पुणे : निवडणुकीतील अधिकृत प्रचाराच्या आधीच पुण्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या एका छायाचित्रात दिवंगत खासदार गिरीष बापट यांचा फोटो वापरल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावर राळ उठविली आहे. ‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा,’ अशी स्लोगन देत गिरीष बापट यांचे छायाचित्र यात वापरण्यात आले आहे.
धंगेकर यांचा त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर विश्वास नाही का? असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावर हे कोणी पोस्ट केली तेच मला माहिती नाही, असा दावा धंगेकर यांनी केला. आणि म्हणाले बापट जनमानसात मान्यता पावलेले नेते होते त्यांना एका चौकटीत बांधून ठेवणे योग्य नाही .. प्रत्यक्षात ते काय म्हणाले हे ऐका त्यांच्याच शब्दात …