Home Blog Page 1295

भाजपा आणि शिंदे गटाच्या हाथी धत्तुरा..? दादागिरीपुढे सनदी अधिकाऱ्यांची हुजरेगिरी?

पुणे- चंद्रकांत दादा पाटील यांना जेव्हा पुण्यात आणले गेले आणि आमदारकीचा मुकुट जेव्हा त्यांना बहाल केला जात होता तेव्हा सर्वांच्या टीका अस्त्रांचा भडीमार होत होता.पण आता परिस्थिती बदलते आहे.पालकमंत्री म्हणून अजितदादांच्या दादागिरीपुढे चंद्रकांत दादांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले जाऊ लागले आहे.जिल्हा नियोजन मंडळात याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते तेव्हा सर्वांना समान न्याय दिला जात होता पण आता तर चंद्रकांत दादांच्या कारकिर्दीत घेत्लेलेया निर्णयांना देखील वाटण्याच्या अक्षदा लावण्यात येऊ लागल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. सध्या अजित पवार हे पालकमंत्री आहेत.आणि अगदी चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना झालेल्या बैठकीतील निर्णयाचे चर्चेचे इति वृत्तांत सुद्धा आता सदस्यांना देणे टाळले जाऊ लागले आहे.चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर अंमल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सह्याच केलेल्या नाहीत आणि या सह्या न केल्याने असंख्य कामांचा खेळ खल्लास च जणू करून टाकण्यात आल्याचे म्हटले जाते आहे.नियोजन मंडळाच्या ९० टक्के निधींवर नव्या पालकमंत्र्यांनी कब्जा मिळविल्याचा आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या १० सदस्यांनी पत्र दिले आहे.मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय दबावाखालील पार्श्वभूमीवर देखील त्यांनी पहा माध्यमांशी बोलताना नेमके काय म्हटले आहे. ते ऐका त्यांच्याच तोंडून….

एयर इंडियातर्फे भारतातील पहिल्या आणि नवे ब्रँड चिन्ह मिरवणाऱ्या एयरबस A350 एयरक्राफ्टचे स्वागत

गुरुग्राम,डिसेंबर २०२३ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने आज पहिल्या २० एयरबस A350-900 एयरक्राफ्टमधील पहिल्या एयरक्राफ्टचे स्वागत केले. व्हीटी- जेआरए नोंदणीकृत हे विमान एयरलाइनच्या नव्या, बोल्ड रूपात पाहायला मिळणार असून कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या रुपांतरणाच्या प्रवासात ते महत्त्वाचा टप्पा ठरेल.

हे एयरक्राफ्ट टुलुझ, फ्रान्स येथील एयरबस केंद्रातून नवी दिल्ली येथे आज १३:४६ वाजता (स्थानिक वेळ) पोहोचले. AI350 हे खास चिन्ह वापरलेल्या या डिलीव्हरी फ्लाइटचे एयर इंडियाच्या प्रतिनिधींनी स्वागत केले. एयर इंडियाच्या वरिष्ठ कमांडर कॅप्टन मोनिका बत्रा वैद्य या ऑबर्झव्हर म्हणून या विमानात उपस्थित होत्या. AI350 वर राहाण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या काही भारतीय पायलट्समध्ये त्यांचा समावेश होतो.

पहिले नवीन वाइडबॉडी फ्लीट दशकापेक्षा जास्त काळ भारतात वापरणारी एयर इंडिया भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात आघाडीवर असून A350 वापरणारी पहिली भारतीय विमानकंपनी ठरली आहे. २०१२ मध्ये बोईंग ७८७ ड्रीमलायनर फ्लीट टाइप वापरणारी एयर इंडिया ही पहिलीच भारतीय विमानकंपनी होती.

एयर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘एयर इंडियासाठी हा दिवस लक्षणीय आहे. A350 आमच्यासाठी केवळ धातू किंवा इंजिन नाही, तर ते आमचे कर्मचारी कंपनीचे स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी घेत असलेल्या अविरत प्रयत्नांचे आणि नवे मापदंड तयार करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर या निमित्ताने जागतिक पातळीवर भारतीय विमानवाहतूक क्षेत्राचा नव्याने उदय होत आहे.’

नव्या युगातील विमानवाहतुकीचे प्रतीक असलेलेA350 जागतिक दर्जा, आमच्या विना- थांबा मार्गांवर दीर्घकाळ प्रवासाचा वैशिष्ट्यपूर्ण आणि आरामदायी अनुभव देईल. याचे असामान्य फ्लाइट इकॉनॉमिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यावसायिक यश मिळवण्याची आमची बांधिलकी आणि शाश्वततेचे ध्येय साध्य करण्याचा ध्यास अधोरेखित करणारा आहे, असे विल्सन म्हणाले.

एयर इंडियाचे A350 जानेवारी २०२४ मध्ये व्यावसायिक सेवेत दाखल होईल. सुरुवातील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ते देशांतर्गत सेवा देणार असून त्यानंतर विविध खंडांतील वेगवेगळ्या ठिकाणी ते सेवा देईल. A350 चे व्यावसायिक वेळापत्रक येत्या काही आठवड्यांत जाहीर केले जाईल.

एयर इंडियाच्या A350-900 एयरक्राफ्टमध्ये कॉलिन्स एयरोस्पेसतर्फे ३१६ सीट्ससह थ्री- क्लास केबिन कॉन्फिगरेशन डिझाइन करण्यात आले आहे. त्याशिवाय २८ खासगी बिझनेस क्लास स्वीट्स फुल- फ्लॅट बेड्स, २४ प्रीमियम इकॉनॉमी सीट्स अतिरिक्त लेगरूम व इतर विविध वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहे. यामध्ये २६४ प्रशस्त इकॉनॉमी क्लास सीट्सचाही समावेश आहे. एयरक्राफ्टमधील सर्व सीट्समध्ये अत्याधुनिक पॅनासॉनिक eX3 इन- फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टीम आणि एचडी स्क्रीन्सचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित होतो.

हे एयरक्राफ्ट एयर इंडियाच्या २० एयरबस A350-900 ऑर्डरपैकी पहिले असून मार्च २०२४ पर्यंत आणखी ५ वितरित केली जातील. एयर इंडियाने एयरबसकडे दिलेल्या २५० नव्या एयरक्राफ्टमध्ये २० A350-1000 चा समावेश आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या सर्व गेस्ट टचपॉइंट्सवर नव्या ग्लोबल ब्रँड ओळखीचा प्रसार सुरू केला असून त्याचबरोबर ग्राहकाभिमुख संकेतस्थळ आणि मोबाइल अप लाँच केले आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने केबिन आणि कॉकपिट क्रु साठी बहुप्रतीक्षीत युनिफॉर्म्सचे अनावरण केले. हे युनिफॉर्म्स भारतीय सेलिब्रेटी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले आहेत. A350 च्या आगमनानंतर एयर इंडियाचा केबिन क्रु आणि पायलट्स नव्या युनिफॉर्ममध्ये दिसतील.

‘कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

0

मुंबई- कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश  कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री प्रा.डॉ सावंत यांनी दिली.

ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणाचे कार्य कौतुकास्पद – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुकोद्गार

0

पुणे

ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. मात्र, सर्व शाखीय ब्राह्मणांना एकत्रित करून, समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ह.भ.प. मोरेश्वर बुवा नागनाथ जोशी- चऱ्होलिकर महाराज, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक सुशील मेंगडे, कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी, उपाध्यक्ष डॉ. वनमाळी वाईकर, कार्याध्यक्ष प्रमोद जोशी, सचिव रावसाहेब उन्हाळे, खजिनदार प्रकाश हडप, वासुदेव एकबोटे, डॉ. रमाकांत कुलकर्णी, डॉ. सुमेधा शिवदे, राजीव जोशी, सतिश ऋषिपाठक, अरुंधती जोशी, रुपा शास्त्री, प्रदीप दीक्षित, नागेश जोग, हभप अनुराधा प्रभुणे, प्रद्मा जोशी, संजिवनी उन्हाळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संपूर्ण देशभरात आणि राज्यात ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. आपल्या परीने या सर्व संघटना ब्राह्मण समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र, सर्व शाखीय ब्राह्मणांना एकत्रित करून, समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अ. ल. जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, ज्येष्ठ अभिनेते बंडा जोशी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र कुलकर्णी, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर, श्रीराम रानडे, लेखक संशोधक आणि उद्योजक डॉ. अमोद साने यांचा ब्राह्मण महासंघाच्या वतीने चंद्रकांतदादांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.राज्य सरकार कलाकारांच्या प्रती संवेदनशील असून विविध योजनांच्या माध्यमातून कलावंताना मदत व्हावी यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

न्यू ईयर एक्झिबिशन ७ जानेवारी पर्यंत

पुणे :

काश्मीर मधील कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली तसेच सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या ‘दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो’-न्यू ईयर प्रदर्शनाला काँग्रेस भवन(शिवाजीनगर) येथे प्रारंभ झाला.७ जानेवारी २०२४ पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहील.पुणेकरांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.साड्या,ड्रेस,सूट,कुर्ती,शाल,दागिने ,लोकरीचे कपडे आणि कलाकुसरीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असून अनिवासी भारतीयांसाठी स्वतंत्र विभाग आहे.खास हिवाळ्यासाठी वूलनचे उबदार कपडे,शाली,स्टोल,पश्मीना प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.सिल्क साड्या,चंदेरी फॅब्रिक,मुगा सिल्क,कोसा सिल्क,कलमकारी साड्या,बनारसी सिल्क साड्या,कुर्ती,बेड शिट,कार्पेट तसेच अक्रोड,बदाम सारखा सुका मेवाही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. २६: दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात असून या दिनानिमित्त २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने २७ डिसेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नागरिकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्ये आदींबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांची दालने प्रदर्शनात असणार आहेत. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सिमा होळकर यांनी केले आहे.
0000

तृतीयपंथीयांच्या समस्यांबाबत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न

पुणे दि.२६: तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारीसंदर्भात गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीत तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांना मोफत तृतीयपंथीय ओळखपत्र देणे. जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत शिधापत्रिकेचा लाभ देणे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निवृत्तीवेतनाचा लाभ देणे. उदरनिर्वाहासाठी व स्वयंरोजगारासाठी तसेच उद्योजक निर्माण करण्याकरीता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. तृतीयपंथी व्यक्तींच्या गरिमा गृहासाठी भाडे तत्वावर शासकीय कार्यालयांची इमारत उपलब्ध करुन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात विशेष अभियान राबवून १३६ तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे दिली.
00000

वैश्विक शिक्षण आणि मूल्यांचे अधिष्ठान एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठतंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती व नैतिकता

पुणे – “देशाचा जबाबदार आणि नितिमूल्याधारित नागरिक बनविणे, विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडविणे तसेच विद्यार्थ्याच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर देण्याचा मुख्य उद्देश्य ठेवून ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’( एमआयटी-व्हीपीयू) ची स्थापना करण्यात आली आहे.” असे मत उपस्थित शिक्षण तज्ज्ञांनी मांडले.माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’ ( एमआयटी-व्हीपीयू) च्या प्रथम नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. या वेळी नागपूर येथील आयआयएमचे संचालक प्रा.भीमराया मैत्री, संकल्प सेमीकंडक्टरचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष विवेक पवार, प्रिसिजन कॅमशफ्टस लि. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा उपस्थित होते.माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. तसेच बंगलोर येथील आयआयआयटीचे माजी संचालक प्रा.एस.सदगोपन हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच एमआयटी एडीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, कुलगुरू प्रा.डॉ. गोपालकृष्ण जोशी व कुलसचिव डॉ. प्रणेश मुरणाल उपस्थित होते.प्रा.भीमराया मैत्री म्हणाले,”तंत्रज्ञान, संशोधन, सामजिक नवननिर्मिती, भागीदारी व विश्वशांती या तत्वाच्या आधारावर व्हीपीयू ची स्थापना झाली. देशाचा जबाबदार व नितिमूल्याधारित नागरिक बनविण्यासाठी योगदान सर्वात महत्वाचे असेल. येथे विद्येचे उच्च कोटीचे शिक्षण देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.”प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” शिक्षण हे आपल्या भविष्यासाठी आहे. त्यात देह आणि बुध्दीचा विचार आहे. दुसर्‍या बाजूला आत्मा आणि मन आहे. म्हणजेच कॉन्शसनेस वर शिक्षणात कार्य करावे लागेल. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञनाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाकडून होत आहे. जगात सध्याची शिक्षण व्यवस्था आहे ती प्रगतीची परिसीमा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, अ‍ॅप वगैरे शब्द आता आले. पण याचे चिंतन ज्ञानेश्वरांनी ७३० वर्षापूर्वी केले आहे.”प्रा.एस.सदगोपन म्हणाले,” भारतातील एक सर्वोत्तम शिक्षणाचे मॉडेल एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या माध्यमातून जगासमोर ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात भारताने नवीन दरवाजे उघडले. या क्षेत्राल नवीन दिशा आणि विश्वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्याचा पाया ठेवण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर दिला जाईल.”डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,” या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संस्था एकत्रितपणे काम करून विविधि प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत. इंटर्नशिप, प्लेसमेंट, लाइव्ह प्रोजेक्ट, गेस्ट लेक्चर्स, अभ्यासक्रम, इंडस्ट्री व्हिजीट, टेक फेस्ट सेंटर अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी व एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातील प्राध्यापकांना उद्योगामधील कामकाज, त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांची गरज लक्षात घेता प्रशिक्षण दिले जाईल.”प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या,” विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन रोबोटिक निर्मिती केली जाणार नाही. तर एक चांगला मानव बनविला जाईल. त्यांना शिक्षणाबरोबरच मानवतेचे शिक्षण, अध्यात्म, नीतिमूल्य, शिस्त, चारित्र्य, जगात शांतता कशी निर्माण करता येईल यासाठी पीस सेंटर व मेडिटेशन शिकविले जाईल. सुसंस्कृत समाजनिर्मितीचा ध्यास असून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण देण्यात येईल.”भारतीय शिक्षण वसुधैव कुटुंबकम्, एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति अशा तत्त्वज्ञानाचे प्रतिक आहे. आताच्या शिक्षणात बदल करून त्याला मूल्यांचे अधिष्ठान असावे, तरच ते खरे शिक्षण ठरेल असे विचार यतीन शहा, प्रा.डॉ. गोपाळकृष्ण जोशी व डॉ. प्रणेश मुरणाल यांनी मांडले.

सकारात्मक गोष्टींसाठी विद्यार्थ्यांनी उर्जेचा वापर करावाप्रा.डॉ. दत्तात्रय तापकीर यांचा सल्ला : एमआयटी तर्फे सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

पुणे, दि. २६ डिसेंबर: “शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आंतरिक उर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करावा.” असा सल्ला संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी दिला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित केलेल्या वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०२३ या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. संजीव सोनवणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनेस्को अध्यासन प्रमुख, विश्वशांती केंद्र (आळंदी) चे संस्थापक अध्यक्ष व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण व एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
डॉ.दत्तात्रय तापकरी म्हणाले,”भारतीय संस्कृती ही सत्यमेव जयते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारावे, आपण खरच अभ्यास करतो का? जीवनात मूल्यांचे आचरण महत्वाचे आहे. आचरणामुळे समाजाचे भले होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याने त्यांनी प्रश्न विचारावे, संतांचा अभ्यास करावा आणि त्या ज्ञानाचा उपयोग पुढे जीवनासाठी करावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात नुसता विचार करून चालणार नाही तर त्याला कृतिशीलतेची जोड देणे गरजचे आहे. ज्ञानाच्या शोधात बुद्धांनी सर्वस्व त्याग केला ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. विद्यार्थीदशेत भगवद् गीता, स्वामी विवेकानंद, श्यामची आई,  टाकीचे घाव या पुस्तकांचे वाचन करावे. जेणेकरून संघर्ष काय असतो हे कळेल. त्यातूनच जीवनाचा खरा शोध घेता येतो.”
प्रा.डॉ. संजीव सोनवणे म्हणाले,” नैतिक मूल्य सतत आपल्या  कुटुंबात व अवती भवती वावरत असतात. त्याचा शोध घेऊन ते जीवनात उतरविल्यास व्यक्तीमत्व निर्माण होते आणि हे व्यक्तिमत्व आपल्या वर्तनातून दिसायला हवे.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले,” वैश्विक मूल्याधिष्ठीत हा शब्द सोपा नसून समझणे अवघड आहे. आजच्या काळात संपूर्ण समाजालाच मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गरज आहे.”
डॉ. एस.एन. पठाण म्हणाले, ” शिक्षण म्हणजे साक्षर होणे नाही, तर यातून चारित्र्य व एक आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मिती व्हावी. बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच आत्म्याचा विकास घडविणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण महत्वाचे आहेच परंतू देश एकत्रित राहण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण महत्वाचे आहे. तसेच या परिक्षेच्या उपक्रमामागची व विद्यार्थ्यांना सत्कारपूर्वक पारितोषिके देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ”
सूत्रसंचालन प्रा.डॉ. अर्चना चौधरी यांनी केले. प्रा.एकनाथ सारूक यांनी आभार मानले.

अटलजींचा ‘ सुशासन ‘ संकल्प पंतप्रधान मोदी साकारत आहेत: केंद्रीय मंत्री पियुष गोयल

अटल सन्मान सर्वात खास: अभिनेत्री खा. हेमा मालिनी

अटलजी खरे मुंबईकर होते- मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

‘अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळ फुलले’ अटलजींचे शब्द खरे ठरले: हेमा मालिनी

भारत अटलजी यांच्या आदर्शांवर चालतो – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई
माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा सुशासनाचा संकल्प पंतप्रधान नरेंद मोदी साकारत आहेत. भ्रष्टाचार संपवण्यासाठी अटलजी लढत राहिले, तो कायमचा संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेत आहेत. समाजातील शेवटच्या फळीतील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी गरीब कल्याणसारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या दीप कमल फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मथुरेच्या खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांना अटल सन्मान प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हेमा मालिनी यांना संस्थेचे स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना अभिनेत्री खा. हेमा मालिनी म्हणाल्या की, मला खूप मोठा सन्मान मिळाला आहे. अटलजींच्या नावाने मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अटलजींनी अचूक सांगितले होते की, आज अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळही फुलले. यावेळी हेमा मालिनी यांनी अटलजींच्या अनेक आठवणी सांगितल्या. गतवर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला अटल सन्मान यंदा त्यांना मिळाल्याबद्दल हेमा मालिनी यांनी दीप कमल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

स्व. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अटलजींच्या संवेदनशीलतेचे अनेक किस्से सांगितले. सुशासन दिन त्याचवेळी सार्थ ठरेल ज्यावेळी संपूर्ण देश अटलजींच्या आदर्श मार्गावर चालून त्याचे पालन करेल असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, भारताची प्रगती पाहून अटलजींना आनंद झालाच असेल. मुंबई भाजपा अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार यांनी अटलजी हे खरे मुंबईकर असल्याचे सांगत अटलजी जिथे जात तिथे रमून तल्लीन व्हायचे असे म्हटले. अटलजींच्या मराठी भाषेवर असलेल्या प्रेमाचा उल्लेख करून ते म्हणाले की, अटलजींचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे.

अटल महाकुंभचे संयोजक अमरजीत मिश्रा यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील साम्य रेखाटताना सांगितले की, अटलजींनी पोखरण अणुचाचणी करून भारताची स्थिती जगाला सांगितली होती, तर पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून नवा भारत किती सक्षम असल्याचे जगाला दाखवले. यावेळी भोजपुरी चित्रपट अभिनेत्री स्मृती सिन्हा आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी अटलजींच्या कविता सादर केल्या. स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले.

माजी मंत्री राज पुरोहित, भाजप नेते किरीट भन्साळी, अलका पारेख, ऑस्कर मीडियाचे आनंद सिंह यांच्यासह हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपट, नाट्य, साहित्य जगतातील मान्यवरांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसब्याचीच पुनरावृत्ती होणार नाही असा उमेदवार लोकसभेसाठी द्यायला हवा -भाजपा कार्यकर्त्यांची मागणी

पुणे-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल अनेक ठिकाणी भाजपा च्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.मोदी – शहा या जोडगळी च्या नेतृत्वाखाली लोकसभा जिंकणे सहज शक्य आहे पण यावेळी गेल्या टर्म मध्ये महापालिका सत्तेत पद उपभोगलेल्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातलगांना उमेदवारी दिली तर कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनुरावृत्ती झाल्या शिवाय राहणार नाही असे मत भाजपा मध्ये ४० वर्षाहून अधिक काळ निव्वळ कार्यकर्ते म्हणून घालविलेल्या अनेकांनी व्यक्त केले आहे.निमित्त होते काल विविध असलेल्या भाजपच्या कार्यक्रमांचे.सर्व जुन्या जाणत्यांना अपराधी मानणे,त्यांना वेगळी वागणूक देणे असे प्रकार पक्षातील नव्या पिढीने सुरु केल्याने हे पक्षाला घातक असल्याचे सर्वांचे मत आहे.पुणे लोकसभेची पोट निवडणूक न घेणे, कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील रुंदीकरण आणि अन्य टेंडर च्या इस्टीमेट रकमांमध्ये ५० कोटीचा घोळ करणे, महापालिकेतील भरती मध्ये कामगारांची आर्थिक पिळवणूक करणे, टेंडर घोटाळे,इस्टीमेट घोटाळे,टीडीआर घोटाळे,बेकायदा बांधकामे,कोरोना काळातील घोटाळे अशा विविध मार्गावर महापलिकेत सत्ता असताना केलेला कारभार कुस्त्यांचे फड,आणि पुरस्कारांचे मेळावे भरवून पुसला जाणार नाही सामान्य माणसाच्या रोटी कपडा मकान या मुलभूत हक्कांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा निर्माण केल्या कि त्यावरच गदा आणल्या यावर एक चर्चा सत्र भाजपांतर्गत विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांन मध्ये भरविले तर कसब्याच्या पराभवाची कारणे मीमांसा लक्षात येईल आणि लोकसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते काय याचीही कल्पना येईल असे मत व्यक्त झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान- सुनील देवधर

लोकतंत्र सेनानी संघ, पुणे तर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
पुणे – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक मोठे नेते नव्हते, तर आपल्या ध्येय धोरणांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देणारे राष्ट्रपुरुष होते. आज देशाची जी सर्व क्षेत्रांमध्ये विलक्षण घोडदौड सुरू आहे, त्याचा पाया अटल बिहारी वाजपेयी यांनी घातला. अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

लोकतंत्र सेनानी संघ पुणे तर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली पर कार्यक्रमाचे कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी संस्थेचे प्रमुख विलास पाठक, सुधीर बोडस, अनुपमा लिमये, मुरलीधर घळसासी, अनिता बिरजे आदी यावेळी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, देश स्वतंत्र करण्यासाठी कारागृहामध्ये गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच देशांमध्ये लोकशाही टिकावी, यासाठी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेले सैनिकही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही टिकून आहे. अशा लोकशाही सैनिकांचे स्मरण राहावे आणि त्यांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदीप रावत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन एक आदर्श आहे. त्यांचे जीवन आणि विचार आजच्या तरुणांपर्यंत विविध मार्गाने पोहोचले पाहिजे. मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे गैरमार्गाला लागलेले तरुण अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि जीवन विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

महासचिव मुरलीधर घळसासी यांनी प्रदीप रावत व सुनिल देवधर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा, त्यांनी समाजासाठी  व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर परिचय करून दिला.

सुधीर बोडस म्हणाले, आणिबाणीच्या काळामध्ये जेव्हा देशांमध्ये लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकशाहीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अनेक लोकशाही सैनिकांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्या सैनिकांचे सध्या काय प्रश्न आहेत? हे सुद्धा जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकतंत्र सेनानी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या, माजी नजरसेविका अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनिता बिरजे यांनी आभार मानले.

ग्लॅडिएटर्स संघाने पटकावले विजेतेपदमहेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती महेश्वरी फुटबॉल लीग मध्ये बाजी

पुणे : निहार झंवरच्या दोन गोलच्या जोरावर एमजेएम ग्लॅडिएटर्स संघाने मालपाणी पँथर्स संघावर मात करून महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी  फुटबॉल  लीगमधील विजेतेपद पटकावले.गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील अंतिम लढतीत ग्लॅडिएटर्स संघाने पँथर्सवर ४-०ने मात केली. लढतीच्या तिस-याच मिनिटाला स्मित झंवरने गोल करून ग्लॅडिएटर्स संघाचे खाते उघडले. यानंतर काही वेळ ग्लॅडिएटर्स संघाचे आक्रमण रोखून धरण्यात पँथर्स संघाला यश आले. लढतीच्या १३व्या मिनिटाला जय मालपाणीने गोल करून ग्लॅडिएटर्स संघाची आघाडी २-०ने वाढवली. यानंतर निहारने (१५, १८ मि.) तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल करून ग्लॅडिएटर्सची आघाडी ४-०ने भक्कम केली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून ग्लॅडिएटर्स संघाने बाजी मारली.

तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत ग्लॅडिएटर्स संघाने दुबई एक्सपर्ट डायनामोज संघावर ३-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. यात ग्लॅडिएटर्स संघाकडून रामानुज राठी (५ मि.), स्मित झंवर (९ मि.) आणि निहार झंवरने (१६ मि.) गोल केले. दुस-या उपांत्य लढतीत मालपाणी पँथर्स संघाने किअॅक किकर्स संघावर २-१ ने विजय मिळवला. पँथर्स संघाकडून प्रणव न्याती (२१ मि.) आणि तेज सारडा (२३ मि.) यांनी गोल केले, तर किकर्स संघाने एकमेव गोल श्रेष्ठ माहेश्वरीने (१० मि.) केला.    

विजेत्यांना मालपाणी ग्रुपचे संचालक गिरिश मालपाणी आणि तारा डेव्हलपर्सचे नंदकिशोर राठी यांच्या हस्ते करंडक आणि पदक देऊन गौरविण्यात आले. या वेळी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे प्रणव न्याती, महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू, रजत दरक, वेदांत कारवा, परम जखोटिया, जय मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल – अंतिम फेरी – एमजेएम ग्लॅडिएटर्स – ४ (निहार झंवर १५, १८ मि., स्मित झंवर ३ मि., जय मालपाणी १३ मि.) वि. वि. मालपाणी पँथर्स

उपांत्य फेरी – ग्लॅडिएटर्स – २ (रामानुज राठी५ मि., स्मित झंवर ९  मि., निहार झंवर १६ मि.) वि. वि. दुबई एक्सपर्ट डायनामोज – ०

मालपाणी पँथर्स – २ (प्रणव न्याती २१ मि., तेज सारडा २३ मि.) वि. वि. किअॅक किकर्स – १ (श्रेष्ठ माहेश्वरी १० मि.)

बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल-राज्यपाल रमेश बैस

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे, दि.२६: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे बाल विज्ञान प्रदर्शन ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविले, असे गौरवोद्गार राज्यपाल श्री. बैस यांनी काढले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, मुंबई येथे १९७९ आणि २००६ मध्ये पुण्याला हे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राज्यात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीईआरटीचे सहसंचालक श्रीवास्तव म्हणाले, गेल्या पाच दशकापासून विविध राज्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीईआरटी प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावरील नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी १७३ बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज १० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.

प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता, वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

काल ओपन चॅलेंज अन् आज अजित पवार थेट पोहोचले अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात…विविध विकासकामांची पाहणी

अमोल कोल्हेंच्या विरोधात भूमिका घेतली तर अजीत दादांना करावा लागणार ओबीसी संतापाचा सामना

पुणे, दि. २६: उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वेफाटकावरील उड्डाणपुल, मुळा मुठा नदी वरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली. खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन तेथील कामाचा आढावा घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वेफाटकावरील उड्डाणपुल, मुळा मुठा नदी वरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी केली.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे,  डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की,  मांजरी बु. परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी. आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी. महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करुन या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी.

हडपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बु. येथे रेल्वे फाटकावरील उड्डाणपुल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी ५० मीटर जमीन भुसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा. या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. या पुलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

मांजरी बु. आणि मांजरी खु. यांना जोडण्यासाठी मुळा मुठा नदीवर दोनपदरी पुलाचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

विकास कामाच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते ससाणेनगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्मान आरोग्यवर्धनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.