Home Blog Page 1294

रेड झोनची मोजणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांची मान्यता

 पिंपरी चिंचवड -शहरातील रेड झोनची मोजणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने आणि विविध डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळेगुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ तसेच श्रीम. शेवंताबाई प्राथमिक शाळा क्रमांक ५६, वैदु वस्ती या इमारतीची स्थापत्यविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी, दत्तवाडी, काळभोरनगर व परिसरातील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण व दुरूस्ती करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १९ गावडे कॉलनी, उद्योगनगर, सुदर्शननगर व इतर परिसरामध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी व इतर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती एम.पी.एम पद्धतीने करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक २३ मधील नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तसेच नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

आकुर्डी येथील दत्तवाडी विठ्ठलवाडी व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १४ मधील डांबरी रस्त्यांची चरांची कामे करण्यासाठी तसेच सन २०२३-२४ करिता प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासनगर, भिमाशंकर कॉलनी, दत्तनगर भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

 प्रभाग क्रमांक ८ मध्ये खोदलेल्या चरांची डब्ल्यु.बी.एम व बी.बी.एम पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर व परिसरातील स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १९ मधील महापालिका इमारतींची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

क्रांतीवीर चापेकर वाडा येथे ऑडियो-व्हिडीओ व्हिज्वल, प्रोजेक्शन मॅपिंग व विविध डिजीटलायझेशन विषयक कामासाठी तसेच भाटनगर व इतर झोपडपट्टीमधील महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमधील ग्रंथालयाकरिता आवश्यक कथा पुस्तके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

सन २०२३-२४ साठी कासारवाडी गेटाखालील परिसरात मुख्यालय स्तरावर डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक २५ वाकड, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख भागातील रस्ते आवश्यकतेनुसार डब्ल्यु.एम.एम व एम.पी.एम पद्धतीने विकसीत करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १४ मधील परिसरामध्ये स्ट्रॉम वॉटर लाईन टाकणे व पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रॉम वॉटर लाईनची दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक २४ येथील रत्नदीप कॉलनी, मंगलनगर, गुजरनगर, लक्ष्मणनगर, संतोषनगर, सदाशिव कॉलनी व इतर आवश्यक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी आणि महापालिकेचे इ क्षेत्रीय कार्यालय, विद्युत विभागांतर्गत विविध कामांकरिता सन २०२३-२४ च्या तरतुदीमधील शिल्लक तरतुद वर्गीकरण करण्यासाठी तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावणे या लेखाशिर्षावर स्थायी अग्रिम सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

0

मुंबईत १८ व १९ जानेवारी रोजी आयोजन

मुंबई, दि. 27 :- मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

श्री. साठे म्हणाले की, मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठी मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, मध महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव देणारे राज्य असून राज्यात प्रति किलो पाचशे रुपये हमीभाव देण्यात येतो. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९  मधपाळ शेतकरी मधमाशांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. गेल्या वर्षी १ लाख ६० हजार मध उत्पादन झाले. त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशाच्या सीमांवर होणार मधमाशांचा वापर

मधमाशा ह्या त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करुन त्याला जखमी करतात. मधमाशांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर मधमाशांचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला म्हणाल्या की, मधुबन हा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग विभागाचा मधाचा ब्रॅंड आहे. मध शरिरासाठी अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यासाठी मधाचा उपयोग, मध निर्मिती, या विषयात काम करणारे अनेक तज्ज्ञ आणि पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मधपाळ, शेतकरी यांच्यासाठी मधपालन कसे करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.

अत्याचारी ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसेच भाजपाच्या हुकूशाहीलाही घरी पाठवू.

देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा एल्गार.

देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात; महागाई, बेरोजगारी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘काँग्रेस है तैयार’!

नागपूर/मुंबई, दि. २७ डिसेंबर
देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी एल्गार पुकारुन परिवर्तानाचा संदेश दिला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरच्या पवित्र भूमितून परिवर्तानाचा संदेश दिला जाणार आहे. मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमितून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे. ६० वर्षांच्या काँग्रेस सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत भारताला एक महाशक्ती म्हणून उभे केले पण दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला आहे. आज देश विकून देश चालवला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांना घाबरवले जात आहे. संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले पण काँग्रेस अशा कारवायांना भिक घालत नाही. जगातील बलाढ्य ब्रिटिशांना जसे देश सोडून जाण्यास भाग पाडले तसेच या हुकूमशाही भाजपालाही घरी बसवू. राहुलजी गांधी यांनी ‘डरो मत’ चा नारा दिला आहे, त्याच मार्गाने जावून भाजपाला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आज महागाई, शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या आहेत. सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई असून देशाला वाचवणे हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. २८ तारखेच्या नागपुरच्या महामेळासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून परिवर्तनाचा एल्गार या महामेळाव्यातून पुकारला जाणार आहे, या परिवर्तनासाठी ‘हम तैयार है’, असे नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांचे व्याख्यान संपन्न

पुणे, दि. २७: शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आयसर येथील वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांचे ‘निसर्ग आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

डॉ. नातू म्हणाले, नागरिकांनी चिकित्सकवृत्तीने निसर्गाचे निरीक्षण करुन त्यामधून सतत अध्ययन करीत राहावे. स्वतः ला का? कधी? कसे? असे प्रश्न विचारत राहावे असे म्हणून त्यांनी मानवी अस्तित्वासाठी तंत्रज्ञान विकसित करावे.

निर्सगाच्या निरीक्षणातूनच ‘वेलप्रो’चा शोध लागला. तसेच बुलेट ट्रेनचे इंजिन निर्माण करताना ‘किंगफिशर’ या पक्षाच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना आवाज न करण्याच्या पद्धतीचा उपयोग झाला. रोबो निर्माण करताना झुरळासारख्या छोट्या किटकाने संकटाच्यावेळी स्वत:ची लांबी ५० टक्क्यापर्यंत करणे या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला आहे. निरीक्षणाद्वारे अशा वैज्ञानिक गोष्टींचे आकलन होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे उपस्थित होते. प्रदर्शनात विविध राज्यातील प्राध्यापकांनी विज्ञान प्रदर्शनाबाबत सुरु असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील डॉ. हेमंत कुमार, चंदीगडचे मनू शर्मा, नागालँडचे श्रीमती विसेतोनुओ अंगमी, मणिपूरचे ओनिनाम सिंग, आसामचे नितुल दास, बिहारचे कृष्णा कुमार, झारखंडच्या प्रिती मिश्रा, अंदमान- निकोबारचे राजेश कुमार, लडाखचे युसूफ अली आदींनी सहभाग घेतला.

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला २ हजार ७०० विद्यार्थी आणि १४० शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. येडगे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या अविष्काराबद्दल माहिती घेतली तसेच कराड येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. अधिकाधिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. येडगे यांनी केले आहे.

मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू

३१ जानेवारीपर्यंत लाभ घेता येणार

पुणे, दि. २७: कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा हा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर, दुसरा टप्पा हा १ फेब्रुवारी ते दि. ३१ मार्च २०२४ असा असणार आहे. काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर, दुसऱ्या टप्यामध्येदेखील सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतू अशा प्रकरणात लाभाचे प्रमाण कमी राहील.

महाराष्ट्राच्या राजपत्रात अधिसूचित केलेल्या ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन आदेशाच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाने ११ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून या योजनेबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना जारी केल्या आहेत. १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या सालामध्ये निष्पादित केलेल्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणात कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सुट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे.

१ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये निष्पादित केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट आणि दंड हा नाममात्र २५ लाख ते १ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्क्म त्यापेक्षा जास्त असल्यास ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रक्कमेच्या मुद्रांक पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही.

कोणत्याही परिस्थितीत राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पक्षकारांनी लेखी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्यांना डिमांड नोटीस देण्याच्या सूचना शासनाने मुद्रांक शुल्क विभागाला दिल्या आहेत. पूर्वीच डिमांड नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणी वेगळ्याने मुद्रांक शुल्काचे निर्धारण करण्याची गरज नाही. अशा प्रकरणी अभय योजनेखालील सवलत तातडीने लागू करुन डिमांड नोटीस तात्काळ देण्याबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत.

मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. योजनेची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

अभय योजनेच्या लाभाची संधी दिल्यानंतर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन मालमत्तेच्या हस्तांतरणावरील कमी भरलेले मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा करणे आवश्यक आहे. मात्र, असे न केल्यास संबंधिताच्या मालमत्तेवर मुद्रांक कायद्याच्या कलम ४६ नुसार टाच आणून त्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करुन शासनाच्या चुकविलेल्या मुद्रांक शुल्काची संबंधितांकडून सक्तीने वसुली करण्यात येणार आहे.

जाणीवपूर्वक मुद्रांक शुल्काची चोरी करण्याच्या हेतूने असा दस्त निष्पादित केला आहे; असे गृहित धरुन संबंधित पक्षकारांवर मुद्रांक कायद्याच्याच कलम ५९ व कलम ६२ नुसार कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा देण्याच्या अनुषंगाने दिवाणी-फौजदारी कारवाईदेखील शासनाकडून प्रस्तावित करण्याबाबतच्या स्पष्ट अशा सूचना देखिल शासनाने निर्गमित केल्या आहेत.

शासनाकडून कोणत्याही प्रकारची सक्तीने वसुली करण्याची कारवाई टाळण्यासाठी सदर मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेऊन कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काचे सर्व व्यवहार तातडीने नियमित करुन घेण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

या अभय योजनेमुळे, सर्वसामान्य नागरिकांच्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाचे दस्त ज्यावर कमी मुद्रांक शुल्काची आकारणी केली आहे त्यांना यथोचित मुद्रांकित करण्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे असे दस्त नियमानुसार नोंदविणे शक्य जरी होणार नसले, तरी अशा दस्तांना यथोचित मुद्रांकामुळे कोलॅटरल तथा अप्रत्यक्ष असे पुरावा मूल्य मिळणार आहे.

अभय योजनेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांना नवीन घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. केवळ, मुद्रांक शुल्काचा कमी भरणा केला असल्याने मानीव अभिहस्तांतरणाची (डिम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया प्रलंबित असलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण तातडीने पूर्ण होण्यास सहाय्य होणार आहे.

याशिवाय, कंपन्यांच्या पुनर्रचना किंवा एकत्रीकरण किवा विभाजनाच्या अनुषंगाने निष्पादित झालेल्या दस्तांवर देखील मुद्रांक शुल्काची सवलत लागू केल्याने अशा कंपन्यांच्या प्रलंबित राहिलेल्या पुनर्रचना किवा एकत्रिकरण किवा विभाजनाच्या प्रक्रियेला देखील चालना मिळून या कंपन्यांच्या माध्यमाने राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

अभय योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत नागरीकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी संबंधित जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाचा कॉल सेंटर क्र. ८८८८००७७७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व. दिंगबर(दादा) बाळोबा भेगडे स्मारकाचे लोकार्पण

स्व.दिगंबर भेगडे यांचे जीवन कर्तव्याप्रती समर्पणाचा आदर्श-देवेंद्र फडणवीस

पुणे दि.२७: जनतेप्रती समर्पणाचा भाव असलेल्या स्व. दिंगबर(दादा) भेगडे यांनी नेहमी मूल्याधिष्ठीत राजकारण केले; त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकायला मिळते आणि प्रेरणाही मिळते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व.दिगंबर भेगडे यांना आदरांजली अर्पण केली.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे कै.दिंगबर(दादा) बाळोबा भेगडे प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, स्व. दिंगबर(दादा) भेगडे यांच्यासोबत दहा वर्षे काम करता आले. ते समर्पित जीवन जगलेले कार्यकर्ते होते. पूर्णवेळ विधानसभेत बसून सगळ्या कामकाजात सहभागी होणारे दादा आपले विषय स्पष्टपणे आणि नेटाने मांडत असत. त्यामुळे मंत्री त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायचे. पंढरीचा वारकरी असणारे दादा विधानसभेत गेल्यावरही मानकरी न होता वारकरीच राहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या रुपात वारकरीच पहायला मिळाला, अशा शब्दात त्यांनी स्व.भेगडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

दादा आमदार नसतानाही सामान्य माणसाच्या मुलभूत प्रश्नांचा पाठपुरावा करत राहिले. त्यांनी हाती घेतलेली आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नरत राहू. यातीलच भंडारा डोंगरावरचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करु, याबाबतच प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे देऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. तुकाराम महाराजांच्या स्मृती महत्वाच्या असून त्या जपण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले स्व. भेगडे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मार्गाने पुढे जावे लागेल. राजकारण आणि समाजकारण त्यांच्या कुटुंबातच होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ अशा संस्थेवर त्यांनी विविध पदे भूषवली. या भागातील त्यांच्या कल्पनेतील प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. दानवे म्हणाले.

उच्च व तंत्रशिक्षण श्री. पाटील म्हणाले, अतिशय नम्र, अहंकारी वृत्तीला बाजूला सारत अधिकाऱ्यांना प्रेमाची वागणूक देणारा खरा कार्यकर्ता म्हणून दादांना ओळखले जाते. लोकप्रतिनिधींना त्यांचे जीवन आणि कार्य मार्गदर्शक आहे. स्व. आमदार भेगडे यांच्या निधनानंतर मावळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्या संकल्पनेतील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच स्व. दिगंबर दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी माजी राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

मीडियापुढे मौन बाळगा पण कोर्टात जायची तयारी ठेवा, चंद्रकांत पाटलांनी अजित दादांविरोधात मोर्चा उघडला?

पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात अजित पवार गट विरुद्ध भाजप- शिंदे गट असा नवा संघर्ष सुरू झाला आहे. मात्र या वादावर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमासमोर बोलायला नकार दिला आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी अजितदादा विरुद्ध मोर्चा उघडलेला दिसत आहे.आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भाजपच्या मंडल अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीतील काही सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडत अजित दादांची थेट तक्रार केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला आपण अजितदादा यांच्याशी बोलू. ते हा प्रश्न मार्गी लावतील, असं म्हटलं. मात्र त्यानंतर निधी न मिळाल्यास कोर्टात जाण्याची तयारी ठेवा, अशा थेट सूचना चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना केल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी अजित पवार यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका स्वीकारलेली दिसते.दरम्यान, या बैठकीला चंद्रकांत पाटील आले असता त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधी संदर्भात भाजपच्या सदस्यांनी केलेल्या आरोपावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडत तुमच्या पासून लांब राहायला हवं, असं म्हणत या वादावर बोलणं टाळलं आहे. एकीकडे माध्यमांसमोर बोलणं टाळलं असताना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मात्र चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे.भाजप- शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन या संदर्भाचा गंभीर आरोप केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप शिंदे गटाला डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या समर्थकांना जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे ही कामे तात्काळ थांबावेत अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा गंभीर इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, एकूण निधीपैकी 60 ते 70 टक्के निधी अजित पवारांनी आपल्या समर्थकांनाच दिल्याचा आरोप करत शिंदे गट भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केवळ पाच ते दहा टक्क्यांवर बोलवण करण्यात आल्याच देखील आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा निधी जिल्ह्यात कुठलीही आपत्ती नसताना वापरण्यात आल्याचा आरोप देखील या निवेदनातून करण्यात आला आहे.

रिपोर्ट कार्ड पाहूनच पुणे लोकसभेसाठी निर्णय-फडणवीसांचा राज्यभर मॅरेथॉन दौरा

देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेसाठी कंबर कसली:फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेत करणार महाराष्ट्राचा दौरा

मुंबई- कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनुरावृत्ती होऊ नये अशा पद्धतीने उमेदवार द्यावा अशी मागणी आमच्या पर्यंत पोहोचली असून जरी पुणे लोकसभेसाठी महापलिकेत सत्ता असताना पदाधिकारी राहिलेल्या कोणी लोकसभेसाठी इच्छुक म्हणून फिल्डिंग लावलेली असली तरीही पक्ष रिपोर्ट कार्ड पाहूनच पुणे लोकसभेचा उमेदवार देताना निर्णय घेईल रिपोर्ट कार्ड पाहताना त्यांच्याबाबतच्या आक्षेपांचा देखील विचार करण्यात येईल.कसबा निवडणुकीत पराभव का पत्करावा लागला याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले असून त्याचा देखीलविचार करण्यात येईल असे येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांकडे दिलेली माहिती समजते आहे.पुण्याचे माजी महापौर मोहोळ आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांचे भाऊ माजी आमदार मुळीक यांच्या उमेदवारी बाबत वरिष्ठ नेत्यांकडे शंका उपस्थित करण्यात आल्याचे वृत्त आहे यावर स्पष्टीकरण देताना नेत्यांनी हि माहिती दिल्याचे समजते आहे.दरम्यान आता मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही असं स्पष्ट सांगितल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलं आहे. याच निवडणुकीवर महाराष्ट्रातील विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार असून रोज 3 सभा घेत भाजपला चांगल्या जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असले तरी अजून त्यांचे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. मात्र, ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत, अशी माहिती समजत असून लवकरच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होणार अशी माहिती आहे. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

राजकीय विश्नेषक यांच्या मते 2024 लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय होऊ शकतो. पण गेली काही दिवस सोशल मिडीयावर भाजपने 3 राज्यांत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू असून असे झाले तर भाजप नेते विनोद तावडेंसारख्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची लॉटरी लागण्याची चिन्हे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून हे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

साने गुरूजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 27 : – ‘पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वस्त देखील केले.

या आगामी संमेलनासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेवून निमंत्रण दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली. संमेलनासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे सांगत त्यांनी संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.

देशात महागाई, बेरोजगारीने नागरिक त्रस्त- डॉ. कैलास कदम

काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नागपूरला रवाना
पुणे (दि.२७ डिसेंबर २०२३)
देशातील नागरिक महागाई, बेरोजगारीमुळे त्रस्त झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जातीजातीमध्ये तेड निर्माण करण्याचे काम करीत आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आता काँग्रेस पक्ष योग्य पर्याय आहे. काँग्रेसच्या १३९ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित केलेल्या “है तैयार हम” या मेळाव्यास राज्यातील लाखो नागरिक उपस्थित राहत आहेत या साठी पिंपरी चिंचवड मधून काँग्रेसचे सुमारे दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी रवाना होत आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून बुधवारी काँग्रेसचे कार्यकर्ते शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला रवाना झाले.
यामधे विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विजय ओव्हाळ, भाऊसाहेब मुगुटमल, बाळासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, मिलिंद फडतरे सुधाकर कुंभार, युनुस बागवान, निखिल भोईर, सतीश भोसले, इरफान पठाण, राजू ठोकळ, सुधाकर कुंभार, हरीश डोळस, आकाश शिंदे, जितेंद्र छाबडा, फिरोज तांबोळी, डॉ. मनीषा गरुड, सौरभ शिंदे, प्रा. किरण खाजेकर, विशाल कसबे, ॲड. बाजीराव दळवी, शयान अन्सारी, सुरज गायकवाड, अमरजीत सिंग, चंदन गुप्ता, जय राऊत, शहाजात शेख, श्रीराम लवंगे, कैलास मकासरे, निर्मलाताई खैरे, शशिकांत जगताप, प्रकाश लोंढे, दिलीप जगताप, चिदानंद जमादार, बाबासाहेब वाघमारे, गौरीताई शेलार, अरुण डोळस, आशा डोळस, प्रमोद शेलार, लक्ष्मीबाई जठार आदींचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात २० हजार ग्राहकांची वीज खंडित;१५.७४ लाख वीज ग्राहकांकडे ३१० कोटींची थकबाकी

शनिवारी, रविवारी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

पुणे, दि२७ डिसेंबर २०२३: वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती १३ लाख ९८ हजार ४४९ ग्राहकांकडे २१८ कोटी ३० लाख तसेच वाणिज्यिक १ लाख ५२ हजार ९०० ग्राहकांकडे ६२ कोटी ९ लाख तर औद्योगिक २३ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून वसूली मोहिमेला वेग देण्यात आला असून या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

दरम्यान, वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या २५ दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक २० हजार ३२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ११,१८२ सातारा- १८२३, सोलापूर- ६००८, कोल्हापूर- २०९४ आणि सांगली जिल्ह्यातील २७७६ थकबाकीदारांचा समावेश आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १९८ कोटी ३ लाख रुपये (७,७६,४९८), सातारा- २२ कोटी २ लाख (१,८६,४७९), सोलापूर- ४९ कोटी ०६ लाख (२,५३,९३९), कोल्हापूर- २० कोटी ३३ लाख (१,७७,९३८) आणि सांगली जिल्ह्यात २० कोटी ७३ लाख रुपयांची (१,७९,७२६) थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कसरत सुरू आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

थकबाकीदारांकडून वीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. आता थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. यात परस्पर इतर ठिकाणावरून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.  

शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू– पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासोबतच वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा

पुणे, दि. २७ डिसेंबर २०२३वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करीत असताना महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मुळशी विभागातील उरूळीकांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे, अंचल बागडे, अश्विनी गोरे, किरण झेंडे यांच्यासह मंगळवारी (दि. २६) दुपारी २.३०च्या सुमारास थेऊरफाटा, कुंजिरवाडी येथे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होते. यामध्ये आंबेकरवस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीजबिलाची ९ हजार १५० रुपयांची थकबाकी होती व वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजजोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीजग्राहकाकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले. या वीजचोरीबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यात आला. यासंदर्भात संबंधित वीजग्राहकांना माहिती देत असताना गणेश दौंडकर याने तेथे येऊन स्थळपाहणीचा अहवाल फाडून टाकला. तसेच माझ्या दारात येण्याचा काय संबंध असे म्हणत उपकार्यकारी अभियंता श्री. पंडित व सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली.

याप्रकरणी महावितरणकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गणेश दौंडकर विरुद्ध कलम ३५३, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सराईत दुचाकी चोर अटकेत , सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे – सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.25) करण्यात आली. सचिन शाम ढवळे (वय-43 रा. शंकर महाराज वसाहत, साई मंदिरामागे, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ख्रिसमस नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी
आरोपी सचिन ढवळे अॅक्टीव्हा मोपेड दुचाकीवरुन ट्रेझर पार्क कडून तावरे कॉलनीकडे वेगाने जाताना दिसला. पथकाला त्याचा संशय आल्याने पोलीस हवालदार भुजंग इंगळे व सुशांत फरांदे यांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने इप्लीकेट चावीच्या सहाय्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

पोलिसांनी 45 हजार रुपये किमतीच्या दोन अक्टिव्हा मोपेड व एक होंडा शाईन जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे , सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, अमोल पवार, नलेश शिवतरे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांच्या पथकाने केली.

भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा: देशभरातील ३० लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार : राहुल डंबाळे

पुणे : जानेवारी रोजी होणारा भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्या निमित्त भाभवादन करण्यासाठी महाराष्ट्र सह उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात सह संपूर्ण भारतभरातून तब्बल ३० लाख भिम अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार उमा सह अनुयायांची ही संख्या लक्षात घेवून जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व पायाभूत सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. भिमाकोरेगांव शौर्यदिनाच्या अनुषंगाने तसेच राज्यात अन्य कोणत्याही स्वरुपाचा तणाव नसल्याने अभिवादन सोहळा शांतते पार पडणार आहे अशी माहितील भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समितीचे अध्यक्ष

राहुल डंबाळे यांनी दिली.

अनुयायीची वाढती संख्या लक्षात घेता यंदाच्या वर्षी शौर्यदिन अभिवादन सोहळा दि. ३१ डिसेंबर व ०१ जानेवारी या दोन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे. दोन दिवसाच्या सोहळयाचे राज्यात सर्वत्र स्वागत होत असून ३१ डिसेंबर रोजी अंदाजे ५ लाख अनुयायी अभिवादन करतील. ज्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांच्यासह कुटुंबासह अभिवादनला येणाऱ्यांचा सहभाग राहणार आहे.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विजयस्तंभ अभिवादनासाठी सर्व सजावटीसह संपूर्णपणे खुला राहणार असून भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीसह अन्य आंबेडकरी पक्ष संघटनांचे विविध कार्यक्रम सुरु होणार आहेत. विविध शासकीयविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे उद्घाटन याच दिवशी होणार असून ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता फटक्यांची भव्य आताशबाजी करण्यात येणार आहे.

१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार हे विजयस्तंभास मानवंदन देणार आहेत. यावेळी भिमाकोरेगाव शायदिनासाठी कार्यरत राहिलेले पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा स्मृती चिन्ह व मानपत्र देऊन अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहेत. त्यानंतर
वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर. भिमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, भारतीय बौध्द महासभेचे भिमराव आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, भारतीय दलित कोब्राचे अॅड. भाई विवेक चव्हाण यांचेसह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी इत्यादी मान्यवर अभिवादन करणार आहेत.

सकाळी ८ : ३० वाजता समता सैनिक दलाची मानवंदना परेड अत्यंत दिमागदार पध्दतीने बँन्डपथकासह संचलन करणार असून यात सुमारे ८०० पेक्षा अधिक समता सैनिक सहभागी होणार आहेत.

सकाळी ९:३० वाजता १ जानेवारी रोजीच भारतीय सैन्य दलातील महार रेजिरमेंटमधील निवृत्त १५०० सैनिकांची मानवंदना परेड आयोजित करण्यात आली असून त्यांचे वतीने पुष्पचक्र अर्पण करुन लष्करी इतमातील महार गान गायले जाणार आहे. यासाठी देशभरातील विविध भागातून निवृत्त सैनिक यात सहभाग होणार आहेत.

सकाळी १०:३० नंतर आंबेडकरी कार्यकत्यांनी निर्माण केलेली ढोल पथक तसेच ढोल लेझिम पथक हे देखील या सोहळयात सहभागी होणार आहेत.

अभिवादन सोहळयानिमित्त भारतीय दलित कोन्नाचे भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचेसह पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे

यांच्या अभिवादन सभा परिसरात होणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने गेल्या ३ महिन्यांपासून भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती यांच्या समवेत अनेकदा संयुक्त बैठका घेवून त्यातील सूचनांच्या आधारेच यंदाच्या वर्षी सर्वोत्तम नियोजन केले असून या नियोजनावद्दल समन्वय समिती समाधानी आहे. व संपूर्णपणे ठरलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रयत्नशिल आहेत.

यंदाच्या वर्षी आंबेडकरी साहित्य तसेच पुस्तक विक्रेत्यांना विजयस्तंभालगतच जागा उपलब्ध करुन दिली असल्यामुळे पुस्तक विक्रेत्याबरोबरच अनुयायांमध्ये देखील आनंदाचे बातावरण आहे. चैत्यभूमीप्रमाणेच याठिकाणीदेखील करोडो रुपयांची साहित्यांची खरेदी केली जाणार आहे.

१५ हजार शासकीय निमशासकीय कर्मचारी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्यमुळे हा उत्सव अत्यंत आनंदात पार पडणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या संख्येने सर्व शासकीय कर्मचारी काम करीत असल्याने आता हा उत्सव सर्व समावेशक झाला असून हा देशाच्या मुख्य उत्सावामध्ये गणला जात आहे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे परशूराम वाडेकर यांनी मांडले. दरम्यान विजयस्तंभावरसंविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने संविधाची प्रतिकृती लावण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने आम्ही केली होती ती देखील मान्य केल्याचा आनंद वाटत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

विजयस्तंभ शौर्यदिन अनुषंगाने देशभरातील अनुयायी दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पुणे शहर व जिल्हयातील सर्वच आंबेडकरी पक्ष संघटना एकत्रितपणे सज्ज झाल्या असून अनुयायांना सर्व त-हेची सुरक्षा व्यवस्था व अन्य पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून ३ महिन्यांपासून प्रयत्नशिल आहोत या दरम्यान पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सी ओ, बार्टी महासंचालक, समाज कल्याण आयुक्त यांच्या समवेत सातत्याने बैठका घेत आहोत. अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली.

सध्या देशभरामध्ये कोविड १९ सबव्हायरंट जे. एन. १ ची शक्यता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर तसेच धूळीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनुयायांनी शक्यतो मास्कचा बापर करावा असे आव्हान समिती व्दारे करण्यात येत आहे असेही धेंडे यांनी सांगितले.

यासंपूर्ण उत्सवात महिलांची वाढती संख्या लक्षात घेवून महिलांसाठीचे स्वतंत्र नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. महिला सुरक्षितेसोबतच महिलांच्या दागिण्यांची चोरी होवू नये म्हणून पोलीसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून हिरकणी कक्ष व आरोग्य केंद्रांची उभारणी केली जात आहे यामुळे महिला वर्ग मोठया संख्येने या उत्सवात सहभागी होईल असे मत सुवर्णा डंबाळे यांनी मांडले.

तरी सदर पत्रकर परिषदेव्दारे राज्यातील व देशातील आंबेडकरी अनुयायांनी कोणत्याही अफवांना थारा न देता भिमाकोरेगांव शौर्यदिन अभिवादन सोहळयात सहभागी व्हावे.

सदर पत्रकार परिषदेत राहुल डंबाळे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, परशूराम वाडेकर, सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने आदिपदाधिकारी सहभागी होते.

नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण

पुणे-डीईएसच्या पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदीर शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांनी सलग तीन तास नृत्याविष्कारातून गीतरामायण सादर केले.

लहान वयात मोठ्या संख्येने गीत रामायण सादर केल्याबद्दल ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ असे दोन विक्रम शाळेने प्रस्थापित केले.

राम जन्म, सीता स्वयंवर, हनुमान भेट, रावण वध असे 30 प्रसंग नृत्य, संगीत आणि नाटकाच्या माध्यमांतून अडीच ते साडेपाच वयोगटातील विद्यार्थ्यांनी चार हजार प्रेक्षकांसमोर साकारले.

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गीतरामायणाचे जनक ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांच्या सादरीकरणातून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

आनंद माडगुळकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी आणि शाला समितीच्या अध्यक्ष ॲड. राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.