Home Blog Page 1080

मानवाधिकार आयोग सदस्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र येवलेवाडी येथे तृतीयपंथीकरीता कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २३: राज्य मानवाधिकार आयोग, सहायक आयुक्त समाज कल्याण, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र आणि अनाम प्रेम परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीकरीता आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र येवलेवाडी येथे रविवारी संपन्न झाली.

राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य सचिव नितीन पाटील, सदस्य एम. ए. सय्यद, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्राच्या डॉ. सत्य लक्ष्मी, अनाम प्रेम परिवाराचे भास्कर बिडये यांच्यासह राज्यभरातून वीस जिल्ह्यातील तृतीयपंथीय प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, तृतीयपंथीयाच्या कल्याणाकरीता शासनाच्यावतीने देण्यात आलेला निधी वेळेत खर्च होईल, याबाबत सर्व संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. शासनाच्या लोककल्याणारी योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. आधारकार्ड देण्यासाठी शिबीरे आयोजित करावीत. राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्रातील आरोग्याबाबतचे विविध कार्यक्रम होत असतात त्यांचा तृतीथपंथीयांनी लाभ घ्यावा. याबाबत तृतीथपंथी समुदायाला जागृत करावे.

तृतीथपंथीयांनी कृषी आणि कापड उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या अनुषंगाने बघावे. महिला बचत गटाच्या उत्पादित खाद्यपदार्थ, वस्तुंना विक्रीकरीता आरक्षण देण्यात आले असून त्याचप्रमाणे तृतीथपंथी समुदायाने विविध खाद्य पदार्थ, वस्तू उत्पादनावर भर द्यावा. तसेच त्यांच्याद्वारे निर्मित उत्पादनांना बाजारपेठेत आरक्षणाकरीता प्रयत्न करावे. या समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामाहून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी केले.

डॉ. सत्य लक्ष्मी यांनी तृतीयपंथी रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याबाबत सूचना केल्या. डॉ. मेघश्याम गुर्जर यांनी खादी आणि कापड उद्योग क्षेत्रात होणारी रोजगार निर्मिती तसेच संतोष चव्हाण यांनी कृषी होणारी रोजगार निर्मितीबाबत माहिती दिली. खुले कारागृहातील कैद्यासोबत शेतीच्या उपक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग याविषयावर चर्चा करण्यात आली.

कोल्हापूर येथील मैत्री फाऊंडेशनच्या तृतीयपंथी प्रतिनिधी शिवानी गजबर यांनी मानवाधिकार कायद्यांची माहिती, तृतीयपंथीची समाजासाठी उपयुक्तता या विषयावर माहिती दिली. अनाम प्रेम परिवाराचे श्री. बिडये यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. अनाम प्रेम परिवार गेल्या १८ वर्षांपासून तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक अधिकारांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शरीर स्वास्थ्य व निसर्गोपचार, मानवाधिकार कायदा, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येऊन सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
0000

पुण्यात तरुणांच्या बेकारीचा मोठा प्रश्न – रवींद्र धंगेकर

  पुणे-  काँग्रेस राजवटीत पुण्यामध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली. काँग्रेस पक्षाने पुण्याला आयटी सिटी केले, वाहन उद्योग निर्मितीचे केंद्र बनवले त्यामुळे शेकडो देशी परदेशी कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक केली व लाखो नवे रोजगार पुण्यात काँग्रेस राजवटीत निर्माण झाले. गेल्या १० वर्षात मात्र केंद्रात, राज्यात व पुण्यात भाजप सरकार असूनही पुण्यात कोणतीही नवी गुंवणूक त्यांनी आणली नाही त्यामुळे गेल्या १० वर्षात लाखो तरुण – तरुणींच्या, नोकरी – रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या साठीच आता परिवर्तन आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी पंजाच्या चिन्हापुधील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले. कसबा विधानसभा मतदार संघातील सकाळी झालेल्या भव्य पदयात्रेनंतर ते बोलत होते.

   ही पदयात्रा शहराच्या मध्य भागातील दाट वस्तीतून जाताना अनेक गणेशोत्सव मंडळे व व्यापाऱ्यांनी धंगेकरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.   महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेतील नागरिक व कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे पाणी दिले जात होते. मागार्वरील अनेक मंदिरांमध्ये व गुरुद्वारात जाऊन उमेदवार धंगेकर यांनी दर्शन घेतले. तसेच ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले. मोतीचौक आणि गणेशपेठ गुरुद्वारा जवळील हनुमान मंदिर येथे जाऊन त्यांनी श्री हनुमानाचे दर्शन घेतले. साखळी वीर तालीम येथे जाऊन त्यांनी प्रथम हनुमानाच्या प्रतिमेस वंदन करून तालमीतील पैलवानांची भेट घेतली. तसेच आखाड्यात उतरून आखाड्यातील माती हातात घेऊन ती आखाड्यात अर्पण केली. पैलवानांनी रवींद्र धंगेकर यांना दिलेली मुदगल हातात घेऊन त्यांनी प्रत्येक पैलवानाला प्रोत्साहन दिले. तेव्हा जयजयकाराच्या घोषणाही चालू होत्या. मागील वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीतील आठवणींना अनेक जण उजाळा देत भक्कम पाठिंब्याची खात्री देत होते. जुन्या वाड्यांमधील नागरिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन स्वागत करत होते तसेच महिला देखील मोठ्या प्रमाणात येऊन धंगेकरांचे औक्षण करीत होत्या. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले गेले.

        या पदयात्रेत पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड ,माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक विशाल धनावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे व बाळासाहेब मालुसरे, शहर काँग्रेस सरचिटणीस गणेश शेडगे व शिवराज भोकरे, कसबा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष गणेश नलावडे, विभाग प्रमुख चंदन साळुंखे, आम आदमी पक्षाचे किरण कद्रे, प्रभाग क्र.१७ चे काँग्रेस अध्यक्ष कुणाल जाधव, नरेश नलावडे, राजेंद्र आलमखाने, कसबा महिला ब्लॉक अध्यक्ष प्रतिभा शिंदे, स्वाती कथलकर, निकिता मारटकर, राष्ट्रवादीच्या कसबा महिला अध्यक्ष सुरेखा पारेख, प्रसाद गावडे, शंतनू हिंगमिरे, गोरख पळसकर, महेश हराळे, संतोष कोहराळकर, प्रविण करपे, संदीप आटपाळकर, ओंकार धावडे, चंदन पाचंगे, सुरेश कांबळे     सहभागी झाले होते.

       पदयात्रेचा प्रारंभ फडके हौद येथून मोठ्या थाटामाटात झाला. तिथून ही  पदयात्रेचा – सावतामाळी भवन – लाल महाल – नाना वाडा – बुधवार चौक – डाव्या हाताने पासोड्या विठोबा –  मोती चौक – फडके हौद – आर. सी. एम. – देवीजबाबा चौक – गुरूद्वारा – लक्ष्मी रोड – डुल्या मारूती – दूध भट्टी – राजा धनराज गिरजी हायस्कूल – ताराचंद हॉस्पिटल – राष्ट्रीय तरूण मंडळ – शुभम सोसायटी – पारशी अग्यारी – आझाद तरूण मंडळ – विठोबा आनंद सोसायटी – लक्ष्मी रोडने – नाना चावडी चौक – हिंदमाता चौक – साखळीपीर तालीम – धनवडे ऑफिस – पिंपरी चौक – नाकोडा हाईटस् – खाकसार मशिद – हमाल तालिम – पालखी विठोबा कमान – चमडे गल्ली – शिवप्रताप चौक – भवानी पेठ व्यापारी मंडळ – जनता सहकारी बँक – पालखी विठोब चौक – कामगार मैदान चौक – रामोशी गेट – गोकुळ वस्ताद तालीम – महेश भुवन – विजय वल्लभ शाळा – घसेटी पुल – श्री स्वामी समर्थ मठ – साईनाथ मंडळ – ढोर गल्ली – धुमधडाका उदबत्ती – विरेंद्र किराड यांचे ऑफिस – पांगुळआळी – नाडे गल्ली – डुल्या मारूती – हमजेखान चौक – शिवरामदादा तालीम – सहकार तरूण मंडळ – सातववाडा – गोविंद हलवाई चौक – सुभानशा दर्गा – नेहरू चौक – उजव्या हाताने भुतकर हौद – शुक्रवार पेठ पोलीस चौकी – विजयानंद टॉकिज – गवळी आळी – प्रभात पापडी – मर्गी गल्ली – क्रांती चौक – जगोबा दादा तालीम येथे समाप्त झाली.

निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

पुणे -सर्वांना न्याय‌ मिळावा, निवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल, याची शास्वती नाही. संविधानिक संस्था निस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, अशी‌ टीका अखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे,  नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, श्री पोळेकर, श्री मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेय, हे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे ७६ लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदु मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे, अशी टिका पंतप्रधानांनी करणे दुदैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.

पहिल्या‌ टप्प्यात विदर्भातील सर्व पाच जागा इंडिया आघाडी‌ जिंकणार आहे. संपूर्ण राज्यात व देशात काँग्रेस व इंडिया आघाडीला‌ चांगले दिवस आहेत.

शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढझालेली आहे. शेतमालास भाव नाही, त्यामुळे शेतकरी‌ त्रस्त आहे.

देशातील संस्था विकण्याचा धडाका‌ सुरू आहे. देशात महिला‌ सुरक्षित नाहीत, याचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये‌ सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील.

काँग्रेसने न्याय पत्र म्हणून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

मोदी यांच्या‌ सत्ताकाळात ३० लाख नोकऱ्या‌ थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती‌केली जाईल. आमच्या‌ न्याय पत्रातशेतकऱ्यांची‌कर्जमाफी करू,स्वामीनाथन समितीच्या‌ सिफारशि स्विकारू,  महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपये, आरोग्यासाठी २५ लाख रुपये, आदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे. हा जाहीरनामा अतिशय‌ चांगला‌ आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीत, त्यामुळे  भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते २०० सुद्धा पार करणार नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांनी दिलेली गॅरंटी फसवी आहे, हे लोकांच्या लक्षात आले आहे. जाहीरनाम्यातील तरतुदी काँग्रेस पक्षाच्या‌ सरकारने कर्नाटक, तेलंगणा येथे पूर्ण केल्या आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील महिलांचे मंगळसूत्र राहणार नाही, हे नरेंद्र मोदी‌ यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे. वरीष्ठ पद भुषविणाऱ्या‌ व्यक्तीने असे बोलणे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, असेही‌ते म्हणाले.

प्रारंभी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माणिकराव ठाकरे यांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील:

फडणवीस व भाजपने सुड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. पवार साहेबांच्या‌ पुण्यास मोदी‌शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणे, षडयंत्र रचणे लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेत, माहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदलले, स्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले.

शिंदे – पवारांनी पायावर दगड मारून घेतला :

अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असत, पवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहे, ऐवढे मिंधे होण्याची गरज काय, भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले.

उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.

आघाडीसाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला :

देशातील परिस्थिती पाहून काँग्रेसने पुढाकार घेवून आघाडी‌ केली. त्यामुळे आघाडीत कमी जास्त होऊ शकते. सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमीका आहे. शिवसेना व काँग्रेस नेते एकत्र बसुन सांगली बाबत निर्णय घेतील. शिस्तीच्या बाहेर कोण जाणार नाही, असेही ते म्हणाले.

दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे – डॉ. अमोल कोल्हे

राजगुरूनगर : सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्वाच आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतलाय. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचे ही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला.यावेळी अशोक खंडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वर्पे, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड त्यांच्या समवेत सहभागी होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, अमरावतीचे भाजपचे उमेदवारच सांगत आहेत की, पंतप्रधान मोदींची लाट आता राहिलेली नाही. हेच चित्र सगळ्या देशात आहे. दक्षिण भारत असो की ईशान्य भारतासह अनेक राज्यात भाजप नाही.

या परिस्थितीत महाराष्ट्रतल्या माणसांची जबाबदारी मोठी आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता मात्र, दिल्लीचे ही तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा, ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवून द्यायची आहे, अस आवाहन ही डॉ. कोल्हे यांनी केलं.
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपले प्रश्न सुटणार नाहीत

देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत. विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही. याचाही विचार मतदारांनी करावा, असेही डॉ. को

उमेदवार दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेख्याची तपासणी करण्यात येणार आहे. खर्च तपासणी नगर परिषद प्रशासन शाखा, शेजारील सभागृह, दुसरा मजला, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे-४११००१ येथे करण्यात येणार आहे.

खर्च तपासणीबाबत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पहिली तपासणी २५ एप्रिल रोजी, दुसरी तपासणी १ मे आणि तिसरी तपासणी ६ मे २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे. तपासणी दिनांकाच्या वेळी उमेदवार अथवा त्यांचा अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनीच उपस्थित रहावे. तपासणी दिनांकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिवशी नोंदवही तपासण्यात येणार नाही. तपासणी दिनांकाच्या दिवशी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चात तफावत आल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

कोणत्याही उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत हवी असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येक पृष्ठाला १ रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. यासूचनांबाबत सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचार

  • सहाही विधानसभा मतदारसंघात प्रतिसाद
  • विविध समाजघटकांकडून मोहोळ यांचे स्वागत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची अधीसूचना जारी होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यांनी सहाही मतदारसंघात पदयात्रा करून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्यापूर्वीच प्रचाराचा धुराळा उडवला आहे. यातून महायुतीची असलेली वज्रमूठ मतदारांना बघायला मिळाली. शहरातील मान्यवरांच्या तसेच प्रभावशाली व्यक्ती, पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन भेटीगाठी, विविध संस्था संघटनांच्या मेळाव्यांना उपस्थिती आणि त्यानंतर सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यासाठी दाटलोकवस्तीच्या परिसरात पदयात्रा करत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.

शहरातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील दाट लोकवस्तीच्या परिसरात या मतदार संवाद पदयात्रा काढण्यात आल्या होत्या. या पदयात्रांमध्ये भाजपसह महायुतीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते. यातून उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी थेट नागरीकांशी संपर्क साधला आणि मोदीयांना मतदान करण्याचे आवाहन केले. विविध समाजघटकांनी मोहोळ यांचे केलेले स्वागतही चर्चेचा विषय ठरले. कार्यकर्त्यांच्या घोषणा, झेंडे, यामुळे निवडणुकीच्या वातावरणात रंग भरायला सुरूवात झाली आहे.

यात सर्व मतदार संवाद पदयात्रांमध्ये महायुतीतील पक्षाचे शहराध्यक्षांसह धीरज घाटे, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते. हा तंत्रज्ञानाचा जमाना असल्याने बहुतेक सर्व पदयात्रांचे व्हिडिओ कार्यकर्ते स्वत:हून काढून ते व्हायरल करत होते. त्यामुळे आपल्या भागात पदयात्रा किंवा प्रचार फेरी कधी असणार याबद्दल कार्यकर्त्यांकडे विचारणा होऊ लागली आहे. या पदयात्रेच्या काळात शहराच्या विविध भागातील विविध समाज घटकातील मतदारांचा मूड लक्षात येत होता.

पदयात्रांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘सहाही विधानसभा मतदारसंघात पुणेकरांचा मिळालेला प्रतिसाद मलाही भारावून टाकणारा होता. ठिकठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागत हे भारतीय जनता पार्टी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे, अशी माझी भावना आहे. विशेष म्हणजे मोदी यांची समाजाच्या सर्व घटकांत असलेल्या विश्वासाची पावतीही पदोपदी मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही पदयात्रेत महायुती म्हणून पुणेकरांसमोर गेल्याने महायुतीतील प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधित्व यात पाहायला मिळाले’

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, दि. २३: जिल्ह्यातील ३४- पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३५४९२४ आणि इमेल आयडी loksabhaelectionpune@gmail.com असा आहे.

निवडणूक निरीक्षक, पुणे लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे मंगळवार व गुरुवार रोजी १०.३० वाजेपासून सायं १२.३० वाजेपर्यंत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
0000

व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पुणे, दि. 23: मतदानांनतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचेदेखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजप नेत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कराड -‘रिसॉर्ट मॅनेजमेंट’ व्यवसायातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून कराडमधील यशवंत सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील ‘एमपीआयडी’ न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा आदेश दिला.

शेखर सुरेश चरेगावकर यांच्यासह बुलडाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता यांनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) स्थापन विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, चरेगावकर यांच्यासह अन्य आरोपीविरोधात पाच मार्च रोजी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे मंजूर करून त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शेखर चरेगावकर, श्रीपाद कुलकर्णी आणि रोहित लभडे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मारुती वाडेकर आणि तक्रारदारांतर्फे अॅड. विपुल दुशिंग व अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी यांनी विरोध केला. त्यांना अॅड. रोहित राहिंज व अॅड. अभिनव नलावडे यांनी साह्य केले.

  • असा केला युक्तिवाद

हा गुन्हा अतिशय अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, लेखापरीक्षणातून ही बाब उघड झाली आहे. तक्रारदारांच्या कर्जखात्यातील रकमेचा विनियोग आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे; तसेच अनेक कर्जदारांना फसविले आहे, असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला.

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप

अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम –11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड –16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

काँग्रेस नेते राहुल गांधींची अमरावती व सोलापुरात जाहीर सभा.

मुंबई, दि. २३ एप्रिल

काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदान, नबील कॉलनी, बैतुल रोड याठिकाणी सकाळी ११ वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झीबिशन ग्राउंड, मरिआई चौक येथे दुपारी ३.५५ वाजता प्रचार सभा होत आहे.

अमरावतीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व CWC सदस्य यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे, अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, प्रीती बंड, सुनील खराटे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रदीप राऊत, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, संगीता ठाकरे, वर्षा भटकर यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

सोलापूर येथील सभेला राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व लोकसभेच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट नेते माजी आ. नरसय्या आडम, दिलीप माने, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा महाराष्ट्रात प्रचाराचा झंझावात सुरु असून राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भंडारा-गोंदिया मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची १४ एप्रिल रोजी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली.

अकोल्यात कमळाचे बटन दाबा, करंट इटलीपर्यंत पोहोचले पाहिजे:अमित शहांचा निशाणा

अकोला –अकोल्यामध्ये कमळाचे बटन एवढ्या ताकतीने दाबा की, बटन अकोल्यात दबले की करंट इटलीमध्ये जाऊन लागले पाहिजे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. अकोला लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मी आज शरद पवार यांना प्रश्न विचारणार आहे. मात्र, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारुन काहीही उपयोग नाही. त्यांना तर आपल्या मुलाव्यतिरीक्त काहीच दिसत नसल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे.

या वेळी अमित शहा यांनी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत या देशातून एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कोणीच हटवू शकत नाही. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असल्याचा दावा देखील अमित शहा यांनी केला आहे. सिंचन योजनेमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे – फडणवीस सरकारने देखील अनेक कामे केली असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. अकोला जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे.

मी अकोला येथे आल्यानंतर शरद पवार यांना काही प्रश्न विचारणार आहे. शरद पवार हे मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारमध्ये होते. कृषी मंत्रालय सांभाळत होते. मग त्या दहा वर्षांच्या काळात सोनिया आणि मनमोहन सिंग सरकारने किती पैसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिला? असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला. मात्र या प्रश्नाचे उत्तर शरद पवार देणार नाहीत. त्या दहा वर्षात महाराष्ट्रात मनमोहन सिंग यांच्या सरकारने एक लाख 91 हजार करोड रुपये दिले असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळातच 7 लाख पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रला दिले असल्याचा दावा देखील अमित शहा यांनी केला आहे. या व्यतिरिक्त दोन लाख 90 हजार कोटी इन्फ्रास्ट्रकरच्या विकासासाठी, चार हजार कोटी विमानतळासाठी नरेंद्र मोदी सरकारने दिले असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला इन्व्हेस्टमेंट मध्ये नंबर एक करण्याचे काम केले असल्याचा दावा देखील अमित शहा यांनी केला आहे.

PM मोदींचा पुण्यात रोड-शो आणि सभा

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

पुणे -पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राजाभाऊ कांबळे, लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, लहुजी शक्ती सेनेचे नितीन वायदंडे, शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड,, प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.घाटे म्हणाले, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत. शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीसाठी वातावरण खूप चांगले आहे. मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी पुणेकरांची सेवा केली. समाजासाठी जीवनदान देणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आहे. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्राताई पवार, मावळ मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार असून, त्याला चारही मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळेल.मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर म्हणाले, रॅलीच्या नियोजनासाठी आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजन करीत आहोत. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ हे अभ्यासू आणि चांगले उमेदवार असून, पुणेकरांच्या आवडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते मताधिक्याने विजयी होतील.ही रॅली ही महायुतीच्या विजयाची नांदी असेल असे सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले तसेच महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एक दिलाने काम करून उमेदवार विजयी करतील असा विश्वास ही यावेळी सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला

अयोध्या राम मंदिर निर्मिती हे राष्ट्र निर्माण कार्य-ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर

 श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव
पुणे : रामायण हे आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष घडले होते, ते केवळ मिथक नव्हते, याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. रामायण ही केवळ एक कथा नसून ते एक महाकाव्य आहे. या महाकाव्याचा देशाच्या नागरिकांवर संस्कार झालेला आहे. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे तर सशक्त राष्ट्र निर्माण करण्यामधील एक महत्त्वाचे कार्य आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात ‘अयोध्या राम मंदिर इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये राहुल सोलापूरकर बोलत होते
 राहुल सोलापूरकर म्हणाले, आज ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम चे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे, त्या ठिकाणी इसवी सन १०० म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी राम मंदिर बांधण्यात आले होते.  याचे कार्बन फुटप्रिंट पुरावे आजही उपलब्ध आहेत. हे मंदिराचे निर्माण नऊ वेळा करण्यात आले होते हे उत्खननामध्ये सिद्ध झालेले आहे.  शरयू नदीच्या वाळूमुळे या ठिकाणी उत्खनन करणे अवघड जात असताना ७२ फूट खोल खनन केल्यानंतर त्या ठिकाणी ५४ खांबांचे मंदिर असल्याचे सिद्ध झालेले आहे. 
रामायणाच्या कथा देशातील अनेकांनी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. रामायणाचे संस्कार देशातील ठराविक नागरिकांवर किंवा समाजावर झालेले नाही तर संपूर्ण हिंदुस्तान वर रामायणाचा प्रभाव आणि संस्कार आहे. रामायणाच्या मुल्यांचा हिंदुस्थानची पायाभरणी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळेच हिंदुस्तानची संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृतींपैकी एक मानली जाते, असेही राहुल सोलापूरकर यांनी यावेळी सांगितले. 
रामायण हे केवळ पुस्तकांमध्ये न ठेवता हे विविध माध्यमातून आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच रामायण आणि त्यातील मूल्य ही आपल्या जीवनामध्ये कशी अंगीकारता येतील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जीवन कसे जगावे याचे धडे आपण रामायणातून आपल्या तरुण पिढीला देऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने रामायण अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे. 
रामायण कथेमुळे केवळ आजची तरुण पिढीच सुसंस्कृत होणार नाही, तर एक बलशाली आणि समृद्ध हिंदुस्तान निर्माण करण्यासाठी ज्या मूल्यांची आवश्यकता आहे, ती मूल्ये आपण तरुणांमध्ये रुजवून एक समृद्ध हिंदुस्तान घडवू शकतो ही रामायणाची ताकद आहे. 

तहसील कार्यालयातील कारकूनाला एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडला

पुणे- रिंगरोडकरिता भूसंपादनमध्ये जाणाऱ्या जमीनीची सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी हवेली तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकुन याने दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी ४७ वर्षीय तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे (ACB) तक्रार दाखल केल्यावर, एसीबीने सापळा रचून खातरजमा केली असता अव्वल कारकूनास एक लाखांची लाच घेताना जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी, नरेंद्र भानुदास ढोले (वय-४०) या अव्वल कारकुनास अटक करण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मालकीची जमीन पश्चिम चक्राकार मार्गासाठी संपादित होत आहे. सदर जमीनीची नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार यांना ३४ लाख २० हजार ३४८ रुपये सरकारी कार्यालयाकडून मिळणार होते. तक्रारदाराच्या त्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर पोकळीस्त असलेली नोंद तहसीलदार हवेली कार्यालयाकडून कमी होणार होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदार यांचे अर्ज प्रकरण तहसीलदार, हवेली कार्यालय येथे प्राप्त झाले होते. संबंधित अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी अव्वल कारकून नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांचेकडे तहसीलदार यांचेकरिता दीड लाख रुपांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबीकडे केली होती. तक्रारदारांनी यांनी दिल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, नरेंद्र ढोले यांनी तक्रारदार यांचेकडे तहसीलदारांकरिता दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पुढील तपास एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले करत आहे. सदरची कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.शीतल जानवे, एसीपी नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या एका ५५ वर्षीय महिलेच्या पतीची साबर्डी, ता.खेड,पुणे येथे एकूण ६३ गुंठे शेतजमीन आहे. सदर गटाची मोजणी करण्याकरिता तक्रारदार यांचे पतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापक अधिकारी खेड यांचे कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी खाजगी टायपिस्ट सुनंदा वाजे यांनी त्यांच्याकडे सदर काम करण्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणखी दोन हजार रुपये लागतील असे सांगितले. याबाबत एसीबीने खातरजमा केली असता तक्रारदार यांचेकडे सुनंदा वाजे यांनी नऊ हजार रुपये लाच मागणी करुन सात हजार रुपये स्विकारताना तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.