Home Blog Page 1130

२ पैलवानांंना.. दाजीने दिली मेव्हण्याच्या खुनाची सुपारी

पुणे-सख्या मेव्हण्याला जीवे ठार मारण्यासाठी त्याच्या दाजीनेच मध्यप्रदेश येधील कुस्ती पैलवानास सुपारी दिल्याच्या प्रकरणात महेश महादेव ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) आणि तथाकथित दाजी अश्विनीकुमार शेषराव पाटील वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०४/०२/२०२४ रोजी रात्रौ २२/३५ वा. सुमा फिर्यादी वय ३१ वर्ष रा. आपटे रोड पुणे हे आपले हॉटेल बंद करुन राहते घरी आले असताना दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांचे जवळ येऊन काही कारण नसताना त्यांचे तोंडावर लाल तिखट टाकुन कोणत्या तरी हत्याराने वार करुन गंभीर जखमीकरुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला बाबत डेक्कन पोलीस स्टेशन गुरनं २०/२०२४ भादंवि कलम ३०७,३२४,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश साबळे यांनी गुन्हयाचे घटनास्थळापासुन बालगंधर्व
चौक, वृधेश्वर घाट, पुणे मनपा, गाडीतळ चौक, मालधक्का चौक ठिकाणचे सविस्तर सीसीटीव्ही फुटेज पाहुनसंशयीत आरोपी माहिती घेवुन मार्ग काढुन संशयीत आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेले बाबत निष्पन्न केले.
या सीसीटीव्ही फुटेज व्दारे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयाचा तपास करुन निष्पन्न झालेला आरोपी नामे महेश महादेव ठोंबरे वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी पुणे सध्या आगरवाल तालीम, कसबा पेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या गुन्ह अनुशंगाने व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करता त्याने सदर गुन्हा फिर्यादीचे दाजी यांचे सांगणेवरुन ५० हजार रुपायांची सुपारी देवुन इसम नामे पैलवान फैजल खान व त्याचे दोन मित्र रा. मध्यप्रदेश यांचेसह केला असल्याची कबुली दिली.
इ महेश ठोंबरे याच्या सांगणेवरुन फिर्यादीचे दाजी इसम नामे अश्विनीकुमार शेषराव पाटील वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे. यास ताब्यात घेवुन त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्याचेकडे तांत्रिक विश्लेषण व केलेला तपास आधारे तपास केला असता त्यानेही सदर गुन्हयांची कबुली दिली आहे.
एकूणच महेश महादेव ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) यांनी अश्विनीकुमार पाटील यांचे सांगण्यावरुन सदर गुन्हयामध्ये पुर्व नियोजीत कट रचुन गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींना पुढील कार्यवाही कामी डेक्कन पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, शब्बीर सय्यद सहा. पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, अभिनव
लडकत यांनी केली आहे.

निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

पुणे, दि. २३: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबीर संपन्न

0

पुणे, दि. २३ : सहायक आयुक्त समाज कल्याण, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज (सी.वाय.डी.ए.) व मंगलमुखी किन्नर ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, तृतीयपंथी व्यक्तींच्या मतदारांसाठीच्या ब्रँड ॲम्बेसेडर प्रेरणा वाघेला, सी.वाय.डी.ए.चे प्रितेश कांबळे, मिलन लबडे, मंगलमुखी किन्नर ट्रस्टच्या श्रीमती मन्नत यांच्यासह सुमारे १०० तृतीयपंथी उपस्थित होते.

शिबीरात श्री. लोंढे आणि श्रीमती वाघेला यांनी तृतीयपंथी व्यक्तींना आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन केले.

हुकूमशाही विरोधात लाखो तरुण उभे राहावेत: किरण माने 

पुणे :हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा  सन्मान  ‘बोल के लब आजाद है तेरे’ या कार्यक्रमात   पुण्यात  करण्यात आला .दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे भारत जोडो अभियान, पुणे आणि इंडिया आघाडी ,   युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, निर्भय बनो, जनसंघर्ष समिती, स्वराज अभियान, एनएस यु आय , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार), जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती या संस्था,संघटना आयोजनात सहभागी झाले.
 प्रसिध्द अभिनेते किरण माने,दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ,लेखक,अभ्यासक प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

विविध आंदोलनातून हुकूमशाहीच्या विरोधात निर्भयपणे लढणाऱ्या अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,भक्ती कुंभार,एड.बाळकृष्ण निढाळकर,वैभव कोठुळे, सायांतन चक्रवर्ती, रिताग्निक भट्टाचार्य, मधुरीमा मैती, मनकल्प नोकवोहम,निहारिका भोसले, श्रावणी बुवा, आकाश नवले,  प्रथमेश नाईक आणि आश्चर्या अशा अनेक युवा प्रतिनिधींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात  आला. शेतकरी आंदोलन, ललित कला केंद्र हल्ला प्रकरण, निर्भय बनो सभा हल्ला प्रकरण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हल्ला प्रकरण, फिल्म इन्स्टिट्युट हल्ला प्रकरण अशा ठिकाणी दडप शाही विरुद्ध लढणाऱ्या युवक , युवतींचा यात समावेश होता.
नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. संदिप ताम्हणकर, इब्राहिम खान तसेच युवा आंदोलकांनी  मनोगत व्यक्त केले.  अशोक तातुगडे,  सुनील सुखथनकर , डॉ प्रवीण सप्तर्षी,अन्वर राजन, प्रशांत कोठडीया असे अनेक मान्यवर उपस्थित होते. एकनाथ पाठक यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना किरण माने म्हणाले, ‘ ७० वर्ष भारतीय कंदमुळं खावून जगत होते, असा समज करून दिला जातो.  २०१४ नंतर हवेत ऑक्सिजन वाढला ,असा समज करून दिला जातो.मात्र,मोदी हे अवतारी पुरुष असल्याने त्यांनी चहा विकलेले रेल्वे स्टेशन सापडत नाही, डिग्री सापडत नाही . याच काळात माणसाचा गुलाम होण्याची प्रक्रिया झाली. मेंदूवर कब्जा घेण्यात आला आहे. या अराजक काळात जे दोन हात करतील त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. म्हणूनच आज होत असलेल्या सत्काराचे महत्व आहे.

आपण देश वाचविण्यासाठी झटले पाहिजे. कलाकारांनी राजाचे भाट बनू नये. किरण माने दडपशाहीच्या विरोधात उभे राहिले म्हणून संपले, असे उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी संपलो नाही, म्हणून लढा देणाऱ्या कोणीही घाबरु नये. हुकूमशाही विरुद्ध लढणारे लाखो निर्माण व्हावेत, असेही ते म्हणाले.

 शिल्पा बल्लाळ म्हणाल्या,’  भगतसिंग यांनी केलेला स्फोट हिंसक नव्हता.  ती पहिली वहिली अभिव्यक्ती होती.   आज आपला लढा स्वातंत्र्य लढ्यासारखा आहे.  तरुण मंडळींनी हा लढा पुढे न्यायचा आहे. कलाकारांनी हिंसक अभिव्यक्ती पेक्षा सकारात्मक अभिव्यक्ती करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वव्यापी असली पाहिजे.गोडसेची अभिव्यक्ती हवी की गांधीजींची अभिव्यक्ती हवी, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘देशाची स्थिती बिकट आहे. त्याविरुद्ध लढा देण्याची शपथ आजच्या शहीद दिनी घेतली पाहिजे.संविधानाचा वारसा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न लपलेला नाही.ध्रुवीकरणाच्या द्वारे विखार पसरवला जात आहे. या लढाईत द्वेष जिंकणार नाही, तर प्रेम जिंकणार आहे’.

‘जो आमदार कसब्याचा, तो खासदार पुण्याचा’बापटांच्या फोटो वापरण्यावरून वादंग,काय म्हणाले,रविंद्र धंगेकर… 

पुणे : निवडणुकीतील अधिकृत प्रचाराच्या आधीच पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या एका छायाचित्रात दिवंगत खासदार गिरीष बापट यांचा फोटो वापरल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावर राळ उठविली आहे. ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा,’ अशी स्लोगन देत गिरीष बापट यांचे छायाचित्र यात वापरण्यात आले आहे.

धंगेकर यांचा त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर विश्वास नाही का? असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावर हे कोणी पोस्ट केली तेच मला माहिती नाही, असा दावा धंगेकर यांनी केला. आणि म्हणाले बापट जनमानसात मान्यता पावलेले नेते होते त्यांना एका चौकटीत बांधून ठेवणे योग्य नाही .. प्रत्यक्षात ते काय म्हणाले हे ऐका त्यांच्याच शब्दात …

आता निष्ठावंतच न्यायासाठी काढणार संघर्ष यात्रा-पुणे कॉंग्रेसमध्ये मोठी हलचल

पुणेआगामी काळात काँग्रेसच्या  कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता  निष्ठावंतांची  न्याय संघर्ष  यात्रा काढणार आहोत. त्यातून निष्ठावंतांची भावना सातत्याने पक्षाच्या श्रेष्ठींपुढे पोहोचवणार आहोत.पुण्यातून सुरू होणाऱ्या  या   निष्ठावंतांच्या   न्याय संघर्ष     यात्रेचे स्वरूप आगामी काळात शहर पातळीवरून राज्यच काय देशपातळीवर वाढेल. ज्यातून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी एकजूट निश्चितच होईल.अशी भूमिका काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडली. शिवाय  जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेसला  निष्ठावंतांची गरज आहे, ती एकजूट या निष्ठावंतांची  न्याय संघर्ष  यात्रेतून होणार आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंतांना विचारात न घेता सातत्याने डावलण्याचे होणारे  राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षातील प्रत्येक निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे यासाठी माजी उपमहापौर   आबा बागुल यांनी  काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन हजारो मेणबत्या प्रज्वलित करून मूक आंदोलन केले. त्यानंतर निष्ठावंतांच्या   न्याय संघर्ष   यात्रेचा शुभारंभ पुण्यातून झाला असून त्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे.  असेही  त्यांनी जाहीर केले.

आबा बागुल यांनी म्हटले आहे की, शहर काय राज्यपातळीवर काँग्रेसच्या निष्ठावंतांना सातत्याने डावलले जाते.त्यांची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे.  ‘आयाराम -गयारामा ‘साठी होणाऱ्या राजकारणात निष्ठावंतच भरडला जातो. पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या या निष्ठवंतांच्या व्यथेची दखल घेतली जावी आणि त्यांना पक्षात संधी मिळालीच पाहिजे. तसेच पक्षाच्या निष्ठावंतांना मानसन्मानाने बोलावून त्यांची विचारपूस करून त्यांच्या भावना आणि   जिथे कुठे निष्ठावंतांवर अन्याय होईल तिथे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून  त्यांच्यावर  होणारा अन्याय   पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रदेशच्या सर्व नेत्यांसमोर प्रत्यक्ष भेट घेऊन मांडला जाईल.  जेणेकरून  पक्ष वाढीला चालना मिळाली पाहिजे हा हेतू  या निष्ठावंतांची  न्याय संघर्ष     यात्रेचा असून   आता निष्ठेची ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही.  हेही त्यांनी स्पष्ट केले. 

 पक्षाचे काही ‘नतद्रष्ट’ पक्षाचे नुकसान करत आहेत.पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ गेली १५ वर्षे भाजपला पोषक करण्याचे कारस्थान या ‘नतद्रष्टां’नी  केले आहे. वास्तविक   तीन वेळा या मतदारसंघातही निष्ठावंतांवर अन्याय झालेला आहे.  या  ‘नतद्रष्टां’नी  काँग्रेसला पोषक असणारा हा  मतदारसंघ जाणीवपूर्वक भाजपला कसा   फायद्याचा ठरेल यासाठीच हातभार लावलेला आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी अडथळा ठरणाऱ्यांना आताच शोधून काढले पाहिजे.  नाहीतर काँग्रेस पक्ष वाढीला हा मोठा अडथळा राहील. यंदाच्या निवडणुकीवर या निष्ठावंतांची  न्याय संघर्ष     यात्रेचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत.आमचे कार्य सुरूच राहणार आहे .  मीच म्हणजे काँग्रेस अशा अविर्भावात असणाऱ्या आणि नेत्यांचे कान भरवणाऱ्या या  ‘नतद्रष्टां’ना आता बाजूला केले पाहिजे. आपल्याला जातीयवादी शक्तीला रोखायचे आहे. चारशे पार काय दोनशे पार होऊ देणार नाही असा निर्धार निष्ठावंतांनी केल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.

‘मीच म्हणजे काँग्रेस पक्ष’लाच आक्षेप, मग तुम्हीच उमेदवार कसा  निवडून आणणार?  

  शहर काँग्रेसच्या एका नेत्याच्या ‘मीच म्हणजे काँग्रेस पक्ष आणि मीच खासदारकीचे तिकीट बसवले’ या वक्तव्याचे तीव्र पडसाद   काँग्रेसच्या वर्तुळात उमटले आहेत. तुम्हीच म्हणजे काँग्रेस पक्ष असाल तर कार्यकर्त्यांनी काय करायचे? असा सवाल करताना ज्यांना काँग्रेस कुणाची, परंपरा काय  हेच माहित नाही अशा या नेत्याला इतका अहंमपणा आला कुठून अशी संतप्त प्रतिक्रिया निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमटली आहे. तुम्हीच म्हणजे काँग्रेस पक्ष असेल तर मग आता लोकसभेचा उमेदवार तुम्ही  विना कार्यकर्ते कसा  निवडून आणणार असा प्रश्नही   काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला  आहे. यावेळी माजी मंत्री श्री बाळासाहेब शिवरकर, पर्वती मतदार संघाचे निरीक्षक मुख्तार शेख, सरचिटणीस संतोष गेले, कॉंग्रेस पदाधिकारी गोरख मरल, तिळवण तेली समाज पुणे शहर अध्यक्ष घनशाम वलुंजकर, भीमज्योत संघटनेचे अध्यक्ष  गजानन किरते, मुस्लिम यंग सर्कल चे महमद शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे दीपक कूडले निष्ठवंत कार्यकर्ते व पुणेकर मोठ्या संखने उपस्थित होते.

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’

पुणे-मूळचे पैलवान असलेले आणि आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले पै. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी मिळाल्याने विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पुणे आणि परिसरातील मल्लांनी एकदिलाने करण्यात आला. पै. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढून असाही निश्चय करत यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.

पैलवानकीचा सराव करत असताना मोहोळ यांनी कोल्हापूर आणि पुणे परिसरात पैलवानांचा मोठा मित्र परिवार तयार केला होता. आज मोहोळ स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने पुणे आणि परिसरातील मल्लही मोहोळ यांच्या प्रचारासाठी एकवटले असून पुढील प्रचारासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात पुढील ४५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील अंबर हॅाल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते. पै. दीपक मानकर, पै. बापूसाहेब पठारे, पै. विकास दांगट, पै. आप्पा रेणूसे, पै. शुक्राचार्य वांजळे, पै. बाबा कंधारे, पै. हनुमंत गावडे, पै. योगेश दोडके, पै. संदीप भोंडवे, पै. विलास कथुरे, पै. ज्ञानेश्वर मांगडे, पै. विजय बनकर, पै. शिवराज राक्षे, पै. राजेश बारगुजे, पै. संतोष गरुड, पै. नितीन दांगट, पै. रामभाऊ सासवडे, पै. पंकज हरपुडे, पै. महेश मोहोळ, पै. राजू मोहोळ, पै. तात्या भिंताडे, पै. अभिजीत आंधळकर, पै. विजय जाधव, पै. अमोल बराटे, पै. शिवाजी तांगडे यांच्यासह पुणे आणि परिसरातील पैलवान मोठ्या संख्यने उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी विकी बनकर म्हणाले, आमच्या पैलवानांपैकी एक पैलवान थेट दिल्लीत जाणार आहे. ही आम्हा सर्वांसाठीच मोठी समाधानाची बाब आहे. म्हणून मोहोळ यांच्या विजयात आपलाही वाटा असावा अशी प्रत्येक पैलवानाची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकवटलो आहोत. आम्ही एकत्रित येत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करत असून यात हजारो पैलवान सहभागी होत आहेत. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवणे ही आता आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही यसस्वीपणे पार पाडू, हा विश्वास आहे’.

हिंद केसरी पै. योगेश दोडके म्हणाले, ‘मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही आम्हा सर्व पैलवानांचा सन्मान आहे. ते लोकसभेत गेल्यावर आम्हा पैलवानांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतील आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करतील, हा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सर्वांनी मोहोळ यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे’.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘लाल मातीशी नाते असणारा माझा परिवार एकवटला असून सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रचारासाठी सज्ज होत आहेत. येत्या कालावधी ८ ते ९ हजार पैलवान स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे माझा सर्व पैलवान परिवार माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.

पै. अप्पा रेणुसे म्हणाले, ‘पुण्यासारख्या शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पैलनावाला थेट संसदेत जाण्याची संधी मिळत आहे, हा सर्व पैलवानांचा सन्मान आहे. आपण सर्वांनी पुढील कालावधीत जबाबदारीने घरोघरी प्रचार केल्यास मोहोळ यांना मोठे मताधिक्य मिळेल’.

पै. दिपक मानकर म्हणाले, ‘मोहोळ यांच्या मागे पैलवानांची ताकद उभी राहिल्याने त्यांचे मताधिक्य विक्रमी असेल हा विश्वास आहे. आम्ही सर्वजण विश्वासाने एकत्र आलो असून ही निवडणूक मुरलीधर मोहोळ यांची नाही तर ही निवडणूक दीपक मानकर यांची आहे.’

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपने केले प्रचाराचे सूक्ष्म नियोजन

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय (ए) आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शहर भाजपने कंबर कसली असून, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात आज शहर कार्यालयात निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या समितीत ७० हून अधिक अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील समित्यांची निर्मिती पूर्ण झाली आहे.

शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, उपाध्यक्ष राजेश पांडे, चिटणीस ऍड वर्षा डहाळे, संयोजक श्रीनाथ भिमाले यांनी मार्गदर्शन केले.

भांडारी म्हणाले, उत्तम निवडणूक व्यवस्थापनातून पुणे मतदारसंघात भाजप विक्रमी मताधिक्य मिळवेल असा विश्वास वाटतो. व्यवस्थापन पूर्ण झाले असून त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

घाटे म्हणाले, बूथ समितीचे व्यवस्थापन, विविध समाज घटकांतील मतदार संपर्क, लाभार्थी संपर्क, प्रसिद्धी, डिजिटल माध्यमे, प्रचार व्यवस्थापन, साहित्य निर्मिती, नेत्यांचे दौरे, सभा मेळावे, आचारसंहिता आदी विषयांच्या समित्यांची स्थापना करून कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
मोहोळ यांना विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे

कार्बनमुक्त, अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर-डॉ. रेजी मथाई यांचे मत

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’वर चर्चासत्र
पुणे : “प्रगत तंत्रज्ञान, इनोव्हेशनच्या साहाय्याने शाश्वत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती होत आहे. रस्त्यांचा दर्जा उंचावत आहे. ईलेक्ट्रीकल व्हेईकल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असून, त्यासाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात कार्बनमुक्त व अपघाताविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे,” असे मत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी व्यक्त केले.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएई) इंडिया आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणाऱ्या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’वर चर्चासत्राचे आयोजन केले होते. होमियोपॅथ व काऊन्सलर डॉ. मीनल सोहोनी, ‘एआरएआय’च्या उपसंचालिका उज्ज्वला कार्ले, फोर्स मोटर्सचे डॉ. बाळासाहेब शिंदे, सागे इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीचे महेश शिंदे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले. 

कर्वे रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी व्हेक्टर इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे संचालक एन. पी. वाघ, ‘एआयएसएसएमएस’ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश वाघमारे, स्पेक्ट्राटेकचे संचालक केशव ताम्हणकर, ‘एसएई’ वेस्टर्न सेक्शनचे सदस्य प्रकाश सरदेसाई व संजय निबंधे, कार्यकारी संचालक रमेश पसरीजा, सहायक संचालक मोहन पाटील, व्यवस्थापक परेश शितोळे, सागर मुरुगकर व ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘एसएई’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.

डॉ. रेजी मथाई म्हणाले, “दळणवळण अधिक सक्षम होण्यासाठी ‘व्हिजन झिरो’ आणि ‘नेट झिरो’ संकल्पना राबविण्यात येत आहे. वाहतुकीसंबंधी नियमावली करण्यासह चार्जर, बॅटरी यामध्ये इंनोव्हेशन सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअरचा वापर वाढवून कार्बनमुक्त व अपघातमुक्त वाहतूक कशी बनवता येईल, या दृष्टीने विचारविनियम केला जात असून, त्या पद्धतीची धोरणे आपल्याला बनवावी लागतील. त्याचप्रमाणे २०२५ मध्ये ‘ई-२०’ ची अंबलबजावणी होणार आहे. हायड्रोजन इंधन वाढवण्यावर भर दिला जात आहे. जागतिक स्तरावर लागू होईल, अशा पद्धतीची नियमावली तयार केली जात आहे.”

डॉ. मीनल सोहोनी यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे, याचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. कार्यक्षमता वाढविण्यासाठी मनशांती गरजेची असून, कामाच्या धबडग्यातून स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. योग्य व्यायाम, प्राणायाम याचे महत्व अधोरेखित केले. प्रा. डॉ. अविनाश वाघमारे यांनी ‘एसएई’तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांविषयीची माहिती दिली. रमेश पसरीजा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अनिता वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. एन. पी. वाघ यांनी आभार मानले.

… तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ:राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी सांगितला मार्ग ..

अवघड आहे पण मार्ग आहे ….

मुंबई- कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचं काम पूर्ण करु. EVM ची कपॅसिटी 300 उमेदवारांची आहे. 300 पेक्षा जास्त उमेदवार झाले तर आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ, अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केली.

मनोज जरांगे यांच्या समर्थक आंदोलकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा केला जातोय, असे झाल्यास निवडणूक आयोगावर ताण पडू शकतो का? असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत श्री. एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहुल तिडके,  अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

या जिल्ह्यातून आले अर्ज?
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे. यासाठी 20 मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झालीय. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. आतापर्यंत रामटेक – 1 , भंडारा-गोंदिया 2, गडचिरोली-चिमूर – 2, चंद्रपूर – 0 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्किंग डेस कमी आहेत, त्यामुळे ते बघून अर्ज करावे. 17 मार्च ते 22 मार्च या एका आठवड्यात 1 लाख 84 हजार नवीन मतदारांची नोंदणी झालीय. आणखी मुदत बाकी आहे. लवकरात लवकर नवीन मतदारांनी नोंदणी करा”, असं आवाहन त्यांनी केलं.

आतापर्यंत किती जणांवर कारवाई?
आतापर्यंत 308 बिना परवान्याच्या शस्त्रास्त्रे जप्त केले आहेत. राज्यात 77 हजार 148 परवाने दिले गेले आहेत. त्यातील 45 हजार 755 शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आलीय. 13 हजार इसमांवर कारवाई करण्यात आलीय. मतदानाच्या दिवशी पेड हॉलिडे द्यावी. मतदानाच्या दिवशी ड्राय डे जाहीर झालाय. 85 वर्षांवरील नागरिकांना गृह मतदानाची सुविधा असेल”, अशी माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

कारवाईतून किती पैसे जप्त?
आचारसंहिता सुरु झाल्यापासून आतापर्यंच कोट्यवधी रुपये विविध कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई उपनगरातून सर्वात जास्त कॅश जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. जिल्हा स्तरावर कारवाई सुरू आहे. आम्ही भारतीय निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी पोहोचवतोय. 98 हजार अंतर्गत पोलीस स्टेशन आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

 भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर – 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदारांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकूण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

10 – नागपूर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकूण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.

11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकूण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.

12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकूण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

13-चंद्रपूर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकूण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.

निरीक्षकांची नियुक्ती

भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, एससीएस, भारतीय वनसेवा, राजपत्रित  अधिकारी  हे जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक,पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले जातात. सन 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील निरीक्षक अधिका-यांचे प्रशिक्षण भारत निवडणूक आयोगाकडून दि.11.03.2024 रोजी नवी दिल्ली येथे व आभासी प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून या निरीक्षक अधिकाऱ्यांची निवडणूक टप्प्यांनुसार लोकसभा मतदार संघामध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात 5 जनरल निरीक्षक, 6 खर्च निरीक्षक व 3 पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

   कायदा व सुव्यवस्था : 13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

      लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 निप:क्षपाती व शांततापूर्वक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्याअंतर्गत दि.22 मार्च रोजी  सकाळी 6 वाजेपर्यंत 308 परवाना नसलेली शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 77 हजार 148 शस्र परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्त्रांच्या अनुषंगाने ताब्यात घेणे, जप्त करणे किंवा मुभा देणे इ. कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित कार्यवाही सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी प्रमाणे 13 हजार 141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दि.16 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून, प्रथम टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची दि.19 व 20 मार्च 2024 या कालावधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय सरमिसळ करण्यात आलेली असून प्रथमस्तरीय सरमिसळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन्सची विभागणी करण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहितेबाबत :- भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च च्या प्रसिद्धीपत्रकान्वये लोकसभा  सार्वत्रिक निवडणूक- 2024  चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यानुसार  महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्तीची थोडक्यात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 साठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) कळविण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत अंमलात आणावयाची तत्वे सर्व संबधितांना निदर्शनास आणण्यात आलेल्या आहेत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथकाच्या प्रमुखांना दि.16 मार्च ते दि.6 जून या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करुन फौ.प्र.संहिता-1973 च्या कलम (129), (133), (143) व (144) खालील शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत राज्य शासनाच्या एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करणे वा आचारसंहितेमधून सूट देणे या करिताचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरिता छाननी समिती गठित करण्यात आलेली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सर्व पक्षांना व अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक संभाषणाच्या घसरत्या पातळीबद्दल व प्रक्षोभक भाषण टाळण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भातील महाराष्ट्र राज्याचा 24, 48 व 72 तासाचा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला  आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. मतदान केंद्रांवरील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांना कळविण्यात आले आहे.

माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष

राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्यूजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे.  जिल्हा स्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अधिनस्त माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

माध्यम  पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडिओ/ संदेश यांचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती व अपिलीय समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सुरु आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार मार्गदर्शिका तयार केली आहे. सदर मार्गदर्शिका राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण दोन कोटी 72 लाख 40 हजार मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी दोन कोटी 17 लाख 92 हजार, हिंदी 40 लाख 86 हजार) व इंग्रजी 13 लाख 62 हजार मतदार मार्गदर्शिका छपाई करुन त्याचे वाटप करण्याबाबत संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सदर मार्गदर्शिकेची छपाई करुन जिल्ह्यांना वाटप करण्याची कार्यवाही संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस व मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यासाठी संबंधित विभागास कळविण्यात आलेले असून कामगारांसाठी  मतदाना दिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय दि. 22 मार्च रोजी उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे. गृह विभागाकडून कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतची व सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

महिला मतदारांच्या मनात मतदानाबद्दलची भावना समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण करणार; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती

स्त्री आधार केंद्र व गरवारे महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचा पुढाकार

पुणे दि.२३: काही दिवसांपूर्वी विधिमंडळाला गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भेट दिलेली होती. त्यावेळी महिला मतदारांच्या लोकप्रतिनिधी यांचे कडून काय अपेक्षा आहेत याबाबत चर्चा झाली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून राज्यातील महिला मतदारांचे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी स्त्री आधार केंद्र व गरवारे महाविद्यालयाचे पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग मिळून सर्व्हेक्षण करणार असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे पत्रकरिता व जनसंज्ञापन विभाग आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी सुधीर भोसले म. ए. सो. सहायक सचिव, डॉ नूतन कानेगावकर विभाग प्रमुख, प्रा संतोष गोगले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, यापूर्वी स्त्री आधार केंद्रांने महिला मतदारांचा अंदाज घेतला होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. त्यामध्ये कुठली नक्की निवडणूक आहे याची अनेक मतदारांना माहिती नसते. तसेच निवडणुकीचा आठवडा जवळ आल्यावर राजकीय जागृती अधिकाधिक होते असे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला मतदारांचे सर्वेक्षण पुढच्या महिनाभरामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिला मतदारांच्या अपेक्षांच प्रतिबिंब या व येणाऱ्या सर्व निवडणुकात पडावं हे अपेक्षितच आहे.म्हणून अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून महिला मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा दृष्टिकोन समोर ठेवून सर्वेक्षणाला ३० मार्चपासून सुरुवात होईल. त्याच्यानंतर ते साधारणपणे ३० मे पर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून समोर आलेल्या माहितीचे विविध माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत त्याचे निष्कर्ष किंवा निरीक्षण मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे सर्व्हेक्षण म्हणजे महाराष्ट्रातील ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल नसून तो एक समाजशास्त्राच्या अभ्यासातून महिला मतदारांमध्ये जागृती करण्यासाठीचा अराजकीय उपक्रम असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

‘स्वर स्नेहांकित ‘ मधून  नातेसंबंधांचा सुरेल  शोध !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम 
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित  ‘स्वर स्नेहांकित ‘ या संगीत कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
    हा कार्यक्रम अबीर इव्हेन्ट या संस्थेने   सादर केला.गौरी गोळे-लिमये यांनी भावसंगीत, भक्ती संगीत, नाटय संगीतातून बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या गायनाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अदिती गराडे(संवादिनी),अवधूत धायगुडे(तालवाद्य),अक्षय शेवडे(तबला) यांनी  साथसंगत केली. हर्षद लिमये यांनी कार्यक्रमाचे  निवेदन केले.  या कार्यक्रमात मानवी आयुष्यातील नात्यांचा सुरेल शोध भावसंगीत,नाट्य संगीत आणि भक्ती संगीताच्या माध्यमातून घेतला गेला.

नाट्यसंगीतामध्ये ‘ उगवला चंद पुनवेचा ‘ ,अभंगामध्ये ‘अबीर गुलाल उधळीत रंग ‘,भावगीत मध्ये  ‘हसले मनी चांदणे ‘, ‘कुहू कुहु  येई साद’, सादर करण्यात आले.चित्रपट गीतामध्ये ‘ आळविते केदार, ‘भरजरी ग पितांबर दिला फाडून ‘ सादर करण्यात आले. त्याचबरोबर रागमाला, चतरंग हे शास्त्रीय संगीतातील प्रकारही सादर झाले.
हा कार्यक्रम शनिवार,२३ मार्च  २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच   सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १९९ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला.

श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीचा ग्राहक मेळावा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२४) ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे ते कुटुंब सक्षम पणे स्थिरस्थावर झाल्याचे दिसते. योग्य आर्थिक व्यवस्थापन करून बदलत्या काळातील नवतंत्रज्ञान आत्मसात करीत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरुषांबरोबरच महिलांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. अनुभवी सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन केले तर प्रत्येकाला सुरक्षित आर्थिक उद्दिष्ट गाठता येते असे प्रतिपादन श्रीनिवास होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक ओंकार पटवर्धन यांनी केले.
श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीच्या ग्राहक आणि हितचिंतकांचा ग्राहक मेळावा शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कंपनीच्या वतीने ‘बदलत्या काळाची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट विषयी थोडक्यात’ या माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. जगदीश ढेकणे, अनिकेत बुटाला, आनंद मुथा, कंपनीचे संचालक सुहास गनबोटे, अरुणा गनबोटे, स्नेहल पटवर्धन, चैतन्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी चैतन्य कुलकर्णी व सह कलाकारांनी हिंदी, मराठी चित्रपट व पारंपारिक गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
ओंकार पटवर्धन यांनी आर्थिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, आर्थिक नियोजन हा खूप मोठा आणि कधीही न संपणारा विषय आहे. यामध्ये बरेच टप्पे आहेत. पण कुठून तरी सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. बाजारामध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीची सुरक्षितता, तरलता, कर, परतावा, अनुकूलता आणि गुंतवणुकीची वेळ याचा प्राधान्याने विचार करावा. सुरक्षिततेसाठी आयुर्विमा, अपघात विमा, तसेच अचानकपणे उद्भवणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी राखीव निधी, दीर्घकालीन ठेव योजना, आवर्तक ठेव योजना, एसआयपी (पद्धतशीर गुंतवणूक योजना), एसडब्लूपी याबाबत माहिती घ्यावी. आधी घर घ्यावे की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. निवृत्तीनंतरची आर्थिक गरज याविषयी ओंकार पटवर्धन यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. निवडक ग्राहकांनी आपले कंपनीच्या सेवा सुविधा विषयी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
स्वागत, प्रास्ताविक स्नेहल पटवर्धन आणि आभार अरुण गणबोटे यांनी मानले.

फकिरभाई पानसरे कॉलेज ऑफ थेरपीचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात

mपिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२४) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. म्हणजे स्वप्नांना गवसणी घालता येईल. आज तुम्ही फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. हे यश संपादन करताना आई – वडील, शिक्षकांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका. फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून उत्तम सेवा प्रदान करा, असे प्रतिपादन चाकण नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रावार यांनी केले.
स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या निगडी येथील फकिरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा सातवा पदवी प्रदान समारंभ प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. संजीव कुमार पाटील, जॉर्न जोशेफ, जॉर्डन संसारे, स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष निहाल आझम पानसरे, संचालिका डॉ. झोया पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव, प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉ. झोया पानसरे म्हणाल्या, तुम्ही फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली आहे. पुढील काळात फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारीने काम करा. आपल्या ज्ञानाचा समाजाला उत्तम सेवा देण्यासाठी उपयोग करा, असे डॉ. झोया पानसरे यांनी सांगितले.
आपल्याला पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे समजू नका. शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सातत्याने नवनवीन शिक्षण, संशोधन, अनुभव यांचा ज्ञान रूपी संचय जमा करा. उपचारासाठी आलेल्या रूग्णांना धीर दिला पाहिजे. गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना मदत करा. आपले आईवडील, गुरूजनांना विसरू नका‌; याप्रमाणे कार्य करीत राहिलात तर पुढील आयुष्यात यशोशिखरावर पोहचाल असे डॉ. श्याम अहिरराव म्हणाले.
प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. राजू शिंगोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट विद्यार्थी डॉ. शराण्या बापट, डॉ. प्रांजली झेंडे, उत्कृष्ट शिक्षक – डॉ. भाग्यश्री बडवे आणि महाविद्यालयाच्या समर्पित कामगिरीसाठी राजू शिंगोटे यांना गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वरिष्ठ शिक्षकांनी योगदान दिले. पारितोषिक वितरणाचे संचालन डॉ. श्रुती मुळावकर यांनी केले. स्वागत डॉ. मानसी चौधरी, डॉ. एकता पाटील, सूत्रसंचालन डॉ. नेहा देशपांडे यांनी तर डॉ. लावण्या अय्यर यांनी आभार मानले.

ते बदला घेण्यासाठी तर मी शेतकरी हितासाठी लढणार ..खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले हाच फरक आहे आमच्यात

पुणे- शिवाजीराव आढळराव पाटील बदला घेण्यासाठी निवडणूक लढणार आहे तर मी मात्र शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवून त्याचे हित साधण्यासाठी निवडणूक लढणार आहे हाच त्यांच्यात आणि माझ्यात महत्वाचा फरक असणार आहे असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोल्हे ,म्हणाले,’2019 चा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असतील तर, माझा प्रश्न आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न माझ्या मनात येतो.दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोर जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे ही स्पष्ट होत

त्यांच विधान पाहिले तर त्यांना 2019 चा बदला घ्यायचा आहे, मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे.

राज ठाकरे यांच्यावर बोलताना ते म्हणाले,’कोणी महायुतीत जाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय.अब की बार 400 पार म्हणणं असताना जेमतेम ते 200 चा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे.महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल अशी नाहीयेमहाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल.

आढळराव जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 26 मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोर- बैठका सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असल्याने आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून 26 मार्च रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणारचं, असे थेट आव्हान दिल्याने ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झाले आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक 30 हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असे शिवाजीराव म्हणाले.

दरम्यान शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असे सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच.45 पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याच आमच उद्दिष्टय आहे असे सुनील तटकरे म्हणाले.