पुणे दिनांक 21…. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराच्या विरोधात संपूर्ण देशभर नैराश्याचे वातावरण आहे, असेच वातावरण पुण्यातही असून पुणेकर मतदार यंदा परिवर्तनाच्या बाजूने मतदान करण्याच्या मूडमध्ये आहेत असे मत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. विश्रांतवाडी परिसरात झालेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,समाजातल्या सगळ्याच घटकांमध्ये निराशेचे वातावरण आहे पुण्यात मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात आहे गेल्या दहा वर्षात या मध्यमवर्गीय मतदारांच्या पदरात काहीही पडलेले नाही, मध्यमवर्गीयांचे उत्पन्नही वाढलेले नाही मात्र त्या मानाने त्यांचा खर्च महागाईमुळे खूप वाढला असल्याने अन्य घटकांबरोबरच मध्यमवर्गीयांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन घडवायचेच असा निर्धार मतदारांच्या मनात आहे आणि ते पदोपदी सगळीकडे जाणवते आहे असेही धंगेकर यांनी नमूद केले.
विश्रांतवाडी चौकात त्यांच्या पदयात्रेचा शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. जोरदार पाउस असूनही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून धंगेकर यांनी वंदन केले, तसेच तेथील गणेश मंडळात जाऊन श्री गजाननास पुष्पाहार अर्पण करून गजाननाचे आशिर्वाद घेतले. ढोल ताशाच्या गजरात पुढे सरकणाऱ्या या पदयात्रेत ठिकठिकाणी धंगेकर यांचे नागरिक व व्यापारी स्वागत करीत होते. पदयात्रा थांबून सर्वांना पाणी दिले जात होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी व स्थानिक रहिवाश्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
विश्रांतवाडी चौकातून चव्हाण चाळ – पेट्रोल पंप – कळस गावावरून बोपखेल गणेशनगर – मस्के वस्ती – कुसमाडे कॉलनी – आर.एन.डी कॉलनी – एस.आर.ए स्किम विश्रांतवाडी – धानोरी गाव पूर्ण परिसर – तोरणा हॉटेल – पूर्वाल रस्ता – डी.वाय पाटील रस्ता – समर्थ नगर – गाव कोश राख पसरे वस्ती – भाजी मंडई कोपराआळी – भक्ती शक्ती चौक – मुख्य लोहगाव चौक – संत नगर दादाची वस्ती गुरुद्वारा कॉलनी – साठे वस्ती – पूर्वाल रस्ता चौक – खेसे पार्क – कलवड – इंदिरानगर – मुंजोबा वस्ती – गोकुळ नगर – टिंगरे नगरचा काही परिसर – एकता नगर – भारत सावंत पेट्रोल पंप – फादर मायकल सोसायटी – भीमनगर विश्रांतवाडी येथे ही पदयात्रा समाप्त झाली.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि आम आदमी पक्षाचे सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. सर्व पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. धंगेकरांच्या जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून जात होता.
या पदयात्रेत प्रकाश आप्पा मस्के, सुनिलमलके, रमेश आढाव, माजी नगरसेवक अविनाश साळवे,पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, राजेंद्र शिरसाट, वडगाव शेरी ब्लॉकअध्यक्ष राजू ठोंबरे,महिला अध्यक्ष वडगाव शेरी शिवानी माने,येरवडा ब्लॉकअध्यक्ष रमेशसकट,येरवडा ब्लॉकअध्यक्ष महिला ज्योती चंदेवळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा प्रमुख आनंदजी गोयल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आशिष माने, आम आदमी पक्षाचेआमित म्हस्के, डॉ. रमाकांत साठे, अमोल लोणार, शशिकांत खलसे, मनोज शेट्टी, योगेश शिर्के, चेतन चव्हाण, प्रसाद वाघमारे सहभागी झाले होते.