गोदरेज इऑन वेल्वेट 4–डोअर रेफ्रिजरेटरसह तुमचे स्वयंपाकघर अपग्रेड करा. तुमच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढेच कूलिंग पर्याय प्रदान करणारे हे प्रॉडक्ट आहे. 670 लीटरची क्षमता, विस्तीर्ण शेल्फ्, रुंद, खोल आणि सहज स्लाइड ड्रॉवर्ससह, हा फ्रीज तुमच्या सर्व खाद्यपदार्थांसाठी पुरेशी जागा देतो. आणि भारतीय कुटुंबांसाठी एक आदर्श पर्याय सिद्ध होतो.
याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये तपमान सेट करता येऊ शकते. –18°C ते 5°C दरम्यान आपण तपमान सेट करू शकतो. हा फ्रीज 81% स्पेस अनलॉक करतो. विशेषत: ज्या दिवसांमध्ये जास्त भाज्या असतात, तेव्हा ही जागा निश्चितच उपयोगात येते. सुपर फ्रीझर, सुपर कूल आणि हॉलिडे मोड पर्याय अनुक्रमे हेवी–ड्यूटी कूलिंग आणि ऊर्जा संरक्षण सक्षम करतात. ड्युअल–टेक कूलिंग आणि प्रगत इन्व्हर्टर तंत्रज्ञानाद्वारे समर्थित, हे रेफ्रिजरेटर कार्यक्षमता, टिकाऊपणा याचे उत्तम उदाहरण आहे. दार उघडे राहिल्यावर तुम्हाला अलर्ट देण्यासाठी डोअर अलार्म फंक्शन देखील यात आहे.
नवीन लॉन्च झालेल्या 4-डोअर रेफ्रिजरेटरबद्दल अनुप भार्गव, गोदरेज अप्लायन्सेसचे प्रोडक्ट ग्रुप हेड – रेफ्रिजरेटर्स, म्हणाले, “आम्हाला गोदरेज इऑन वेल्वेट 4-डोअर रेफ्रिजरेटर सादर करताना आनंद होत आहे. आमच्या प्रीमियम रेफ्रिजरेटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये अत्यंत नवीन उत्पादन आहे. प्रगत कूलिंग वैशिष्ट्ये आणि बहु-कार्यक्षम क्षमतांच्या मिश्रणासह, हे उत्पादन ग्राहकांचे जीवन समृद्ध करण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. आम्ही एक उत्कृष्ट नमुना तयार केला आहे जो केवळ तुमच्या स्वयंपाकघरातील सौंदर्यच वाढवत नाही तर ग्राहकांच्या अनेक गरजांची पूर्तता करतो, ज्यामध्ये प्रामुख्याने विस्तारित स्टोरेज आणि विविध सुविधांचा समावेश होतो.”
इऑन वेल्वेट रेफ्रिजरेटर ग्रॅफाइट ब्लॅक आणि आयनॉक्स स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सध्या याची किंमत १ लाख २० हजार एवढी आहे. भारतातील अग्रगण्य ई–कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये हा उपलब्ध आहे.