Home Blog Page 1077

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी-डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी

भोसरी : मुख्यमंत्री एकनाथ शिरुर लोकसभा मतदार संघातुन मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती. पण, भुजबळांनी नकार दिल्याने ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदर डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलच उधाण आलय.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहराध्यक्ष तुषार कामठे, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात डॉ. कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. माझ्या समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. मात्र, अनेक पक्षातून बेडूक उड्या घेऊन आलेल्या उमेदवारावर बोलणे योग्य नाही.

विरोधकांची केवलवाणी परिस्थिती झाली असल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. भुजबळांनी नकार दिल्याने ही उमेदवारी आढळरावांना देण्यात आली. त्यामुळं ते सक्षम ही नाहीत, आणि बाय चॉईस ही उमेदवार नाहीत. अश्या वयस्कर व्यक्तीवर काय बोलायचं असा खोचक सवाल ही कोल्हेंनी केला.

काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे: पृथ्वीराज चव्हाण

सांगली जिल्हा काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: नाना पटोले

सांगली, दि. २५ एप्रिल
लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी द्रष्ट लावण्याचे काम केले त्याची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजची लढाई वेगळी आहे, देशावर मोठे संकट आहे, चुकून जर मोदी सरकार पुन्हा आले तर भविष्यात निवडणूक होणार नाही. मोदी सरकारने १० वर्षात विरोधी पक्षांना प्रचंड त्रास दिला. सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालयात तासंतास बसवले, राहुल गांधी यांनाही ईडी कार्यालयात चौकशीच्या नावाखाली पाच दिवस १०-१० तास बसवले अशा मोदी सरकारला माफ करणार आहात का? सोनियाजी गांधी यांनी देशासाठी कपाळाचे कुंकू दिले, देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी पंतप्रधानपदही नाकारले हे लक्षात ठेवले पाहिजे.

यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०१४ नंतर आलेले भाजपाचे सरकार वेगळ्या वाटेवर गेले, पुढच्या कालखंडात लोकशाही, राज्यघटना राहणार का बदलणार? देश वेगळ्या वळणावर जाईल का? अशी ही ऐतिहासिक निवडणूक आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे, राज्यघटना पायदळी तुडवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली. देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करुन विरोधी पक्ष एकत्र आले व इंडिया आघाडीची स्थापना केली. राज्यातही महाविकास आघाडी स्थापन करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिल्या टप्प्यातील चित्र सकारात्मक दिसले आहे, भाजपाला रोखणे हे आपले लक्ष्य आहे. तीन पक्षांच्या जागा वाटपाचे काम सोपे नव्हते. सांगलीच्या जागेसाठी सर्व बाजूंनी दबाव होता, खूप चर्चा झाली. सांगलीच्या जागेसाठी दिल्लीतूनही प्रयत्न केला परंतु यश आले नाही. भाजपाला हद्दपार करण्याच्या उद्देशाने आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, भाजपाच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून २०१९ साली तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. सरकार चांगेल काम करत होते नंतर शिवसेना पक्ष फोडला, आमदार खरेदी केले, पदांचे आमिष दाखवले, साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्वोच्च पातळीवरून झाला. महाराष्ट्रातील या तोडफोडीला नरेंद्र मोदी यांचा राजश्रय होता, त्यांच्या संमतीनुसार हे घडले, हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे.
निवडणुकीत विरोधकांची फाटाफूट झाली की भाजपाचे फावते म्हणून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीचा शाप लागेल. राज्यात मविआ व दिल्लीत मोदींचा पराभव करुन इंडिया आघाडीचे सरकार येईल. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व ताकदवर राहिली पाहिजे व मोदींचा पराभव झाला पाहिजे हे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे व आपण हे इंद्रधनुष्य पेलाल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबस्क्रीप्शनवर आधारीत बाजारपेठेचे पुनरुत्थान करण्यासाठी जिओ सिनेमा सज्ज

~ एका उपकरणासाठी दरमहा रु. २९ च्या विशेष सुरुवातीच्या ऑफर सह परिवारासाठी दरमहा रु. ८९ प्रती ४ उपकरणांपर्यतचे प्लान्स ~

~ ४ के ड फ्री स्ट्रिमिंग सह कोणत्याही उपकरणावर अनोखा अनुभव- कनेक्टेड टिव्ही आणि ऑफलाईन व्ह्युईंगचीही सुविधा ~

 सक्षम कंटेंट सह टॉप ओरिजिनल सिरीज, ब्लॉकबस्टर मुव्हीज, विविध भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट हॉलिवूडचे चित्रपट, मुले आणि पारिवारीक हब तसेच २१ टिव्ही चॅनल्स, व्हायाकॉम १८ टिव्ही नेटवर्क च्या सिरीयल्स ‘ बिफोर टिव्ही’ प्रदर्शित’~

२५ एप्रिल २०२४, राष्ट्रीय-  इंडियन प्रिमियर लीगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि पुरस्कार विजेत्या एन्टरटेन्मेंट हब असलेल्या जिओ सिनेमाने आता प्रिमियम मनोरंजनासाठी प्रत्येक भारतीय घरात आपले नाव प्रस्थापित केले आहे.  आता ग्राहकांच्या आणखी काही समस्या जसे मर्यादित उपकरणांची क्षमता, कमी गुणवत्तेचे व्हिडिओ, महाग सबस्क्रीप्शन प्लान्स इत्यादींवर मात करण्यासाठी जिओ सिनेमा कडून त्यांच्या नवीन सबस्क्रीप्शन योजना ‘जिओ सिनेमा प्रिमियम’ची घोषणा करण्यात आली आहे. यातील प्लान्स हे बाजारपेठेत नवीन असे म्हणजेच दरमहा रु.२९/- पासून सुरु होत असून यांत ड फ्री अनुभव हा ४ के गुणवत्तेसह ऑफलाईन व्ह्युईंग अनुभवाने युक्त असेल. सदस्यांना आता यामध्ये विशेष सिरीज, मुव्हीज, हॉलिवूड, मुले आणि टिव्ही मनोरंजन हे कनेक्टेड टिव्ही सह कोणत्याही उपकरणावर पाहता येणार आहेत.

संपूर्ण भारतातील विविध विभागातील वापर पाहता, फॅमिली प्लानची सुध्दा घोषणा करण्यात आली असून हा प्लान दरमहा रु ८९/- च्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे.  यामध्ये एकाच वेळेस ४ स्क्रीन्सवर वापर करता येणार आहे.  सध्याच्या जिओ सिनेमा प्रिमियम सदस्यांना आता ‘फॅमिली’ प्लानचे लाभ आता  कोणत्याही अधिकच्या खर्चा शिवाय प्राप्त होणार आहेत.

सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग  सह खेळांशी संबंधित कंटेंट आणि मनोरंजनात्मक कंटेंट हा ॲड सपोर्टेड ऑफरिंग नुसार मोफत उपलब्ध होणार आहेत, या व्यतिरिक्त जिओ सिनेमा प्रिमियम मेंबर्सना खालील गोष्टींचा ही विशेष ॲक्सेस उपलब्ध होणार आहे-

स्थानिक भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय कंटेंट –  आता जागतिक स्तरावरील हॉलिवूडच्या सिरीज आणि मुव्हीज जगभरांतील सर्वात मोठ्या स्टुडिओज बरोबरच्या भागीदारीतून उपलब्ध होणार असून यांत  पिकॉक, एचबीओ, पॅरामाऊट आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचा समावेश आहे.  गेम ऑफ थॉर्न्स, हाऊस ऑफ ड्रॅगन, ओपनहायमर, बार्बी आणि अशा अनेक मालिका आता हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मराठीतही उपलब्ध होणार आहेत.

परिवार आणि मुलांसाठी संपूर्ण मनोरंजन :  आता सर्वोत्कृष्ट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय टून्स जसे मोटू पतलू, शिवा, रुद्रा पासून ते पोकेमॉन, पेपा पिग आणि पॉ कंट्रोल, दि किड्स ॲन्ड फॅमिली हब मध्ये हजारो तासांच्या उच्च गुणवत्तेच्या मुव्हीज आणि सिरीज आपल्याला पहायला मिळणार आहेत. जिओ सिनेमा मधील पॅरेंटल कंट्रोल वैशिष्ट्यामुळे कोणता कंटेंट मुलांनी पहावा याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.

विविध शैलींनुसार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट:  बहुचर्चित अशा रणनीती:बालाकोट ॲन्ड बियाँड (जिम्मी शेरगिल, लारा दत्ता, आशिष विद्यार्थी), मर्डर इन माहिम (विजय राज, आशुतोष राणा), पिल (रितेश देशमुख) सारख्या आगामी सिरीज सह अनेक मालिका आता जिओ सिनेमाच्या प्रिमियम सदस्यांसाठी असून दर महिन्याला या सिरीज तर येतीलच पण त्याच बरोबर भारतातील काही आवडीच्या मालिका जसे असूर, ताली आणि कालकूट ही आपल्याला पहायला मिळणार आहेत. या मंचाच्या माध्यमातून आपल्याला आता दर महिन्याला बॉलिवूड प्रिमियरही पाहता येणार असून याची सुरुवात मे महिन्यापासून जरा हटके जर बचके पासून होणार आहे.

बिफोर  टिव्ही प्रिमियर्स आणि लाईव्ह चॅनल्स:  आता सदस्यांना कलर्स, निकलोडियन आणि  कलर्सच्या अन्य स्थानिक भाषांमधील चॅनल्स ची संपूर्ण श्रृंखला आता उपलब्ध होणार असून सदस्यांसाठी विशेष म्हणजे या एपिसोड्स टिव्हीवर प्रदर्शित होण्याच्या आधी पाहता येणार आहेत.  त्याच बरोबर व्हायाकॉम १८ नेटवर्क वरील २० हून अधिक चॅनल्स स्ट्रीम ही होणार आहेत.

जिओ सिनेमा ने हाय डेसिबल आणि बहुप्रतिक्षित अशी मोहिमही सुरु केली असून ‘तो आज क्या प्लान है?’ असे या मोहिमेचे नाव आहे. ही मोहिम जिओ सिनेमा प्रिमियम चे प्रमुख लाभ अधोरेखित करत असून आजच्या ग्राहकांचा मनोरंजनात्मक प्लान शोधण्यासाठीचा तणाव विनोदी पध्दतीने सादर केला आहे.

खोपोलीसाठी स्वतंत्र पाणी योजना, मेट्रोचे नियोजन – खासदार बारणे

खोपोली, दि. 25 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघात विकास झाला नाही, अशी टीका करणारे विरोधक डोळ्यांवर पट्टी बांधून बोलत आहेत, असा प्रतिटोला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला. खोपोली शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना तसेच मेट्रो आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असेही बारणे यांनी यावेळी सांगितले.

खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर, कर्जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुधाकर घारे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, ज्येष्ठ नेते बाबू पोटे, ॲड. अमोलराजे बांदल-पाटील, माजी नगरसेवक महादू जाधव, माजी नगरसेवक मंगेश दळवी, रमेश जाधव, खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली जाधव, माजी नगरसेविका केविना गायकवाड, सुर्वे ताई, अंजू सरकार, सुरेखा खेडेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पालांडे, कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, शुभम सकपाळ, शुभम शिर्के, शेलार, पवार, रवींद्र घारे, अल्पेश थरकुडे, साजिद मालदार आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतदारांकडे मते मागत आहोत. सकारात्मक कार्य करणाऱ्यांच्या मागे हा मतदार राहतो, असा अनुभव आहे. आपण नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले आहे. कधीही कोणाला त्रास दिलेला नाही. विरोधकांची या मतदारसंघात ताकद कमी आहे. त्यामुळे ते विनाकारण टीका करीत आहेत. पण सूज्ञ मतदारांना वस्तुस्थिती माहीत आहे.

खोपोली शहरात व परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. खोपोली शहरासाठी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पाणी योजना सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येईल. कर्जत- खोपोली लोहमार्ग, खोपोलीत मेट्रो सुविधा, मोठे अद्ययावत रुग्णालय आदी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपल्याला सर्वप्रथम फोन आला. आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे आपल्याला चांगले सहकार्य असून त्याची आपण नक्की परतफेड करू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.

प्रास्ताविकात दत्तात्रय मसुरकर यांनी खोपोली शहराला आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत अपेक्षा व्यक्त केली. खोपोली शहरातून बारणे यांना भरभरून मतदान होईल, असा विश्वास सुधाकर घारे यांनी व्यक्त केला. सुरेखा खेडकर, अंकित साखरे विजय पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले.

खालापूरच्या ग्रामीण भागात बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद

महडच्या श्री वरद विनायकाचे व धाकटी पंढरीच्या विठोबाचे घेतले बारणे यांनी आशीर्वाद

खोपोली, दि. 24 एप्रिल – कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 20 गावांना भेट देत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (बुधवारी) मतदारांशी संपर्क साधला. प्रत्येक गावात बारणे यांची उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

खासदार बारणे यांनी रानसई, शिरवली, वावोशी, आपटी, डोणवत, नारंगी, चिलठण, भोकरपाडा, खाणाव, शेमडी, ठाणेनाव्हे, ढेकू, साजगाव, अंजरून, बीड, महड, सावरोली, धामणी, खालापूर आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला. फटाके वाजून, औक्षण करीत, ठीकठिकाणी बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बारणे यांनी मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. काही प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही बारणे यांनी यावेळी दिले.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महडच्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेऊन बारणे यांनी पूजा व प्रार्थना केली. त्यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांनीही बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. साजगाव मंदिर धाकटी पंढरी येथील बोंबल्या विठोबाचे खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. खालापूर नगर पंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बारणे यांनी त्यांना अभिवादन केले.

बारणे यांच्या समवेत शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संघटक संतोष विचारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील, आरपीआय तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, रासपचे कोकण विभाग प्रमुख भगवान ढेपे, खालापूर तालुकाध्यक्ष आनंद ढेपे, पनवेल तालुकाध्यक्ष मुकेश भगत, महिला तालुकाध्यक्ष मनीषा ठाकूर, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा आंग्रे, राष्ट्रवादीचे एच. आर. पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख रोहित विचारे, शिवसेना तालुका समन्वयक आप्पा फावडे, शिव उद्योग तालुकाप्रमुख शशिकांत मोरे तसेच अविनाश कांबळे, हेमंत माने, शशी विचारही उत्तम परबलकर, सागर पाटील, रवी पाटील हेमंत नांदे, मुनीर धनसे, हेमंत पाटील, इलियास धनसे, वसीम धनसे, पांडुरंग बर्गे, दगडू बर्गे आदी पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते.

‘मावळ का खासदार कैसा हो, आप्पा बारणे जैसा हो’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’, ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

महाआघाडीकडे नेता नाही, नीती नाही, नियत नाही विकासाची दृष्टी नाही,अवस्था दिशाहिन-देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुणे-महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियत ही नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पुण्याचे जे ट्रान्सफमेशन दिसत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक व्हायब्रंट शहर बनवायचे आहे. देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित करायचे आहे. जो काही विकास दिसतोय तो आमच्या काळातील आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. आता मुरलीधर मोहोळ यांच्या सारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. जनता मोदींच्या पाठीशी असून, राज्यात महायुतीच्या मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील.

चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची प्रतिक्रिया

जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वा तीन लाखाचे मताधिक्य होते. जर यापेक्षा अधिक मताधिक्य मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बूथवर 75 टक्के मतदान झाले पाहिजे आणि त्यापैकी 75 टक्के मतदान महायुतीला होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपले नातेवाईक आहेत. त्यांना सर्वांना महायुतीला मतदार करा असे आवाहन करा.

मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

राजमाता जिजाऊ यांनी ज्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवला आणि हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कर्मभूमी म्हणून ओळखली जाते अशा पुण्यासारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरात महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मनापासून आनंद झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, गृहमंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, आरपीआयचे नेते रामदासजी आठवले आणि महायुतीतील घटक पक्षांनी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करीन.

श्रद्धेय अटलजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माझे मार्गदर्शक गोपीनाथजी मुंडे, गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची आज मला प्रकर्षाने आठवण होत आहे.

संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली विकासाची यात्रा २०१४ मध्ये सुरू झाली आहे. ही यात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे करीन.

पुण्यात पुढील पन्नास वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. त्याचा प्रारंभही झाला आहे. पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत.

पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मूलभूत सुविधा पुरवतानाच पुण्याची ओळख स्वच्छ पुणे, प्रदूषणमुक्त पुणे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे पुणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे पुणे अशी होईल यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करीन. पुण्याची ओळख आयटी हब अशी देखील आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक उद्योग येतील आणि त्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल, यावरही आमचा भर राहील. उत्तम आरोग्य सेवा पुणेकरांना मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातील.

पुणेकरांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी आणि ते अधिक उंचावण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य सरकारकडे पुण्याचा खासदार म्हणून मी पुण्याची बाजू प्रभावीपणे मांडेन, याची ग्वाही देतो.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून पुणेकरांनी भरघोस आणि विक्रमी मतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने करतो.माझे कार्य आणि लोकसंपर्क यातून पुणेकरांचा हक्काचा खासदार म्हणून माझी ओळख निर्माण करण्यात मी निश्चितपणे यशस्वी होईन.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

पुणे,दि. २५: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील सभागृहात संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक ९ हजार ५८ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि १४१ टक्के कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रीयेची माहिती देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर ५ एप्रिल रोजी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय सरमिसळनंतर बारामती लोकसभा मतदार संघासाठी ३ हजार ५६९ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत.

बारामती लोकसभा संघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार २३ एप्रिल रोजी पूरवणी सरमिसळ प्रक्रीयेद्वोर आवश्यक बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत. सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत, असे श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले.

शक्तिप्रदर्शनाने मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

पुणे, ता. 25 ः कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता. 25) शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर,महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या सह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोफ्लडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर,महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर,आ.सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, , शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्या दरम्यान खंडोजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला.

क्षणचित्रे

भर उन्हामधील पदयात्रेत आबाल वृद्धांचा उत्साहात सहभाग
रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी
दिव्यांग व्यक्तिंचा तीनचाकी वाहनांतून सहभाग
मुस्लिम मतदार विशेषतः महिलांचा मोठा सहभाग
पक्षांचे नाव व चिन्ह असलेले गमछे गळ्यात घालून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
चौकाचौकात पुष्पहार घालून, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल व बँड पथकाने स्वागत

तटस्थ अंपायर म्हणून काम करा मॅचफिक्सिंग नको-अन्यथा लोकांचा रोष ओढवून घ्याल -निवडणूक आयोगाला इशारा

लोकांनी सरकारी यंत्रणांवर दबाव आणणाऱ्यांविरुद्ध मतदान करावे’

‘भारत जोडो अभियान’  आणि सामाजिक संघटनांचे आवाहन 
पुणे :
सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर दबाव आणून लोकशाहीविरोधी निर्णय घेण्यास भारतीय जनता पक्ष भाग पाडत असल्याने लोकसभा निवडणूक निःपक्षपाती वातावरणात पार पडेल की नाही,याविषयी शंका निर्माण झाली आहे. या  पार्श्वभूमीवर नागरिकांनी संविधान वाचविण्यासाठी  भाजपाविरोधी मतदान करावे,असे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेत करण्यात आले. 
‘भारत जोडो अभियान’च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदीप बर्वे(युवक क्रांती दल),इब्राहिम खान(भारत जोडो अभियान),प्रशांत कोठडीया (संवैधानिक राष्ट्रवाद मंच),उत्पल व.बा.(निर्भय बनो),प्रसाद झावरे(पुणे कलेक्टिव्ह ) श्रीरंजन आवटे, उमेश ठाकूर , एकनाथ पाठक हे उपस्थित होते. 
या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर घडलेल्या घटनांची माहिती देऊन देशातील यंत्रणांवर भाजपचा प्रचंड दबाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले.निवडणूक लोकशाही मार्गाने,निःपक्षपाती पणे आणि भयमुक्त वातावरणात व्हायला हवी,या मूलभूत अपेक्षेला भाजपकडून नख लावले जात आहे. मॅच फिक्सिंग करण्याचे प्रयत्न होत आहेत म्हणून  साऱ्यांनी जागरूक असावे आणि भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, हे लक्षात घेऊन सावध रहावे,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सर्व सामाजिक संघटना एकत्र येवून आघाडी करून प्रत्येक मतदार संघात इंडिया आघाडीला किमान २ लाख मतदान वाढेल यासाठी कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
*देशाला आणि निवडणुकीला संकटात टाकणारा घटनाक्रम* 
१. सुरतमध्ये भाजपचा लोकसभेचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला आहे. इतर आठ उमेदवारांची नामांकनं रद्द करण्यात आली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवारांची पात्रता, नामांकनं रद्द होण्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडला आहे.
२. “अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतो आहे.” असा आरोप केजरीवाल यांच्या पत्नीने केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांना आचारसंहिता सुरू झाल्यावर अटक करण्यात आली. हा आचारसंहितेचा भंग होता. त्या आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक झाली.
३. काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली. त्यांना 1823 कोटींचा दंड केला. त्यासाठी 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण काढलं गेलं. कम्युनिस्ट पार्टीला केवळ जुनं पॅनकार्ड वापरलं म्हणून 11 कोटींचा दंड केला गेला.
४. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या नोटिसा आल्या आहेत. एकट्या साकेत गोखले या खासदारास 11 नोटिसा आल्या आहेत. तृणमूलच्या खासदादारांना, नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला, असे गोखले यांनीच सांगितले.
५. राजस्थानमधील सभेत प्रधानमंत्री महोदयांनी थेट मुस्लिम विरोधी  वक्तव्य केले. आचारसंहितेचा हा भंग असून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही.
६. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताविषयी पत्र पाठवले. हा आचारसंहितेचा भंग होता. आयोगाने हे मान्य केले पण कोणतीही कारवाई केली नाही. मुळात लाखो लोकांचे पर्सनल नंबर प्रधानमंत्र्याकडे कसे आले आणि प्रायव्हसीचे काय झाले, हे आणखी काही प्रश्न.
७. आंध्र प्रदेश मध्ये सरकारी विमान वापरून प्रधानमंत्री प्रचारासाठी गेले. हाही आचारसंहितेचा भंग होता. अशी अनेक उदाहरणे आहेत. निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही.
८. व्हीव्हीपॅट यंत्रावर 100 टक्के ईव्हीएम मतदानाची पडताळणी करण्याच्या संदर्भात निवडणूक आयोग अनुत्सुक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवलेला आहे. लोकांना आयोगावर विश्वास नसल्याचे चित्र आहे.
९. चार दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरात बॉम्ब सापडला. या आधी कर्नाटकमधील बंगलोरमधील कॅफेतल्या बॉम्बस्फोटात भाजप कार्यकर्त्यास अटक झाली आहे. लोकांचा कौल पाहता भाजप कोणत्याही थरास जाऊ शकते, हे या निमित्ताने लक्षात येते.
१०. मुळात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना वगळले आहे. एका आयुक्तांनी अचानक निवडणूक जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर राजीनामा दिला आणि निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन नव्या आयुक्तांची नेमणूक प्रधानमंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालून केली आहे.
आयोगाने तटस्थ अंपायर असले पाहिजे. मॅचफिक्सिंग करता कामा नये, एवढी माफक अपेक्षा होती. वरील सारे मुद्दे आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात.त्यामुळे मतदारांनीच याविरोधात मतदान करावे,आणि भाजपला हरवून ताळ्यावर आणावे,असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. 

थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थानी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रविवारी

पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमधील डुबेरे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक २८  एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता  विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या जन्मस्थळी नाशिक मधील डुबेरे या गावी करण्यात आले आहे. यावेळी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.

ज्या बर्वे वाड्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यावेळी  लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर,चितळे बंधू मिठाईवालेचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नवाब शादाब अली पेशवा,  निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, इतिहास तज्ञ मोहन शेटे उपस्थित राहणार आहेत.

कुंदनकुमार साठे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे रणधुरंधर, महापराक्रमी अजिंक्य योद्धा व हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्म स्थळ असलेला डुबेरे ता. सिन्नर येथील “बर्वे वाडा” त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्म स्थानाचा इतिहास ही मोठा रंजक आहे. बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातील श्रीवर्धन तर आई राधाबाई बर्वे व मामा मल्हारराव बर्वे हे गणपतीपुळ्या जवळच्या नेवरे गावचे. मल्हारराव बर्वे यांनी स्वकर्तृत्वावर नाशिकच्या गंगथंडी प्रांती स्वराज्यकामी केलेल्या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम महाराजांकडून त्यांना डुबेरे, पांडुर्ली, पिपळस व कोठुरे ही चार गावे जहागीर (बक्षीस) मिळाली. जहागिरी व चौथाई वसुलीचा कारभार बघण्याकामी त्यांनी डुबेरे येथे कुटुंब कबील्यासाठी हा वाडा बांधला.

हिंदू चालीरीती प्रमाणे स्त्रीचे पाहिले बाळंतपण माहेरी व्हावे असा प्रघात आहे. बाजीरावांच्या वेळी राधाबाई बर्वे – पेशवे या सासवड येथे वास्तव्यास होत्या. बाजीरावांचा जन्म पावसाळ्यात भाद्रपद पौर्णिमेचा अशा वेळी बालाजी पंतांनी राधाबाईंना बाळंतपणासाठी दूर पल्ल्याच्या व अती पावसाच्या कोकणातील नेवरे येथे न पाठवता जवळ असलेल्या व तुलनेने सुरक्षित ठिकाणी भावाच्या गावी म्हणजेच डुबेरे येथे पाठवले व म्हणून बाजीरावांचा जन्म डुबेरे येथे मामाच्या घरी बर्वे वाड्यात झाला.

सुंदर दीड एकर क्षेत्रात असलेला बर्वे वाडा तीन चौक, एक बुरुज, भक्कम भिंती, कोरीवकाम असलेल्या सागवानी खांबावर उभा असून दरवाजे, पागा, कचेरी असंख्य दालने, धान्याची बलंद, पाण्यासाठी आड इ. सुविधांसह परिपूर्ण असलेला हा “बर्वे वाडा” वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे.

भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा:रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र

पुणे : देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून ‘मंगळसूत्रा’वर खरा डोळा भाजपचाच आहे, हे सिद्ध होते… अशा शब्दांत पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आज तोफ डागली.

एका जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे’, अशी टीका केली होती. या टीकेला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या सडेतोड उत्तर दिले. जवळपास ६० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. या काळात कधी काँग्रेसने कोणाचे मंगळसूत्र हिसकवले? याचे एकही उदाहरण नाही. उलट इंदिरा गांधींनी युद्ध झाले तेव्हा त्यांचे सोने देशाला दिले. माझ्या आईचे ‘मंगळसूत्र’ देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर बोलत होते. ते म्हणाले, देशात कोरोना येवू शकतो. सतर्क रहा, असे सर्वप्रथम काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले होते. पण, मोदींनी ते लक्षात घेतले नाही. देशात कुठलीही पूर्वतयारी केली नाही. नंतर पुढे एका दिवसात लॉकडाऊन करून टाकले. सर्वसामान्यांचे अर्थचक्र ठप्प झाले. यात देशातील लाखो लोक मृत्यूमुखी पडले. असेच नोटबंदीच्या जाचक निर्णयातूनही घडले. मग ‘मंगळसूत्रा’वर डोळा कोणाचा आहे? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

हमीभावासाठी पंजाब, हरियाणामधील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर लाठी उचलण्यात आली. लाठी हल्ल्यामुळे, कडाक्याच्या थंडीमुळे, पावसामुळे अनेक आंदोलनकर्ते शेतकरी रस्त्यावर मृत्यूमुखी पडले. अशा घटनेत मंगळसूत्रा’वर कोणाचा डोळा होता, हेही जनतेला माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. ती मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना योग्य ते उत्तर देणार आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद म्हणजे माणूसपणाची घेतलेली दखल -माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी 

डॉ.राधा संगमनेरकर लिखित ‘झेप यशाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नजरेच्या माध्यमातून होणारा संवाद महत्त्वाचा आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद म्हणजेच माणूसपणाची घेतलेली दखल आहे. काही डॉक्टर असे असतात की, त्यांच्याकडे पाहिल्यावरच अर्धे आजार बरे होतात. परंतु डॉक्टरांना मारहाणीचे प्रसंग होताना दिसतात. वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण झाले आहे. अनेकदा रुग्णांकडे माणूस म्हणून नाही तर रुग्ण म्हणूनच पाहिले जाते, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

आनंद प्रकाशन आणि चिन्मय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राधा संगमनेरकर लिखित ‘झेप यशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रमेश भोसले, डॉ.अमोल अन्नदाते, लेखिका डॉ.राधा संगमनेरकर, डॉ अभिजित अन्नदाते आदी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यात आला आहे.  पुस्तकातील अनेक घटना वाचल्यावर हे पुस्तक वेदनादायी परंतु आपले ज्ञान वाढवणारे आहे, असे लक्षात येते. विश्वाची माऊली काय काय सोसून विश्वाला वाढवत असते याची प्रचिती पुस्तकातून येते.

ते पुढे म्हणाले, तरुणांनी आठवड्यातले सहा दिवस दररोज १६ तास काम केले पाहिजे. कामात बदल हाच आराम असला पाहिजे. तरुणपणात काम केले तरच आयुष्यभराचा मजबूत पाया निर्माण होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. रमेश भोसले म्हणाले, एका शिक्षकाला आपला विद्यार्थी कसा घडावा असे वाटते त्याच प्रकारे राधा संगमनेरकर यांचे काम आहे. एक डॉक्टर काय करू शकतो याची प्रचिती त्यांच्या कामातून येते. निस्पृह आणि नीतिमत्तेने त्यांनी रुग्णांची सेवा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.  

डॉ. राधा संगमनेरकर म्हणाल्या, ग्रामीण भागात मी काम करत होते प्रत्यक्ष अनुभवासाठी विविध हॉस्पिटलमध्ये काम केले आणि शेवटी आपल्या गावातील लोकांना सेवा मिळावी म्हणून गावी हॉस्पिटल उभारले. पुस्तकी ज्ञानाला व्यवहारात ज्ञानाची जोड मिळेल आणि एक चांगला डॉक्टर होण्यासाठी या पुस्तकातून प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी गीता भुर्के यांनी गणेशवंदना सादर केली. डॉ. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ मुकुंद संगमनेरकर यांनी आभार मानले. डॉ सई संगमनेरकर यांनी पसायदान म्हटले.. श्रोत्यांची फार मोठी उपस्थिती होती.

मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज


गंगाधाम,पुणे येथे ७९४ युनिट रक्तदान  करून मानव एकता दिवस साजरा

गंगाधाम,पुणे , २५ एप्रिल, २०२४:-
            “निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्यक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्न होतो तेव्हा खरं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते.” असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले.
            मानव एकता दिवसाचे पावन पर्व बाबा गुरबचनसिंहजी यांनी मानवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत आहे.  
            संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज संपूर्ण भारतवर्षात जवळपास २०७ ठिकाणी विशाल रुपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सुमारे ५०००० युनिट रक्त संकलित करण्यात आले.
            संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात समस्त रक्तदात्यांनी स्वेच्छेने व अत्यंत उत्साहाने ७९४ युनिट रक्तदान केले अशी माहिती पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. ससून रुग्णालय रक्तपेढी २८९ आणि वाय. सी. एम. रुग्णालय रक्तपेढीच्या टीमने ५०५ युनिट रक्त संकलित केले.
            मानव एकता दिवस प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात जनसमुदायाला संबोधित करताना सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवा ही नेहमी निष्काम भावनेनेच केली जाते. अशी भावना जेव्हा आपल्या हृदयात निवास करते तेव्हा खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होते. असेच परोपकारी जीवन बाबा गुरबचनसिंहजी यांच्या दिव्य शिकवणूकीचा आधार राहिला आहे.  
            निष्काम सेवेच्या सुंदर भावनेविषयी बोलताना सदगुरु माताजींनी समजावले, की जेव्हा आमच्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू लागते. कारण त्यावेळी आमची सेवाभावना साकार व कर्मरूप धारण करुन समस्त मानव परिवारासाठी वरदान बनून जाते. रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वोपरि सेवा आहे ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे.

एनडीआर वेअरहाऊसिंगतर्फे पुण्यात अत्याधुनिक सुविधेचे अनावरण

·       या सुविधा केंद्रात गोदामाची जागा 0.४ दशलक्ष चौ. फूट आहे

·       ७ महिन्यांत बांधकाम पूर्ण

पुणे, २५ एप्रिल २०२४: गोदाम आणि दळणवळण क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनडीआर वेअरहाऊसिंगने आज पुण्यात आपल्या नवीन अत्याधुनिक सुविधा केंद्राच्या उद्घाटनाची  घोषणा केली. उद्घाटन सोहळा २५ एप्रिल २०२४ रोजी पार पडला.

हा प्रकल्प एनडीआर वेअरहाऊसिंगच्या विस्तार योजनेचा एक भाग असून पुण्यात ८० एकरांपेक्षा जास्त भूसंपादनाचे काम सुरू किंवा नियोजित आहे. यातून अतिरिक्त १.८ दशलक्ष चौरस फूट औद्योगिक आणि गोदामांच्या जागेची क्षमता दिसून येते.

हे सुविधा केंद्र एका भारतीय बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीला भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.

पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यामध्ये स्थित नवीन सुविधा केंद्रामध्ये अंदाजे 0.४ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे गोदाम आहे आणि ते केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत बांधले गेले आहे. गोदामाच्या लक्षवेधी वैशिष्ट्यांमध्ये उष्णतारोधक छप्पर आणि बाजूच्या भिंतींचा समावेश असून त्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहण्याची यंत्रणा आहे. त्यामुळे प्रति तास ६ वेळा हवा बदल होतात. त्याच्या आकारमानाच्या आणि प्रगत बांधकामाव्यतिरिक्त या सुविधा केंद्रामध्ये ६०० वन वृक्षांची लागवड आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) यासारख्या शाश्वत घटकांचा समावेश आहे.

१९८६ पासून सुरुवात झाल्यापासून आपली परंपरा जपत एनडीआर वेअरहाऊसिंग भारतातील एक प्रमुख वेअरहाऊसिंग पॉवरहाऊस म्हणून विकसित झाले आहे. ते देशभरात किफायतशीर दरात अतुलनीय दर्जेदार औद्योगिक आणि वितरण केंद्रे सादर करते. सध्या, एनडीआर कडे १७  दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त गोदामांची जागा आहे आणि ती ते चालवतात. जोडीला अतिरिक्त ४ दशलक्ष चौरस फूटाचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये फॉर्च्युन 100 कंपन्या, आघाडीच्या भारतीय कॉर्पोरेट्स, ई-कॉमर्स बड्या कंपन्या आणि 3PL यांचा समावेश आहे.

एनडीआर वेअरहाऊसिंगचे झोनल हेड (पश्चिम) रामचंद्रन राजाराम म्हणाले, “पुण्यातील आमचे नवीन सुविधा केंद्र एनडीआर वेअरहाऊसिंगच्या नाविन्यपूर्णता आणि शाश्वतता यासाठीच्या बांधिलकीची पावती आहे. या क्षेत्रात आमचे स्थान मजबूत करत आणि उद्योगक्षेत्रासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करत या अत्याधुनिक सुविधाकेंद्राचे उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे सुविधाकेंद्र म्हणजे केवळ पुण्यातील वेअरहाउसिंग सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीला पुरे करण्याचे साधन आहे असे नाही तर त्यातून पर्यावरणाप्रती असलेली आमची बांधिलकी देखील प्रतिबिंबित होते. उद्योगातील आमचे नेतृत्व आणखी मजबूत करत आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक गोदाम आणि दळणवळण सुविधा पुरविण्यासाठी आम्ही चांगल्या स्थितीत आहोत.”

एनडीआर वेअरहाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड हे भारतातील पहिले “पर्पेच्युअल वेअरहाऊसिंग आणि इंडस्ट्रियल पार्क्स InvIT” या एनडीआर InvIT ट्रस्टचे प्रायोजक आहेत. InvIT खाजगीरित्या १४  फेब्रुवारी २०२४ रोजी सूचीबद्ध केले गेले.

गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार,नौकऱ्यांची कंत्राटी पद्धती बंद ते जातनिहाय जनगणना ,शरद पवार राष्ट्रवादी चा शपथनामा प्रकाशित

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचा (NCP SP) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) साठी शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा शपथनाम्यातील काही गोष्टी वाचून दाखवल्या. शपथपत्रातील प्रमुख गोष्टी

  • स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती करुन 500 रुपयांवर आणणार

-पेट्रोल आणि डिझेलवरील कराची फेररचना, महागाई रोखण्यासाठी प्रयत्न

  • केंद्राकडील 30 लाख रिक्त जागांवर भरती करण्याचा आग्रह

-महिलांना शासकीय नोकऱ्यात 50 टक्के आरक्षण

-जीएसटीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणार

  • शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार
  • शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार

-जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार

-आरक्षणावरील 50 टक्केची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार

  • खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करणार
  • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार
  • आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणार
  • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करणार
  • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी आणणार
  • खाजगीकरणावर मर्यादा आणणार
  • अग्निवीर योजना आम्ही बंद करणार
  • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू
  • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू

वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. पाच वर्षांसाठी आमचे खासदार निवडून जातील, त्यांना हे विषय कमी पडतील, असं वंदना चव्हाण म्हणाल्या. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.