Home Blog Page 1083

पुण्यात महत्वाचे विकास प्रकल्प भाजपमुळे रखडले – आ. रवींद्र धंगेकर

पुण्यातील विकास कामांबाबत दूरदृष्टी आणि काम पूर्ण करून घेण्याची धमक नसल्यामुळेच गेली १० वर्षे केंद्रात, राज्यात व पुण्यात सत्तेवर असणाऱ्या  भारतीय जनता पक्षामुळे पुण्यातील अनेक मोठे प्रकल्प रखडले. मुठा नदी सुधारणा ( जायका ) प्रकल्प, स्मार्ट सिटी, पुण्याची मेट्रो, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुण्याहून अनेक शहरांकडे जाणाऱ्या नव्या रल्वे गाड्या असे कोणतेच प्रकल्प भाजप करू शकले नाही. मेट्रो तर गेल्या १० वर्षात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुणेकरांचे मोठे नुकसान झालेले असून या  परिस्थितीत परिवर्तन करीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या काँग्रेसला मतदान यंत्रावरील पंजाच्या चित्रापूढील बटन दाबून विजयी करा असे आवाहन पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले.

कोथरूड मधील प्रभाग क्र. ११रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर येथे रविवारी सायंकाळी निघालेल्या विराट पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. ११ मधील ही पदयात्रा ना भूतो ना भविष्यती अशी झाली सुमारे ४००० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते.

पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता तसेच अनेक ठिकाणी महिला गटागटाने उभ्या राहून रवींद्र धंगेकर यांना ओवाळत होत्या. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पदयात्रेत ठिकठिकाणी पथनाट्य आयोजित केली गेली. ‘लोकायत संस्थेतर्फे’ पथनाट्याद्वारे काँग्रेसच्या योजनांची माहिती दिली गेली. याचे सूत्रसंचालन कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे आणि यशराज पारखी यांनी केले. या पदयात्रेचे संयोजन माजी जेष्ठ नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी केले.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे  संतोष डोख व दिपाली डोखयांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेकडो  कार्यकर्त्यांसह कालच्या रॅलीत प्रवेश केला.

पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती.

या पदयात्रेत रवींद्र धंगेकरांनी श्री विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर, श्री देवी मंदिर येथे फुलांचा हार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. पदयात्रेत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी व सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या पक्षांचे झेंडे पदयात्रेत डौलाने फडकत होते. विशेष म्हणजे केळेवाडी परिसरात काँग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सहभागी होते. पदयात्रेत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या तेव्हा पाठिंब्याच्या जोरदार घोषणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

 चंदूशेठ कदम यांचे ऑफिस – म्हातोबानगर पासून पदयात्रेस सुरुवात झाली – राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) – शिवकल्याण गणपती गल्ली क्र. ११ – क्रांतीसेना कमान – जुने विठ्ठल मंदिर – गल्ली क्र. ३१ – गल्ली क्र २८ पांडुरंगनगर – समर्थ चौक – माथवड चौक ते जयभवानीनगर क लाईन – गुरुदत्त चौक,किष्किंधानगर – रामबाग कॉलनी – शंकरराव मोरे विद्यालय ऑफिस समोरून – मोरे श्रमिक वसाहत – राउतवाडी – हनुमाननगर – राजीवगांधी पार्क – इंदिरा पार्क – केळेवाडी विठ्ठल मंदिर ए.आर.ए.आय रोड – आदर्श मित्रमंडळ – विश्वशांती मंडळ – जय श्रीराम तरुण मंडळ येथे समाप्त झाली.

पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री रमेशबागवे, माजी जेष्ठ नगरसेवक चंदूशेठ कदम,शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार,माजी नगरसेवक योगेश मोकाटे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्ष पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे,आम आदमी पार्टी शहर प्रमुख सुदर्शन जगदाळे धनंजय बेनकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे उपशहर प्रमुख राजस पळसकर,पुणे शहर काँग्रेस महिला अध्यक्षा पूजा आनंद, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे, महिला ब्लॉक अध्यक्ष मनीषा करपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ब्लॉक अध्यक्ष स्वप्नील दुधाणे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षमहिला आघाडी सविता मते,अभिजित मोरे, अमोल काळे,पुणे शहर महिला संघटक सचिव नैना सोनार, महिला उपशहर प्रमुख दुधाणे ताई, पुणे शहर उपाध्यक्ष विजयश्री खळदकर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे ४ तास चालेली ही विशाल पदयात्रा रात्री ९.३० च्या सुमारास संपली.

महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा

पुणे : महावीर जयंतीनिमित्त जैन समाजातील चारही पंथीयांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  आनंद, समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली. या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधाम फेज 2 येथील जैन मंदिरात झाली. आकर्षक पारंपारिक वेशभूषा,  विविध संगीत समूह आणि ’त्रिसलानंदन वीर की…जय बोलो महावीर स्वामी की… जयकारे ’यांच्या जयघोषात त्यांना नमन व पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते, अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडोत यांनी दिली.
अशोक हिंगड यांनी सांगितले की, या शोभायात्रेत 2000 हून अधिक जैन अनुयायीही पायी चालत सहभागी झाले होते. हे नयनरम्य दृष्य पाहणसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. या भव्य मिरवणुकीत 5 रथ, 3 बँड पथक, 1 ढोल ताशा पथक, 1 डीजे सिस्टीम आणि हजारो स्त्री-पुरुष, लहान मुले, तरुण व वृद्ध सहभागी झाले होते.
अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वरघोड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. फुलांनी सजलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषाने आसपासचा परिसर दणाला हाता. शोभायात्रेत पारंपारिक पोशाखात महिलांची संख्या केवळ उल्लेखनीयच नव्हती तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते. उमेश मांडोत, अशोक हिंगड, आनंद कटारिया, सौ. सारिका संचेती, दिनेश अग्रवाल, अनिल पोरवाल, अनिल भन्साळी, नरेश जैन, ललित गुंदेचा आदींनी शोभायात्रा यशस्वी अलौकिक आणि वाखाणण्याजोगा करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत उमेश मंडोत, अशोक हिंगड, आनंद कटारिया, दिनेश अग्रवाल, नरेश जैन, अनिल पोरवाल, बालचंद बांठिया, प्रवीण चोरबेले, सारिका संचेती, दिलीप जैन, तरुण मोदी, अनिल भन्साळी, तेजराज धोका, संजय राठोड, जितेंद्र राठोड, मणिलाल राठोड, प्रवीण संघवी, पुनित परमार, नितीन शहा, राजेंद्र दुग्गड, अजित सेठिया, सचिन सरनोत, महावीर कटारिया, प्रकाश फुलफगर आदींचे सक्रिय सहकार्य होते. तसेच शोभायात्रेत अशोक हिंगड, आनंद कटारिया, सारिका संचेती, ललित गुंदेचा, महेश कोठारी, नितीन शहा, तरुण मोदी, राहुल परमार, वंदना संजय राठोड यांच्यासह महिलांचा सहभाग अधिक होता.

‘चोरांची लोकशाही’ पुस्तक निवडणुकीच्या काळात येणे महत्वाचे संकेतः डॉ. रवींद्र गुर्जर 

पुणे, दि. २२ एप्रिल : ” सर्व विरोधक जर एकत्र आले, तर निश्चित समाजावे की राजा प्रामाणिक आहे. दोन हजार वर्षापूर्वी आर्य चाणक्याने जे लिहून ठेवले, ते आजही सर्वार्थाने लागू आहे. याचे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आता होऊ घातलेली लोकसभा निवडणूक असून याच काळात ही पुस्तक प्रकाशित होणे महत्वाचे संकेत आहे.” असे मत कार्यक्रमाचे लेखक व पत्रकार डॉ. रवींद्र गुर्जर यांनी व्यक्त केले.
मतदार जागृतीसाठी आणि समृध्द लोकशाहीसाठी माजी वायुसेना व माजी पोलिस अधिकारी अनिल शां. पाटील यांनी लिहिलेल्या ‘चोरांची लोकशाही’ या पुस्तकाचे प्रकाशन टिळक रोड येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पद्मजी हॉल येथे लेखक व पत्रकार डॉ. रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार बबन पोतदार, राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे आणि देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने, व प्रतिभा पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सेलिब्रेशन अ‍ॅट सिक्टी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यावेळी अनिता पाटील व प्रतिभा पाटील या उपस्थित होत्या.
डॉ. रवींद्र गुर्जर म्हणाले,” जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामधील वास्तव परिस्थिती काय आहे. लोकशाही खरोखर अस्तित्वात आहे का. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशात खरे  राष्ट्रनिष्ठ आणि सर्वस्व झोकून देण्याची तयारी असलेल्या लोकांचे प्रमाण किती आहे, हे तपासणे गरजेचे आहे. पंतप्रधान पं. नेहरू गेल्यानंतर देशासमोर प्रश्न पडला होता की पुढील पंतप्रधान कोण आहे. पण लोकशाहीने ते दाखवून दिले. तसेच नरेंद्र मोदी नंतर ही या देशात बरेच पंतप्रधान येतील.”
चंद्रकात शहासने म्हणाले,” आम्ही चोर आहोत हे ज्या दिवशी या देशात थांबेल तेव्हाच आम्ही विश्वगुरू बनेल. संविधाच्या आधारावर चाललेल्या या देशात कालानुरूप काही चुका आहेत.  त्याचे आता परीक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांचा संभ्रम, चीड, संताप, अगतिकता या सर्व गोष्टी लेखकाने पुस्तकात मांडल्या आहेत.”
डॉ. सदानंद बोडसे म्हणाले, ” भ्रष्टाचारी सदैव अस्तित्वात राहतात याला आपणच जबाबदार आहोत. अशावेळेस चोरांच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर मतदातांनी सजग होऊन चिंतन, मनन करून योग्य मतदान करावे. कोणतीही सुधारणा करावयाची असेल तर मतभेद होणे ही गरजेचे आहे.”
बबन पोतदार म्हणाले, ” चोरांची लोकशाही सारखे पुस्तकांची निर्मिती होणे म्हणजे सर्वांना विचार करण्याची वेळ आली आहे. वाढता भ्रष्टाचार हा देशाला पोरखून ठेवणारा आहे. अशावेळेस मतदातांनी जागृत राहून संविधानाचा अभ्यास करावा आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालावा.”
अनील पाटील म्हणाले,”  देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झालीत परंतू आज ही हा देश बर्‍याच समस्यांनी ग्रस्त आहे. स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी योजनांचा पाऊस पडला खरे परंतू गरिबी काही संपली नाहीच परंतू भ्रष्ट लोकांमुळे आज लोकशाहीला नुकसान पोहचले आहे. चोरांची लोकशाही हा विषय गेल्या ८वर्षापासून डोक्यात होता. या पुस्तकात संविधान, हक्क आणि कर्तव्य, राजकारणात गुन्हेगारांचा प्रवेश, घराणेशाही, न्यायव्यवस्था, भ्रष्टाचार, प्रसार माध्यमे यांचा उहापोह केलेला आहे.”
सूत्रसंचालन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले. आकाश पाटील यांनी आभार मानले.

भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

0

पुणे दि.२१: भोर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले आहेत.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३५-बारामती लोकसभा मतदार संघाअंतर्गत भोर विधानसभा मतदार संघातील सर्व ठिकाणी मंगळवार ७ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडील २२ मार्च २०२४ च्या परिपत्रकानुसार हे आदेश देण्यात आले आहेत.

सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी किमान दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी.

या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

पुणेकर मतदार यंदा परिवर्तनाच्या मूडमध्ये – रवींद्र धंगेकर

पुणे दिनांक 21…. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराच्या विरोधात संपूर्ण देशभर नैराश्याचे वातावरण आहे, असेच वातावरण पुण्यातही असून पुणेकर मतदार यंदा परिवर्तनाच्या बाजूने मतदान करण्याच्या मूडमध्ये आहेत असे मत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. विश्रांतवाडी परिसरात झालेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,समाजातल्या सगळ्याच घटकांमध्ये निराशेचे वातावरण आहे पुण्यात मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात आहे गेल्या दहा वर्षात या मध्यमवर्गीय मतदारांच्या पदरात काहीही पडलेले नाही, मध्यमवर्गीयांचे उत्पन्नही वाढलेले नाही मात्र त्या मानाने त्यांचा खर्च महागाईमुळे खूप वाढला असल्याने अन्य घटकांबरोबरच मध्यमवर्गीयांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन घडवायचेच असा निर्धार मतदारांच्या मनात आहे आणि ते पदोपदी सगळीकडे जाणवते आहे असेही धंगेकर यांनी नमूद केले.

     विश्रांतवाडी चौकात त्यांच्या पदयात्रेचा शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. जोरदार पाउस असूनही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून धंगेकर यांनी वंदन केले, तसेच तेथील गणेश मंडळात जाऊन श्री गजाननास पुष्पाहार अर्पण करून गजाननाचे आशिर्वाद घेतले. ढोल ताशाच्या गजरात पुढे सरकणाऱ्या या पदयात्रेत ठिकठिकाणी धंगेकर यांचे नागरिक व व्यापारी स्वागत करीत होते. पदयात्रा थांबून सर्वांना पाणी दिले जात होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी व स्थानिक रहिवाश्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

     विश्रांतवाडी चौकातून चव्हाण चाळ – पेट्रोल पंप – कळस गावावरून बोपखेल गणेशनगर – मस्के वस्ती – कुसमाडे कॉलनी – आर.एन.डी कॉलनी – एस.आर.ए स्किम विश्रांतवाडी – धानोरी गाव पूर्ण परिसर – तोरणा हॉटेल – पूर्वाल रस्ता – डी.वाय पाटील रस्ता – समर्थ नगर – गाव कोश राख पसरे वस्ती – भाजी मंडई कोपराआळी – भक्ती शक्ती चौक – मुख्य लोहगाव चौक – संत नगर दादाची वस्ती गुरुद्वारा कॉलनी – साठे वस्ती – पूर्वाल रस्ता चौक – खेसे पार्क – कलवड – इंदिरानगर – मुंजोबा वस्ती – गोकुळ नगर – टिंगरे नगरचा काही परिसर – एकता नगर – भारत सावंत पेट्रोल पंप – फादर मायकल सोसायटी – भीमनगर विश्रांतवाडी येथे ही पदयात्रा समाप्त झाली.

   महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आम आदमी पक्षाचे सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. सर्व पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. धंगेकरांच्या जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून जात होता.

     या पदयात्रेत प्रकाश आप्पा मस्के, सुनिलमलके, रमेश आढाव, माजी नगरसेवक अविनाश साळवे,पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, राजेंद्र शिरसाट, वडगाव शेरी ब्लॉकअध्यक्ष राजू ठोंबरे,महिला अध्यक्ष वडगाव शेरी शिवानी माने,येरवडा ब्लॉकअध्यक्ष रमेशसकट,येरवडा ब्लॉकअध्यक्ष महिला ज्योती चंदेवळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा प्रमुख आनंदजी गोयल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे आशिष माने, आम आदमी पक्षाचेआमित म्हस्के,  डॉ. रमाकांत साठे, अमोल लोणार, शशिकांत खलसे, मनोज शेट्टी, योगेश शिर्के, चेतन चव्हाण, प्रसाद वाघमारे सहभागी झाले होते.

निवडणुकीच्या प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जातायेत – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी : २०२४ च्या निवडणूक प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जाताय. वगद्दारी विरुद्ध एकनिष्ठा या विरोधातली लढाई सोबतचझ मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी मतदार संघातील रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर, कृष्णानगर या भागातील दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, आशाताई भालेकर, दादा नरळे, नितीन बोडे, इम्रान शेख, अशोक पवार आदी सहभागी होते.

नागरिकांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे म्हणाले किझ संविधान वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत. पण
मूळ मुद्दापासून निवडणूक भरकटवली जात आहे.
मी, माझं, माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन देश आणि देशातील जनता यांच्या प्रति माझी बांधिलकी आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाची पहिली असली काय किंवा शेवटची असली काय त्याने महागाई कमी होणार आहे का ? असा सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केला.

सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला: अनंत गाडगीळ

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार

मुंबई दि. २१ एप्रिल २०२४

जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे असे प्रतिपादन माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गाडगीळ म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधीत देशात सत्तेवर कोणते सरकार असणार हा ही एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो. असे असताना टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे याचाच अर्थ भारतात निवडणूकांनतर सत्तापरिवर्तन होणार आहे याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातल्या जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे असे गाडगीळ म्हणाले.

बलशाली भारतासाठी युवकांचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा – पूर्वेश सरनाईक

काळेवाडी, दि. 21 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महायुतीचे युवा शिलेदार आता प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. युवकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच लोकसभेत अभूतपूर्व बहुमतासह पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास युवा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

महायुती युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल (शुक्रवारी) संध्याकाळी काळेवाडी रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महामंत्री सुनील मेंगडे, सरचिटणीस अनुप मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस तसेच तुषार हिंगे, मनसे शहर अध्यक्ष अनिकेत प्रभू, आरपीआई शहर अध्यक्ष सुजित कांबळे, युवासेना कोर कमेटी रुपेश कदम, रासपा शहर अध्यक्ष अजित चौगुले, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष शेखर काटे, वर्षा जगताप, रितू कांबळे, तेजस्विनी कदम, माऊली जगताप, सागर पाचर्णे, सचिन घोटकुले, रघुवीर शेलार आदी पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्वेश सरनाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये कौशल्य विकासावर भर देत तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जगातील एक बलशाली राष्ट्र म्हणून भारत नावारूपाला येत आहे. देशातील युवकांचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त मोदी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी देशातील युवाशक्ती त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे.

खासदार बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असणार आहे. त्यामुळे सर्व युवकांनी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावावी, असे आवाहन सूरज चव्हाण यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पूर्ण युवाशक्ती खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

मेळाव्याचे संयोजन विश्वजीत बारणे यांनी केले होते.

भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग आजही प्रेरक – बारणे

महावीर जयंतीनिमित्त बारणे यांनी साधला जैन बांधवांशी संवाद

निगडी, दि. 21 एप्रिल – भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग समाजासाठी आजही प्रेरक आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) काढले.

भगवान महावीर जयंती निमित्त बारणे यांनी आकुर्डी-निगडी- प्राधिकरण जैन श्रावक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास तसेच निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले व जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, तानाजी बारणे, मयूर बारणे, धनाजी गुजर, गौरव जाधव आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, भगवान महावीर यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करीत अहिंसा व शांततेच्या मार्गाने जैन समाज व्यवसाय करून समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहे. समाजाच्या विकासात जैन बांधवांचे योगदान मोठे आहे.

आकुर्डी येथील कार्यक्रमात जैन श्रावक संघाच्या वतीने सुभाष ललवानी, नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट यांनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.

निगडी प्राधिकरण येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांनी बारणे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कैलास पांडे, वर्धमान पांडे, सुदीन खोत यांच्यासह जैन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही बारणे यांनी भेट दिली व सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

सलग आठ तास ‘संपूर्ण गीतरामायण’ एकाच दिवशी रंगला  ५६ गीतांचा सुरेल सोहळा 

पुणे : सावळा गं रामचंद्र… दशरथा घे हे पायसदान…आज मी शापमुक्त जाहलें…या इथे लक्ष्मणा बांध कुटी.. यांसह गीत रामायणातील ५६ गीते एक सलग एकाच दिवशी एकाच मंचावर कलाकारांनी सादर केली. तब्बल आठ तास चाललेल्या स्वरयज्ञात २५ हून  अधिक कलाकारांनी सहभाग घेत सुरेल आवाजात गीते सादर करून रामचरित्राची अनुभूती दिली. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात गीत रामायणाचा आनंद सोहळा रंगला.

हटके म्युझिक ग्रुपच्या वतीने ‘संपूर्ण गीत रामायण’ हा एका दिवसात गीत रामायणातील सर्व ५६ गीते सादर करण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शालेच्या सभागृहात आयोजित  करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गदिमा यांच्या सुकन्या प्रियदर्शिनी अंतरकर आणि सुपुत्र आनंद माडगुळकर हे प्रमुख पाहुणे तर हटके ग्रुपचे संस्थापक, कार्यक्रमाचे सादरकर्ते शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी, माधव धायगुडे यांसह कलाकार उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सांगीतिक नियोजन जेष्ठ हार्मोनियम वादक आणि गायक अनिल मोटे यांनी केले होते.

आनंद  माडगूळकर म्हणाले, गीत रामायण हे केवळ मनोरंजन नसून अनेकांंनी ते जीवनात अंगीकारले आहे.  हटके ग्रुपने हाच वसा घेतला आहे व असे अनेक कार्यक्रम व्हावेत, अशा  शुभेच्छा त्यांनी दिल्या. शिरीष कुलकर्णी म्हणाले, हटके ग्रुपचा उद्देश सर्वांना आनंद देणे, नवोदितांना संधी देणे व सांगीतिक व्यावसायिकांना धन-निर्मितीची संधी या  तिन्ही माध्यमातून सफल झाला.

गीतरामायणातील सर्व गीतांच्या सादरीकरणांमध्ये श्रोते रममाण होऊन गेले होते. सीतेच्या तोंडच्या काही तर गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी  श्रोत्यांचे डोळे पाणावले. नकोस नौके…सेतू बांधा रे सागरी… त्रिवार जयजयकार … अशा काही गीतांच्या  बरोबरीने श्रोतेही गायक म्हणून सहभागी झाले. तर, दशरथा घे हे पायसदान…. हे गीत हार्मोनिका व व्हायोलिन यावर ‘हटके’ प्रकारे सादर झाले आणि श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली. 
या सुमधुर गीतांच्या सादरीकरणासोबतच डॉ. मुकुंद कोठावदे यांनी प्रत्येेक गीतासाठी काढलेली ५६ रेखाचित्रेही दाखवली. आठ तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक अगदी समरस झालेले होते. गीतांच्या सादरीकरणांमध्ये सह कलाकारांमध्ये मातब्बर आणि अनुभवी साथीदार होते.  चारुशीला गोसावी-व्हायोलिन, मोहन पारसनीस – तबला,  संतोष अत्रे – हार्मोनियम, ओमकार पाटणकर – कीबोर्ड व विशेष म्हणजे तालवादक वसंत देव  ज्यांनी विविध तालवाद्ये एकाच वेळी वाजवून अतिशय सुरेख साथ दिली. सहवादकांनी  हटके ग्रुप चे या शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न, वाखाणण्यासारखा आहे, असे सांगितले. .हा कार्यक्रम “न भूतो न भविष्यती” असा झाल्याचे बऱ्याच प्रेक्षकांनी नमूद केले. असेच नवनवीन कार्यक्रम घेऊन हटके म्युझिक ग्रुप आपल्या समोर येत राहणार आहे, असा मानस शिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा-एस.चोक्कलिंगम

पुणे, दि. २१: जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार, निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लाल्लरेमावी, मावळ मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय, व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून श्री. चोक्कलिंगम म्हणाले, एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानासाठी पगारी रजा देण्याच्या सूचना द्याव्यात.

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा. मतदान संबंधी सर्व अहवाल वेळेत सादर करावे. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटात निवारण करावे. मतदानाच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे.

निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. समाजमाध्यमाद्वारे चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, आदी सूचना त्यांनी दिल्या.

निवडणूक विषयक नियमांचे उल्लंघन कोणत्याही घटकाद्वारे होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे. कमी मतदान असलेल्या १० मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यात महानगरपालिका आणि नगरपालिकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी आवश्यक प्रयत्न करावे, असेही श्री.चोक्कलिंगम म्हणाले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, श्री.चौबे आणि पोलीस अधीक्षक श्री.देशमुख यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सदारीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस विभागाच्या सहकार्याने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळ, बारामती आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही निवडणूक तयारीची माहिती सादर केली.

बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांचा उदंड प्रतिसाद


पिंपरी, पुणे (दि. २१ एप्रिल २०२४)- विशिष्ट शैलीतील ठसकेबाज गायकीसाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंर्तगत शनिवारी रात्री जुन्या सांगवीतील एकता चौकात आनंद शिंदे यांच्या लोकगीतांचा “जलसा” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष कांबळे, गणेश बँकेचे संचालक संजय जगताप, ऑल इंडिया बॉडी बिल्डींग असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, सचिव बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शाहीरीच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचे जगताप यांनी कौतुक केले.
आनंद शिंदे यांनी या कार्यक्रमात भीमगीते, बुद्धगीतांपासून त्यांची प्रसिध्द असलेली अनेक बहारदार गाणी गायली. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून दाद मिळाली. सांगवीकरांच्या रसिकतेचे शिंदे यांनी आवर्जून कौतुक केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव योगेश कांबळे यांनी तर रवींद्र यादव यांनी आभार मानले.

परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई टाळण्यासाठी तोडपाणी- मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

इंधनावर कर वाढवून ३६ लाख कोटी जनतेचे ओरबाडले

निवडणुक रोख्यातून जगातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप

पुणे: ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने

महाविकास आघाडीतील जागा वाटप ४८ पेकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे. मात्र आता निवडणुक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे, विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे , असेही‌ चव्हाण म्हणाले.

बागुल यांची नाराजी दूर होईल : थोरात

पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रश्नावर थोरात म्हणाले,  नाराज्यांकडे जाणे बोलणे, आमचे काम आहे, बागुल‌ यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

काळ्या पैशामध्ये मोदींचे तोडपाणी :

परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये  १५ लाख रुपये‌जमा करण्याचे आश्वासन देवून नरेंद्र मोदी २०१४ मध्ये‌ सत्तेवर आले. त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळ्या पैशाची‌ सर्व माहिती आली. आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे.  तरीही मोदी सरकारने आजवर संबंधीतांवर  कारवाई केला नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले आहे. इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू, असेही‌चव्हाण म्हणाले.

विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण खा. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

यांचे मत; ‘आयसीएमएआय’तर्फे ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’
पुणे : “देशातील विकासकामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प राबविताना त्याचे सूक्ष्म आर्थिक नियोजन व प्रस्तावित खर्चाचा योग्य विनियोग कसा होईल, यावर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) काम करत असतो. विकसित भारताच्या वाटचालीत ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारशी संबंधित ‘सीएमए’च्या काही अडचणी असतील, तर त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आणि आयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’ व ‘रिजनल लेडी सीएमए कॉन्व्हेंशन २०२४’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. ‘लर्न, शेअर अँड नेटवर्किंग इज अ सक्सेस मंत्रा’ आणि ‘विकसित भारताच्या प्रगतीमध्ये महिलांच्या क्षमतांचा लाभ’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या.

कर्वेनगर येथील संस्थेच्या कार्यालयात ‘आयसीएमएआय’चे अध्यक्ष सीएमए अश्विन दलवाडी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, उपाध्यक्ष सीएमए अरिंदम गोस्वामी, सचिव सीएमए मिहीर व्यास, खजिनदार नॅन्टी शहा, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, सीएमए डॉ. डी. व्ही. जोशी, सीएमए एम. के. आनंद, सीएमए अमित आपटे, सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए नीलेश केकाण, सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सीएमए राहुल चिंचोलकर आदी उपस्थित होते.

सीएमए अश्विन दलवाडी म्हणाले, “संसदेच्या कायद्यांतर्गत स्थापित झालेली आयसीएमएआय ही एक प्रोफेशनल संस्था आहे. कॉस्ट अकाउंटन्सीच्या व्यवसायाचा प्रचार, नियमन आणि विकास करण्याचे काम होते. संस्था खर्चाची स्पर्धात्मकता, खर्च व्यवस्थापन, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि खर्च लेखाबाबत संरचित दृष्टीकोन याचा पाठपुरावा करते. सीएमए हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्स, कर, मर्जर अँड अक्विजीशन, तसेच कॉस्ट ऑडिट अँड सर्टिफिकेशन आणि ऑडिट ऑफ कॉस्ट रेकॉर्ड्सच्या क्षेत्रात उद्योग आणि व्यवसायात कार्यरत असतात.”

सीएमए चैतन्य मोहरीर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी सीएमए सर्वोत्तम पदवी असून व्यवसाय व नोकरीमध्ये उत्तम करियर करू शकतात. त्यामुळे सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाधिक तरुणांनी सीएमएचा अभ्यास समजून घेऊन तयारी करावी. भारताच्या अर्थव्यवस्थेत व विकासात योगदान देण्याची ही नामी संधी आहे.”

सीएमए डॉ. डी. व्ही. जोशी यांचे बीजभाषण झाले. सीएमए नागेश भागणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीएमए नीलेश केकाण यांनी सूत्रसंचालन केले. सीएमए नॅन्टी शहा यांनी आभार मानले.

किवळे येथेही लवकरच मेट्रोची सुविधा – खासदार बारणे

नरेंद्र मोदींनी गरिबांना धन्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला – श्रीरंग बारणे

किवळे, दि. 21 एप्रिल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी गोरगरिबांना अन्नधान्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला. मोदींनी रक्ताचा थेंबही न सांडवता जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली. जगामध्ये भारताचे मान उंचावली. त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

देहूरोड किवळे इथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते तसेच शीलाताई भोंडवे, नानासाहेब डोईफोडे, सुदाम दिवटे, गौतम गायकवाड, प्रकाश साबळे, रवींद्र कदम, मीनाताई डेरे, सुनीता संदणे, निशाताई ओव्हाळ, मनोज थोरवे, सुरेश नायर, विनोद चांदमारे व परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नमो संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाकडे देश पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा सोपविणे गरजेचे आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. मेट्रोच्या पुढील टप्प्यात निगडी ते किवळ्याचा मुकाई चौक असा विस्तार करण्यात येणार आहे. मुकाई चौकातून मेट्रो निगडी, वाकड, स्वारगेट, रामवाडी, चाकण या मार्गांना जोडली जाणार आहे. त्यामुळे परिसराचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात होईल, असे त्यांनी सांगितले.

देहूरोड ते बालेवाडी हा साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यामुळे देहूरोड किवळे भागातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही सुटेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.