छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव:कामगार झोपेत असताना कंपनीला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

Date:

छत्रपती संभाजीनगर-

छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.

वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे कठीण होते, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने स्वतःची सुटका केली. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबरने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितले की, ”काम बंद करून आम्ही मध्यरात्री आम्ही झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पदे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची २४ तासांत पाहणी करा; कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही – आशिष शेलार

‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेनंतर प्रशासनाला निर्देश; मृत गणेशसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन मुंबई,...

मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

जखमींमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुली; भुलेश्वरमधील आगमन...

चाकणमधील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर ‘ऑन फिल्ड’; १० एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे कार्यान्वित पुणे, दि. २३ ऑगस्ट २०२६ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. वाढत्या औद्योगिक वीजभाराचा विचार करून त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई येथील केंद्राचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर ३३/२२ केव्ही भांबोली उपकेंद्रात अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करून औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला. २२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे.  तसेच, ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त ‘फिडर बे’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली. तर २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.