Home Blog Page 1269

पुण्यातून श्रीनाथ भिमालेंनी पाठविले पंतप्रधान मोदींना पत्र

पुणे-आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणारे पत्र पुण्यातून भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे.

या पत्रात भिमाले यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांकरिता एक आनंदाची बातमी म्हणजेच आयोध्येमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भगवान श्री राम विराजमान होणार आहेत. याकरिता प्रत्येक भारतीय अगदी मनापासून आतुर झालेला आहे. आपण सर्वजण अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभ प्रसंगाजवळ येत आहोत. २२ जानेवारी २०२४ रोजी सुमारे ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संपूर्ण भारत देशात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. जसे काही दिवाळी सारखाच प्रत्येक भारतीय हा सन साजरा करणार आहे. मी तुम्हाला विनंती करू इच्छितो कि २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा विचार करावा, सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याने नागरिकांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होऊन सर्व नागरिक श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त साजरे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
मला संपूर्ण विश्वास आहे की, आपण या विनंतीचा व आपल्या देशभरातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ही नम्र विनंती आहे. असे भिमाले यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

कॉंग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा! भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचा आरोप

पुणे-संपूर्ण भारतवासीयांचे श्रद्धास्थान आणि भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली हिंदुविरोधी मानसिकता उघड केली असून कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान केला आहे अशा शब्दात भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढविला. मुस्लिम अनुनयाचा वारसा घेऊन हिंदुद्वेषाच्या राजकारणापोटी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाची थट्टा करणाऱ्या व निमंत्रण नाकारणाऱ्या कॉंग्रेसला येत्या निवडणुकीत जनता नाकारेल असा इशाराही त्यांनी दिला.
कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारून हिंदुविरोधी राजकारणाचा आपला अजेंडा उघड केला आहे. न्यायालयासमोर प्रभू रामचंद्राचे अस्तित्वच नाकारून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या सहा शतकांच्या संघर्षास अपशकुन करू पाहणाऱ्या कॉंग्रेसकडून दुसरी अपेक्षा नव्हतीच, पण हिंदु समाजाच्या या प्रदीर्घ संघर्षाला मिळालेल्या यशामुळे पोटदुखी सुरू झालेल्या कॉंग्रेसने हिंदूंच्या आराध्य दैवताच्या मंदिराचे राजकारण करावे हे दुर्दैवी आहे असे ते म्हणाले. हिंदूंच्या भावनांची कुचेष्टा करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना श्रीरामाने सदबुद्धी द्यावी असा टोलाही त्यांनी मारला. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणाऱ्या कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत नाकारून हिंदू जनता या अपमानाची परतफेड करेल, असा इशाराही घाटे यांनी दिला. याच कॉंग्रेसने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला, याच कॉंग्रेसने जी-२० परिषदेवर बहिष्कार घातला, कारगील विजय दिवसावरही बहिष्कार घातला. जेव्हा जेव्हा देशाची मान अभिमानाने उंचावली तेव्हा तेव्हा कॉंग्रेसची पोटदुखी बळावली आहे, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठविली.
समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे रामलल्लाची पुनर्स्थापना व्हावी यासाठी सहा शतके सुरू असलेल्या संघर्षास संघ-भाजपाचा कार्यक्रम म्हणून राजकीय स्वरूप देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असेल, तर या मुक्ती लढ्याचा हिंदु समाजाला अभिमानच वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी 31 जानेवारीला निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष

मुबई-अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता राष्ट्रवादी कोणाची याबाबात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.31 जानेवारीला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.याबाबत बोलतांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीची परिस्थिती शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. या प्रकरणात, प्रतिस्पर्धी गटांनी जारी केलेला व्हीप कायदेशीरदृष्ट्या वैध होता की नाही, असा प्रश्न व्हिपच्या वैधतेबाबत आहे. आम्ही एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर आमच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाई संदर्भातील कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली. आता येत्या 18 जानेवारीला किंवा त्यापूर्वी सर्व संबंधित पक्ष साक्षीदारांची यादी आणि शपथपत्रांची देवाणघेवाण करतील असे मानले जात आहे. 20 जानेवारीला साक्षीदारांची उलटतपासणी, तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. तर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर 31 जानेवारीला अध्यक्षांना निर्णय देणे अनिवार्य असणार आहे.

जाधवर इन्स्टिटयूटतर्फे आदिवासी बांधवांना १० हजार कपडयांची मदत 

लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या सहयोगाने उपक्रम ; शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : सापुतारा पर्वतरांगांमधील आदिवासी बांधवांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा, याउद््देशाने न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या १० हजार कपडयांची मदत आदिवासी बांधवांना पाठविण्यात आली. लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल च्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला लायन्स चे माजी प्रांतपाल दीपक शहा, लायन रमेश शहा, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्लचे अध्यक्ष युवराज लांबोळ, प्रविण खुळे, जाधवर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कपडयांनी भरलेल्या टेम्पोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. धुळे येथील गरजूंना देखील हे कपडे देण्यात येणार आहेत. 
दीपक शहा म्हणाले, इच्छाशक्तीची प्रेरणा ही प्रत्येकाला सामाजिक कार्याकरिता उद्युक्त करीत असते. आपण नकारात्मकतेकडे न पाहता, चांगल्या गोष्टींकडे पाहून त्याचा अवलंंब करुन यशस्वी होऊ शकतो. यामाध्यमातून अनेक चांगल्या व्यक्तींचे हात एकत्र येऊन समाजकार्याचा डोंगर उभा राहू शकतो. 
रमेश शहा म्हणाले, नैसर्गिक आपत्ती किंवा गरजूंना मदतीचा हात देताना केवळ सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता आपण काय करु शकतो, हा विचार लायन्स क्लब करीत असतो. यामाध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकातील गरजूंना विविध प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न क्लबने केला आहे. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, समाजातील गरजू घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत देण्याकरिता शासनाच्या सर्व यंत्रणा कार्यान्वित असतात. मात्र, सामाजिक संस्थांसह सामान्य नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणिव निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी चांगले कपडे गोळा करुन गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमात मोठा वाटा उचलला आहे.

गानसामर्थ्याने गरुडभरारी- स्वरसिद्ध पद्माताई देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष

किराणा घराण्याच्या ज्या मोजक्या कलाकारांनी आपल्या गाना कर्तृत्वाची मोहोर उठवली आहे त्यात पद्माताई देशपांडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपल्या गानसामर्थ्याने हे वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. अर्थातच या गरुडभरारीसाठी खूप अभ्यास, मेहनत आणि विचार करून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पद्माताईंचा जन्म1952 साली सोलापूरला झाला. त्यांच्या वडिलांना गाण्याची आवड होती. आईकडूनही वारसा मिळालेला आहे. त्यांच्या आई माणिक वर्मांची गाणी खूप छान गात असत. उपजतच सुरांची ओढ,जात्याच हुशार. लहानपणी आईबरोबर लग्नाला गेल्या असताना हात सोडून तिथल्याच एका बँडवाल्या जवळ जाऊन बँड ऐकत बसल्या तेव्हाच त्यांच्यातील आवड लक्षात आलेली होती. अडीच वर्षांच्या असताना संस्कृतमधील काही श्लोक त्यांना अर्थासह पाठ होते. अशा एकपाठी पद्माताईनी गायनाचे धडे सुरुवातीला दिगंबर बुवा कुलकर्णी यांच्याकडे गिरवले. पाच सहा वर्षानंतर दत्तूसिंग गहेरवार यांचे मार्गदर्शन मिळाले. अगदी लहान वयात पेटीवर जवळजवळ 25 राग वाजवून गाता येत होते. हळूहळू पेटीबरोबर तबलाही वाजवता येऊ लागला. गांधर्व महाविद्यालयाची विशारद पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. वयाच्या सोळाव्या वर्षी सोलापूरला झालेल्या मुख्याध्यापकांच्या राज्यव्यापी संमेलनात सौभद्र नाटकात सुभद्रेची भूमिका पद्माताईंनी केली. त्याच वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संमेलनात ‘रामरंगी रंगले’ हे पद स्वतः तबला वाजवून त्या गायल्या. दरम्यान शैक्षणिक प्रगती चांगली होती. महाविद्यालयीन काळात त्यांना महाराष्ट्र राज्याची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. शिवाजी विद्यापीठातून बी. ए. झाल्यावर त्यांनी सोलापूरच्याच एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून काम केले. पुण्यात डॉ.प्रभाकर देशपांडे या कै.सवाई गंधर्वांच्या नातवाशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पद्माताईंच्या गाण्याला अधिक वाव मिळाला. सुरुवातीला हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले.किराणा घराण्याचे शास्त्रशुद्ध संस्कार इथेच रुजले व वेगळीच दिशा मिळू लागली.एकच यमन राग गाताना तो कसा मांडायचा, इथपासून त्याची विशिष्ट स्वर जोडण्याची व तोडण्याची पद्धत आणि त्यातून निर्माण होणारी अलौकिक कलाकृती याचा तो प्रत्यक्ष अनुभव होता.पुढे दाजी उर्फ विजय करंदीकरांकडे आठ वर्षे रागसंगीताची तालीम मिळाली. ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यसंगीत या साऱ्यांमध्ये वेगवेगळा असलेला स्वरविचार दाजींनी शिकवला. एकाच रागात वरील सर्व प्रकार गाताना सूक्ष्म स्वरभेदांचा विचार त्यांना दाजींकडून समजला. नंतरच्या काळात त्यांचे दीर पं.श्रीकांत देशपांडे यांचाही प्रभाव पडला असे त्या आवर्जून सांगतात. कलाकाराला शोधक नजर आणि कलेची ओढ असेल तर त्याला पुढे जाता येते आणि म्हणूनच रागाकडे बघण्याच्या सौंदर्यासक्त नजरेमुळेच पद्माताईंना नाविन्याचा विचार करावासा वाटला. एकच राग विविध घराण्यात विविध गायक कशा पद्धतीने सादर करतील हा विचार करून तशा पद्धतीने सुरुवातीला शास्त्रीय असो, वा सुगम गायक असो, त्यांच्या गायकीतील सौंदर्यस्थाने शोधून आत्मसात करण्याच्या वृत्तीमुळे स्वतःच्या गाण्याची शैली निर्माण करण्याची ओढ त्यांना लागली. त्यांच्या गायनावर पं.वसंतराव देशपांडे, विदुषी गंगुबाई हनगल यांच्या गायकीची छाप असल्याचं अनेक गायकांनीही नमूद केले आहे. माणिकबाईंना त्यांनी आदर्श मानले  आहे. माणिकबाईंसारखे गाता आलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत आलेले आहे. आपल्या क्षमता, मर्यादा ओळखून चाकोरी बाहेरचं गाणं म्हणायचं त्यांचा प्रयत्न असतो. अजय पोहनकरांचे मार्गदर्शन घेऊन पतियाळा गायकीचा बाज आपल्या गायनात आणला. सरगमचा रियाज केला. गळी आणि सपाट तान आरोही, अवरोही तान यासाठी कसून सराव केला. त्यामुळे त्यांच्या ताना स्पष्ट असतात. बंदिशींची चुस्त, शिस्तबद्ध मांडणी व वैविध्यता, बोलबनाव ही त्यांच्या गायकीची बलस्थाने आहेत. त्यांच्या या अभ्यासु व चिंतनशील वृत्तीमुळे त्यांना अनेक प्रथितयश महोत्सवात गायन सादर करता आले आहे. सवाई गंधर्व महोत्सवा मध्ये आत्तापर्यंत दहा वेळा गायन झालेले आहे. पद्माताईंजवळ काव्यगुणही आहे. हिंदी मराठीत कविता केल्या असून जवळजवळ 50 रागात बंदिशी रचल्या आहेत. स्वतः तबला वाजवत आपल्या सुनेला श्रुतीला आणि आता ऐश्वर्या या नातीलाही शिकवत आहेत. दोघीही पद्माताईंना सुरेल साथ करतात. पद्माताईंनी ‘सूरसंगत’  संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यातून नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना गायनाची संधी देत असतात. अनेक विद्यार्थ्यांना गेली 40 वर्षे विद्यादान करत आहेत. ‘रमणीय पद्मदले’
 नावाचे त्यांच्या आत्मचरित्राचे पुस्तक प्रसिद्ध झालेले असून 150 बंदिशींच्या रचना केल्या असून स्वरपद्म नावाने 2 सी.डी. संग्रह काढलेले आहेत. अलूरकर म्युझिक हाऊस ने त्यांच्या सवाई गंधर्व महोत्सवातील गायनाची व्ही.सी.डी. काढलेली आहे. ताईंनी ‘सुधाकेदार’, ‘गोपाल सारंग’ व ‘सोहनी बहार’ या रागांची निर्मिती केली आहे. पद्माताईंना सूरमणी  किताब मिळालेला आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी स्वरचित बंदिशी तसेच ‘नेहरू सेंटर’ मध्ये त्यांनी ‘नाट्यसंगीत आणि त्याचा सुवर्ण काळ’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिलेले आहे. मुंबईच्या  एन.सी.पी.ए. येथील त्यांच्या गायनाचे प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे ह्यांनी कौतुक केले. भारतभर व परदेशातही गायनाच्या अनेक मैफली झाल्या. आकाशवाणीच्या त्या मान्यता प्राप्त कलाकार असून गेली ३० वर्षे आकाशवाणी वरून तसेच दिल्लीच्या संगीत सभे मधून त्यांचे गायन प्रक्षेपित झालेले आहे. अलाहाबादच्या ‘संगीतांजलि’ संस्थेने ‘संगीतश्री’ हा किताब देऊन गौरविले आहे. पुण्याच्या भरतनाट्य मंदीरात ‘मला उमजलेल्या माणिक वर्मा’ हा त्यांचा कार्यक्रम श्रोत्यांना फारच आवडला. टी.व्ही. च्या ‘सह्याद्री’ चॅनेल वर ‘नाट्य पराग’ या कार्यक्रमात त्यांनी नाट्यगीते सादर केली आहेत. गेली 62 वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत राहून अनेक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व वाटचालीत त्यांचे यजमान डॉ.प्रभाकर देशपांडे यांची मोलाची साथ आहे. अशा या स्वरसिद्ध पद्माताई याना त्यांच्या त्र्याहत्तराव्या वर्षातील पदार्पणासाठी त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा.

-डॉ. राजश्री महाजनी

नव्या युगाची धुरा युवा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर -इतिहासतज्ञ, प्रसिद्ध वक्ते विक्रम संपत 

भारतीय छात्र संसदेचे दुसरे सत्र संपन्न
 पुणे, दि. ११ जानेवारी – नवे युग नवे विचार, नवी क्रांती आणि नवे तंत्रस्नेही वातावरण घेऊन अवतरत आहे. या पार्श्वभूमीवर, इतिहासाचे नेमके आकलन करून घेऊन, भविष्याचा वेध घेत नव्या युगाची धुरा तरुणाईने खांद्यावर घ्यावी, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ आणि प्रसिद्ध वक्ते विक्रम संपत यांनी गुरुवारी येथे केले.
एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद फाऊंडेशन आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाने रंगले. या सत्राला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. ’युगांतर – यूथ इन ट्रान्झिशन’, या शीर्षकांतर्गत ते बोलत होते. या सत्रात आध्यात्मिक गुरू, लेखक स्वामी मुकुंदानंद, कर्नाटक विधान सभेचे सभापती बसवराज होराट्टी, प्रसिद्ध वक्ते सुरेश गरीमेला हे उपस्थित होते.
विक्रम संपत म्हणाले, ’देशाचे भवितव्य तेथील युवा पिढीमध्येच पाहिले जाते. प्रत्येक नव्या युगात प्रवेश करताना, आपण आपल्या इतिहासात डोकावणे आवश्यक असते. आपण कुठून आलो, आपल्या पूर्वजांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रात काय कामगिरी केली, संस्कृतीची कोणती उच्चतम अवस्था आपण प्राप्त केली होती, हे युवा पिढीने समजून घेतले पाहिजे. तसेच नजिकचा दीडशे वर्षांचा इतिहासही समजून घेतला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यासाठी पूर्वजांनी, क्रांतिकारकांनी, लोकनेत्यांनी कोणते संघर्ष केले. किती अत्याचार सहन केले, याची कृतज्ञ जाणीव आपण ठेवली पाहिजे, तरच उज्ज्वल भविष्याकडे आपण यशस्वी वाटचाल करू शकू’,.
स्वामी मुकुंदानंद म्हणाले, ’जगभरातील सर्वाधिक युवा लोकसंख्येचा देश अशी आपली ओळख आहे. युवा हे परिवर्तनाचे अग्रदूत असतात. ते भावी नेते असतात. त्यामुळे युगांतरात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. नव्या युगाकडे जाताना आपली मुळे आपण पुन्हा तपासली पाहिजेत, नव्या दृष्टीने आपल्या इतिहासाकडे पाहिले पाहिजे, त्यातून प्रेरणादायी दृष्टी मिळेल आणि विकासाला अंतर्दृष्टी मिळेल’.
सुरेश गरिमेला यांनी तरुणाईसाठी सहा मुद्दे मांडले. गुंतागुंतीची आव्हाने असताना तुमच्यामधील सर्वोत्कृष्ट ते देशासाठी द्या, प्रभावी संवाद शिकून घ्या, विरोधी मतांचा आदर करा, परिश्रमांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवा, इतर कुणी आपल्यासाठी काहीतरी करत राहील, या गैरसमजातून बाहेर या, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि योग्य कृती तात्काळ करा, मग नवे युग तुमचेच असेल.
बसवराज होराट्टी यांनी युवा शक्ती हीच देशाचे सामर्थ्य असते आणि नव्या युगात सारे विश्व नागरीक असतील, याचे भान ठेवण्याचे आवाहन केले. ’नव्या युगात प्रवेश करताना, हे स्थित्यंतर स्वीकारणे आव्हानात्मक, गुंतागुंतीचे असते, त्यामुळे तरुणाईने आपली जबाबदारी ओळखून देशासाठी योगदान देण्याचा निश्चय करावा’, असे आवाहन केले.
यावेळी आदर्श आमदार सन्मान राष्ट्रीय जनता दलाचे बिहार येथील चेतन आनंद यांना राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सायली घाटे, सूरज शर्मा, ट्यूलिप शर्मा, नंदिता जामवाल आणि अनुराग गुप्ता या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत मांडले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

यशराज,  सार्थक,  परीधी उपांत्यपूर्व फेरीत

पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : यशराज कदम, आद्य पारसनीस, सार्थक पाटणकर, परीधी बुधवार यांनी पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या चौथ्या फेरीत यशराज कदमने कृष्णा जसूजावर १९-२१, २१-९, २१-१५ असा, आद्य पारसनीसने सुदीप खोराटेवर २१-१५, २१-१८ अशी मात केली. वत्सल्य गर्गने ग्रंथ वालेचावर २१-१०, २१-१७ अशी मात केली. यानंतर सार्थक पाटणकरने तनिष दरपेवर २१-११, २१-९ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

१९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत श्रीया उत्पटने इरा आपटेवर २१-८, २१-७ असा, सानिका पाटणकरने प्राची शितोळेवर २१-१४, २१-७ असा, त जिज्ञासा चौधरीने नाव्या रांकावर २२-२०, २१-१९ असा विजय मिळवला. सफा शेखने दिव्यांश वहाळवर २१-८, २१-१२ अशी सहज मात केली. परीधी बुधवारने सायुरी थोकलवर २१-११, २१-१७ अशी मात करून आगेकूच केली.

निकाल – उपउपांत्यपूर्व फेरी – १५ वर्षांखालील मुले – कपिल जगदाळे वि. वि. सौरिष काने २१-६, २१-७, राघवेंद्र यादव वि. वि. आरुष अरोरा २१-११, २१-११, तनिष्क आडे वि. वि. स्वरीत सातपुते २१-१९, १९-२१, २५-२३, अभिक शर्मा वि. वि. चिन्मय फणसे २१-१६, २१-१७, एस. सोमजी वि. वि. पार्थ सहस्त्रबुद्धे २१-१५, २१-१३, अभिज्ञान सिंघा वि. वि. सयाजी शेलार २१-१३, २१-१०, विराज सराफ वि. वि. अक्षर झोपे १८-२१, २१-१५, २१-१६, अरहम रेदासानी वि. वि. ध्रुव बर्वे २१-१०, २१-१५.

१५ वर्षांखालील मुली – शर्वरी सुरवसे वि. वि. शिवानी मासळेकर २१-१२, २१-१५, ख्याती कत्रे वि. वि. शिप्रा कदम २१-८, २१-७, मनीषा थिरुकोंडा वि. वि. कायरा निजाहवान २१-५, २१-५, शरयू रांजणे वि. वि. स्वराली थोरवे २१-२, २१-४, स्नेहा भिसे वि. वि. आर्या कुलकर्णी २०-२२, २१-१७, २१-८, अनन्या बोंद्रे वि. वि. मौसम पाटील २२-२०, २१-१८, सोयरा शेलार वि. वि. पद्मश्री पिल्लई २१-९, २१-१३, सान्वी पाटील वि. वि. पर्णवी मोहळकर २१-११, २१-१९,

१७ वर्षांखालील मुले – सुदीप खोराटे वि. वि. श्लोक डागा २१-१६, २१-१४, कविन पटेल वि. वि. रघुवेंद्र यादव २१-६, १५-२१, २१-१६, विहान मुर्ती वि. वि. ओम दरेकर २१-१५, २१-१४, देवांश सकपाळ वि. वि. आधिश ए. २१-११, १९-२१, २१-१४, अवधूत कदम वि. वि. वरद लांडगे २१-१३, २१-१६, अर्जुन देशपांडे वि. वि. नील शोरन २१-८, २१-१६, सार्थक पाटणकर वि. वि. कपिल जगदाळे २१-१३, २१-१४, ओजस जोशी वि. वि. अभिक शर्मा २१-१३, २३-२१, २१-१६

१७ वर्षांखालील मुली – भक्ती पाटील वि. वि. एस. ढाखणे २१-१४, २१-१६, यशस्वी काळे वि. वि. आयुषी मुंडे २१-११, २१-१०, स्नेहा भिसे वि. वि. हृदया साळवी २१-१७, २१-१५, नाव्या रांका वि. वि. आयुषी काळे २१-१३, २१-१३,

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धामुलांच्या गटात तन्मय मुजुमले विजेतातर मुलींमध्ये शमिका उभे विजेती

पुणे-क्रीडा भारती व शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेतील मुलांच्या गटात तन्मय मुजुमले याने तर मुलींच्या गटात शमिका उभे हिने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.‌

ही स्पर्धा पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या पटवर्धन बाग येथील मैदानावर (श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर) आयोजित केली होती. दोरीवरील मल्लखांब व पुरलेला मल्लखांब या दोन्ही प्रकारातील एकत्रित कामगिरीच्या आधारे विजेतेपद देण्यात आले.‌
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केळकर हाऊसिंग कंपनीचे संचालक अनिरुद्ध केळकर यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमास क्रीडा भारती पुणे महानगर अध्यक्ष शैलेश आपटे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर, क्रीडा भारतीचे पुणे महानगर मंत्री विजय रजपूत, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सत्यजित शिंदे, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या संचालिका अनुराधा येडके व राज तांबोळी, मल्लखांब प्रशिक्षक जितेंद्र खरे आणि रवींद्र पेठे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मेहेंदळे यांनी केले.स्पर्धेमध्ये २७४ खेळाडूंनी भाग घेतला होता.

स्पर्धेतील गटवार निकाल असे-
मुले- १. तन्मय मुजुमले १५.९५ गुण (शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी), २. आर्यन पाळंदे १५.७ गुण (नवजीवन स्पोर्ट्स),३. ओम लखाशे १५.५५ गुण ४. अथर्व मोरे १५.४५ गुण (दोन्ही महाराष्ट्रीय मंडळ),५. रेवणसिद्ध कोरे १५.२५ गुण,६. सर्वेश देशपांडे १५.१० गुण (दोन्ही इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी)
मुली १.शमिका उभे १५.६५ गुण(मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी),२. तनया साळवी १५ गुण (पुणे स्पोर्ट्स अकादमी),३.अवनी हुले १४.६ गुण (मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी) ४.अन्वी म्हसवडे १४.५०गुण (वेदांत अकादमी),५. अर्णवी नाईक १४.०५ गुण (इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी),६.मधुरा दीक्षित १३.६५ गुण (मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी)

पुणे महानगर नियोजन समितीसदस्यपदी आमदार शिरोळे

पुणे – राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२१ साली पुणे महानगर नियोजन समिती स्थापन केली. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील नागरी पायाभूत सुविधा, नागरी वाहतूक, पर्यावरण, उद्योग याचे नियोजन व्हावे आणि त्याआधारे विकास व्हावा याकरिता समिती स्थापन केलेली आहे.

‘नगरसेवक, पीएमपीएलचे संचालक आणि छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अशा कामांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अनुभव आहे. शहराचा विकास होत असताना शहराभोवतीच्या परिसराचाही विकास होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन’, अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी त्यांच्या नियुक्तीवर व्यक्त केली.

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे आवाहन

पुणे दि.११: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी तसेच मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील अशी वाहने मालक, चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन कार्यालयात वाहन कर, दंड भरलेला नाही अथवा वाहने नेण्यासाठी संपर्क केलेला नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रियादेखील सुरु केलेली आहे. त्यापैकी ४ वाहनांच्या मालकांना कार्यालयाने पाठविलेल्या नोटीस वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदलाची नोंद पत्ता बदल झाल्यास ७ दिवसात करावयाची आहे. परंतु, वाहन मालकांनी पत्ता बदल न केल्याने वाहन मालकाचे अद्ययावत पत्त्यावर पत्रव्यवहार करणे शक्य होत नाही व वाहन मालकासोबत संपर्क होऊ शकत नाही.

वाहन मालकांनी आपली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवुन न्यावीत, अन्यथा अशी वाहने बेवारस वाहने आहेत समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने या वाहनांचा जाहीर ई लिलाव करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११: – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हीरो असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने ७ स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये नगर परिषद सासवडला प्रथम आणि लोणावळा शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेला ५ स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला ५ स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे. याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवड, लोणावळ्यासह, कराड, पाचगणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले आहेत. तर गडहिंग्लज, विटा, देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात झाली आहे, त्यापूर्वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु झालेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेने मुंबईचे रस्ते, गल्ल्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत. स्वच्छता कामगारांच्या बरोबरीने जनता य स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत असून या चळवळीला आता लोकचळवळीचे स्वरुप आले आहे.

मुंबईपासून सुरु झालेली ही मोहिम आता राज्यभर राबविण्यात येत असतानाच आज महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अधिकारी-कर्मचारी अधिक जोमाने, उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असेच सातत्य राखूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार आणि मानांकन प्राप्त शहरांचेही अभिनंदन केले आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

पुणे दि.११-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी केले .

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार ) अधिनियम १९९६ अर्थात ‘पेसा’ कायद्यावरील दोन दिवसांच्या पहिल्या प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सत्राला केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, सहसचिव ममता वर्मा , राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंह, उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे उपसचिव विजयकुमार आदी उपस्थित होते .

श्री.भारद्वाज म्हणाले, आदिवासींच्या जमिनीवर, घरांवर इतरांनी कब्जा केल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. हे प्रकार रोखण्यासाठी अनेक कायदे असून त्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पेसा कायदा करण्यात आला. आदिवासींच्या मालकीची जमीन, जंगल आणि वनसंपदा त्यांनाच मिळावी यासाठी या कायद्याचा वापर सुरू झाला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जन मन योजना’ हा त्याचाच एक भाग असून पेसाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला अधिक सक्षम बनवण्याचे आवाहन भारद्वाज यांनी यावेळी केले.

श्री. डवले यांनी यावेळी पेसा कायद्याच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणी संबंधी माहिती दिली . पेसा अंतर्गत आदिवासी बहुल भागाच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा वापर अधिक कार्यक्षमतेने कसा करता येईल याबद्दल या परिषदेत अधिक विचारमंथन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांच्या या परिषदेत ५ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित असून पुढच्या टप्प्यात आणखी ५ राज्यांसाठी स्वतंत्र परिषद घेण्यात येईल असे पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार यांनी सांगितले.

सहसचिव ममता वर्मा यांनी प्रास्ताविकात पेसा कायद्याच्या या ५ राज्यातील अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण केले.

पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतील राज्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि तळागाळातील धोरणकर्ते, नागरी संस्था संघटना आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सामूहिक दृष्टीकोन वाढविणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे. पहिल्या दिवशी ‘पेसा क्षेत्रातील ग्रामसभांची परिणामकारकता, या भागात राहण्याच्या सोयीमध्ये त्यांची भूमिका,’ ‘पेसा क्षेत्रातील गौण वनउत्पादन आणि गौण खनिजे’ या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आर्किटेक्ट  जी.के.कान्हेरे  आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना जीवनगौरव

‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ची घोषणा-१३ जानेवारी रोजी कार्यक्रम 
पुणे :
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची  घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रा.जी.के.कान्हेरे, ज्येष्ठ स्ट्रक्चरल  इंजिनियर सतीश मराठे यांना यावर्षी हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. असोसिएशन तर्फे   प्रेसिडेंट पराग लकडे, उपाध्यक्ष राजीव राजे,चेअरमन महेश बांगड,सचिव संजय तासगांवकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
 दि १३ जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता आर.बी.सूर्यवंशी(सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह ,बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) आणि जे.पी.श्रॉफ(अध्यक्ष,श्रॉफ ग्रुप)  यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.  सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो.या पुरस्कारांचे हे १७ वे वर्ष आहे.*’आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’:५४ वर्षांची परंपरा* 
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ ही ५४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि नीतिमान  सेवांना उत्तेजन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन नागरी,सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.सभासदांची वर्गणी आणि प्रयोजकत्वातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये चर्चासत्रे,प्रशिक्षण ,विविध पुरस्कारांचा समावेश आहे.  

रोगप्रतिबंधात्मक उपायांकरीता आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करावा-सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर 

राष्ट्रीय शिक्षण मंडळ सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रीसर्च इन आयुर्वेद आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या क्रियाशारीर विभागातर्फे अग्नीकॉन २०२४ मध्ये परिसंवादाचे आयोजन

पुणे : रोगप्रतिबंधात्मक उपाय यांकरीता आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करायला हवा. आयुर्वेदाचे आधुनिक शास्त्राबरोबर एकत्रीकरण करुन त्यामध्ये अधिकाधिक संशोधन करावे. आयुर्वेदाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. आयुर्वेदातील संशोधनाचे पेटंट मिळवावे आणि योग्य दिशेने प्रसिद्धी द्यावी, असे मत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षण मंडळ सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रीसर्च इन आयुर्वेद आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या क्रियाशारीर विभागातर्फे पुणे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित अग्नीकॉन २०२४ या राष्ट्रीय परिसंवाद  कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सचिव डॉ. राजेंद्र हुपरीकर, प्राचार्य डॉ. सरोज पाटील, उपप्राचार्य-डॉ. मिहीर हजरनवीस, डॉ.इंदिरा उजागरे आणि डॉ. संगीता साळवी उपस्थित होते. यावेळी डॉ. जयंत बर्डे यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या ‘आयुर्विद्या’ या वैज्ञानिक विषयावरील मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात करण्यात आले.
परिसंवादात ७२ शोधनिबंध सादर केले झाले. परिसंवादाचे संयोजन प्राचार्य डॉ. सरोज पाटील  क्रियाशारीर विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी रणदिवे, डॉ. तरन्नूम पटेल, डॉ. लक्ष्मण लावगनकर, डॉ. तनुजा सावंत, डॉ. श्यामबाला बळी यांनी केले.
यावेळी डॉ. योगेश बेंडाळे यांचे धात्वाग्नी आणि कर्करोग व्यवस्थापन, डॉ.मुरली कृष्ण यांचे पंचकर्मामध्ये दोष आणि अग्नी विचार, डॉ. तपन कुमार यांचे अग्नी – कॉन्सेप्ट टू क्लिनिकल मॅनेजमेंट,डॉ. प्रशांत सुरू यांचे पांचभौतिक अग्नी आणि त्याचे वैद्यकीय उपयोग, डॉ. हरीश पाटणकर यांचे पुराव्यावर आधारित आयुर्वेद, डॉ. वैशाली वेणू यांचे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम आणि त्यामध्ये आयुर्वेदीय डॉक्टरांचा सहभाग , डॉ. लक्ष्मण लावगनकर यांचे केस सादरीकरण या विषयांवर व्याख्याने झाली.  

संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रक्रिया सुरू-मंत्री शंभुराज देसाई

मुंबई-आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले, त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.शंभुराज देसाई म्हणाले की, जर मॅचफिक्सिंग असती तर 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावे. शरद पवार यांनी त्यांना बुस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू. आमचे शिवसंकल्प अभियान सुरू आहे. 14 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळावे घेणार आहोत.

दरम्यान पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची, हे अध्यक्षांनी सांगितल. आम्ही 54 पैकी 40 आमदार शिंदेंसोबत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही. आम्ही नैसर्गित युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छा विरोधात सरकारमध्ये सहभागी झालो.

शंभुराज देसाई म्हणाले की, सरकार स्थापन करताना 2 ते 3 हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो.ते ज्या मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडाला आहे.

शंभुराज देसाई म्हणाले की, रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, तर मग मतदारसंघातील कामे घेऊन का येता? रोहित नैराश्येतून असे बोलत आहे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी रोहित पवारांवर केली आहे. एकीकडे मतदार संघातील काम घेऊन यायचे आणि बाहेर राजकीय टीका करायची. राष्ट्रवादीबाबतही असाच निर्णय येईल ही धाकधूक रोहित यांच्या मनात आहे त्यामुळे नैराश्यातून ते बोलते आहेत.