Home Blog Page 1206

स्पाइस मनीच्या अधिकारी नेटवर्कमध्ये महाराष्ट्रात १०० टक्के वाढ

स्पाइस मनी महाराष्ट्रातील उद्योजकांना सक्षम करत पर्यायाने रोजगाराच्या संधी वाढवणार 

पुणे – स्पाइस मनी (डिजीस्पाइस टेक्नॉलॉजीची उपकंपनी) ही भारतातील ग्रामीण फिनटेक क्षेत्रातील पायोनियर आणि नागरिकांच्या बँकिंग सेवा वापरण्याच्या पद्धतीत क्रांती आणणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात आपल्या स्पाइस मनी गॅरंटी ड्राइव्हसह महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. या धोरणात्मक उपक्रमाद्वारे भागिदारी मजबूत करण्याचे आणि २१ शहरांतील वितरकांना समाविष्ट करत आपल्या नॅनोप्रेन्युअर कम्युनिटीसाठी आपसात जोडली गेलेली यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. गेल्या वर्षात स्पाइस मनीने महाराष्ट्रात अधिकारी नेटवर्कच्या विस्ताराच्या माध्यमातून ४३९९ कोटी लक्षणीय एकूण व्यवहार मूल्य (जीटीव्ही)नोंदवले आहे.

या नेटवर्कमध्ये नॅनोप्रेन्युअर्सचा समावेश असून ते २०२२ पासून २०२३ मध्ये आकर्षक १० टक्क्यांनी वाढले असून एकूण व्यवहार ५.८ कोटींवर गेले आहेत. यावरून आर्थिक उपलब्धता क्षेत्रातील स्पाइस मनीची प्रमुख भूमिका स्पष्ट होते. १२,३६५ गावांतील ३७ लाख ग्राहकांना सेवा देणारी स्पाइस मनी आर्थिक सक्षमता आणि सर्वसमावेशकतेला चालना देत आहे. देशभरातील १३ लाख अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा नॅनोप्रेन्युअर्समधील वाटा ४.७३ टक्के आहे. यावरून आर्थिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यातील स्पाइस मनीची भूमिका अधोरेखित होते.

स्पाइस मनीने स्पाइस मनी गॅरंटी ड्राइव्ह कॅम्पेनच्या माध्यमातून आपल्या विस्तारित नेटवर्कसह अधिक सखोल नाते प्रस्थापित करण्याचे ठरवले आहे. कंपनीने सहकार्यपूर्ण यंत्रणा उभारण्याचे ध्येय ठेवले असून त्याद्वारे नॅनोप्रेन्युअर्सना एकत्र येण्याची, माहितीची देवाणघेवाण करण्याची आणि स्पाइन मनीच्या नाविन्यपूर्ण आर्थिक सेवांना यश मिळवून देणारे नाते अधिक बळकट करण्याची संधी दिली जाईल.

कंपनी नॅनोप्रेन्युअर्ससाठी धोरणात्मक पद्धतीने यंत्रणा उभारत असून अधिकारी वर्गाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आर्थिक साक्षरतेचा प्रसार केला जात आहे. अधिक सर्वसमावेशक यंत्रणा तयार करण्याचा कंपनीचा दृढनिश्चय स्त्री अधिकाऱ्यांची नेमणूक करून नेटवर्कमध्ये वैविध्यता आणण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांवरून अधोरेखित झाली आहे.

स्पाइस मनी असिस्टेड पेमेंट सेवांपासून सर्वसमावेशक बँकिंग सेवा देण्यापर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. या विस्तारामध्ये करंट आणि बचत खाती सुरू करणे, नॅनोप्रेन्युअर्सना कर्ज व रोख वसुली सेवेचे ध्येय देणे यांचा समावेश आहे. या बहुपेडी धोरणावरून स्पाइस मनीची भारतात प्रभावी आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्याची बांधिलकी दिसून येते.

याच विकास धोरणाशी सुसंगत राहात स्पाइस मनीने महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली असून गेल्या वर्षापर्यंत एकूण २२.५ कोटी आधार-अनेबल्ड पेमेंट्स सिस्टीमचे (एईपीएस) व्यवहार झाले आहेत. एईपीएस आणि रोख व्यवस्थापन यंत्रणा, डायरेक्ट मनी ट्रान्सफर, मिनी- एटीएम्स आणि भारत बिल पेमेंट सेवा ही उत्पादने स्पाइस मनीच्या येथील यशात महत्त्वाची ठरली आहेत. महाराष्ट्रात स्पाइस मनीच्या उत्पादनांना मिळालेले यश या प्रदेशाची डिजिटल उत्पादनांचा अवलंब करण्याची स्वीकारार्हता दर्शवणारे आहे. महाराष्ट्र स्पाइस मनीच्या आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचे ठरले असून विशेषतः ५४.७८ टक्के जनता राहाते, त्या ग्रामीण भागात (२०११ च्या लोकगणनेनुसार) कंपनीला यश मिळाले आहे.

स्पाइस मनीचे संस्थापक दिलिप मोदी म्हणाले, ‘भारतात स्पाइस मनीच्या यशाला चालना देण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अधिकारी नेटवर्कचा लक्षणीय विस्तार आणि येथील डिजिटल आर्थिक सेवांमध्ये झालेली वाढ यावरून डिजिटल विश्व आपलेसे करण्याची या भागाची तयारी दिसून येते. आमच्या डिजिटल बँकिंग सेवांच्या माध्यमातून नॅनोप्रेन्युअर्सनी महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या भागात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक विकासाला चालना दिली आहे. ग्रामीण नॅनोप्रेन्युअर्सना सक्षम करण्याची आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना अर्थार्जनाच्या संधी मिळवून देण्याची आमची बांधिलकी कायम आहे.’

स्पाइस मनीची बांधिलकी आकडेवारीच्या पलीकडे जाणारी असून कंपनी देशभरात असिस्टेड- डिजिटल यंत्रणा उभारत आहे. अधिकारी वर्ग ९५ टक्के ग्रामीण भागात पोहोचत असून त्याअंतर्गत २.४ लाख गावे, ७०० जिल्हे आणि ६४५८ ब्लॉक्ससह स्पाइस मनी महिन्याला २०० लाख ग्राहकांना सेवा देत आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये ग्राहक जीटीव्हीमध्ये २० टक्क्यांची असामान्य वाढ नोंदवत ग्रामीण भागाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली. यातून देशभरात आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्याचे कंपनीचे धोरणही नव्याने अधोरेखित झाले आहे.

स्पाइस मनी यापुढील प्रवासात नॅनोप्रेन्युअर्सना सक्षम करण्यासाठी, अर्थार्जनाच्या संधी तयार करण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे.

शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन 

शिवजयंतीच्या तपपूर्ती सोहळ्याला ९५ स्वराज्यरथांची मानवंदना

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे शिवजयंतीला सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून ‘शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा’ या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा १२ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९५ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.  
या मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, खासदार सुप्रिया सुळे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, संजय जगताप, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे.  यावेळी परिमंडळ १ पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी “महाराणी ताराराणी शौर्य पथक” मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग, ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक सहभागी होणार आहे.    
सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, समीर जाधवराव, किरण देसाई, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

* स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणार ही स्वराज्यघराणी -समितीच्या जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत या मानाच्या मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार, पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी होणार आहेत.
* सलग १३ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी-शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १३ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड मानवंदना देणार आहेत. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूणार्कृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत , ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून सलग १३ व्या वर्षी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशनतर्फे पारधी समाजातील मुला-मुलींना मदत

महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींकरिता रुलर स्कॉलर स्किम व यशस्वी विद्यार्थीनींचा गौरव
पुणे : महाराष्ट्राच्या नकाशावरील खामगाव जवळील अतिशय छोटेसे खेडेगाव असलेल्या दुर्गम भागातील शाळेत पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या सावलीत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता पुण्यातील अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. पारधी समाजातील मुला-मुलींना सर्वतोपरी मदत आणि रुलर स्कॉलर स्किम अंतर्गत महाराष्ट्रातील गरजू महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा शैक्षणिक खर्च असा मदतीचा हात देत या विद्यार्थ्यांच्या पंखांना फाऊंडेशनचे बळ दिले आहे. अशाच यशस्वी गरजू विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सन्मान सोहळा पुण्यात नुकताच पार पडला.

अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशनतर्फे हडपसर मगरपट्टा जवळील अ‍ॅमेनोरा द फर्न येथे या विद्यार्थ्यांच्या सन्मानसोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, विवेक कुलकर्णी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फाऊंडेशनच्या कार्याला हातभार लावणा-या नोबेल हॉस्पिटलचे डॉ.एस.के.राऊत, लोकमान्य हॉस्पिटलचे विशाल क्षीरसागर, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे डॉ.शेखर कुलकर्णी, सरिता सोनवले, रोटरी क्लब कात्रजचे मिलिंद कुलकर्णी, नितीन नाईक, डॉ.अजित कुलकर्णी, डॉ.एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील पदाधिका-यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

तसेच खामगाव येथील पारधी समाजातील विद्यार्थी संतोष अंबुरे, ॠषिकेश सोनवणे आणि कराटे खेळाडू अथर्व चव्हाण यांना देखील गौरविण्यात आले. रुलर स्कॉलर स्किम अंतर्गत प्रियांका मोहिते, अश्विनी लेम्भे, क्षितिजा धुमाळ या महाराष्ट्रातील गरजू व यशस्वी विद्यार्थीनींचे सन्मानचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. जलसंधारणाविषयी व पाणी बचतीविषयी मी अवंतिका ही चित्रफित आणि पारधी शाळेच्या कार्याची चित्रफित देखील यावेळी दाखविण्यात आली. यावेळी पारधी समाजातील शालेय विद्यार्थ्यांनी योगासने देखील सादर केली.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, पारधी समाजातील मुलांचे आयुष्य बदलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. केवळ शिक्षण नाही, तर कला, क्रीडा अशा विविध माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरजू लोकांना अन्नदानसोबतच  विद्यादानासारखी पोटाची खळगी कायमस्वरूपी भरणारी मदत आम्ही करीत आहोत. पारधी समाज हा ब्रिटीशांच्या विरोधात लढणारा समाज अशी त्याकाळी ओळख असल्याने त्यांना सरकारी कागदपत्रांकरिता स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र, त्या देखील दूर करुन आता उत्तम नागरिक घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. तर, महाराष्ट्रातील पाच हजार गरजू मुलींची जबाबदारी घेण्याकरिता पुढाकार घेणार आहे. पुढील ३ वर्षात समुदाय विकासाच्या दृष्टीने देखील उपक्रम राबविणार असल्याचे देशपांडे यांनी  सांगितले.

रुलर स्कॉलर स्किममधील प्रियांका मोहिते म्हणाली, उस्मानाबाद येथील खेड्यातून मी पुण्यात शिक्षणासाठी आले. इयत्ता १२ वी नंतर माझे लग्न करण्याचा घरच्यांचा विचार होता. मात्र, अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशन माझे दुसरे पालक झाले आणि आज मी बीएमएस झाले आहे. फाऊंडेशनतर्फे मला सर्वोतोपरी आर्थिक सहाय्य मिळाल्याने ही वाटचाल मी करु शकले.

विवेक कुलकर्णी म्हणाले, पारधी समाजातील मुले ही अंध:कारात जगत होती. त्यांना शिक्षणाच्या प्रकाशाचे कोंदण अ‍ॅमेनोरा फाऊंडेशनने दिले आहे. यामध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या सर्व संकल्पना असून त्याद्वारे आजपर्यंत ४९६ आरोग्य शिबीरे, १६६ सामाजिक शिबीरे, ५३ शैक्षणिक शिबीरे, ५१ पर्यावरणविषयक शिबीरे विनामूल्य स्वरुपात भरविण्यात आली आहेत. यापुढेही असेच कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अश्विनी लांबे म्हणाल्या,  अनिरुद्ध देशपांडे यांचे  अ‍ॅमनोरा येस फाऊंडेशन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सक्षम करत केवळ मदत करत नाही तर  विद्यार्थी राष्ट्रीय गुंतवणूक म्हणून सिद्ध होतील, यासाठी ते कायम प्रयत्न करतात.

एवढं सारं करून घरातले मला एकटं पाडतात.घरातील सर्व विरोधात, केवळ तुम्हीच माझ्यासोबत-म्हणाले अजितदादा

मार्च महिन्यात आचारसंहिता लागेलमी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलाे नाही

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी मेळाव्यात बोलताना अजित पवार भावनिक झाले. परिवारात एकटे पाडण्यात आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात”, असे अजित पवार म्हणाले.

मी मुख्यमंत्रीपदासाठी हपापलेलाे नाही. कोणाचाही पक्ष चोरलेला नाही असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही असेही ते म्हणाले. घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत आहात असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.

यावेळी ते म्हणाले की, मित्रांनो मी तुम्हाला दाव्याने सांगेने की, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाच प्रकारे सुरूच राहिल. काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यापद्धतीने आपल्या सर्वांचं काम चाललेलं आहे. मी पुन्हा सांगतो की, काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामे होत नाहीत”, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

तसेच पक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, ”लाेकशाहीत बहुसंख्येला महत्व असते. राज्यातील मतदारांचे आशीर्वादाने आतापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे. विराेधी पक्षात असताना केवळ भाषणे करता येतात विकासकामे करता येत नाही त्यात अडचण निर्माण हाेते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेसाठी सर्वांनी जीवाचे रान केले त्यामुळे पक्षाचे चिन्ह घडयाळ व नाव सर्वत्र पाेहचवले. आम्ही काेणाचा पक्ष चाेरलेला नाही”, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन मार्च रोजी पाच जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना आहे. आपली घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे”, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले.

ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. १६: समाज कल्याण विभागाकडून ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजने’चा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी ३ हजार रूपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येईल.

लाभ वितरण झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे यांचेकडून प्रमाणित करून संबंधीत केंद्रीय सामाजिक उपक्रम (सीपीएसयु) संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्यात आत अपलोड करणे आवश्यक राहिल. अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी पात्र अर्जदारांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसमोर, येरवडा पुणे- ०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ ईमेल-acswopune@gmail.com) वर सपंर्क साधण्याचे आवाहनही सहायक आयुक्त, समाजकल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

काँग्रेसचे बँक खाते गोठवल्याचा आरोप-वीज बिल कर्मचाऱ्यांचे पगार थांबले.भारत जोडो न्याय यात्राही संकटात

नवी दिल्ली

काँग्रेसने पक्षाची त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष अजय माकन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितल्याचा आरोप केला.

माकन म्हणाले- आम्हाला गुरुवारी माहिती मिळाली की बँकांनी पक्षाने दिलेले धनादेश थांबवले आहेत. ते आमचे चेक क्लिअर करत नाहीत. काँग्रेस पक्षाची खातीही गोठवण्यात आली आहेत. याशिवाय क्राउड फंडिंग खातीही गोठवण्यात आली आहेत.काँग्रेसचे कोशाध्यक्ष अजय माकन म्हणाले- सध्या आमच्याकडे वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खाती गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्राच नाही, तर पक्षाच्या सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे लोकशाही गोठवण्यासारखे आहे.

आज सकाळी अत्यंत चिंताजनक आणि निराशाजनक बातमी शेअर करण्यासाठी मी तुम्हा सर्वांना बोलावले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल आणि खऱ्या अर्थाने दुःखही होईल. भारतात लोकशाही पूर्णपणे संपली आहे. लोकशाही बंद पडली आहे.परवा (14 फेब्रुवारी) आम्हाला माहिती मिळाली की बँका आमच्याकडून दिलेले चेक क्लिअर करत नाहीत. आम्ही अधिक तपास केला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाच्या खात्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. खाती गोठवली आहेत.आपली लोकशाही लॉकडाऊनमध्ये आहे. काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली नाहीत, तर लोकशाही गोठवली गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला जेमतेम दोन आठवडे शिल्लक राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाची खाती गोठवून या सरकारला काय दाखवायचे आहे?

ज्या आधारावर हे गोठवले जातात ते आणखीनच हास्यास्पद आहे. आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. हा पैसा कोणत्याही भांडवलदाराचा नाही. हे पैसे आम्ही ऑनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उभे केले आहेत.क्राउड फंडिंगमधून सुमारे 25 कोटी रुपये जमा झाले आहेत. यापैकी अनेकांनी प्रत्येकी 100 रुपयांपेक्षा कमी देणगी दिली आहे. लोकांनी UPI च्या माध्यमातून पैसे जमा केले आहेत. युवक काँग्रेसचा पैसा हा युवक काँग्रेसच्या सदस्यत्वातून गोळा केलेला पैसा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारने हा पैसा आयकराच्या माध्यमातून गोठवला आहे.

लंडनच्या आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत लॉर्ड मेयर ऑफ लंडन यांचा मानस

0

मुंबई,: महाराष्ट्र आणि लंडन मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. मिलेनी यांनी लंडन मधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा मानस व्यक्त केला. श्री. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेन्री ली, अभिजीत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टीफिशिअल इंटिलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध दृढ असून ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शविल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव कथन करतानाच तो भव्य आणि दर्जेदार असल्याचे श्री. मिलेनी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच मानस श्री. मिलेनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १६:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नटराज मंदिर परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

नटराज मंदिर परिसरातील कॅनालच्या समांतर असलेले पदपथ स्वच्छ राहतील याची दक्षता घेतानाच सार्वजनिक कामांचे विद्रूपीकरण करणाऱ्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम आराखड्याप्रमाणे पूर्ण करावे. परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात.

कन्हेरी वनविभागात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोयीस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत. या सर्व सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

0

विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्धल कौतुक

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल

— मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई दिनांक १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडे तीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.

या कामकाजाकारिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यदी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवानी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्याविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पाऊले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पाऊले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ गजानन खराटे, नीलिमा सरप(लखाडे), सदस्य सचिव आ.उ. पाटील उपस्थित होते.

सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा ? : नाना पटोले

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृत्तीस काही झाले तर जबाबदार कोण?

लोणावळा, दि. १६ फेब्रुवारी
मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेत ५०० च्या प्रश्न आहेत एका अर्जाला तास ते दीड तास लागतो मग कोणत्या आधारावर हा सर्वे केला? मुंबई शहरात सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा काय होऊ शकतो? असे प्रश्न उपस्थित करत सरकार मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

लोणावळ्याच्या हॅाटेल मेट्रो पार्क येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाच दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचा शुभारंभ झाला, त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व घेतलेली शपथ पूर्ण केली असे नवी मुंबईत जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना जाहीर केले होते. पण पुन्हा उपोषण करण्याची वेळ जरांगे पाटील यांच्यावर का आली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? हे जनतेला समजले पाहिजे. सरकार दोन जातीत भांडणे लावत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचे काम करत आहे त्याचा निषेध करतो.
मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे व सर्वपक्षीय बैठकीतही ते मान्य करण्यात आले होते. नागपुरच्या हिवाळी अधिवोशनातही काँग्रेसने आरक्षण प्रश्न उपस्थत करत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी विचारणा केली होती पण सरकारने स्पष्टता आणला नाही. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने पास करुन घेतला होता. परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टानत टिकले नाही, कोर्टाने ताशेरे ओढले. आता पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी दोन दिवसांच्या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, कायदा करत असताना स्पष्टता आली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा. अध्यादेश काढण्यास अधिवेशनाची गरज नाही तो पास करण्यास अधिवेशन लागते. आयोगाच्या अहवालात काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे पाटील यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय ? तसेच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृत्तीला काय झाले तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे पाटील यांची बोलणी झाली, उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला असे सांगितले मग पुन्हा उपोषण करण्याची गरज काय पडली याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, पृथ्वीराज साठे, प्रवक्ते राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

नवले पुलावर पुन्हा अपघात,भरधाव डंपरची ट्रॅव्हल्सला धडक

नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच19 ब्लॅकस्पॉट निश्चितमृत पावणाऱ्यांमध्ये 67% दुचाकी स्वारांचा समावेश

पुणे-भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये डंपरचालकासह बसमधील ६ प्रवाशी जखमी झाले आहेत. मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 6 ते 7 च्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे. इथून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत असताना मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघात डंपर चालकासह बसमधील 6 प्रवाशी असे एकूण 7 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात ट्रॅव्हल्सचे तसेच डंपरचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या पुलावर विचित्र स्लोप असल्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील नवले पुलावर अपघातांच्या घटना सातत्याने घडत असतात. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

शहरातील 19 अपघात प्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट) निश्चित केली आहेत. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा करण्यासंबंधी वाहतूक पोलिसांनी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला असून त्यानुसार काही सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांमध्ये 67% दुचाकी स्वारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जरांगेंच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदारी कोणाची ?:मागासवर्गीय आयोगाचा अहवाल दोन तासाच्या आत जनतेसमोर ठेवा -पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला दिला इशारा

गुलाल उधळला, प्रश्न सुटला सांगितले….आता पुन्हा ते उपोषणास बसले ,याचा अर्थ सरकारकडून फसवणूक झाली.

दोन तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते जनतेसह आमच्यासमोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या.

सातारा-मनोज जरांगेंच्या जीविताला धोका झाल्यास जबाबदारी कोणाची?, असा स्पष्ट सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र सरकराने आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला पाहू द्या. हा अहवाल विधीमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही विधीमंडळापेक्षा राज्यातील जनता सर्वोच्च आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जरांगेंचे नवी मुंबईत उपोषण सोडले गेले. गुलाल उधळला गेला. प्रश्न सुटला गेले असे सांगितले गेले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले ते सांगावे. मराठा आरक्षणाची स्पष्टता झाली पाहिजे. आज पुन्हा ते उपोषणास बसले आहेत. याचा अर्थ सरकारकडून त्यांची फसवणूक झाली आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जरांगे पाटील यांची तब्बेत नाजुक आहे, त्यामूळे तोबडतोब मार्ग काढा. दोन तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसह आमच्यासमोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या. त्यासाठी 20 तारखेची वाट कशाला पाहता, अशात त्यांच्या जिवीताला धोका झाला तर जबाबदारी कोणाची असणार असा प्रश्न सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा सामाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त करण्यात आला. लोणावळा येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्याच दिवशी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टिका केली आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तातडीने वेबसाईटवर टाकून जनतेसमोर आणावा आणि अध्यादेश काढावा, त्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनाची गरज नसल्याचे सांगूण मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

माधव भंडारींचे नाव 12 वेळा चर्चेत, पण उमेदवारी नाही:माझे वडील ५०वर्षे निष्ठावंतच पण काहीच न मिळालेल्या नेत्यांपैकी एक-अखेरीस मुलाची खंत

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मुलाने भाजपला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान मोदींसोबत वडिल माधव भंडारी यांचा फोटो ट्विट करत गेली ५० वर्षे पक्षनिष्ठा असलेले आणि राज्यात काही न मिळालेल्या नेत्यांपैकी एक असल्याची व्यक्त खंत केली आहे.

नेमके चिन्मयचे ट्विट काय?

चिन्मय भंडारी याने पोस्टमध्ये ती वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने माधव भंडारी यांनी 1975 ला जनसंघ जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर 1980 मध्ये भाजपची निर्मिती झाली. आता त्याला जवळपास 50 वर्ष झाल्याचे म्हटले आहे. या 50 वर्षांच्या काळात माधव भंडारी यांनी महाराष्ट्राच्या विविध संघटना बांधणीचे काम केले. हजारो लोकांना, शेकडो गावांना मदत केली आहे.

चिन्मय भंडारी म्हणाले की, आत्तापर्यंत 12 वेळा मी त्यांच्या नावाची चर्चा विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी होताना पहिली आहे, 12 वेळा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. नेतृत्वाला याचा जाब अथवा त्यावर भाष्य करण्याच्या परिस्थिती नाही. ना मला तसे काही करायचे आहे, कारण माझ्या वडिलांसारखा माझा देखील त्यांच्यावर विश्वास आहे.

चिन्मय भंडारी म्हणाले की, पण एक आशा आणि दुःख तर सारखं होतंच. त्यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले तिला दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. त्यांनी पक्षाचे काम कधीच थांबवले नाही, त्यांची तब्येत बिघडली असताना देखील नाही, गेल्या वर्षी त्यांच्या जवळची व्यक्ती गमावली तेव्हाही नाही. याउलट, मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेल्या लोकांना शुल्लक कारणावरून अन्यायाच रडगाणे गाताना बघितल आहे. माझ्या देखत बघितलेली त्यांची 30 वर्षांची कारकीर्द आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांना योग्य ते मिळेल अशी मी आशा करतो.

सत्तेच्या गैरवापराविरोधात माधव भंडारी यांनी भूमिका मांडली,सामान्य लोकांचे प्रश्न मांडले. 2014 मध्ये पक्षाचे सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना आणि ते प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, अनेक पुस्तकाचे लेखन केले, असे चिन्मय भंडारी याने म्हटले आहे.

ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केले त्याला दुखावण्याचे काम त्यांनी केले नाही.प्रकृती बरी नसताना आणि आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतरही पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवले नाही. मी काही लोक ज्यांना पक्षाने मंत्री केले, खासदार केले अशांना अन्याय झाल्याचं म्हणताना पाहिल्याचे चिन्मय भंडारी याने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील मातब्बर मल्ल हडपसर मध्ये दाखल,उद्यापासून रंगणार सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

पुणे – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १6 फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्ल भाग घेणार असून, मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी व रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. तब्बल 550 मल्ल यात सहभागी होणार आहेत.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी,हडपसर पुणे येथे पार पडणार आहेत.

विशेष म्हणजे वियजी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली, बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम ५ लक्ष रुपये , चांदीची गदा व बुलेट मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास ३ लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास २ लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास १ लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.

दरम्यान, भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व त्यांच्या नियमानुसार होणार असून, या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे.यास्पर्धेचे उदघाटन खासदार डॉ श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन,शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के,यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी/हिंद केसरी अभिजित कटके, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

ट्रॅफिक प्रश्नासाठी’वेकअप पुणेकर’ कडूनपाठपुरावा चालू

वाहतूक उपायुक्तांशी चर्चा-संयोजक, माजी आमदार मोहन जोशी

पुणे – विविध चौकांमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक जॅम च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ मार्फत पाठपुरावा चालू असून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याशी चर्चा करण्यात आली, अशी माहिती ‘वेकअप पुणेकर’ चे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) दिली.

कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलाच्या पाडकामाआधी करण्यात आलेल्या प्रायोगिक वाहतूक बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ च्या निदर्शनास आणून दिल्या. मंगलदास रोड वाहतुकीसाठी एकेरी न ठेवता पूर्वीसारखीच दुतर्फा वाहतूक चालू ठेवावी, मोबोज हॉटेल चौकातील बॅरिकेड्स ताबडतोब काढण्यात यावेत, त्या चौकातील रसत्यांवर तीन ते चार ट्रॅफिक वॉर्डन दिवसभरासाठी तैनात व्हावेत, अशा उपाययोजना नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ला सुचविल्या होत्या. पोलीस उपायुक्तांकडे त्या सूचनांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

दहावी, बारावी आणि इतर वार्षिक परीक्षेनंतर पुलाचे पाडकाम करावे, अशीही सूचना नागरिकांकडून आली होती, ती ही उपायुक्तांकडे दिल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

ट्रॅफिक समस्येवर नागरिका़ंकडून ‘वेकअप पुणेकर’ मार्फत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संघटना, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ यांना ‘वेकअप पुणेकर’ने एकत्रित आणले आहे. ट्रॅफिक प्रश्नातून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, असा प्रयत्न असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

वाहतूक उपायुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत धैर्यशील वंदेकर, वीरेंद्र किराड, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, संकेत गलांडे, किशोर मारणे, प्रा.यशराज पारखी, सचिन भोसले, पल्लवी सुरसे, विश्वजीत जाधव आणि अधिकारी वर्ग सहभागी झाला होता.