Home Blog Page 1161

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधितून साडेआठ कोटी रुपयांचा निधी

पुणे, 13 जून : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहाचे भूमिपूजन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर यांच्या खासदार निधितून या वसतिगृहासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वसतिगृहात 280 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था होणार आहे.

जावडेकर म्हणाले, ‘मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे. एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.’

जावडेकर म्हणाले ‘पुणे विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, सिनेट मेंबर म्हणून जवळजवळ 15 वर्षे मी विद्यापीठात विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या अनुभवाचा मला पुढील राजकीय, सामाजिक जीवनात मोठा उपयोग झाला. पुणे विद्यापीठाबद्दल माझ्या मनामध्ये आत्मीयता आहे. म्हणून मी ही सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.’

जावडेकर पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मोठे योगदान राहील, असा विश्वास वाटतो.’

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात नव्या डिझाईनिंग सेंटरसाठी अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या उद्देशाने 46 लाख रुपये आणि मिलेनियम स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबच्या धरतीवर उत्तम प्रयोगशाळा उभारण्यासाठी 40 लाख रुपयांचा खासदार निधी जावडेकरांनी उपलब्ध करून दिला आहे.

पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार :मोहोळ

पुणे: पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार असल्याची. प्रतिक्रिया पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हेच माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे.

पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीची मी विनम्रपणे स्वीकारतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवू हा सार्थ विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे. या दृष्टीने गेल्या दहा वर्षात पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. ही विकासाची गंगा पुढे नेत पुणे शहराला जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख निर्माण करायची आहे.

याबरोबर शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा एकदा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. पी. आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करीन. असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

संविधान देशाचा पाया; मोदीच काय, कोणालाही संविधानाला हात लावू देणार नाही: राहुल गांधी.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ‘नफरत’च्या बाजारात ‘मोहब्बत’ की दुकान उघडली.

मालेगावात भारत जोडो न्याय यात्रेचे प्रचंड जल्लोषात स्वागत.

मालेगाव, दि. १३ मार्च
भाजपा व आरएसएसचे लोक भावा-भावामध्ये भांडणे लावत आहेत, एका भाषेला दुसऱ्या भाषेविरोधात लढवत लावत आहेत, एका राज्याला दुसऱ्या राज्याविरुद्ध लढवत आहेत. एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात तर एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात लढवत आहेत. देशात आरएसएसचे कट्टरपंथी लोक व्देष पसरवत आहेत, असा आरोप करत ‘नफरत’च्या या बाजारात ‘मोहब्बत’ ची दुकान सुरु करत भारत जोडो न्याय यात्रा काढली असल्याचे, खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

धुळ्यातून मालेगावात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवेळी ते जनतेला संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, शेतकरी, कामगार, गरिब यांचे मुद्दे गंभीर आहेत पण त्यावर चर्चा होत नाही. मीडियावर २४ तास बॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटपटू नाहीतर मोदीच दिसतात, कधी ते समुद्राखाली गेलेले दिसतात तर कधी हवेत विमानातून उडताना दिसतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला पण पंतप्रधान मोदींनी तुम्हाला ताली बजावो, थाली बजाओ, मोबाईल टॉर्च दिखावो हे करण्यास सांगत होते. मोदी सरकारने लावलेल्या जीएसटी व नोटबंदीमुळे मालेगाव सारख्या शहरातील पॉवरलूम उद्योग बंद पडत आहेत. वाढत्या वीज दरानेही पॉवरलुम उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास पॉवरलुमची वीज दरवाढ थांबवण्यावर निर्णय घेऊ. नोटबंदी व जीएसटीमुळेच देशातील छोटे उद्योग बंद पडले आणि तरुणांच्या हातातील नोकऱ्याही गेल्या. देशात बेरोजगारी, महागाई व भागिदारी ह्या तीन मुख्य समस्या आहेत. शिक्षण घेऊन तरुण बाहेर पडतो पण त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून काँग्रेसने तरुणांसाठी पाच गॅरंटी दिल्या आहेत. पहिली नोकरी पक्की, पेपरफुटी कायमची रोखण्यासाठी कठोर कायदा, ३० लाख रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती केली जाईल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.
भारतीय जनता पक्ष संविधान संपवण्याची भाषा करत असतो. भाजपाच्या एका खासदाराने पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलण्याची भाषा परवा दिवशी केली. भाजपाने त्या खासदाराला तसे बोलण्यास सांगितले होते. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत, संविधान देशाचा पाया आहे, नरेंद्र मोदीच काय, देशातील कोणतीच व्यक्ती संविधान संपवू शकत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला संविधानाला हात लावू देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
भारत जोडो न्याय यात्रेला मालेगावात तुफान गर्दी जमली होती. मोठ्या संख्येने लोकांनी राहुल गांधी व न्याय यात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे

मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 : मराठवाडयातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्यासह मराठवाडयातील आठही जिल्हयांचे जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तसेच मराठवाडयातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मराठवाडयातील टंचाई स्थिती, काही जिल्हयातील अतिवृष्टी, तर काही भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. टंचाई निवारणासाठी शासनाकडून विविध सवलती व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.शासकीय यंत्रणेसोबतच काही सामाजिक संस्था टंचाई स्थितीत चांगले काम करत आहेत. मराठवाडयातील आठही जिल्हयात अशा स्वंयसेवी संस्थाचा टंचाई निवारणात सक्रिय सहभाग घ्यावा. प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

गावागावात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, रोजगार हमी योजने अंतर्गत कामे, बीड जिल्हयातील ऊसतोड मजूराचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर या बाबी नियोजन करताना प्राधान्याने विचारात घ्याव्यात. महिलांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासोबत महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळायला हवे. तसेच यावर कार्यरत असलेल्या महिलांसाठी असलेल्या सोई सुविधा तसेच त्यांच्या मुलांसाठी देखभाल सुविधा त्यांना मिळाली पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, शेती पंपाच्या वीजबिलात ३३.५% सूट, शेती पंपाचे वीस कनेक्शन न तोडणे तसेच पिण्याचे पाण्यासाठी टँकरची गरज आदींचा आढावा घेतला. टंचाई निवारणासाठी स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय असला पाहीजे. यासाठी प्रत्येक जिल्हयात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करावी. विद्यापिठांनी परिक्षा शुल्कात माफी दिली नसेल तर त्यांनी याबाबतचा खुलासा तातडीने करावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे व उपायुक्त नयना बोंदर्डे यांनी टंचाई स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळी स्थितीबाबत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी ऑनलाईन माध्यमातून श्रीमती दीपा मुधोल मुंडे जिल्हाधिकारी बीड, छ संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ कृष्णनाथ पांचाळ जिल्हाधिकारी जालना, श्री जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी हिंगोली, श्रीमती वर्षा ठाकूर घुगे जिल्हाधिकारी लातूर, श्री सचिन ओम्बसे जिल्हाधिकारी धाराशिव, श्री अभिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड, श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी हे उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्याची दुष्काळाची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी सांगितली. यावेळी दुष्काळावर विविध प्रकारच्या उपाय योजनावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था चे प्रतिनिधी श्री रमेश भिसे,श्री रमेश कुटे, श्री एच पी देशमुख व श्री पुष्कराज तायडे हे या बैठकीला हजर होते. या बैठकीत त्यांनी अनेक उपयुक्त सूचना प्रशासनास केल्या.

निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल… डॉ.नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांना इशारा

छत्रपती संभाजीनगर दि.१३ : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार आहे. शिवसेना महिला पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरण करण्याबाबत ज्या विविध योजना सुरू केल्या आहेत त्याची माहिती स्थानिक महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करण्याचे आवाहन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी येथील महिला पदाधिकारी बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या महिलांची संख्या राजकारणात तसेच समाजकारणात वाढताना दिसत आहे. महिलांचे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचप्रमाणे दुष्काळात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू होतील. यासंदर्भात आपण ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांना रोहयोच्या कामाची व शासन निर्णयाची माहीती देखील देण्याचे सूचना डॉ.गोऱ्हे यांनी महिला पदाधिकारी यांना केली.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून विचारपूस देखील केली.

यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, महिला संपर्कसंघटक सविता केवेंडे यांनी याबैठकीत काही मुद्दे मांडले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- शिल्पाराणी वाडकर, शहर- लक्ष्मीताई भुतडा, जालना – कलिंदा ढगे, बीड – सौ चंद्रकलाताई बांगर, गीता सूर्यवंशी – परभणी, युवासेनेच्या हर्षदा शिरसाट, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी येथील महिला पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होत्या.

पीएम -उषा योजनेजतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई, दि.१३ :- पीएम उषा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेल्या भरघोस अनुदानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील महाविद्याल आणि विद्यापिठांच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी मदत होणार आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

देशभरातील उच्च शिक्षण संस्था मधील गुणवत्ता सुधारणे आणि उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना २०१३ मध्ये सुरु केली. त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा २०१८ मध्ये राबविण्यात आला. राज्याला रुसा १ मध्ये रू २३६ कोटी तर रुसा २ मध्ये रू ३८६ कोटी मंजूर झाले होते.

नवीन राष्ट्रीय शक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी च्या अनुषंगाने या योजनेचा तिसरा टप्पा पीएम-उषा या नावाने २०२३ मध्ये जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्याने या योजनेत सामाविष्ट होत राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांचे देशातील सर्वाधिक म्हणजे ६८१ प्रस्ताव केंद्राला सादर केले होते. सादर केलेल्या प्रस्तावांपैकी एकूण ५८ प्रकल्प व ७९१.१७ कोटी निधी महाराष्ट्राला मंजूर झाला आहे.

बहुविद्याशाकीय शिक्षण व संशोधन विद्यापीठ यासाठी ४ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी, विद्यापीठांना सक्षमीकरणासाठी अनुदान अंतर्गत ७ प्रत्येकी २० कोटी, महाविद्यालयांच्या सक्षमीकरणासाठी अनुदान अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकूण ४३ महाविद्यालयांना पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी एकूण २१४.०८ कोटी निधी मंजूर झाला आहे.

या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या महाविद्यालयाला प्रत्येकी ५ कोटी रु. इतका निधी मिळणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना PM USHA योजनेचा लाभ मिळाला आहे तर समानता उपक्रम या घटक ५ मध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशीम या जिल्ह्यांना मुलींसाठी वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी एकूण 37.09 इतका निधी मंजूर झाला आहे. घटक ५ अंतर्गत राज्याला देशात सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

या योजनेसाठी प्रधान सचिव श्री. विकासचंद्र रस्तोगी, रुसाचे संचालक श्री. निपुण विनायक, यांनी रूसा कार्यालया मार्फत PM USHA योजने संबंधीत माहीत सर्व जिल्ह्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाला देऊन सदर योजनेत सहभाग घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

00000

अनोख्या कॉन्ट्रास्ट-फ्री अँजिओप्लास्टीच्या साहाय्याने धमनीमधील गंभीर स्वरूपाच्या ब्लॉकेजवर यशस्वी उपचार

·         कार्बन डाय ऑक्साइडचा वापर करून धमनीतील गंभीर ब्लॉकेजवर यशस्वी उपचार , किडनी ट्रान्सप्लान्ट झालेल्या रुग्णाच्या किडनीला इजा होण्याचा धोका दूर केला.

पुणे13 मार्च , 2024:  सोलापुरातील अकलूजचे रहिवासी, ६२ वर्षांचे सेवानिवृत्त गृहस्थ श्री संजय यादव (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये एक क्रांतिकारी वैद्यकीय प्रक्रिया करून पॉप्लिटल धमनीच्या गंभीर स्टेनोसिसमुळे पायातील वेदनांवर यशस्वी उपचार करण्यात आले. २०१७ साली श्री यादव यांच्यावर रेनल ट्रान्सप्लान्ट सर्जरी करण्यात आली होती, त्यामुळे कॉन्ट्रास्ट एजंट्सच्या वापराशी संबंधित संभाव्य धोक्यांमुळे श्री यादव यांच्यासमोर एक वेगळेच वैद्यकीय आव्हान होते, खासकरून किडनीशी संबंधित नुकसान होण्याची दाट शक्यता होती.

श्री. गाढवे यांना शरीरातील मांडी आणि गुडघ्याच्या भागाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी असलेल्या पोप्लिटियल धमनीमध्ये लक्षणीय अडथळे असल्याचे निदान झाले होतेज्यामुळे त्यांच्या पायाला रक्तपुरवठा कमी होत होता आणि तीव्र वेदना सहन कराव्या लागत होत्याज्याला सामान्यतः “लेग अटॅक” म्हणून ओळखले जाते. त्यांना त्वरीत सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांची मिनिमली इनवेसिव्ह अँजिओप्लास्टी करण्यात आली. शरीरावर खूपच कमी चिरा देऊन ही प्रक्रिया केली जाते. अँजिओप्लास्टीमध्ये कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर केला जातो पण या सर्जरीच्या बाबतीत विशेष बाब म्हणजे यामध्ये कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर केला गेला नाही कारण तसे केल्याने श्री यादव यांच्या ट्रान्सप्लान्टेड किडनीला धोका होऊ शकला असता. रक्तवाहिन्या पाहण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर करण्यात आला, अशाप्रकारे कोणत्याही कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर न करता संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली.

पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समधीलइंटरव्हेन्शनलरेडिओलॉजिस्टडॉकौरभीझाडे यांनी ही प्रक्रिया केली, कॉन्ट्रास्ट एजंट्सशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आणि किडनीच्या कार्यावर संभाव्य नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी या अनोख्या पद्धतीच्या महत्त्वावर भर दिला. त्या म्हणाल्या, यारुग्णाचेरेनलट्रान्सप्लान्टझालेलेहोतेत्यामुळेकिडनीलासंभवणाराधोकाकमीकरण्यासाठीकॉन्ट्रास्टएजंट्सचावापरटाळणेखूपआवश्यकहोतेयाकेसमध्येअँजिओप्लास्टीसाठीकार्बनडायऑक्साइडचायशस्वीवापरसह्याद्रि हॉस्पिटल्समधीलउपचारप्रक्रियाप्रत्येकरुग्णाच्यागरजेनुसारआणिसुरक्षितअसाव्यातयाप्रतीआमचीबांधिलकीदर्शवतो.”

अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यामुळे श्री यादव यांना “लेग अटॅक” मुळे पायात होणाऱ्या गंभीर वेदनांपासून मुक्ती मिळाली, इतकेच नव्हे तर, किडनीला दुखापत होण्याचा धोका देखील कमी झाला. रेनल ट्रान्सप्लान्ट झालेल्या रुग्णांच्या बाबतीत ही खूप मोठी जोखीम असते. या प्रक्रियेमध्ये शरीरावर खूप जास्त जखमा होत नाहीत त्यामुळे टाके घालावे लागले नाहीत आणि २४ तासांच्या आत श्री यादव स्वतःच्या पायांनी चालत घरी गेले.

श्री यादव यांची केस वैद्यकीय उपचारांमध्ये अभिनव तंत्रांच्या यशस्वी वापराचे आदर्श उदाहरण ठरली आहे. या केसने रुग्ण-केंद्रित, जोखीम कमी करणाऱ्या देखभालीच्या एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. या क्रांतिकारी केसने व्यक्तिगत रुग्ण देखभालीचे, खासकरून रेनल ट्रान्सप्लान्ट झालेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करून किडनीच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड न करता धमनीच्या गंभीर स्थितीवर यशस्वी व सुरक्षित उपचारांचे एक उदाहरण उपलब्ध करवून दिले आहे. किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये कॉन्ट्रास्ट एजंट्स वापरण्याच्या तोट्यांमध्ये कॉन्ट्रास्टमुळे नेफ्रोपॅथीचा धोका असतो, यामुळे किडनीचे आरोग्य खालावते.

यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वांगीण विकासामुळे आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा- डॉ. राजा दीक्षित

पुणे: आधुनिक महाराष्ट्राचे आदर्श नेतृत्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया त्यांनी रचला. साहित्य, संस्कृतीसह सर्वांगीण कार्य त्यांनी जोपासले त्यांच्यामुळेच आजचा आधुनिक महाराष्ट्र दिसतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

       स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव  चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त  यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते विलास रकटे यांना मराठी विश्वकोश  राज्य निर्मिती मंडळाचे अध्यक्ष  राजा दीक्षित यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात  प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांना ‘इष्टक’ या कवितासंग्रहासाठी कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, कवी भीमराव धुळूबुळू (मिरज) यांना ‘काळजाचा नितळ तळ’ या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’ , कवी गीतेश गजानन शिंदे (ठाणे) यांना ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कविता संग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.  मसपाचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर , माजी उपमहापौर दत्ता धनकवडे, ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, गौरव फुटाणे, सचिन जाधव यावेळी उपस्थित होते.

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार चळवळ, सुसंस्कृत राजकारणासाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आधुनिक महाराष्ट्र केवळ यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यामुळे होऊ शकला. त्यांनी आपले सर्व जीवन महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले. सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे म्हणाले, यशवंतराव चव्हाण व पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रेक्षक गृहामध्ये येऊन नाटक पाहिले. या आठवणीला उजळला देत त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य, कला त्यांनी जोपासली म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो,अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

व्यथा गोंजारली होती, मरण कवटाळले होते, तुला आम्ही टाळले नव्हते.…, याद येता तुझी मैना…,दिस जाई, सांज ढळे दूर कोठे उरे.., सांग रंग लावू कोणता,रंग रंगाचा सोडून द्या रे दंगा रंग लावू कोणता…,आभाळी नाही पाण्याचा थेंब…, जिणं फटातय…,म्हणून मी गाव सोडलं…, अशा वास्तव जीवनावर कविता सादर करुन श्रोत्यांना अंतर्मुख केले. सध्याच्या कोलमोडून पडलेल्या राजकीय परिस्थितीवर कवीनीं आपली कविता सादर करुन लोकशाही जीवंत ठेवण्याचे आवाहन कवि संमेलनातून केले. श्रोत्यांनी यावेळी कविसंमेलनाला भरभरुन दाद दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सत्कारानंतर राज्यभरातून आलेल्या प्रख्यात कवींचे कवी संमेलन रंगले.

गेली 36 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा कवी संमेलन अविरतपणे होत आहे. दरम्यान कवी संमेलनाला श्रोत्यांची तुडुंब गर्दी झाली होती.

चार पुरस्कार विजेते कवींसह अनिल धाकू कांबळी, भीमराव धुळुबुळू, गीतेश शिंदे, वैशाली पतंगे, प्रशांत मोरे, अंजली कुलकर्णी, विजय पोहनकर, प्रकाश होळकर , भाग्यश्री केसकर,नितीन देशमुख,मृणालिनी कानिटकर, अनिल दीक्षित  यांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे व अशोक नायगावकर यांनी कवि संमेलनाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण, समाजातील व्यथा कवितेतून  केले. तसेच आपल्या खास भाषेतून कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. टिळक स्मारक मंदिर श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. 

नितीन देशमुख यांनी यशवंतराव ही कविता सादर करून कवी संमेलनाची सुरुवात केली .

रामदास  फुटाणे यांनी‘ जरा अंगी येता, समाजाचे बळ  भुजा तिल बळ दर्शविति’ ही सद्य स्थिती वर सादर केली. ज्येष्ठ कवी फ. मु .शिंदे यांनी‘ टाहो हुंदक्यास देतो त्यांचे अनावर स्वर, विदूषकाचे  काळीज दुःख वेदनाचे घर’ ही वेदना सादर केली.

कवी विजय पोहनकर यांनी सादर केलेल्या शेतकऱ्यांची परिस्थितीमुळे डासराव खेडे सोडून शहरांमध्ये स्वच्छ वस्तीत जातो या कवितेला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. कवि  अनिल धाकू कांबळी यांनी आई आणि तरुण मुलगा मरण मागणारा यांचा होणारा संवाद  आपल्या कवितून मांडला. प्रशांत मोरे यांनी ‘ बाई फुफाटा फुफाटा  बाई ग, शेतीमातीच्या शहरात  गेल्या वाटा ग ‘ ही शेतकर्‍यांच्या अस्मानी संकटामुळे दुष्काळी परिस्थितीवर सल कवितेत सादर केली.

प्रकाश होळकर यांनी ‘आभाळी नाही पाण्याचा थेंब – शिवारी जळाला मातीचा कोंब ही रचना सादर केली.  कवी गितेश शिंदे यांनी 

‘ओझोनची छत्रीही शिवून घेऊ, झाडांच्या सालींनी

अथवा आकाशालाच फासू

सनस्क्रीन लोशन ‘ ही कविता सादर केली.

गझल, प्रेमगीते, राजकरण्यांवर विडंबन कविता सादर करत उत्तोरात्तर कार्यक्रम संमेलन रंगत गेले. त्याचबरोबर कवि रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांच्या खास शैलीतील किस्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

कवयित्री वैशाली पंतगे यांनी ब्रेकअप या कवितेद्वारे तसेच भाग्यश्री केसकर आणि अंजली कुलकर्णी यांनी महिलांच्या समस्या, व्यथा आणि स्वाभिमान त्याच्या रचनांतून मांडल्या.  रोजच्या जीवनातील व्यवस्थापनावर त्यांनी भाष्य केले.  अनिल दीक्षित यांनी राजकारणी पत्रातून जनतेला काय मागणी करतो त्यांच्या विडंबन कवितेतून सादर केले. अनेक कवीनीं राजकीय त्याच्या व्यंगावरील कवितेने रंग भरला. या कवितेला रसिकांची चांगली दाद मिळाली. कवि संमेलनात कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.  कवयित्रींकडून स्त्रियांच्या जिव्हाळा, निसर्गसौंदर्य, प्रेम-विडंबन, अशा अनेक विषयांना स्पर्श करत कवींनी रसिकांना खिळवून ठेवले होते. तर निसर्ग व प्रेम कवितांच्या सादरीकरणाने कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळवली.  कवि  अशोक नायगावकर यांनी  ‘ओनरशिप जेल’ या संकल्पनेवर आपल्या खास शैलीत कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला

वीज ग्राहकांच्या सेवेसाठी ऊर्जा चॅट बॉट उपलब्ध

मुंबई, दि. १३ मार्च २०२४:  महावितरणच्या वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणाऱ्या ऊर्जा या चॅट बॉटचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई येथे केले. महावितरणने आपल्या तीन कोटी ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससारख्या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा, असे मा. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऊर्जा चॅट बॉट उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे. ऊर्जा चॅट बॉटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दिवसाचे चोवीस तास आणि सप्ताहाचे सातही दिवस सेवा उपलब्ध असल्याने त्यांना सोईनुसार सेवेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना आता महानगर क्षेत्रामध्ये तीन दिवसांत, शहरी भागात सात दिवसात आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात वीज जोडणी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

मा. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या नव्या चॅट बॉटची माहिती देणारे सादरीकरण केले. ऊर्जा हे चॅट बॉट महावितरणने विकसित केले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर आणि ॲपवर ते उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅट बॉटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट बॉटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन होते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे ही या चॅट बॉटची वैशिष्ट्ये आहेत.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणचा ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीचा करार

मुंबई, दि. १३ मार्च २०२४:  राज्यातील वाढती कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने बुधवारी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले. वीज खरेदीचा दर माफक असल्याने वीज खरेदी खर्चात बचत होणे अपेक्षित असून त्यामुळे विजेचा दर मर्यादित ठेवण्यास मदत होईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महावितरणतर्फे ग्रीन एनर्जीवर भर दिला जात आहे. ही चांगली बाब असून पर्यावरण रक्षणासोबतच ही स्वस्त ऊर्जा महाराष्ट्राच्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. देशातील बॅटरी स्टोरेज आधारित ग्रीन एनर्जीचा वापर पीकिंग अवर्समध्ये म्हणजे कमाल मागणीच्या वेळी होणार आहे त्यामुळे सौर ऊर्जा उपलब्ध नसतानाच्या कालावधीत महाग वीज खरेदीची आवश्यकता राहणार नाही. या करारांमुळे नवीनीकरणीय ऊर्जा बंधनाचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होईल. एकंदरित वीज खरेदी खर्चात बचत होऊन ग्राहकांना भविष्यात अधिक किफायतशीर दरात वीज मिळेल, ही चांगली बाब आहे.

महावितरणचे संचालक योगेश गडकरी आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड चे कार्यकारी संचालक पवन वर्मा यांनी १८०० मेगावॅट नविनीकरणीय ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे १८०० मेगावॅटची अक्षय ऊर्जेवर आधारित स्टोरेज क्षमता निर्माण होणार असून ती कोणत्याही वीज वितरण कंपनीद्वारे आजवर करार झालेली संपूर्ण देशात सर्वाधिक क्षमता आहे. श्री योगेश गडकरी आणि नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक रणजीत ठाकूर यांनी १५०० मेगावॅट सौर ऊर्जेसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

बुधवारी झालेल्या करारांमुळे वीज खरेदीमध्ये बचत होण्यासोबत हरित ऊर्जेसाठीची जबाबदारी पूर्ण करण्यात मदत होणार आहे. त्यामुळे ‘नेट झिरो’चे उद्दीष्ट गाठण्यास मदत होईल. ही पर्यावरण पूरक ऊर्जा असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. महावितरणची विजेची मागणी सुमारे २५,४१० मेगावॅट असून वीज पुरवठ्यासाठी करार झालेली क्षमता आता ४१,५७० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामध्ये अक्षय ऊर्जेसाठी करार झालेली क्षमता १४,५५१ मेगावॅट आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणे आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या कल्पक योजनेअंतर्गत महावितरणची नवीकरणीय ऊर्जा क्षमता ९,१५५ मेगावॅटने वाढणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पाच हजार लाभार्थ्यांना मंजुरी

मुंबई, दि. १३ मार्च २०२४:  सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पाठविण्यात आले.

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. या योजनेचा आज राज्यात मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, प्रसाद रेशमे आणि योगेश गडकरी उपस्थित होते.

मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या लाभार्थ्यांना आज मंजुरी आदेश मिळत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा. महावितरणतर्फे मोहीम स्वरुपात ही योजना राबविण्यात यावी. जास्तीत जास्त ग्राहकांना योजनेचा लाभ होण्यासाठी योजनेबद्दल जनजागृती करावी.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी योजनेची माहिती दिली. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे. 

या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल ॲप ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी महावितरण राज्यातील ग्राहकांना मदत करते. महावितरणच्या पुढाकाराने यापूर्वी राज्यात १,३८,००० ग्राहकांनी रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता १९०० मेगावॅट आहे. यामध्ये एक लाख घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.

..पुण्यात भाजपा कुठेय ? तर फक्त कोथरूड मध्येच…

पुणे- गेल्या ५ वर्षाच्या सत्रात महापालिकेत सत्ता असताना, दरवर्षी पदाधिकारी बदलाचा ट्रेंड बदलून स्थायी समिती अध्यक्ष पद,त्यानंतर तब्बल ३ वर्षे महापौर पद अशी सुमारे ४ वर्षाहून अधिक काल शहराची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याच गळ्यात पुन्हा लोकसभेच्या उमेदवारीची माळ भाजपच्या नेत्यांनी घातल्यावर भाजपच्या नेत्यांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नसल्याचा सूर भाजपच्याच नगरसेवक वर्तुळातून उमटतो आहे. गेल्या सत्रात त्याच त्याच लोकांना भाजपा संधी देते आहे असा आरोप सातत्याने होत आला होता आता केवळ कोथरूड मधूनच भाजपा आहे कि काय ? कोथरूडच्या बाहेर भाजपा नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नुकतेच कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभा देऊन त्यांना खासदार करण्यात आले आहे.एक खासदार कोथरूड मध्ये भाजपचाच आहेच, या शिवाय कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटीलांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. कोथरूड मध्येच पदांची खिरापत नेते वाटत असल्याचा आरोप होत आला आहे त्यास आणखी बळकटी आता मिळते आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या पारड्यात मात्र यश मिळण्याची शक्यता आता आणखी वाढली आहे. अर्थात कॉंग्रेसला देखील चांगला उमेदवार देणे क्रमप्राप्त आहे.आणि चांगल्या उमेदवारांनी थेट राहुल गांधींच्या पर्यंत पोहोचणे क्रमप्राप्त होणार आहे. महापालिकेतला गेल्या सत्रातला कारभार फक्त मेट्रो पुण्यात झाली असल्याचेच दर्शवित आला आहे ज्याचे संपूर्ण श्रेय मात्र भाजपा घेऊ शकेल काय ? हे पाहावे लागणार आहे. मेट्रो शिवाय गेल्या ७ वर्षात कोणताही नवा प्रकल्प पुण्यात होऊ शकलेला नाही. रोजगार,महागाई,वाहतूक,पर्यावरण अशा असंख्य प्रश्नांकडे तत्कालीन भाजपा सत्ताधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत राहणार आहे.

पुण्यातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार २) रावेर – रक्षा खडसे ३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे ५) पुणे- मुरलीधर मोहोळ ६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर ८) धुळे – सुभाष भामरे ९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा ११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर १२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे १४) जळगाव- स्मिता वाघ १५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील १७) वर्धा – रामदास तडस १८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे २०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

पुणे- भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 समाविष्ट ३४ गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तत्काळ करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :- पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावातील निवासी-बिगरनिवासी मिळकतींना तीनपट ते दहापट वाढीव कर आकारण्यात आल्याने संबंधित गावांवर अन्याय होत आहे. तो दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्याय तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.  उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव के. गोविंदराज, आमदार सर्वश्री चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर यांच्यासह 34 गावांचे प्रतिनिधी,  नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावातील अवैध बांधकामावरील शास्ती व वार्षिक थकीत मालमत्ताकरावर लावण्यात आलेल्या 2 टक्के शास्तीच्या (विंलब आकार) वसुलीस पुढील निर्देशांपर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य शासनाने विशेष पत्राद्वारे दिले आहे. सदर शास्ती माफ करण्यासह 34 गावांतील मिळकतींवर आकारलेला तीनपट ते दहापट कर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक असल्याने ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करुन, 34 गावांतील मिळकतधारकांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने संबंधित गावांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १३ : भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला सैनिकी पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट/शिपाई फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील अधिसूचना तपशीलवार वाचावी. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापातील सूट दिली जाईल. याबाबतचा तपशिल अधिसूचनेत दिलेले आहेत.

लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भरती कार्यालयाद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांना अनुकूलता चाचणीला सामोरे जावे लागेल. या चाचणीचा भरती प्रक्रियेत प्रथमच समावेश केला आहे. अनुकूलता चाचणीसाठी उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी पुरेशी बॅटरी लाइफ आणि २ जीबी डेटा असलेला कार्यरत स्मार्टफोन आणणे आवश्यक आहे, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी कळविले आहे.
000