Home Blog Page 1272

एअर इंडियाचा आभासी यात्रा सहाय्यक (व्हर्च्युअल ट्रॅव्हल असिस्टंट) प्रवाश्यांच्या सेवेसाठी आता व्हॉट्स अॅपवरही

गुरुग्राम भारतातील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य कंपनी  एअर इंडियाने आपल्या प्रवाश्यांना मदत मिळावी म्हणून AI.g, जनरेटिव्ह एआय- संचलित आभासी यात्रा सहाय्यक (व्हर्च्युअल ट्रॅव्हल असिस्टंट) ची उपलब्धता वाढविली असून आता ते व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होईल. व्हॉट्स अॅपवर बहुभाषिक चॅटबॉटच्या अखंड आणि अमर्याद उपलब्धतेने एअर इंडियाला प्रवाश्यांना सहाय्य करण्यासाठी एक नवीन पर्याय खुला करून दिला. या माध्यमातून एअर इंडियाचे  प्रवासी व्हॉट्स अॅपवर यात्रेसंबंधीच्या १३०० पेक्षा जास्त विषयांवर प्रश्न विचारू शकतात. शिवाय त्यांना अनेक सुविधा व फिचर्सही उपलब्ध होतील. आता एअर इंडियाचे प्रवासी व्हॉट्स अॅपवरील चॅटच्या माध्यमातून सहजपणे विमानाची प्रत्यक्ष त्या वेळेची (रिअल टाइम) परिस्थिती आणि सामानाची माहिती मिळवू शकतील. त्याशिवाय आपले बोर्डिंग पास डाऊनलोड करु शकतील किंवा त्यांच्या ई-तिकिटाची प्रत मिळवू शकतील. तसेच जर प्रवाश्यांनी एखाद्या विषयासंदर्भात मदतीची ग्राहक सेवा केंद्राला ऑनलाइन विनंती केली असेल तर त्या विनंतीची नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील त्यांना व्हॉट्स अॅपवरच समजू शकेल आणि ते एअरलाइन च्या ग्राहक सेवा केंद्राला फोन न करता प्रवासासमबंधी अनेक प्रश्न विचारू शकतात.

          एअर इंडियाच्या ग्राहकांची जगभरात वाढत असलेली संख्या पाहता त्यांना मदतीसाठी AI.g हिन्दीइंग्रजीफ्रेंच आणि जर्मन या चार भाषेमध्ये उत्तरे देईल. एयरइंडियाचे अतिथी AI.g बरोबर +९१ ९६६७०३४४४४ या व्हॉट्स अॅप क्रमांकावरुन  संपर्क साधू शकतात.

          एयरइंडियाचे ग्राहक अनुभवचे प्रमुख अधिकारी (चीफ कस्टमर एक्सपिरियंस ऑफिसर) श्री. राजेश डोग्रा याबाबत म्हणाले, “एयरइंडियामध्ये आम्ही आमच्या प्रवाश्यांचा प्रवास अगदी प्रत्येक स्तरावर (प्रत्येक टच पॉइंटवर) सुखकर, आनंददायी आणि सोपा व्हावा म्हणून सातत्याने नवनवीन व कल्पक सेवा सुविधा आणि कल्पना आणित असतो. AI.g च्या आधारे व्हॉट्स अॅपवर सेवा हे आमच्या या वचनबद्धतेचेच प्रमाण आहे. आमच्या ग्राहकांना २४ तासअगदी त्यांच्या हाताच्या बोटावर उपलब्ध होईल इतकी सहजतत्काळ व योग्य माहिती पुरवून सहाय्य करण्याची आणि जेथे जेथे आमचे ग्राहक आहेत तेथे तेथे पोहोचण्याची आमची स्वप्नदृष्टी आहे. व्हॉट्स अॅपची त्वरित व सहज उपलब्धता आणि त्याची व्याप्ती आमच्या या स्वप्नदृष्टीला अत्यंत सुसंगत व पूरक आहे.”

          जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने AI.g ला प्रवासी कोणते प्रश्न विचारतात ते समजून घेणे आणि त्यांना साध्या व जास्त सौहार्दपणे उत्तर देण्यास मदत होईल. ज्या प्रश्नांची उत्तरे AI.g लगेच देऊ नाही अशा प्रश्नांमधून AI.g शिकू शकते. यामुळे AI.g ला नंतर अधिक कार्यक्षम होण्यास मदत होते. याचा अर्थ असा कीआता या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला बुकिंगसामानविमान बदलणे अशा विषयांबाबत प्रश्न असल्यास तुम्हाला स्वयंचलित पद्धतीने अधिक जलद उत्तरे मिळतील. यामुळे एअरइंडियाच्या टीमला गुंतागुंतीचे व जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न हाताळण्यासाठी आणि प्रवाश्यांबरोबर जास्त मूल्यवर्धित संवाद साधण्यासाठी वेळ मिळेल.     

साठ वर्षाच्या ज्येष्ठ खेळाडूला स्पर्धेतून अपमानित करून बाहेर काढले -शहरातील जेष्ठ बॅडमिंटन खेळाडू राजसिंग यांची कैफियत

पुणे: शहरातील ज्येष्ठ नागरिक राजवंत सिंग( राजसिंग) पीडीएमबीए या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या 50 पेक्षा अधिक यावर होतात खेळण्यास मज्जाव केला हे दिनांक आठ जानेवारी रोजी या स्पर्धेत दुपारी चार वाजता जळवा घेऊन यास निघाले खेळाच्या ठिकाणी मैदानावर पोचताच त्यांना स्पर्धेत खेळण्यास मज्जाव करण्यात आला त्यांनी कारण विचारले असता त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात आले.या संदर्भात हवेली तालुका बडमिंटन असोसीएशनने किंवा पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही .


राजसिंगहे हौशी खेळाडू आहेत. गेल्या 48 वर्षापासून त्यांना बॅडमिंटन खेळण्याचा छंद आहे.शीख हेल्पलाईन फाउंडेशनच्या माध्यमातून ते बॅडमिंटनच्या स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करतात अन  स्वतःही देश विदेशात खेळतात. अत्यंत उत्साह आणि निरपेक्ष भावनेने ते या गोष्टी करीत असतात. त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी  देशपातळीवरची स्पर्धा आयोजित केली होती. ती यशस्वी पार पडली. मी पुण्यातील हवेली तालुका बडमिंटन असोसीएशनने पीडीएमबीए (पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेच्या) अधिपत्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला.ते ८जानेवारी रोजी दुपारी ४वाजता पीयासी येथे सर्दीच्या ठिकाणी गेले परंतु त्यांना अपमानित करून तिथून चक्क बाहेर काढण्यात आले.राजसिंग यांना हा अपमान सहन झाला नाही ते, म्हणाले, मी नेमका काय गुन्हा केला आहे? माझा दोष काय आहे ?मला का खेळू दिले जात नाही? केवळ द्वेष आणि आकसापोटी वा माझ्या विषयीच्या इर्षेपोटी तुम्ही मला ही स्पर्धा खेळू देत नाही आसा राग व्यक्त करीत तेथे पोलिसांना पाचारण केले.पोलीस म्हणाले की तुम्ही अडथळा  आणु नका तुम्हाला अटक करू.त्यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले की माझा अपमान झाला आहे. मी जागतिक दर्जाचा ज्येष्ठ खेळाडू असताना मला विनाकारण अपमानित केले त्यामुळे मी संघटनेवर बदनामीचा दावा करणार असल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्त रीतेशकुमार ट्विटर वर पाठवले व  डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दखल केला.


 काय म्हणाले राजसिंग ,’ साहेब , माझे जगामध्ये सहावे रँकिंग

आयोजकांनी मला कोणतेही कारण न देता तिथून चक्क हाकलून दिले. मी वयाच्या 13 वर्षापासून या शहरात बॅडमिंटन खेळतो आहे.आज 48 वर्षे झाली. आम्ही बॅडमिंटन हा खेळ फक्त खेळत नाही तर शहरात रुजवला. अनेक औषध खेळाडू आम्ही तयार केले शहरासाठी माझे फार मोठे नाही परंतु खारीचा वाटा या खेळामध्ये आहे. मी हौशी ज्येष्ठ खेळाडू आहे माझे जगामध्ये सहावे रँकिंग आहे. मी जगातील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत असतो. विमानाने जातो स्वतः फीस भरून अनेक स्पर्धा तिथे खेळतो. मागच्याच वर्षी मी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले.मी गरीब खेळाडूंना मदतही करतो हे सांगण्याचा उद्देश असा की मी निरपेक्षपणे समाजसेवा आणि खेळ असे दोन्ही गोष्टी करत असतो जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी जाऊन जात असतो अशावेळी माझ्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूचा अपमान करण्याचा यांचा काय उद्देश आहे यापुढे यामुळे मी अतिशय व्यतीत झालो आहे.

मुंबई शहर जिल्ह्याचा ५२० कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मंजुरी – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 – सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्याच्या एकूण 520.07 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 500 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 20 कोटी रुपये प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री सदा सरवणकर, सचिन अहीर, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, कॅ.तमिल सेल्वन, सुनील शिंदे, अजय चौधरी, डॉ. मनीषा कायंदे यांच्यासह समिती सदस्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर तसेच संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले, मुंबई हे राजधानीचे तसेच जागतिक दर्जाचे शहर आहे. येथील सर्व कामे दर्जेदार आणि कालबद्ध रितीने पूर्ण करावीत. मुंबई शहरात कोळीवाड्यांच्या विकासाची तसेच सौंदर्यीकरणाची कामे, कामगार कल्याण केंद्रांचे अद्ययावतीकरण, रुग्णालयांचे बळकटीकरण, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, शहराचे सौंदर्यीकरण आदींसह विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. हाजी अली दर्गा तसेच विविध मंदिर परिसरांचा विकास आणि सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहेत.

जिल्ह्याच्या विकास कार्यामध्ये महत्त्वपूर्ण बाबींसाठी यावर्षी 135 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, रुग्णालयांसाठी औषधे, साहित्य  आणि साधनसामग्री खरेदी, रुग्णालयांचे बांधकाम, विस्तारीकरण, देखभाल, शासकीय महाविद्यालयांचा विकास, महिला सबलीकरण व बालकांचा विकास, मच्छिमार सहकारी संस्थांना सहाय्य, लहान बंदरांचा विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉपचे बांधकाम, समाजसेवा शिबिर भरविणे, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, पोलीस वसाहतींसाठी पायाभूत सुविधा पुरविणे आणि क्लोज सर्किट टेलिव्हिजन संनियंत्रण यंत्रणा उभारणे, सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा, गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारकांचे जतन, विविध नाविन्यपूर्ण योजना, अपारंपरिक ऊर्जा विकास आदी बाबींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. हा वाढीव नियतव्यय मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री  श्री. केसरकर यांनी सांगितले.

या बैठकीत मुंबई जिल्ह्याच्या सन 2023-24 अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांच्या माहे डिसेंबर 2023 अखेर देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व झालेला खर्चाचा आढावा आणि सन 2024-25 मध्ये राबवावयाच्या विविध योजना, हाती घ्यावयाची वैशिष्ट्यपूर्ण कामे व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण मुंबईचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत मान्यता दिलेली सर्व कामे योग्य नियोजन करून मार्च अखेरीस पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी दिले. 

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या, त्यानुसार संबंधित विभागांनी बैठकीत करण्यात आलेल्या मुद्यांची दखल घेऊन विनाविलंब कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी दिले.

पर्णवी, शरयू, अरुंधती तिसऱ्या फेरीत

पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे: पर्णवी मोहळकर, शरयू रांजणे, अरुंधती कंवर यांनी अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १५ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत पर्णवीने समीक्षा दोडकेवर २१-१८, २१-१८ असा, शरयूने सानिका बागळेवर २१-४, २१-७ असा विजय मिळवला. अरुंधतीने दर्शना माळीवर २१-५, २१-१० अशी, तर पदमश्री पिल्लईने शर्वरी वरवंटकरवर २१-१४, २१-८ अशी मात केली. सोयरा शेलारने चारुता गोडबोलेचा २१-६, २१-६ असा, तर मौसम पाटीलने अनन्या माळूनजकरचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला.

निकाल – दुसरी फेरी – १५ वर्षांखालील मुली – शर्वरी सुरवसे वि. वि. सनाया सहस्त्रबुद्धे २१-२, २१-०; श्रावणी अरडे वि. वि. स्पृहा गाडगीळ २१-११, २१-९; श्रेया जोशी वि. वि. आद्या बाग्रेचा १९-२१, २१-१४, २१-१७; शिवानी मासळेकर वि. वि. शताक्षी देशपांडे २१-९, २१-९; 
१५ वर्षांखालील मुले – कपिल जगदाळे वि. वि. मोहित सिंह २१-२, २१-१; अतिश अगरवाल वि. वि. आरव नगरकर २१-१४, ८-२१, २१-१७; राघवेंद्र कमलेश यादव वि. वि. रोहन सायंकर २१-१५, २१-७; आरव राय वि. वि. मिहिर कोकीळ १९-२१, २१-१४, २३-२१; अवांश यारागट्टी वि. वि. खूश दीक्षित २१-१५, २१-१०; आरुष अरोरा वि. वि. सुमीत अन्ने २१-९, २१-३; अवनीश बांगर वि वि. शार्दूल दुर्गे २१-११, २१-१०; स्वरित सातपुते वि. वि. अनिकेत भट २१-१०, २१-८; तनीष्क अडे वि. वि. अद्वय देशमुख २१-११, २१-५; रेहान सय्यद वि. वि. नचिकेत गोखले २१-९, २१-७.
१७ वर्षांखालील मुले – वरद लांडगे वि. वि. तनीष दरपे २१-१५, २१-१३; सोहम धामे वि. वि. अमोघ काळे २१-९, २१-१२; अवधूत कदम वि. वि. आर्यन बारवकर २१-११, २१-९; श्लोक डागा वि. वि. चैतन्य परांडेकर २१-१४, २१-१२; नितीन एस. वि. वि. आदित्य तनपुरे २१-७, २१-७; सुदीप खोराटे वि. वि. ईसान मुदगल २१-१०, २१-१५; ओजस जोशी वि. वि. भार्गव क्षीरसागर २१-१, २१-२; चिन्मय फणसे वि. वि. ईशान आगाशे २१-४, २१-९; राघवेंद्र यादव वि. वि. अर्हम बाफना २१-८, २१-७.

१०० व्या मराठी नाट्य नाट्यसंमेलनात ‘जोडी तुझी माझी’ ही रंगतदार मुलाखत

पुणे (दि. ९ जानेवारी २०२४) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ऐतिहासिक १०० व्या नाट्य संमेलनात रविवारी ग. दि. मा.नाट्यगृह येथे ज्येष्ठ अभिनेते व लेखक संजय मोने, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने तसेच झिम्मा या चित्रपटामुळे चर्चेत आलेली जोडी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती व अभिनेत्री क्षिति जोग या दोन जोड्यांचा समावेश असणारा मुलाखतीचा कार्यक्रम रंगतदार झाला. मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
अभिनेते संजय मोने यांच्या बेधडक आणि उत्स्फूर्त उत्तरांनी मुलाखतीत अधिक रंगत आणली. मराठी भाषा आणि मराठी नाटक याविषयी चिंतन मांडताना मोने यांनी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. चांगली संहिता, चांगले दिग्दर्शन, चांगले कलाकार आणि प्रेक्षकांची उत्तम जाण. यावरच भविष्यकाळातील नाटक अवलंबून असल्याचे मोने यांनी सांगितले.
क्षिति जोग यांनी आजी शांताबाई जोग यांच्या पासूनचा अभिनयाचा वारसा उलघडताना अनेक घटना प्रसंग आणि आठवणी सांगितल्या.
सुकन्या कुलकर्णी यांनी संजय मोने यांचा कलंदरपणा, अगदी मध्यरात्री प्रपोज करणे. अगदी स्त्रियांच्या कपड्यात वावरणे अशा आठवणी जागवल्या. तसेच दोन वेळा झालेला अपघात, त्यातून खंबीरपणे केलेली वाटचाल, अपंगत्वावर मात करून वयाच्या पन्नासाव्या वर्षी भरत नाट्यममधील अरंगेत्रम पूर्ण केल्याचे सांगितले. नाटकाबरोबरच चित्रपटातील भूमिका आणि एकमेकांच्या नात्यातील नाजूक बंध त्यांनी उघडले. हेमंत ढोमे यांनी कलेचा कसलाही वारसा नसताना केलेली वाटचाल आणि त्यातून मिळालेले यश उलगडताना झिम्मा चित्रपटाचे काही अनुभव सांगितले. तसेच एकाच क्षेत्रातील पति, पत्नी असतील तर त्याचा लाभ दोघांनाही होतो. एकमेकांच्या गरजा कळतात असे मत मांडले आणि व क्षितीच्या मदतीचे काही किस्से त्यांनी सांगितले. दोन्ही जोड्यांच्या एकमेकांच्या आठवणी, उत्स्फूर्तपणे केलेली मार्मिक टिप्पणी, यामुळे प्रेक्षक हास्यरसात चिंब झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाट्यपरिषदेच्या वतीने समीर हंपी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा-२०२४’ स्पर्धेचा निकाल जाहीर

भारती विद्यापीठ आयएमईडी कडून आयोजन

पुणे :

भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२४’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या स्पर्धेचे दि.९ जानेवारी २०२४ रोजी आयएमईडी, एरंडवणे,पौड रस्ता,पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. एकूण १२१ स्पर्धकांनी भाग घेतला.

नंदिनी रविशंकर ला प्रथम क्रमांक मिळाला. प्रणाली पाटील आणि पराग बडकीरे यांना विभागून द्वितीय क्रमांक मिळाला.अपर्णा पटले आणि देवांशी सिंगला विभागून तृतीय क्रमांक मिळाला.प्रसिद्ध हास्यकलाकार,निवेदक बंडा जोशी यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उप प्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. रेशु अगरवाल आणि श्रीमती रुमा यांनी परीक्षण केले.

या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकास रुपये बारा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.

‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन ’, ‘पत्रकारिता -सामाजिक प्रबोधन ’, ‘ आजचे राजकारण आणि समाज ‘, ‘ सोशल मीडिया -संधी की समस्या’, ‘कामाचे स्वरूप आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स’, ‘ व्यायाम -शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली ‘, ‘ हवामान बदल -शाश्वत पद्धतीची निकड ‘, ‘ युद्ध -प्रगती की अधोगती ‘हे स्पर्धेचे विषय होते.

या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात डॉ.हेमचंद्र पाडळीकर, डॉ.प्रमोद पवार, डॉ.सचिन आयरेकर,डॉ. विजय फाळके, डॉ.हेमा मिरजी,उदय देसाई, प्रतिमा गुंड यांचा समावेश होता.

वासवानी उड्डाणपूल पाडण्याबाबत बैठकीत चर्चा

पुणे:वेगाने विस्तारलेल्या पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप सारख्या संकल्पनेतून हे उद्दिष्ट कसे गाठता येईल,याबाबत पुण्यातील कॉर्पोरेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत सोमवारी अनौपचारिक बैठक पार पडली.पुणे शहरातील विविध प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा झाली.

प्रसिद्ध उद्योगपती योहान पूनावाला यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस मिशेल पूनावाला, उद्योगपती फिरोज पद्मजी, विशाल चोरडिया, डॉ. परवेझ के. ग्रांट, जहांगीर जहांगीर ,भाजप प्रवक्ते अली दारूवाला,एड. श्रेयस आद्यन्तया यांच्यासह विक्रम कुमार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

पुण्यातील वाहतूक, विमानतळाची क्षमता वाढवणे, पाणीपुरवठा, स्वच्छता, नदीकाठ सुधारणा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. शहरासाठी मोठे विमानतळ नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यावर सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाऊस) यांना जोडणारा साधू वासवानी उड्डाण पूल पाडल्यानंतरही या परिसरातील वाहतूक विस्कळित होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी तात्पुरता एकेरी लोखंडी उड्डाण पूल उभारण्याबाबत विचार होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

उड्डाण पूल पाडल्यानंतर वाहतुकीवर काय परिणाम होणार यावरून कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली.विक्रम कुमार यांनी सांगितले, की हा पूल धोकादायक झाल्याने तो पाडणे आवश्यक आहे, पण त्यामुळे वाहतूक विस्कळित न होता विविध पर्यायी मार्गांवर विचार सुरू आहे. पुलाचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यावरही आमचा भर राहणार आहे. याशिवाय तात्पुरता लोखंडी उड्डाण पूल उभारण्याची सूचनाही पुढे आली असून त्यावरही आम्ही विचार करू.

शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम:योहान पूनावाला

पुणे शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा. पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढावा, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी शहरातील उद्योजक प्रशासनाला मदत करतील. ही मदत आर्थिक, सल्लागार अशा विविध स्वरूपात असेल. त्यासाठी उद्योजकांचा फोरम काम करेल. पुण्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविणे हा यामागील हेतू असल्याचे उद्योगपती योहान पूनावाला यांनी सांगितले.वाढत असलेल्या पुणे शहराचे योग्य नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर उद्योजकांच्या मदतीने मार्ग काढण्यासाठी या फोरमच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे अली दारूवाला यांनी सांगितले.

ठेकेदारांसाठी निधीवर डल्ला-अधिकाऱ्यांना मारहाण करणारे टेम्पररी आमदार धंगेकर म्हणजे हवेने भरलेला फुगा आणि एक मुंगेरीलाल – धीरज घाटे

0

पुणे -कसब्यातील टेम्पररी आमदार धंगेकर म्हणजे एक हवा भरलेला फुगा आहे,ज्या मुंगेरीलालला आता लोकसभेचीही स्वप्ने पडू लागली आहेत,त्यांनी कायम महापालिकेच्या निधीवर तसेच राज्याच्या निधीवर केवळ आपल्याभोवताल च्या ठेकेदारांसाठी डल्ला मारण्याचे कृत्ये केली,अधिकाऱ्यांना मारहाण केली त्यांना कोथरूड गुन्हेगारीग्रस्त असून भय मुक्त करा असे म्हणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून पोलीस आणि भाजपा ने कोथरूड मध्ये सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या चांगले वातावरण ठेवण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न केला आहे.असे येथे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले आहे.

भयमुक्त कोथरूड’ बनवा,अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात केली होती यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त यांची भेट घेत त्यांच्याकडेही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन सोमवारी (ता. ८) दिले.यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले,गेल्या काही वर्षांत या भागात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे कोथरूड अशांत बनले आहे.गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत.त्यांच्यातील गँगवॉर याआधी पुणेकरांनी अनुभवलेले आहे.त्यातच गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला आहे.त्यामुळे सामान्य जनता चिंतेत आहे.असा आरोप केला होता त्यावर घाटे यांनी तीव्र ताशेरे ओढले.

काँग्रेसचे हे टेम्पररी आमदार यांच्या भोवती जनता कधी नसते तर हे कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे आहेत ज्यांनी आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलताना पुढे म्हणाले की ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही गुन्हेगारी मुक्त भयमुक्त वातावरण या साठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात ते हवे ने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही त्यांनी कोथरूड ची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांतदादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही’ या पत्रकार परिषदेला सरचिटणीस रवींद्र साळेगावकर,पुनीत जोशी वर्षा तापकीर संजय मयेकर पुष्कर तुळजापूरकर हेमंत लेले आदी उपस्थित होते.

‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला आयोजन-मुरलीधर मोहोळ

लाखो पुणेकर रामभक्तांना घेता येणार रामकथेचा आस्वाद
पुणे, ता. ९ : अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर, निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे. याच आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी १८, १९ व २० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत, अमोघ वाणीत श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राममंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे.  १८ जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून, कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून, पुणेकर नागरिक, राम भक्तांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.”
“कार्यक्रमात येणाऱ्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असून, ८०-९० हजार लोकांची आसनव्यवस्था केली जाणार आहे. त्यामध्ये भारतीय बैठक व खुर्च्या असणार आहेत. नागरिकांची प्रवासाची, पार्किंगची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. फिरते शौचालय, प्रथमोपचार, अग्निशामकदल, पाण्याची सुविधा येणाऱ्या नागरिकांसाठी उपल्बध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे,” असे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

 मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त, सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, नेमकं प्रकरण काय?

मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपकरत जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेवर कारवाई केली आहे. मनसेने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून मनसेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकेशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा आणि पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल.

संदीप देशपांडे म्हणाले…
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी पक्षाची भूमिका मांडली आहे. संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी फोनवरून बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, महेश जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे नव्हतो. परंतु, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमित ठाकरेंकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. कामगारांची फसवणूक करणे, कामगारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे यांनी बोलावलं होतं. परंतु, जाधव काही कामगारांना घेऊन तिथे गेले आणि अमित ठाकरे यांना उलटसुलट उत्तरं देऊ लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सैनिक संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्ह्यातील नगरपरिषदांची देश पातळीवर सर्वोच्च कामगिरी

सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

पुणे दि. ९: गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (एमओएचयुए) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोच्च कामगिरी केली आहे. यामध्ये सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.

सासवड व लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा ४.० मध्ये राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट जिल्हा व सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर कामगिरीमध्ये सातत्य राखून जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.

सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती. त्याअंतर्गत घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, ४० ते ५० टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात १८ ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

लोणावळा नगरपरिषदेनेही सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केला. घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, शहरातील ४० ते ५० सांडपाण्याचा पुर्नवापर, शहरात रिड्यूस, रियूज, रिसायकल (आरआरआर) केंद्राची स्थापना करुन २ टन इतक्या वस्तू १ हजार १०० पेक्षा जास्त लोकांकडून जमा केल्या व त्यातील १.५ टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या.

गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील लोणावळा, सासवड, बारामती आणि इंदापूर शहरांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले होते.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी: स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेने विशेष मेहनत घेऊन नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्यामुळे तसेच नागरीकांना सहभागी करुन घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदाही आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत.
0000

पूना गेस्ट हाऊस हे पुण्याचे  वैभव-प्रख्यात अभिनेते अजिंक्य देव

भारतीय टपाल विभागाकडून पूना गेस्ट हाऊसचे टपाल तिकीट छापण्यात आल्याबद्दल सरपोतदार कुटुंबीयांचा सन्मान
पुणे: गेल्या ९० वर्षाहून अधिक काळ पूना गेस्ट हाऊस हे केवळ मराठी चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसाठीच नव्हे तर प्रत्येक कलाप्रेमी पुणेकरांसाठी आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे जिव्हाळ्याचे स्थान आहे. पुण्यातील अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळाप्रमाणेच पूना गेस्ट हाऊस हे पुण्याचे वैभव आहे, अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.

पूना गेस्ट हाऊस च्या योगदानासाठी भारतीय टपाल विभागाकडून पूना गेस्ट हाऊसचे टपाल तिकीट छापण्यात आले आहे. यानिमित्त पूना गेस्ट हाऊसच्या सरपोतदार कुटुंबीयांचा सत्कार मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अजिंक्य देव यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 
राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर, दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार, सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप, सिटी पोस्टचे प्रमुख रामचंद्र जायभाय, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित विनायक कदम राजेश गिरे गणेश गिरे यावेळी उपस्थित होते.

अजिंक्य देव म्हणाले, माझे वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांच्याबरोबर या ठिकाणी मी लहानपणापासून येत आहे, पूना गेस्ट हाऊस ने केवळ व्यवसाय केला  नाही, तर माणसे जोडण्याचे काम केले, त्यामुळेच येथील माणसांचे आणि वास्तूचे सर्वसामान्यांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. पूना गेस्ट हाऊसचे स्थान हे केवळ खाद्य व्यवसायातच नव्हे तर सांस्कृतिक आणि चित्रपटसृष्टीतही महत्त्वाचे आहे.

सौरभ गाडगीळ म्हणाले,  पूना गेस्ट हाऊस च्या नावाने टपाल तिकीट तयार होणे,  ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असे अनेकदा म्हटले जाते परंतु  सरपोतदार कुटुंबीयांनी गेल्या ९० वर्षांपासून हॉटेल व्यवसायांमध्ये केलेली प्रगती आणि त्यातून सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ पाहता हे विधान चुकीचे आहे, असे म्हणावे लागेल. सरपोतदार कुटुंबीयांप्रमाणे आपुलकी, जिव्हाळा आणि सचोटी असेल तर मराठी माणूस निश्चितच कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

विजय कुवळेकर म्हणाले, संगीतामध्ये ज्याप्रमाणे एखादे घराणे असते त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायामध्ये सरपोतदार हे महत्त्वाचे घराणे आहे. या घराण्याने केवळ मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केली नाही तर ज्या ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या आयुष्याच्या उतरत्या काळामध्ये कोणताही आधार राहिला नाही, अशा कलाकारांची ही काळजी घेतली. पूना गेस्ट हाऊस हे केवळ एक हॉटेल नाही तर मराठी कलाकारांचे माहेरघर आहे. मराठी चित्रपट सृष्टीची आणि नाट्यसृष्टीतील जडणघडणीत या वास्तूचे मोठे योगदान आहे.

माधव जगताप म्हणाले, खाद्य व्यवसायामध्ये ९० वर्षे अविरतपणे पुणेकरांची सेवा केल्याचे फळ पूना गेस्ट हाऊसला टपाल तिकिटाच्या रूपाने मिळाले आहे. पूना गेस्ट हाऊस या मानाचे मानकरी सुद्धा आहेत. सर्वसामान्य ग्राहकांशी असलेल्या नात्याचे आणि कामाचा दर्जा टिकवून ठेवल्यामुळे पुना गेस्ट हाऊसचे  स्थान प्रत्येकाच्या मनात कायम आहे.

मितेश गट्टे म्हणाले, पुण्याची खाद्य संस्कृती केवळ महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पूना गेस्ट  हाऊसने केले आहे. मराठी पदार्थांना कायम मानाचे स्थान त्यांनी आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा मिळवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी निश्चितच हॉटेल आणि इतर व्यवसाय केले पाहिजे.

प्रवीण कुमार पाटील म्हणाले, पूना गेस्ट हाऊस ही केवळ एक वास्तू नाही तर पुण्याची सांस्कृतिक ओळख आहे. त्यांनी या क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही तर माणसे जोडण्याचे साधन म्हणून पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला भरभराट आली आहे. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे लोकसभा कॉंग्रेसच्या सुधारित यादीत आता २० इच्छुक :मोहन जोशींसह अन्य नावांचा समावेश

पुणे- पक्षात उमेदवारी अर्जाची यादी होतानाच मतभेद स्पष्ट होऊ लागल्यानंतर आता सही शिक्क्यानिशी २० इच्छुक उमेदवारांच्या नावाची यादी संगीता तिवारी यांनी पाठविली आहे. यापूर्वी शहर अध्याक्ष्यांनी मोहन जोशी यांचा अर्ज आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले होते. मात्र आता सुधारित यादीत मोहन जोशी यांच्या नावासह अन्य काही नावांचा समावेश करून १४ ची यादी २० वर पोहोचली आहे. ती पुढील प्रमाणे

३४ पुणे लोकसभा मतदार संघ ईच्छूक उमेदवारांची यादी

१श्री. अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस)
२श्री. बाळासाहेब शिवरकर (माजी मंत्री)
3श्री. रविंद्र धंगेकर (आमदार)
४श्री. मोहन जोशी
५श्री. अभय छाजेड (सरचिटणीस, म.प्र.काँ.क.)
६श्री. अनंत गाडगीळ (माजी आमदार)
७श्रीमती. दिप्ती चवधरी (माजी आमदार)
८श्री. संजय बालगुडे
९श्री. आबा बागुल (माजी उपमहापौर)
१०श्री. दत्ता बहिरट
११श्री. गोपाळ तिवारी (प्रवक्ते, म.प्र.काँ.क.)
१२श्री. वीरेंद्र किराड
१३श्रीमती. संगीता तिवारी (उपाध्यक्ष, म.प्र.म.काँ.क.)
१४श्री. नरेंद्र व्यवहारे
१५श्री. यशराज पारखी (प्रदेश प्रतिनिधी)
१६श्री. मुकेश धिवार
१७श्री. राजू नागेंद्र कांबळे
१८श्री. मनोज पवार
१९श्री. संग्राम खोपडे (आर. जे.)
२०श्री. दिग्विजय जेधे

डेक्कन परिसरात सव्वा कोटींच्या विकास कामांना प्रारंभ-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे :आमदार विशेष निधीतून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भांडारकर रोड, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना परिसर येथे १ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विकास कामांना आज सोमवारी सुरुवात करण्यात आली.

या भागातील ड्रेनेज लाईन विकसित करणे, रस्ते डांबरी करणे यासाठी हा निधी खर्च केला जाणार असून या कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे,असे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले.
या परिसरातील नागरिक माझे वडील नगरसेवक असल्यापासून आमच्याआणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. मी नगरसेवक असताना सुद्धा याठिकाणी बरीच विकास कामे मला करता आली याचा आनंद आहे. या भागातील नागरिकांनी ही कामे मला करण्याची संधी दिल्याबद्दल मी नेहमीच त्यांच्या विषयी कृतज्ञ राहील, अशी भावना आ.शिरोळे यांनी व्यक्त केली.

माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार अनेक विकासाची कामे करत आहे आणि यापुढेही विकासाची गंगा अशीच पुढे सुरू राहील असा विश्वास आ.शिरोळे यांनी व्यक्त केला.

यावेळी संयोजक सुनील पांडे (लोहगांवकर), रविंद्र साळेगावकर, गणेश बगाडे, अभिजीत मोडक, समीर हलंदे,रमेश गिरमकर, निलेश घोडके,योगेश जोगळेकर, दशरथ कदम, जोंधळे,मिलिंद टकले, हर्षल मोरे,नरेंद्र उर्फ नाना मोरे, अपूर्व सोनटक्के, दत्तात्रय फंड,श्रीधर खांडेकर, दिलीप हर्डीकर, सिद्धार्थ भोंडे, बाळा गिराम, राशिकर करमकर, मिलिंद जोगदंड, सचिन वाडेकर, अपर्णाताई कुऱ्हाडे, अनिल भिसे, राजेश नायडू, सुजित गोटेकर, रविराज यादव, रोहित लींबोळे,सुरेश उर्फ काका धर्मावत, मुकेश राठोड, ॲड. दिलीप आठवले,किशोर गोडबोले, राजेंद्र जोगळेकर, डॉ. संजीव दातार,दिनेश बर्वे, विद्याताई भोपटकर, विलास राठोड, राजकुमारी जैन, अभयसिंह धाडवे पाटील, निरंजन गोडबोले, संग्राम चाफेकर,जालिंदरनाथ मोरे, विजयकुमार सिंग तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या नावांच्या यादीत आबा बागुलांच्या सह १४ जण-मोहन जोशींचा अर्ज,शहराध्यक्षांना ओव्हरटेक करून प्रदेशाध्यक्षांकडे मात्र व्हाया पुणे कॉंग्रेसच

पुणे-पडलेल्यांना पुन्हा पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी मागणी करत आता पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली असून लोकमत ज्याच्या पाठीशी ज्याला कधीही जनतेने डावलले नाही अशा उमेदवारांचा विचार व्हावा असे म्हटले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज पुणे लोकसभेसाठी इच्चुकांच्याकडून अर्ज मागविले त्यात त्यांच्या स्वताच्या अर्जासह,एकूण १४ जणांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज दिल्याचे म्हटले आहे.मात्र त्यात मोहन जोशी यांचे नाव नाही,त्यांनी रीतसर शहर अध्यक्ष यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज दाखल करायला हवा तो केलेला नाही तर याबाबत मोहन जोशींना विचारता आपण लोकसभेसाठी इच्छुक आहोत आणि शहर कार्यालयात अर्ज देखील दिल्याचे त्यांनी म्हटले.मात्र त्यांच्याकडे अर्जाची पोहोच मागितली असता त्यांनी दिलेल्या फोटो कॉपीवरून जोशी यांनी प्रदेश अध्यक्ष यांच्या नावे शहर कार्यालयात अर्ज देऊन उमेदवारी मागितली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहर कॉंग्रेसने उमेदवारी साठी इच्छुक म्हणून अर्ज दिलेल्यांमध्ये खालील १४ नावांचा समावेश आहे.

१ श्री.अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस)
२ श्री. बाळासाहेब शिवरकर (माजी मंत्री)
३श्री. रविंद्र धंगेकर (आमदार)
४ श्री. अभय छाजेड (सरचिटणीस, म.प्र.काँ.क.)
५ श्री. अनंत गाडगीळ (माजी आमदार)
६ श्रीमती. दिप्ती चवधरी (माजी आमदार)
७श्री. आबा बागुल (माजी उपमहापौर)
८श्री. गोपाळ तिवारी (प्रवक्ते, म.प्र.काँ.क.)
९श्रीमती. संगीता तिवारी (उपाध्यक्ष, म.प्र.म.काँ.क.)
१०श्री. यशराज पारखी (प्रदेश प्रतिनिधी)
११श्री. मुकेश धिवार
१२श्री. राजू नागेंद्र कांबळे
१३श्री. मनोज पवार
१४श्री. संग्राम खोपडे (आर. जे.)

मोहन जोशींचा अर्ज,शहराध्यक्षांना ओव्हरटेक करून प्रदेशाध्यक्षांकडे मात्र व्हाया पुणे कॉंग्रेसच

दरम्यान माजी आमदार आणि निष्ठावंत म्हणून ख्याती असलेले कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी तसेच माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी देखील लोकसभेसाठी उमेदवारी मागणारा अर्ज प्रदेश अध्यक्ष यांच्या नावे दिला आहे. मात्र हा अर्ज शहर कॉंग्रेसच्या कार्यालयातच दिल्याचे स्पष्ट दिसते आहे.