स्पाइस मनी महाराष्ट्रातील उद्योजकांना सक्षम करत पर्यायाने रोजगाराच्या संधी वाढवणार
पुणे – स्पाइस मनी (डिजीस्पाइस टेक्नॉलॉजीची उपकंपनी) ही भारतातील ग्रामीण फिनटेक क्षेत्रातील पायोनियर आणि नागरिकांच्या बँकिंग सेवा वापरण्याच्या पद्धतीत क्रांती आणणाऱ्या कंपनीने महाराष्ट्रात आपल्या स्पाइस मनी गॅरंटी ड्राइव्हसह महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. या धोरणात्मक उपक्रमाद्वारे भागिदारी मजबूत करण्याचे आणि २१ शहरांतील वितरकांना समाविष्ट करत आपल्या नॅनोप्रेन्युअर कम्युनिटीसाठी आपसात जोडली गेलेली यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. गेल्या वर्षात स्पाइस मनीने महाराष्ट्रात अधिकारी नेटवर्कच्या विस्ताराच्या माध्यमातून ४३९९ कोटी लक्षणीय एकूण व्यवहार मूल्य (जीटीव्ही)नोंदवले आहे.
या नेटवर्कमध्ये नॅनोप्रेन्युअर्सचा समावेश असून ते २०२२ पासून २०२३ मध्ये आकर्षक १० टक्क्यांनी वाढले असून एकूण व्यवहार ५.८ कोटींवर गेले आहेत. यावरून आर्थिक उपलब्धता क्षेत्रातील स्पाइस मनीची प्रमुख भूमिका स्पष्ट होते. १२,३६५ गावांतील ३७ लाख ग्राहकांना सेवा देणारी स्पाइस मनी आर्थिक सक्षमता आणि सर्वसमावेशकतेला चालना देत आहे. देशभरातील १३ लाख अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा नॅनोप्रेन्युअर्समधील वाटा ४.७३ टक्के आहे. यावरून आर्थिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यातील स्पाइस मनीची भूमिका अधोरेखित होते.
स्पाइस मनीने स्पाइस मनी गॅरंटी ड्राइव्ह कॅम्पेनच्या माध्यमातून आपल्या विस्तारित नेटवर्कसह अधिक सखोल नाते प्रस्थापित करण्याचे ठरवले आहे. कंपनीने सहकार्यपूर्ण यंत्रणा उभारण्याचे ध्येय ठेवले असून त्याद्वारे नॅनोप्रेन्युअर्सना एकत्र येण्याची, माहितीची देवाणघेवाण करण्याची आणि स्पाइन मनीच्या नाविन्यपूर्ण आर्थिक सेवांना यश मिळवून देणारे नाते अधिक बळकट करण्याची संधी दिली जाईल.
कंपनी नॅनोप्रेन्युअर्ससाठी धोरणात्मक पद्धतीने यंत्रणा उभारत असून अधिकारी वर्गाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आर्थिक साक्षरतेचा प्रसार केला जात आहे. अधिक सर्वसमावेशक यंत्रणा तयार करण्याचा कंपनीचा दृढनिश्चय स्त्री अधिकाऱ्यांची नेमणूक करून नेटवर्कमध्ये वैविध्यता आणण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांवरून अधोरेखित झाली आहे.
स्पाइस मनी असिस्टेड पेमेंट सेवांपासून सर्वसमावेशक बँकिंग सेवा देण्यापर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. या विस्तारामध्ये करंट आणि बचत खाती सुरू करणे, नॅनोप्रेन्युअर्सना कर्ज व रोख वसुली सेवेचे ध्येय देणे यांचा समावेश आहे. या बहुपेडी धोरणावरून स्पाइस मनीची भारतात प्रभावी आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्याची बांधिलकी दिसून येते.
याच विकास धोरणाशी सुसंगत राहात स्पाइस मनीने महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली असून गेल्या वर्षापर्यंत एकूण २२.५ कोटी आधार-अनेबल्ड पेमेंट्स सिस्टीमचे (एईपीएस) व्यवहार झाले आहेत. एईपीएस आणि रोख व्यवस्थापन यंत्रणा, डायरेक्ट मनी ट्रान्सफर, मिनी- एटीएम्स आणि भारत बिल पेमेंट सेवा ही उत्पादने स्पाइस मनीच्या येथील यशात महत्त्वाची ठरली आहेत. महाराष्ट्रात स्पाइस मनीच्या उत्पादनांना मिळालेले यश या प्रदेशाची डिजिटल उत्पादनांचा अवलंब करण्याची स्वीकारार्हता दर्शवणारे आहे. महाराष्ट्र स्पाइस मनीच्या आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचे ठरले असून विशेषतः ५४.७८ टक्के जनता राहाते, त्या ग्रामीण भागात (२०११ च्या लोकगणनेनुसार) कंपनीला यश मिळाले आहे.
स्पाइस मनीचे संस्थापक दिलिप मोदी म्हणाले, ‘भारतात स्पाइस मनीच्या यशाला चालना देण्यात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अधिकारी नेटवर्कचा लक्षणीय विस्तार आणि येथील डिजिटल आर्थिक सेवांमध्ये झालेली वाढ यावरून डिजिटल विश्व आपलेसे करण्याची या भागाची तयारी दिसून येते. आमच्या डिजिटल बँकिंग सेवांच्या माध्यमातून नॅनोप्रेन्युअर्सनी महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या भागात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक विकासाला चालना दिली आहे. ग्रामीण नॅनोप्रेन्युअर्सना सक्षम करण्याची आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना अर्थार्जनाच्या संधी मिळवून देण्याची आमची बांधिलकी कायम आहे.’
स्पाइस मनीची बांधिलकी आकडेवारीच्या पलीकडे जाणारी असून कंपनी देशभरात असिस्टेड- डिजिटल यंत्रणा उभारत आहे. अधिकारी वर्ग ९५ टक्के ग्रामीण भागात पोहोचत असून त्याअंतर्गत २.४ लाख गावे, ७०० जिल्हे आणि ६४५८ ब्लॉक्ससह स्पाइस मनी महिन्याला २०० लाख ग्राहकांना सेवा देत आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये ग्राहक जीटीव्हीमध्ये २० टक्क्यांची असामान्य वाढ नोंदवत ग्रामीण भागाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली. यातून देशभरात आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्याचे कंपनीचे धोरणही नव्याने अधोरेखित झाले आहे.
स्पाइस मनी यापुढील प्रवासात नॅनोप्रेन्युअर्सना सक्षम करण्यासाठी, अर्थार्जनाच्या संधी तयार करण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे.