पुणे- काँग्रेस राजवटीत पुण्यामध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली. काँग्रेस पक्षाने पुण्याला आयटी सिटी केले, वाहन उद्योग निर्मितीचे केंद्र बनवले त्यामुळे शेकडो देशी परदेशी कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक केली व लाखो नवे रोजगार पुण्यात काँग्रेस राजवटीत निर्माण झाले. गेल्या १० वर्षात मात्र केंद्रात, राज्यात व पुण्यात भाजप सरकार असूनही पुण्यात कोणतीही नवी गुंवणूक त्यांनी आणली नाही त्यामुळे गेल्या १० वर्षात लाखो तरुण – तरुणींच्या, नोकरी – रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या साठीच आता परिवर्तन आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी पंजाच्या चिन्हापुधील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले. कसबा विधानसभा मतदार संघातील सकाळी झालेल्या भव्य पदयात्रेनंतर ते बोलत होते.

ही पदयात्रा शहराच्या मध्य भागातील दाट वस्तीतून जाताना अनेक गणेशोत्सव मंडळे व व्यापाऱ्यांनी धंगेकरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेतील नागरिक व कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे पाणी दिले जात होते. मागार्वरील अनेक मंदिरांमध्ये व गुरुद्वारात जाऊन उमेदवार धंगेकर यांनी दर्शन घेतले. तसेच ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले. मोतीचौक आणि गणेशपेठ गुरुद्वारा जवळील हनुमान मंदिर येथे जाऊन त्यांनी श्री हनुमानाचे दर्शन घेतले. साखळी वीर तालीम येथे जाऊन त्यांनी प्रथम हनुमानाच्या प्रतिमेस वंदन करून तालमीतील पैलवानांची भेट घेतली. तसेच आखाड्यात उतरून आखाड्यातील माती हातात घेऊन ती आखाड्यात अर्पण केली. पैलवानांनी रवींद्र धंगेकर यांना दिलेली मुदगल हातात घेऊन त्यांनी प्रत्येक पैलवानाला प्रोत्साहन दिले. तेव्हा जयजयकाराच्या घोषणाही चालू होत्या. मागील वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीतील आठवणींना अनेक जण उजाळा देत भक्कम पाठिंब्याची खात्री देत होते. जुन्या वाड्यांमधील नागरिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन स्वागत करत होते तसेच महिला देखील मोठ्या प्रमाणात येऊन धंगेकरांचे औक्षण करीत होत्या. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले गेले.
या पदयात्रेत पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड ,माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक विशाल धनावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे व बाळासाहेब मालुसरे, शहर काँग्रेस सरचिटणीस गणेश शेडगे व शिवराज भोकरे, कसबा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष गणेश नलावडे, विभाग प्रमुख चंदन साळुंखे, आम आदमी पक्षाचे किरण कद्रे, प्रभाग क्र.१७ चे काँग्रेस अध्यक्ष कुणाल जाधव, नरेश नलावडे, राजेंद्र आलमखाने, कसबा महिला ब्लॉक अध्यक्ष प्रतिभा शिंदे, स्वाती कथलकर, निकिता मारटकर, राष्ट्रवादीच्या कसबा महिला अध्यक्ष सुरेखा पारेख, प्रसाद गावडे, शंतनू हिंगमिरे, गोरख पळसकर, महेश हराळे, संतोष कोहराळकर, प्रविण करपे, संदीप आटपाळकर, ओंकार धावडे, चंदन पाचंगे, सुरेश कांबळे सहभागी झाले होते.
पदयात्रेचा प्रारंभ फडके हौद येथून मोठ्या थाटामाटात झाला. तिथून ही पदयात्रेचा – सावतामाळी भवन – लाल महाल – नाना वाडा – बुधवार चौक – डाव्या हाताने पासोड्या विठोबा – मोती चौक – फडके हौद – आर. सी. एम. – देवीजबाबा चौक – गुरूद्वारा – लक्ष्मी रोड – डुल्या मारूती – दूध भट्टी – राजा धनराज गिरजी हायस्कूल – ताराचंद हॉस्पिटल – राष्ट्रीय तरूण मंडळ – शुभम सोसायटी – पारशी अग्यारी – आझाद तरूण मंडळ – विठोबा आनंद सोसायटी – लक्ष्मी रोडने – नाना चावडी चौक – हिंदमाता चौक – साखळीपीर तालीम – धनवडे ऑफिस – पिंपरी चौक – नाकोडा हाईटस् – खाकसार मशिद – हमाल तालिम – पालखी विठोबा कमान – चमडे गल्ली – शिवप्रताप चौक – भवानी पेठ व्यापारी मंडळ – जनता सहकारी बँक – पालखी विठोब चौक – कामगार मैदान चौक – रामोशी गेट – गोकुळ वस्ताद तालीम – महेश भुवन – विजय वल्लभ शाळा – घसेटी पुल – श्री स्वामी समर्थ मठ – साईनाथ मंडळ – ढोर गल्ली – धुमधडाका उदबत्ती – विरेंद्र किराड यांचे ऑफिस – पांगुळआळी – नाडे गल्ली – डुल्या मारूती – हमजेखान चौक – शिवरामदादा तालीम – सहकार तरूण मंडळ – सातववाडा – गोविंद हलवाई चौक – सुभानशा दर्गा – नेहरू चौक – उजव्या हाताने भुतकर हौद – शुक्रवार पेठ पोलीस चौकी – विजयानंद टॉकिज – गवळी आळी – प्रभात पापडी – मर्गी गल्ली – क्रांती चौक – जगोबा दादा तालीम येथे समाप्त झाली.