Home Blog Page 1288

बांधकामावर काम करताना मजुराचा अपघाती मृत्यू, १५ दिवसांनी बिल्डरवर नाही बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल,अटक नाही

पुणे-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संकुलाचे बांधकाम चालू असताना एका कामगारच्या डोक्यात फळी पडते आणि त्याचा रुगांलायात मृत्यू होतो त्यानंतर याप्रकरणी बांधकाम कंत्राटदारावर १५ दिवसांनी गुन्हा दाखल होतो, अटक होत नाही असा प्रकार पुण्यातच दिसून आला आहे .

पार्वती पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार गणेश पुकळे यांनी तक्रार नोंदवून हा गुन्हा उषा किरण साईट चे कंत्राटदार यांच्यावाव्र दाखल केला आहे . यातही त्यांचे नाव दिलेले नाही आणि आरोपी ला अटक देखील केलेली नाही .दाखल फिर्यादीनुसार दि.१५/१२/२०२३ रोजी साधारण सकाळी १०/३० वा. विजयनगर उदयान, सदाशिव पेठ, पुणे येथे उषा किरण या बांधकाम साईटवरयातील नमुद इसम ऊषा किरण साईटचे कॉन्ट्रक्टर याने विजयनगर उदयान, सदाशिव पेठ पुणे येथे उषा किरण येथील बांधकाम चालु असलेल्या साईटवरील, मजुर कामगारांकडुन काम करवुन घेत असताना, कामगारांचे जिवीताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन त्यांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट इत्यादी योग्य ती साधनसामुग्री पुरविणे आवश्यक असताना, त्यांना तशी कोणतीही सुरक्षित साधने न पुरविता, तसेच उघड्या डक्टवर योग्य ती साधन ठेवण्याची सोय न करता, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे, यातील कामगार सैय्यद अहमद अस्लम खान हा सदर साईटचे कंपाऊडचे पत्रे रिपेयर करत असताना, सदर साईटचे कॉन्ट्रक्टर याने कोणतीही उपाययोजना केली नसलेने तिस-या मजल्यावरील लिफ्ट मधुन एक लाकडी फळी सैय्यद खान याचे डोक्यात पडल्याने, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने, त्याचेवर उपचार चालु असताना, दिनांक २०/१२/२०२३ रोजी सैय्यद खान याचा उपचारदरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पो.उप.निरी. एस.टी. जगदाळे ०२०/२४२२०२०५ तपास करत आहेत . मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .

२६ वर्षीय तरुण कामगाराच्या मृत्यूनंतर २२ दिवसांनी महावितरणच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल, अटक नाही

पुणे- महावितरण चे काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला आणि अन्य ३ कामगार गंभीर भाजले या घटने नंतर तब्बल २२ दिवसांनी सिंहगड रोड पोलिसांनी संबधित कामगार कंत्राटी होते , त्यांच्या कंत्राटदार कंपनीच्या म्हणजे मे.आर्या ट्रान्सकेअर, धायरी, पुणे या कंपनीचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या संचालकांची नावे देण्याचे पोलिसांनी का टाळले असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०८/१२/२०२३ रोजी ०२/३० वा. शिवाजी महाराज पुतळ्या जवळील घुले नगर, वडगाव बुद्रुक, पुणे येथील महावितरणच्या लाईट डी.पी. क्र.४६७७८२६, वडगाव, पुणे येथे सिंहगड रोड पो स्टे अ. मयत रजि. नं. २२२/२०२३, सीआरपीसी १७४ अन्वये मयताचे झाले तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, यातील नमुद मे. आर्या ट्रान्सकेअर, धायरी, पुणे या कंपनीचे संचालक व इतर यांनी त्यांचेकडे काम करणारे कामगार १. सागर शांतप्पा पुजारी २. गड्डेप्पा आप्पासाहेब गुरव ३. सागर प्रेमनाथ शिंदे यांना विद्युत डीपीचे दुरुस्तीचे काम करणेसाठी लागणारी सुरक्षिततेची पर्याप्त साधने न पुरविता, तसेच कामगार काम करीत असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे, अगर कसे याबाबतची खात्री न करता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून, यातील कामगारांना महावितरणच्या लाईट डीपीचे मेंटनन्सचे काम करण्यास सांगुन, ते काम करीत असताना, त्यामध्ये सागर शांतप्पा पुजारी, वय- २६ वर्षे, रा. दबाडी वस्ती, वडगाव-बुद्रुक, पुणे यास शॉक लागल्याने तो गंभीररित्या जखमी होवुन, त्याच्या मृत्युस कंपनीचे संचालक व इतर कारणीभुत होवुन, इतर कामगार १. गड्डेप्पा आप्पासाहेब गुरव २. सागर प्रेमनाथ शिंदे यांचे जीवाला धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहा पोलीस निरीक्षक, दिपक कादबाने ९६२३४५९०९७ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

0

मुंबई, – राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व कार्यालयांमधून मराठी भाषेसंबंधी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिर, कविसंमेलन, नाट्य, घोषवाक्य, अभिवाचन, कथाकथन, पुस्तकांचे रसग्रहण, वादविवाद यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करावे. याशिवाय मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध माध्यमांतून याबाबतचे दृक श्राव्य संदेश प्रसारित करावेत. ग्रंथ प्रदर्शन, दिंडी, पुस्तक भेट देणे, पुस्तक जत्रा, समाजमाध्यमांवर मराठी वाचन कट्टा आदी उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई बुक, ऑनलाईन विक्री, लेखक प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, माहितीपट लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मुंबई मराठी साहित्य संघ आदी साहित्य सस्थांची मदत घेता येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

0

सोलापूर, :- श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53 वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी-शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते, बाळासाहेब भोंगडे, बसवराज शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्स ना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. स्टॉल वरील विविध तंत्रज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री सिध्देश्वर देवस्थान, सोलापूर, कषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 डिसेंबर 2023 ते दिनांक 1 जानेवारी 2024 या कालावधीत या कषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात कृषीशी संबंधित 350 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकरी उत्पादक, महिला बचतगट, कृषीशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध  स्टॉल्स आहेत. सलग 53 वर्षापासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी दिली.

या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी मानले.

‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव’ पुरस्काराचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण

0

सातारा,: ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ पुरस्काराचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्याचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात आला.एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, कायदे सल्लागार दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख आदी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी ॲड. कुंभकोणी यांची निवड योग्य- दिलीप वळसे पाटीलसहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी शासनाच्या विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये योग्य बाजू मांडल्यामुळे शासनाच्या बाजूने निकाल लागले आहेत. त्यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले.बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना स्वर्गीय कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी केली. त्यांनी लावलेल्या वृक्षाचा वटवृक्ष झाला असून यामध्ये इस्माईल साहेब मुल्ला यांचेही मोठे योगदान लाभले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.आशुतोष कुंभकोणी यांच्या निवडीने पुरस्काराची उंची वाढली- मंत्री चंद्रकांतदादा पाटीलॲड. कुंभकोणी यांची इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड होऊन प्रदान होत असल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे,  असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ योजना त्यांच्या शिक्षण संस्थेत सुरू केली. यामुळे मुले स्वाभिमानाने शिक्षण घेऊ लागली. त्याचबरोबर त्यांनी वसतिगृहे निर्माण करून मुलांच्या शिक्षणाबरोबर राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सुमारे चार लाख ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संस्था आशियातील सर्वात मोठी संस्था आहे.ॲड. कुंभकोणी यांच्याकडून पाच लाख रुपयांची देणगीॲड. कुंभकोणी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून रयत शिक्षण संस्थेला पाच लाख रुपयांची देणगीही यावेळी दिली.या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेमधील अधिकारी कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

0

मृत कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई दि. ३१: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

ठाण्यात पोलिसांनी उधळून लावली रेव्ह पार्टी:धाड टाकून 100 जणांना घेतले ताब्यात

0

एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर

ठाणे-ठाण्यात रेव्ह पार्टीत कारवाई करत ठाणे पोलिसांनी धाड टाकून 100 जणांना ताब्यात घेतले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह राज्यात अनेक ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ठाण्यातील ही रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली आहे. तसेच पार्टीत गांजा, चरस ही अमली पदार्थही जप्त करण्यात आली आहेत.घोडबंदर येथील कासारवडवली भागात रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्री युनिट पाचचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पार्टी सुरू झाल्यानंतर पथकाने येथे धाड टाकली. त्यांनी सुमारे 100 तरुणांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आले. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.

ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केलेल्या संयुक्तरित्या कारवाई रेव्ह पार्टीत सुमारे 100 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेले आहे.

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव:कामगार झोपेत असताना कंपनीला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

0

छत्रपती संभाजीनगर-

छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.

वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे कठीण होते, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने स्वतःची सुटका केली. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबरने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितले की, ”काम बंद करून आम्ही मध्यरात्री आम्ही झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पदे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती

0

मुंबई दि. 30:  मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे हेदेखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे देखील सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. राज्यात रेल्वेने 1 लाख 7 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी एकदा ठरवले की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

प्रवाशांची उत्स्फूर्त दाद

जालना –मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनीसुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली.

त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि  उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले . प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले.

या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपूर अशा सात ट्रेन्स धावतील.

‘आई’ धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

0

मुंबई, दि.30 : राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट / पर्यटक निवास ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे, 27 उपहारगृहे असून, निवास व न्याहारी (Bed and Breakfast), महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र (Visitor Centre’s), इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग (IISDA) इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये 6 जागतिक वारसा स्थळे, 850 हून अधिक लेण्या, 400 च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. 1975 मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये केली जाते. रिसॉर्टस आणि पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे.

या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. ही सवलत 01 ते 08 मार्च या कालावधीसाठी वैध असेल. ही सवलत, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल.

ही सवलत एमटीडीसीच्या लिज प्रॉपर्टीजसाठी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटकांना डिस्काऊंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकाच वेळी करता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार एमटीडीसीने राखून ठेवले आहे. हा प्रोमो कोड वापरून एकावेळी फक्त एका कक्षाचे बुकिंग करता येईल. ज्यांच्या नावावर बुकिंग केले जाईल त्या व्यक्तीने चेक-इनच्या वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा, बुकिंगची  पूर्ण रक्कम जमा करावी लागेल.

सर्व क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी, एमटीडीसी आपल्या ‘आई’ (AAI) उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर करत आहे. या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी, लवकरात लवकर https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. एमटीडीकडून ही ऑफर केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील आणि परदेशातील सर्व महिलांसाठी एक खास भेट आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीद्वारे महिला पर्यटकांना करण्यात आले आहे.

‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणाची राज्यात पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल या धोरणाची कार्यवाही करीत आहेत.

पुण्याचे पोलीस उपायुक्त शर्मा आता सीबीआय चे अधिकारी

पुणे – येथील परिमंडला ३ चे पोलीस उप-आयुक्त, सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) येथे बदली झाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करत त्यांचा निरोप समारंभ आज पुणे पोलीस आयुक्तालयात संपन्न झाला .१५ नोव्हेंबर २०२२ रोजी शर्मा यांची पुण्यात उपायुक्तपदावर नियुक्ती झाली होती. २५ डिसेंबर २३ रोजी त्यांची सीबीआय कडे बदली झाली .

यावेळी पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त, परि-०२, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे, विजय मगर, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, रोहीदास पवार, नवनियुक्त मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संभाजी कदम तसेच इतर अधिकारी / अमंलदार उपस्थित होते.
सुहेल शर्मा हे भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) म्हणुन २०१२ रोजी रूजु झाले. त्यांनी चंद्रपुर या जिल्हयातुन आपल्या पोलीस कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, कोल्हापुर, सांगली, मुंबई आणि पुणे शहर येथे उत्कृष्टरित्या कर्तव्य बजावले आहे. २०१६ मध्ये उत्तर (चीन) चे बाजुने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या चढाई करणारे ते पहिले (आय.पी.एस.) अधिकारी देखील आहेत. या साहसा बरोबरच त्यांनी ऑक्सफर्ड या विद्यापीठातुन कायदा व धोरणे यामध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळविली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालया मध्ये दि.१५/११/२०२२ रोजी त्यांनी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, म्हणून कार्यभार स्वीकारला. पोलीस उप-आयुक्त म्हणुन कर्तव्य बजावित असताना, त्यांनी परिमंडळ-०३ मधील संवेदनशील व महत्वाचे गुन्हयाचा तपास उत्कृष्ठपणे करुन, सदर गुन्हे उघडकीस आणणेकामी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांना दि.२५/१२/२०२३ रोजी पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी झालेल्या बदलीवर मोकळीक करण्यात आलेली आहे.

अजितदादा उत्तर द्या :“स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गास” केंद्राचा निधी २० % वरून १० % वर का आणला?

पुणे दि ३० -एकीकडे मेट्रोसाठी आपण फार काही करतो आहे हे दाखविणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गास” केंद्राचा निधी २० % वरून १० % वर का आणला? या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे आवाहन कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले आहे . या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि,’सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असे सांगणाऱ्या सत्ताघिशांचा “पुणे मेट्रो” बाबत चा आकस स्पष्ट होत आहे.
केंद्रातील युपीए प्रणीत डॅा मनमोहनसिंग सरकारने पुणे मेट्रो प्रकल्पाला प्रथम मंजुरी दिल्यानंतर ही तब्बल “३ वर्षे ऊशीरा मंजूरी दिलेल्या नागपूर मेट्रोचे” काम मात्र केंद्रातील मोदी सरकारने प्रथम सुरू करून, पुणेकरांवर ४ वर्षे विलंबाचा व त्यामुळे झालेला अतिरीक्त खर्चाचा भार टाकुन अगोदरच अन्याय केला आहे. त्यात भर म्हणून पुन्हा “स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गास” ठरल्या प्रमाणे केंद्राचा मिळणारा निधी २० % वरून कमी करून १० % वर आणला व मोदी सरकारने नेहमीच्या जुमलेबाजी प्रमाणे घुमजाव करून पुणे मेट्रोसाठी अतिरिक्त कर्ज काढण्याची वेळ आणली. त्यात पुन्हा पुणेकरां विषयी सापत्न भाव ठेवत, पुणे मेट्रोस राज्य सरकारकडून मिळणारा निधी देण्याबाबत ही आखडता हात घेत, पुणे मेट्रोवर व पुणेकरांवर अन्याय करण्याचेच काम केंद्र आणि राज्य सरकारने केले असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड’मध्ये होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा खर्च काही अंशी भरुन काढण्यासाठी तसेच प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होण्यासाठी ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांवर’ मेट्रो साठीचा ‘एक टक्का अधिभार’ राज्य सरकार लावतलआहे.
शहरात मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून नागरिकांकडून या अधिभाराची वसुली मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने कसुन केली जात आहे. ०१ % अधिभारातून जमा झालेली रक्कम “मुद्रांक शुल्क विभागामार्फत” राज्य सरकारच्या तिजोरीत जमा ही होत आहे. ही रक्कम ‘पुणे मेट्रोस’ राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित असताना २०२३ चे वर्ष सरत आले तरीही राज्य सरकारने पुणे मेट्रो’स दिली नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई आणि नागपूर शहरां प्रमाणे पुणे व पिंपरी चिंचवड मध्येही “एक टक्का अधिकार” नागरिकांकडून वसूल करून तो राज्य सरकारकडे जमा होतो. यापैकी राज्य सरकारने मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सु ७३९ कोटी तर नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी २६७ कोटी रुपये हे चालू (२०२३-२४) आर्थिक वर्षात दिलेत. मात्र ‘पुणे मेट्रो’ साठी हक्काची येणे रक्कम राज्य सरकारने वर्ष सरत आले तरी दिलेली नाही, ही निंदनीय बाब आहे.
राज्यातील तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू असताना नागपूर आणि मुंबई शहराला एक न्याय आणि पुणे शहराला एक न्याय असा दुजाभाव राज्य सरकार करत असल्याचा आरोप ही गोपाळ तिवारी यांनी केला.
निधी अभावी पुणे मेट्रोचे काम संथगतीने चालले असल्याचे पालकमंत्र्यांचे निदर्शनास कसे येत नाही (?) राज्य सरकारची पुणे मेट्रोबाबत दुजाभावाची वागणूक बंद करून, येणे-निधी तातडीने द्यावा अशी मागणी ही गोपाळ तिवारी यांनी केली.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या विस्तारित मार्गाच्या खर्चाचा भार, केंद्र सरकारने घुमजाव केल्याने पुणेकरांवरच पडणार आहे. केंद्र सरकारने दहा टक्के रक्कम कमी केल्याने सुमारे ५५० कोटींचा अतिरिक्त खर्च पुणेकरांना सहन करवा लागणार आहे “केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे_फडणवीस व पवारांचे त्रिकुट सरकार” पुण्यावर अन्याय करत आहे.
या बद्दल अवैध ‘त्रिकुट सरकारचा’ निषेध करत असल्याचे ही काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.
विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे वारंवार सांगणाऱ्या अजीत दादा पवारांकडे तिजोरीच्या चाव्या असुनही मोदी – शहा – फडणवीसांपैकी कोणाची परवानगी घ्यावी लागते आहे(?) असा सवाल ही केला आहे.

नागपूर शहर गुन्हेगारांची राजधानी:देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हेगारी वाढते, खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा

पुणे-देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केला. नागपूर शहर हे ‘गुन्हेगारांची राजधानी’ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, आत्ताच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री असताना, राज्य सरकारच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून त्यांची नोंद घेतली जाईल. सध्या त्यांना काय झाले आहे मला समजत नाही. त्यांना अधिकार नाहीत का? असा प्रश्न निर्माण होतो. अजित पवार यांनी यापूर्वी फडणवीस यांच्यावर आरोप करत, नागपूर शहर हे ‘गुन्हेगारांची राजधानी’ असल्याची टीका केली होती. तोच प्रत्यय पुन्हा येत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हेगारी वाढते असे दिसून येत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी यांना शेतकरी प्रश्नांवर आयोजित आक्रोश मोर्चाचे निवेदन देण्यासाठी त्या दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप त्यांच्यासोबत उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, संसदेमधून आम्हाला निलंबित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी, दुष्काळ समस्येमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. सरकारने पाण्याचे नियोजन करण्याची गरज असून पिण्याचे पाणी मिळणे देखील शहरात अवघड बनले आहे. पाणी कपातीचे संकट लोकांसमोर आहे. सरकारने पक्ष , लोक फोडणे हे उद्योग बंद करून केंद्र सरकारने सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. परंतु खोके सरकार असंवेदनशील असून शेतकरी आत्महत्या करत असताना, सत्ताधारी नेते जल्लोषत दिसून येतात हे राज्याचे दुर्दैव आहे .महायुतीतील नेते राज्यात दौरे करत असताना, त्यांनी दुष्काळावर ,नागरिकांच्या समस्येवर बैठका घेऊन त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. राज्य सरकारला धोरणात्मक लकवा झालेला असून कोणत्याही गोष्टीवर निश्चित धोरण व अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटनाचे निमंत्रण अद्याप मला मिळाले नसल्याचे सांगत सुळे म्हणाल्या ,जगात कोणत्याही मंदिरात जाण्यास मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही .ज्यावेळी मला वाटेल त्यावेळी मी मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकते.

पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची वर्णी लावल्याबाबत सुळे म्हणाल्या, कोणत्या अधिकाऱ्यास कोणत्या जागी नेमायचे हा पूर्णता सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे. सरकारने नवे बिल आणले असून देशातील कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅपिंग करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना दिला आहे ही बाब चुकीची असून वैयक्तिक अधिकारांवर गदा आणणारी आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रभाव-कार्यशाळा संपन्न

पुणे-भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR), प्रायोजित सहयोगी प्रकल्प “शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रभाव: बिहार आणि महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांचा अभ्यास” या विषयावर कार्यशाळा 28 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रकल्प संचालक, डॉ. स्नेहा कुमारी, सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापिका आणि डॉ. खेम चंद, प्रमुख शास्त्रज्ञ ICAR-NIAP नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पाच्या निष्कर्षांवर. या कार्यशाळेने शेतकरी, ICAR शास्त्रज्ञ, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, कॉमन सर्व्हिस सेंटर्स, राज्य कृषी विभागाचे अधिकारी, आघाडीचे बँक अधिकारी, बँक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि इतरांसह विविध भागधारकांना एकत्र आणले.

कार्यशाळेची सुरुवात डॉ. स्नेहा कुमारी आणि डॉ. खेम चंद यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने झाली, जिथे त्यांनी संशोधन प्रकल्पाच्या सर्वसमावेशक निष्कर्षांचा अभ्यास केला. या चर्चेमध्ये PMFBY च्या विविध पैलूंचा समावेश करण्यात आला आणि महाराष्ट्रातील विशिष्ट जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर त्याचा काय परिणाम होतो याचा शोध घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे कृषी विस्तार सहसंचालक श्री विनय आवटे यांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. श्री विनय आवटे यांनी PMFBY अंमलबजावणीच्या सद्य स्थितीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक केली, या प्रक्रियेतील यश आणि आव्हाने या दोन्हींवर प्रकाश टाकला. श्री विनय आवटे यांनी आपल्या भाषणात PMFBY च्या अंमलबजावणी दरम्यान आलेल्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सहसंचालकांनी सर्वसमावेशक विहंगावलोकन दिले आणि पिकांच्या नुकसानीपासून शेतकर्‍यांचे संरक्षण करण्यासाठी योजनेची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी सतत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला.

कार्यशाळेने खुल्या संवादाचे व्यासपीठ म्हणून काम केले, ज्यामुळे भागधारकांना विचारांची देवाणघेवाण, अनुभव शेअर करणे आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रभाव वाढविण्याच्या दिशेने एकत्रितपणे कार्य करणे शक्य झाले. या कार्यक्रमातील निष्कर्ष आणि चर्चा चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा आहे.

ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस १५ जानेवारी आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून हाेणार साजरा

0

-महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या प्रयत्नांना यश

मुंबई-
देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस १५ जानेवारी आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे, यासाठी शासनाच्या वतीने खास शासननिर्णय जाहीर करण्यात आला. हा दिन साजरा करून आता देशासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवणाऱ्या खाशाबा यांच्या कार्याचा गाैरव हाेणार आहे. यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने अथक प्रयत्न करण्यात आले. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच शासनानला हा महत्वाचा निर्णय जाहीर करावा लागला. यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने घवघवीत यश मिळाले आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड येथील खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीत पहिले पदक पटकावले हाेेते. हे भारताचे वैयक्तिक गटातील पहिले ऑलिम्पिक पदक ठरले. यामुळे भारतीय संघाच्या नावे पदकाचा बहुमान नाेंदवल्या गेला. खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाला हा माेठा बहुमान मिळाला. यामुळे १५ जानेवारी हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म दिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा हाेणार आहे. यातून निश्चितपणे खाशाबा यांच्या कार्याचा गाैरव केल्यासारखेच आहे. यासाठीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये महाराष्ट्र माॅडर्न पेंन्टाथलाॅन संघटनेचे उपाध्यक्ष अमित गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या वतीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला. अध्यक्षांनी या प्रस्तावाचे समर्थन करत शासन दरबारी शिफारस केली. या वर्षी शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण साेहळ्यात याची घाेषणा करण्यात आली. मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक अविनाश सोलवट यांचे या कार्यामध्ये मोलाचे योगदान ठरले आहे.

खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गाैरव : उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची गाैरवशाली कामगिरी केली आहे. यामुळे आता राज्य क्रीडा दिन साजरा करून राज्यात निश्चितपणे त्यांच्या कार्याचा माेठा गाैरव केला जाणार आहे, अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहास १ लाख रुपये असे एकुण २ लाख २५ हजार सुधारीक अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमीसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले. तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण संमारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात भरीव अनुदान उपलब्ध करुन दिले त्यामुळे यांचे मंत्री बनसोडे यांनी आभार व्यक्त केले.

युवा खेळाडूंसाठी अभिमानास्पद निर्णय :
जागतिक स्तरावर आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून स्व. खाशाबा जाधव यांनी देशासाठी गाैरवशाली कामगिरी केली. त्यांनी पहिले पदक जिंकून देशाला माेठा बहुमान मिळवून दिला. आता त्यांच्या कार्याचा आता राज्य क्रीडा दिनामुळे गाैरव हाेत आहे. हे राज्यातील प्रत्येक युवा खेळाडूंसाठी अभिमानाची गाेष्ट आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पाठबळामुळे हा निर्णय घेतला गेला आहे, हा आमच्यासाठी अभिमान आहे, अशा शब्दात संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी प्रतिक्रीया दिली.