भाजप नेत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Date:

कराड -‘रिसॉर्ट मॅनेजमेंट’ व्यवसायातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून कराडमधील यशवंत सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील ‘एमपीआयडी’ न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा आदेश दिला.

शेखर सुरेश चरेगावकर यांच्यासह बुलडाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता यांनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) स्थापन विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, चरेगावकर यांच्यासह अन्य आरोपीविरोधात पाच मार्च रोजी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे मंजूर करून त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शेखर चरेगावकर, श्रीपाद कुलकर्णी आणि रोहित लभडे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मारुती वाडेकर आणि तक्रारदारांतर्फे अॅड. विपुल दुशिंग व अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी यांनी विरोध केला. त्यांना अॅड. रोहित राहिंज व अॅड. अभिनव नलावडे यांनी साह्य केले.

  • असा केला युक्तिवाद

हा गुन्हा अतिशय अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, लेखापरीक्षणातून ही बाब उघड झाली आहे. तक्रारदारांच्या कर्जखात्यातील रकमेचा विनियोग आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे; तसेच अनेक कर्जदारांना फसविले आहे, असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...