे. संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.गायीच्या दूध दरात ही कपात केलेली असून डेअरीकडून टोण्ड मिल्क नावाने त्याची विक्री होते. ग्राहकांसाठी हा निर्णय शुक्रवारपासून (ता. १ डिसेंबर) लागू होणार असून ग्राहकांना १ लिटर पॅकिंगचे टोण्ड दूध आता ५३ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच, कमी स्निग्ध व जास्त प्रोटीन असलेले डबल टोण्ड दूधाची २५० मिलीची पिशवी आता १२ रुपयांत उपलब्ध असणार आहे.

आठव्या पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी या कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचे संबोधन

पुणे

पुणे  इंटरनॅशनल सेंटरने  आयोजित केलेल्या आठव्या पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी या  कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे  यांचे 27 नोव्हेंबर 2023 रोजी भाषण झाले. पुणे  इंटरनॅशनल सेंटर, ऑब्झरवर रिसर्च फाउंडेशन चे सदस्य, लष्करी अधिकारी तसेच निवृत्त  अधिकारी या कार्यक्रमला उपस्थित होते.

राष्ट्राची प्रगती आणि सुरक्षेच्या गरजा यातील अविभाज्य दुवा, यावेळी लष्करप्रमुखांनी अधोरेखित केला. आर्थिक शक्ती जरी विकासाच्या अग्रभागी असली, तरीही, ‘सैन्य शक्ती’च्या आधारावर देशाच्या विविध गरजा पूर्ण करत, ‘देशाची सर्वंकष शक्ती’ सातत्याने वाढवण्याची क्षमता निर्माण करता येते असे जनरल  मनोज पांडे यांनी यावेळीसांगितले. 

सद्यस्थिती आणि एकूणच विकसित होत असलेल्या भू राजकीय परिस्थितीविषयी  बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले की आता आपण ‘अनपेक्षित गोष्टी होण्याची’ तयारी ठेवायला हवी, कारण आजची  युद्धभूमी अधिक गुंतगुंतीची, स्पर्धात्मक झाली आहे.

मात्र, या बदलत्या परिस्थितीचा लष्करी परिणाम भारतीय सैन्यावर होणार नाही, असेही जनरल मनोज पांडे यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. सैन्याच्या क्षमतावाढीसाठी आणि आवश्यक ते बदल आत्मसात करण्यासाठी सुरक्षेवर प्रभाव टाकणारे किंवा सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

इतर सेवा संस्थांच्या सोबतीने एक आधुनिक, वेगवान, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असलेले आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी तयार असलेले सैन्य, अनेक प्रकरचे युद्ध टाळणे आणि जिंकणे अशी क्षमता असलेले, देशाचे संरक्षण करण्यात सक्षम असलेल्या सैन्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठीच्या भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनाची त्यांनी  विस्तृत माहिती दिली. चार महत्वाच्या मुद्यांवर आधारित प्रगतीशील बदलांची सुरुवात यावरही त्यांनी भर दिला.

(a) सध्या असलेली अभूतपूर्व भू-राजकीय परिस्थिती. 

(b)विघटनकारी तंत्रज्ञानाची अमर्याद क्षमता. 

(c) आधुनिक युद्धांचे बदलते स्वरूप.

(d)सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील आमूलाग्र परिवर्तन.

क्षमता बांधणी : सैन्यदलांची पुनर्रचना आणि त्यांची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा भाग म्हणून, भारतीय लष्कर आपल्या संघटनात्मक संरचनेवर भर देत असून, 5G, AI, क्वांटम लॅब, इंटरनेट ऑफ मिलिटरी थिंग्ज, रोबोटिक्स, अ‍ॅडॉप्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी स्पेस अॅसेट्स यासह विशिष्ट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी, राइटसाइझिंग, सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना करत आहे.  क्षमता विकास करण्याचे हे प्रयत्न आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे  त्यांनी सागितले.

राष्ट्र बांधणी : भारतीय लष्कर, देशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतांना, विविध प्रयत्नांद्वारे राष्ट्र उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान देते. या वचनबद्धतेसाठी लष्कराने  समन्वय साधला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: देशाच्या दुर्गम भागात पायाभूत सुविधांच्या विकासात भारतीय लष्कराचे योगदान त्यांनी विस्तृतपणे सांगितले. सीमा क्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना सक्षम करण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने सीमा क्षेत्र पर्यटन आणि इतर विविध उपक्रमांना प्रोत्साहन देऊन स्थानिक समुदायांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी लष्कर करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.