Home Blog Page 1293

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पुणे-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे प्रेरणा देणारे आहेत. लहान मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजावेत, त्यांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल, अशी घोषणा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. एका चिमुकल्याच्या मागणीनुसार मकरसंक्रांतीचे औचित्य साधून लहान मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाईल; असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पक्ष कोथरुड मतदारसंघाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.‌ या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते.यावेळी ह्या स्पर्धेचे यशस्वी नियोजन करणारे सूचित देशपांडे यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या हातातील घड्याळ भेट दिले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे,भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, वासंती जाधव, नगरसेवक दीपक पोटे, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, सचिन दळवी, अश्विनी ढमाले यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, किल्ला बनवा स्पर्धेतील सर्व स्पर्धक उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे शिवरायांचे विचार बाल मनावर रुजावेत, त्यांना शिवरायांच्या कार्याची ओळख व्हावी; यासाठी किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळात गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा केली.

यावेळी उपस्थित लहान मुलांनी मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्याचा आग्रह नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर धरला. त्याला नामदार पाटील यांनी समर्थन दर्शवत मकर संक्रांतीला कोथरुड मध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा केली. यासाठी इच्छुकांनी भाजपा कोथरुड मंडल कार्यालय आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, नामदार चंद्रकांतदादा पाटील हे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारे नेतृत्व आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने नामदार पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. पुणे शहर हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य स्मरणात रहाव्यात. त्यामुळे बाल मनावर संस्कार होतात, यासाठी आयोजित किल्ले बनवा स्पर्धा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी लहान मुलांकडून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ संदीप बुटाला यांनी केले. प्रास्ताविक सुचित देशपांडे यांनी केले. सूत्र संचालन राज तांबोळी यांनी केले.

मानवी जीवनातला आतील अंधकार मिटविण्याची क्षमता वेद, उपनिषदांमध्ये – आचार्य सोनेरावजी

दयानंद सरस्वती हे ऋषी परंपरेतील महान व्यक्ती – विदुषी अंजली आर्य

पुणे (दि.२८ डिसेंबर २०२३) बाहेरचा अंधकार सूर्य दूर करतो. मानवी जीवनातला आतील अंधकार मिटविण्याची क्षमता वेद, उपनिषदांमध्ये आहे. पुरातन शिक्षण पद्धतीत अध्यात्माद्वारे वेद, उपनिषदांचा अभ्यास करून “माणूस” घडविला जात होता. मात्र आधुनिक शिक्षण पद्धतीत भौतिक सुख साधनांचा वापर वाढला असून त्यातून फक्त उपभोक्ता (ग्राहक) घडवण्यासाठी लक्ष दिले जात आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांनी केले.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये
कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सल्लागार मुरलीधर सुंदरानी, सचिव हरेश तीलोकचंदानी, तबला वादक रमाकांत राऊत, नलिनी देशपांडे, उत्तम दंडीमे, आर्य वीर दलाचे शहर अध्यक्ष संजीव भाट, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, पंडित विश्वनाथ शास्त्री, अतुल आचार्य, वशिष्ठ मुनी, माजी नगरसेवक कुमार जाधव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
शनिवारी बालकांच्या हस्ते होम हवन आणि रविवारी ५१ बहुकुंडीय यज्ञ पिंपरी आर्य समाजचे पुरोहित धर्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आर्यभक्त उपस्थित होते. तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या ९७ व्या बलिदान दिवस निमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रवचनकार विदुषी अंजली आर्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, वातावरणासह मनाची आणि अंतकरणाची शुद्धी करण्यासाठी अग्निहोत्र उत्तम साधन आहे. ऋषी दयानंद सरस्वती हे ऋषी परंपरेतील महान व्यक्ती आहेत. वेदांमध्ये विज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. विधवांसाठी, अनाथांसाठी काम करीत असताना जातीपाती तोडो समाज जोडो अशी हाक देऊन त्यांनी कार्य केले. घरातील मुलींसह महिलांनाही धर्मशिक्षण देणे अनिवार्य केले पाहिजे यासाठी त्यांनी काम केले. देशात हिंदू समाज टिकवायचा असेल तर महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार आणि धर्म जागवण्याची गरज आहे असेही विदुषी अंजली आर्या यांनी सांगितले.
स्वागत सुरेंद्र करमचंदानी,
प्रास्ताविक उत्तम दंडीमे आणि आभार नलिनी देशपांडे यांनी मानले.

महिला पाेलिसांपुढे टोळक्याचा तरुणावर काेयत्याने हल्ला:हेच का तुमचे रामराज्य -आपने केला सवाल

निवडणूकपूर्व प्रचारात राम आणून, धागे बांधून, इव्हेंट ची शोबाजी करून रामराज्य येत नाहीमुकुंद किर्दत

आता पुण्यात खरचं कायदा व्यवस्था उरली आहे का? पोलिसांसमोर हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकाला संरक्षण कोण देणार? पुण्यात अजितदादा पवार पालकमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील पुण्यात आमदार आहेत. असे असतानाही पुण्यात पोलिसांना अपयश येत आहे. जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना ऐवजी सतत फसव्या, लक्ष दुसरीकडे वेधणाऱ्या बाबी च्या चर्चेवर ही शिंदे फडणवीस पवार आघाडी काम करते आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या कार्यरत असून त्याची माहिती पोलिसांना नाही अथवा कारवाई करण्यात येत नसावी असे दिसते आहे. सामान्य पुणेकरांची मनातली भिती दूर करून त्यांना आश्वस्त करण्यासाठीचे काही धोरण सरकारकडे आहे का असा प्रश्न पडतो आहे. निवडणूकपूर्व प्रचारात राम आणून, धागे बांधून रामराज्य येत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती आणि कणखर धोरण हवे.

मुकुंद किर्दत, आप

पुणे- – पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्था टिकविण्याचे दृष्टीने सराईत गुन्हेगारांवर माेठ्या प्रमाणात मकोका व एमपीडीए कारवाई करत त्यांना कारागृहात धाडले. परंतु त्यानंतर ही गुन्हेगारांना कारवाईचा धाक उरलाच नसल्याची बाब वडगावशेरी परिसरात उघडकीस आली आहे. भांडण साेडविण्यासाठी गेलेल्या महिला पाेलिस कर्मचाऱ्यापुढेच एका टोळक्याने धारदार काेयत्याने दाेन ते तीन जणांवर वार केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पाेलिसांनी अनुज जितेंद्र यादव (वय- १८), हरिकेश टूणटूण चव्हाण (१८), अाकाश भरत पवार (२३) व अमाेल वसंत चाेरघडे (३०) या आराेपींना अटक केली आहे. तसेच त्यांचे फरार साथीदार अक्षत तापकीर, राहुल बारवसे यांच्यावरही चंदननगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साैरभ संताेष पाडळे (वय-२२,रा.वडगाव शेरी, पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ डिसेंबर राेजी रात्री 11.45 च्या सुमारास घडली आहे. साैरभ पाडळेचा मित्र ऋषिकेश ढाेरे याचे आकाश साेबत भांडण झाले हाेते. हा वाद मिटविण्याकरिता साैरभ हा मित्रांसह वडगावशेरी भागातील दिंगबरनगर येथे आला हाेता. त्यावेळी आकाश याने वाद न मिटवता साैरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनुज याने पळत येऊन महिला पाेलिस कर्मचाऱ्यापुढे ऋषिकेश याचेवर काेयत्याने वार करत शिवीगाळ केली. तसेच ‘याला जिवंत साेडू नका’ असे म्हणत दगड फेकून मारले. त्यानंतर साैरभचा मित्र अभी आगरकर व याेगेश ऋषिकेशला वाचविण्यासाठी गेले. त्यावेळी आराेपींनी त्यांच्यावर देखील काेयत्याने हल्ला केला.

सदर वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या महिला पाेलिस कर्मचाऱ्यांनी आराेपींना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न जुमानता आराेपींनी तक्रारदार व त्याच्या मित्रांवर काेयता व दगडाने प्राणघातक हल्ला करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी पुढील तपास चंदननगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक निलेश घाेरपडे करत आहेत.

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे
महिला पोलिसासमोरच कोयता गँगचा धुडगुस,वडगावशेरीतील आनंदपार्क येथील घटना
पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून थेट पोलिसांसमोरच कोयता हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयता हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली. या कोयता हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झालाआहे.

कतारमधील भारतीयांची फाशीची शिक्षा तुरुंगात रूपांतरित

0

भारतीय राजदूत कोर्टात हजर; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले-नागरिकांची रक्षा करत राहणार

माजी भारतीय नौसैनिकांवर हेरगिरीचा आरोप23 नोव्हेंबर रोजी शिक्षेविरोधातील याचिका स्वीकारण्यात आली.

कतारमधील कथित हेरगिरीचा आरोप असलेल्या 8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला कतारच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कतारच्या अपील न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय घेतला. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.

सुनावणीवेळी भारताचे राजदूत न्यायालयात हजर होते. सर्व 8 कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत होते. भारताने यासाठी विशेष परिषद नेमली होती. मात्र, या निर्णयाची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी कतार न्यायालयाने खलाशांच्या फाशीच्या शिक्षेविरोधातील याचिका स्वीकारली होती. भारत सरकारने सुमारे महिनाभरापूर्वी माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरुद्ध अपील केले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी 9 नोव्हेंबर रोजी अपील दाखल झाल्याची माहिती दिली होती.

ते म्हणाले होते- या सैनिकांना भेटण्यासाठी भारताला दुसरा कॉन्सुलर ऍक्सेसही मिळाला आहे. भारत सरकार कतारच्या सतत संपर्कात आहे. कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची नावे आहेत – कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश. .

26 ऑक्टोबर रोजी कतारी न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, आठ भारतीयांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. अल-जझिराने दिलेल्या वृत्तानुसार, या आठही जणांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.

कतारने अद्याप हे आरोप सार्वजनिक केलेले नाहीत. 30 ऑक्टोबर रोजी आठ माजी नौसैनिकांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतारची समजूत काढण्यासाठी भारत तुर्कीची मदत घेत आहे.

तुर्कियेचे कतारच्या राजघराण्याशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे भारत सरकारने मध्यस्थीसाठी संपर्क साधला आहे. भारत सरकारनेही मदतीसाठी अमेरिकेशी चर्चा केली आहे. याचे कारण अमेरिकेची कतारवर अधिक मजबूत सामरिक पकड आहे.

कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने 30 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली होती.

30 सप्टेंबर रोजी या भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांशी थोड्या वेळासाठी दूरध्वनीवरून बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्या अटकेच्या एका महिन्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी प्रथमच कॉन्सुलर ऍक्सेस मंजूर करण्यात आला. यावेळी भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे दि.27- शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि लघुसंदेश (एसएमएस)पासून सावध रहावे आणि अशा संकेतस्थळावर कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

महाऊर्जामार्फत पीएम-कुसुम घटक-ब योजना राबविण्यात येत असून यामध्ये शेतकऱ्यांना 3, 5 व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येतात. याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 90 टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 95 टक्के अनुदान दिले जाते.

सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो.

महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे चुकीची लिंक पाठविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी शेतकऱ्यांनी अशा खोट्या किंवा फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैशाचा भरणा करू नये. योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या www.mahaurja.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 020-35000450 वर संपर्क साधावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

;राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माणिक भंडगेंनीही राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती…

मुंबई दि. २७ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव राजाराम कुसाळकर व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास शंकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर पक्षप्रवेश केला.

संजीव कुसाळकर व रामदास मोरे यांच्या प्रवेशाने पक्षाला निश्चित बळ मिळेल व पक्षाचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी सहकार्य लाभेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

याशिवाय राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष माणिक भंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नितीन दिंडे यांची कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, कोल्हापूर शहराध्यक्ष आदील फरास, प्रदेश युवक सरचिटणीस अमर पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सौ. भावना नखाते यांची परभणी महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.

हेमंत सालदुरकर यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर इर्शाद जहागिरदार यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव

अयोध्येसाठी प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

मुंबई दिनांक २७ डिसेंबर २०२३

भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केली जात आहे. २२ जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन करून सामान्य नागरिकांना भगवान रामाच्या दर्शनाला घेवुन जाणार आहोत अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, २२ जानेवारी हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस प्रत्येक हिंदूचे स्वप्न पूर्ण होण्याचा आहे. हजारो वर्षांच्या युद्ध विराम देण्याचा आणि साधुसंतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस आहे. विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या मेहनतीचे फळ दिसणारा दिवस आहे. संघ परिवाराने समाजाला जोडण्याचं परिश्रम केले त्याची सांगता आता होते आहे. ज्यावेळी सगळे लोक विरोध करत होते, यात्रा अडवत होते कारसेवकांवर गोळ्या घालत होते, अडवाणीजीना अटक करत होते, मोदीजी प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई करत होते, कल्याण सिंग यांचे सरकार घालवत होते त्यावेळी याची लढाई भारतीय जनता पक्ष लढला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष यांची बैठक २२ आणि २३ तारखेला दिल्लीला झाली. ज्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पक्षाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल अवगत केले. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक राज्यांना केंद्रीय भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यासंबंधी बैठका घेतल्या जात आहेत. कोर कमिटी त्यानंतर निवडणूक संचालन समिती मुंबई स्तरावर स्थापन करून बैठका पूर्ण करून मुंबई पदाधिकाऱ्यांच्या वार्ड स्तरापर्यंत बैठक घेण्याचे लक्ष आम्ही पूर्ण करत आहोत. मुंबईतील सहाही जागा महायुतीमध्ये आम्ही जिंकणार आहोत. जनतेचा आशीर्वाद मा. मोदीजींना आहे. येणाऱ्या काळात २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचं जे एक स्वप्न घेऊन भारत चालला आहे त्यासाठी जनतेकडून आशीर्वाद घेणार आहे. त्याकरिता २०४७ विकसित भारत या संकल्पनेला घेऊन मतदारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.

यातली उपरती आणि पवार साहेबांच्या पक्षाला का होते आहे…?
शरद पवारांना अजून देशाच्या राजकारणातील सामान्य नागरिकांचं मत आणि मन जाणून घ्यायला अजून वेळ लागेल काय? अशा पद्धतीने ते का बोलतात हा माझा प्रश्न आहे. भगवान श्रीरामाचे मंदिर श्रद्धेने झालं पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. त्याची लढाई संघ आणि विश्व हिंदू परिषद लढला आहे. या सोहळ्यामध्ये सगळ्यांना सामावून घ्यायचे आहे. हे भाजप करत आहे. यातली उपरती आणि पवार साहेबांच्या पक्षाला का होते आहे. हा आमचा प्रश्न आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

…यामागे षडयंत्र सुरू आहे.
कंत्राटदार काम करायला आला म्हणून त्याला मारा आणि काम होत नाही म्हणून आदित्य ठाकरे यांनी बोंब मारा ही सोची समजी स्क्रिप्ट आहे. मुंबईकरांसमोर काम होत आहे याला डाग लावण्याचा हा प्रकार आहे. एका बाजूने आदित्य ठाकरे यांनी म्हणायचे की काम होत नाही आणि दुसऱ्या बाजूने कंत्राटदार काम करायला गेला की त्याला मारहाण करायची यामागे षडयंत्र सुरू असल्याचे मला वाटते असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला.

राम मंदिरावरून भाजप राजकारण करतेय की व्यवसाय? शरद पवारांचा सवाल

बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती …

अमरावती –राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता, अशा शब्दांत पवारांनी भाजपाला टोला लगावला. सत्ताधारी भाजपा राम मंदिराच्या नावावरून राजकारण करत आहे की व्यवसाय हे मला माहित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, राम मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे बाळासाहेबांच्या तोंडून ऐकले आहे. मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे. मला राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण नाही. मी मंदिरात जात नाही. मंदिरात जाणे ही व्यतिगत बाब आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज नाही.भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करतंय का, यावर बोलताना शरद पवारांनी भाजपवर टीका केली. ‘ते राजकरण करत आहे की व्यवसाय करत आहे? ते मला माहित नाही, अशी टीका पवारांनी केली. राम मंदिर उभारल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, असे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

शरद पवार म्हणाले की, खासदारांच्या निलंबनाबाबत बोलताना शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. सभागृहातून 146 जणांन निलंबीत केले.काय चूक होती त्यांची. दोन जणं संसदेत घुसले त्यांनी धूराच्या नळकांड्या फोडल्या. ते कसे घुसले याची माहिती सरकारने द्यावी हीच त्याची मागणी होती. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढले. सभागृह चालू असताना बाहेरची लोकं घुसतात याची माहिती घ्यायला नको. ही विनंती केल्यानंतर त्यांनी माहिती तर दिली नाही. संसद कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष चालवू पाहतेय याचा उत्कृष्ट उदाहरण हे आहे. अर्ध्या तासात तीन बिले मंजूर केली. त्याच्यावर चर्चाही नाही.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार – मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही.

महासंघाच्या कॅलेंडर चे दादांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे-अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठी चे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. समाज संघटित करत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प मोलाचा असल्याचे ही चंद्रकांतदादा म्हणाले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर,महासंघाचे
युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , सरचिटणीस गणेश मापारी , युवक सरचिटणीस सचिन वडघुले , अनिकेत भगत
उपाध्यक्ष सुधा पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कसबा अध्यक्ष वैशाली सोनवणे, पर्वती उपाध्यक्ष शुक्रा दुर्गे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतच पण त्याच बरोबर रोजगार मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा, उद्योजक मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत असल्याचे सौ. भाग्यश्री बोरकर यांनी सांगितले.

कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रेनिमित्त दररोज PMPML च्या ७ बसेस

 जादा बसेस आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी भाविकांच्या सोयीसाठी धावणार

पुणे-पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रा निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी मार्ग क्र. २९२-
कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर दि. २९/१२/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ या कालावधीत
आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी २ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
सध्या कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर पीएमपीएमएलच्या दररोज नियमित ५ बसेस दर ३०
मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु असून दिवसभरात एकूण ५८ फेऱ्या होतात. या ५ बसेस व्यतिरिक्त २ जादा बसेसचे नियोजन
दि. २९/१२/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ या कालावधीत आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी
करण्यात आले आहे. सदरच्या २ जादा बसेस भाविकांच्या गर्दीनुसार व आवश्यकतेनुसार धावतील.
तसेच पुणे सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान बसस्थानकावरून बसमार्ग क्र. ६१- कात्रज सर्पोद्यान ते सारोळा (दररोज
५ बसेस), मार्ग क्र. २९३- कात्रज सर्पोद्यान ते सासवड – मार्गे कापूरहोळ (दररोज २ बसेस), मार्ग क्र. २९६- कात्रज सर्पोद्यान
ते विंझर (दररोज ३ बसेस) व मार्ग क्र. २९६अ- कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी (दररोज १ बस) या मार्गावर संचलनात
असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्यापर्यंत जाणेसाठी उपलब्ध आहेत.
तरी कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

विमाननगर हादरले; एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट

पुणे : विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. आगीत तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने घबराट उडाली.विमाननगर भागातील सिंबायोसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारत आहे. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे बांधकाम मजूर राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बांधकाम मजुरांच्या वसाहतीत (लेबर कॅम्प) आग लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटानंतर परिसरात घबराट उडाली. वसाहतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाहतीतील छोट्या घरात जवळपास १०० सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली. आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.रोहन मिथिला इमारतीलगत एका खोलीत जवळपास 100 सिलेंडरचा अवैधरित्या साठा करण्यात आला होता. विमानतळ पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती पाहणी केली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले की, ​​​​​​​ दीपक देवकर यांच्या मोकळ्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्यापैकी सहा सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सिलिंडरचा साठा कोणी केला, याची माहिती घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २७•१२•२०२३ रोजी दुपारी ०२•४० वाजता विमान नगर येथे सिंबायोसिस कॉलेज, रोहन मिथिला इमारतीलगत असणारया होरिझन डेव्हलपर्स, निऑन साईटस् याठिकाणी कामगारांच्या पञ्याच्या शेड असलेली घरे होती. शेजारील एका पञा बांधकामाच्या ठिकाणी सुमारे १०० च्या आसपास घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता. त्याठिकाणी अंदाजे १० ते १२ सिलेंडर फुटल्याने आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत आग अगदी वेळेत विझवल्याने मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणी जखमी नाही. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले तेव्हा ही दोन सिलेंडरचे स्फोट झाले. परंतू सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे.अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व दुपारची वेळ असल्याने तिथे कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने जखमी वा जिवितहानी टळली असून जर ही घटना राञीच्या वेळी घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

देवेंद्र पोटफोडे
मुख्य अग्निशमन अधिकारी
पुणे महानगरपालिका

Story img Loader

दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट, दोन संशयित सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

0

नवी दिल्ली- चाणक्यपुरी परिसरात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्री मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. स्फोटानंतर स्पेशल सेलचं पथक आणि बॉम्बशोधक पथकाने दोन-तीन तास संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. परंतु, सफोटाशी संबंधित कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही. केवळ स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पत्र सापडलं. या पत्रात इस्रायली दूतावासाच्या राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या पत्रात एक झेंडादेखील गुंडाळण्यात आला होता. पोलीस या पत्राच्या अनुषंगानेदेखील तपास जारी आहे.दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं की, दूतावासाजवळ सापडलेल्या पत्रात इस्रायलबद्दल आणि त्यांच्या राजदूतांबद्दल अपमानजनक भाषेत मजकूर लिहिला आहे. हे पत्र टाईप केलेलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. एनएसजी आणि एनआयएची दोन पथकं तसेच दिल्ली पोलीस या दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेप्रकरणी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी दूतावासाजवळच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासलं. त्यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. पोलीस अजूनही इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. ते दोन संशयित कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली अग्निशमन दलाला फोन करून कथित स्फोटाबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमधून स्फोटाचा आवाज आला. आसपासच्या तीन-चार जणांनी हा आवाज ऐकला. हा स्फोट कसला होता याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती अद्याप मिळाली नाही.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

0

मुंबई, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे – २६ डिसेंबर २०२३ पर्यंत, १२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई – १ जानेवारी २०२४, १७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे – ५ जानेवारी २०२४, २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सलीम सारंग यांची उपाध्यक्ष पदी तर संग्राम कोतेपाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड

0

;अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली नियुक्ती

मुंबई दि. २७ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने सलीम सारंग यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर प्रदेश सरचिटणीसपदी संग्राम कोते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

संग्राम कोते-पाटील यांना युवक व विद्यार्थी विभागाच्या प्रदेश समन्वयक पदाची जबाबदारीही यावेळी सोपविण्यात आली.

पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सलीम सारंग आणि संग्राम कोतेपाटील यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

हडपसरची वाहतूक कोंडी: पुणे महापालिका अधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे-काहीच दिवसांपूर्वी हडपसरमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न निकाली लावण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने हडपसर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलली असून, त्यावर तातडीने पर्याय काढण्यासाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व इतर विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शिवसेना पुण्याचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रसाद काटकर व ढवळे तसेच, इतर विविध विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते

हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असून, येथील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळून या परिसरातील IT कंपन्या या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे खूप दिवसांनपासून होत असलेली वाहतूक कोंडी सुरुळीत करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी प्रसाद काटकर यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या समवेत उपस्थितीत विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंढव्यापर्यंत भुयारी मार्ग करण्यात यावा. केशवनगर, मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता अरुंद करण्यात यावा. रस्त्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या व महावितरणचेune) (P पोल व डी. पी बॉक्स यांचे व्यवस्थापन करण्यात यावे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आहे.