Home Blog Page 1076

पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे खडकी येथे आयोजन

पुणे – पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती ज्योतीबा फुले, साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन शनिवार दि.२७ व रविवार दि. २८ एप्रिल २०२४ दरम्यान स्टार बॉक्सिंग ॲकॅडमी,रेंजहिल्स, खडकी, पुणे येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्याचे १८६ खेळाडूनी या स्पर्धेकरिता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
अधिक माहितीसाठी श्री.अभिमन्यु सूर्यवंशी (महासचिव, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना) मो. नं. ९९२२०८१०२२ यांना संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे, कार्याध्यक्ष श्री. भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे.

‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे भाजपचेच..!! कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे -इंडीयन ओव्हरसीजचे (विदेशी) काँग्रेसचे अघ्यक्ष सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील एका कार्यक्रमात,
अमेरीकेतील वारसाहक्क संपत्ती बाबत काय कायदा आहे (?)याची माहीती दिली. ते अमेरीकेचे नागरीक असून त्याचा अर्थोअर्थी भारताशी काहीही संबंध नाही.अमेरीकेत एखादी श्रीमंत व्यक्ती मृत पावल्यास त्याची ५५ % संपत्ती ‘वारसा कराच्या’ रुपाने सरकार जमा होते व ती सरकारच्या कोषागारातुन समाज कल्याणाकरीता खर्च होते, एवढेच सॅम पित्रोडा म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सॅम पित्रोडा यांचे वक्तव्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे देखील सांगितले आहे..!
तरी देखील ‘भाजपचे नेते ते प्रवक्ते’ नेतृत्वाकडून आलेला खोटारडेपणाचा प्रपोगंडा करण्याचा वारसाहक्क निभावत, अमेरीकन वास्तव्य असलेल्या पित्रोदांच्या विघानाचा कपोलकल्पित आघार घेत व अकलेचे तारे तोडत“काँग्रेस भारतात वारसा हक्क संपत्ती कर लाऊन देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान रचत असल्याचा”(?) बालीश व हास्यास्पद आरोप करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,मुळात भाजप नेते व प्रवक्त्यांनी किमान हे लक्षांत ठेवावयास हवे होते की, मुळात “काँग्रेसचा न्याय पत्र जाहीरनामा” हा सत्ताधारी पक्षाच्याही अगोदर जाहीर झाला आहे..! त्यामध्ये “वारसाहक्क संपत्ती कराचा” कुठेही ऊल्लेख नाही..किमान आरोप करण्यापुर्वी हे तरी तपासले पाहीजे होते..!तसेच जर ‘वारसा हक्क संपत्तीकराच्या’ रुपाने देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट – कारस्थान” जर कोणी केले असेल, तर दस्तूरखुद्द मोदी – शहांच्या विकसीत भाजपने २०१९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जयवंत सिन्हा यांनी वारसाहक्क संपत्तीकर भारतात लागु करण्याचे विधान केले होते.. किमान हे तरी भाजपच्या भाषणजीवी नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवे होते..! त्यामुळेच ‘कट कारस्था करण्याचा डीएनए हा भाजपचाच’ असल्याचे ध्यानात येईल अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी जोडली..!

राहुल गांधींनी औकातीत राहावं-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना शोभत नाही, त्यांनी औकातीत राहावं

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

पराभवाच्या भीतीनं सोलापुरात राहुल गांधींकडून मोदीजींचा एकेरी उल्लेख

गाली तो गहना बनाना मोदीजी की आदत, जनता काँग्रेसला धडा शिकणार-बावनकुळे

कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं काँग्रेसला धडा शिकवला

मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर एकही जागा राज्यात काँग्रेसला मिळणार नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात

बावनकुळे यांन असे म्हटले आहे कि,’ सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे.

गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला.

निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही.

शरद पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक!

  • उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा’
  • चंद्रशेखर बावनकुळे यांची दोन्ही जाहीनाम्यांवर सणसणीत टीका

नागपूर-शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते जनतेला मूर्ख समजत आहेत. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा आहे.

कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते, श्री बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेवर होते तेव्हा-तेव्हा स्वतःच राजकारण, स्वतःच्या लोकांच राजकारण सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता यासाठी केले. या महाराष्ट्रच कधीच भले झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवात्वात जो जाहीरनामा, वचननामा जाहीर केला आहे, त्यातून राष्ट्र कल्याण आणि देश कल्याण साधले जाणार आहे

  • उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा’

नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे.

ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही.

• इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधी यांनी असे म्हटल आहे की हिंदूची संपत्ती आम्ही ओढवू आणि मताचा लांघुलचालनाकरिता दुसऱ्या लोकांना देऊ.

  • त्यामुळे हिंदूंच्या मागे हिंदूंचा नाश करण्याकरिता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरिता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिन यांनी केली आहे ती भाषा उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी करत आहेत.
  • काँग्रेसच्या वचन नामामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे, त्या वचन नामाचा जो शेवट आहे हा हिंदू समाजाविरुद्ध आहे..
  • त्यामुळे काँग्रेसचा आणि शरद पवार यांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी,देश विरोधी, हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणारा आहे
  • संविधान संपवणार अशी भाषा, हा नरेटिव्ह, हा जो मागासवर्गीय भागामध्ये काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत आहेत
  • खरे तर यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे,
    डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची माफी मागितली पाहिजे
  • मोदीच्या विकसित भारताचा 2024 ते 2029 चा वचननामा हा महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी 14 एप्रिलला दिला आहे
  • संविधान हातात घेऊन नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्तम भारत बनवण्याकरिता निघाले आहेत, आणि हे खोटारडे (विरोधक) मागासवर्गीय आयोगाला सांगत आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान संपवणार आहे
  • त्यामुळे हे चुकीच सांगून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, मागासवर्गीय जनता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान करणारे आम्ही लोक कधीही या काँग्रेसच्या आणि इंडी आघाडीच्या प्रचाराला बळी पडणार नाही. एकनाथ खडसे यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेशाला
    कोणीही आडकाठी केली नाही, केंद्रानेच जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आडकाठी करत नाही. पक्ष प्रवेशाबद्दलची जी केंद्रीय समिती आहे ती अंतिम निर्णय घेते त्यानंतर समितीची बैठक झाल्यावर मग पक्ष प्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असे मला वाटते.

३ मे रोजी राहुल गांधी पुण्यात …

पुणे- लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर ,बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि मावळातील संजोग वाघेरे तसेच शिरूर चे अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आणि एकूणच महाराष्ट्रातील उर्वरित लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कॉंग्रेस नेते राहुल गांधी ३ मे रोजी पुण्यात येणार असल्याचे वृत्त आहे . यावेळी राहुल गांधी यांची सभा , रेली, संवाद यात्रा काढली गेली पाहिजे गेल्या वेळेप्रमाणे पुणेकरांना आणि कार्यकर्त्यांना टाळून भारती विद्यापीठातील बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमाप्रमाणे नियोजन करून दिशाभूल करू नये अशी मागणी नाग्रीकातून आणि कार्यकर्त्यांतून होते आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या पुणे दौ ऱ्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली असली तरी नेमका सभा कुठे असले , कि नसेल काय कार्यक्रम असेल याबाबतची माहिती अद्याप दिल्लीश्वरांना महाराष्ट्रातील , पुण्यातील स्थानिक नेत्यांकडून आज मिळेल असे सांगितले जाते आहे.

२९ तारखेला पुण्यात PM नरेंद्र मोदींची सभा आहे त्यानंतर होणाऱ्या राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन , राहुल यांचा संपर्क वाढविणारे असेच राहिले तर त्याचा फायदा निवडणुकीत होईल असे मानले जाते आहे.

बटन कचाकचा दाबा, अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल-अजित पवारांचे वक्तव्य आक्षेपार्ह नाही:निवडणूक आयोगाची क्लीन चिट

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रचारसभेत विकासनिधीवरुन केलेल्या विधानाप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचे नाव नव्हतं असे कारण देत त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

बारामतीमधील एका सभेत अजित पवार यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विरोधकांकडून देखील या विधानावर प्रचंड टीका करण्याात आली. त्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. यामधून आता अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा , अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केले होते. या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी कविता द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही अस कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ”आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता घेईल”, असे अजित पवार म्हणाले होते.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी बद्दलच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यासही दिला नकार

सुप्रीम कोर्ट म्हणाले – व्यवस्थेवर अनावश्यक अविश्वास योग्य नाही

नवी दिल्ली- लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी पार्मुख्याने ज्यांच्यावर आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी स्लिप्सच्या 100% क्रॉस चेकिंगची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या. एकीकडे सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी EVM मशीन्स बंद पडत असल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा सल्ला देणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे .

या प्रकरणाची सुनावणी करणारे दोन्ही न्यायाधीश – न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता म्हणाले की, एखाद्या यंत्रणेवर आंधळेपणाने विश्वास न ठेवल्याने अनावश्यक शंका निर्माण होऊ शकतात. आम्ही प्रोटोकॉल, तांत्रिक बाबींवर तपशीलवार चर्चा केली आहे.आम्ही 2 सूचना दिल्या. पहिली- सिम्बॉल लोडिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिम्बॉल लोडिंग युनिट सील केले पाहिजे. सिम्बॉल लोडिंग युनिट 45 दिवसांसाठी साठवले पाहिजे.

दुसरी- उमेदवारांच्या आवाहनावर निकालानंतर अभियंत्यांची एक टीम मायक्रोकंट्रोलर ईव्हीएममधील बर्न मेमरी तपासेल. हे काम निकाल जाहीर झाल्यापासून 7 दिवसांच्या आत केले पाहिजे. त्याचा खर्च उमेदवाराला करावा लागेल.

यापूर्वी 24 एप्रिल रोजी 40 मिनिटांच्या सुनावणीनंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले होते की, आम्ही गुणवत्तेवर पुन्हा सुनावणी करत नाही. आम्हाला काही निश्चित स्पष्टीकरण हवे आहे. आम्हाला काही प्रश्न पडले आणि त्यांची उत्तरे मिळाली. निर्णय राखून ठेवत आहे.

कार्यकर्ता अरुण कुमार अग्रवाल यांनी ऑगस्ट 2023 मध्ये VVPAT स्लिपच्या 100% पडताळणीबाबत याचिका दाखल केली होती. मतदारांना VVPAT स्लिपची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची संधी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. मतदारांना त्यांच्या स्लिप मतपेटीत स्वतः टाकण्याची सोय असावी. त्यामुळे निवडणुकीत अनियमितता होण्याची शक्यता संपुष्टात येईल.

या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे प्रशांत भूषण, गोपाल शंकरनारायण आणि संजय हेगडे हे वकील हजर आहेत. प्रशांत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) चे आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या वतीने अधिवक्ता मनिंदर सिंग, अधिकारी आणि केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते.

गेल्या सुनावणीत कोर्टाने EC ला विचारले होते – मतदारांना VVPAT स्लिप देता येणार नाही का?
यापूर्वी 18 एप्रिल रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने वकील आणि निवडणूक आयोगाचा 5 तास युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला होता. मतदानानंतर मतदारांना VVPAT स्लिप देता येणार नाही का, असा प्रश्न न्यायालयाने निवडणूक आयोगाला गेल्या सुनावणीत विचारला होता.

यावर निवडणूक आयोगाने म्हटले होते की, मतदारांना VVPAT स्लिप देण्यात मोठा धोका आहे. यामुळे मताच्या गोपनीयतेशी तडजोड होईल आणि बूथच्या बाहेर त्याचा गैरवापर होऊ शकतो. इतर लोक ते कसे वापरू शकतात हे आम्ही सांगू शकत नाही.

न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या वकिलांकडून समजली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखले पाहिजे, असे सांगितले. हे घडायला हवे होते आणि झाले नाही यात शंका नाही. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

16 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने भूषण यांना सांगितले होते – येथे जर्मनीची उदाहरणे चालत नाहीत
16 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत वकील प्रशांत भूषण यांनी मतपेटीत VVPAT स्लिप टाकल्या पाहिजेत असा युक्तिवाद केला. जर्मनीतही असेच घडते. त्यावर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता म्हणाले की, तिथली उदाहरणे इथे चालत नाहीत. याशिवाय, न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमच्या निर्मितीपासून ते स्टोअरेज आणि डेटा टेम्परिंगच्या शक्यतेपर्यंत सर्व काही सांगण्यास सांगितले होते.

सध्या कोणत्याही मतदारसंघात केवळ ५ EVM मते VVPAT स्लिपशी जुळतात. याचिकेत म्हटले आहे की निवडणूक आयोगाने अंदाजे 24 लाख व्हीव्हीपीएटी खरेदी करण्यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु केवळ 20,000 व्हीव्हीपीएटी स्लिपची मतांसह पडताळणी केली जात आहे.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात VVPAT मशिनचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. हे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांनी बनवले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, 21 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सर्व EVM पैकी किमान 50 टक्के VVPAT मशिनच्या स्लिपमधील मतांची जुळवाजुळव करण्याची मागणी केली होती. त्यावेळी निवडणूक आयोग प्रत्येक मतदारसंघात एकच ईव्हीएम व्हीव्हीपीएटी मशिनशी जुळवत असे. 8 एप्रिल 2019 रोजी, टॅलीसाठी ईव्हीएमची संख्या 1 वरून 5 करण्यात आली.

यानंतर, मे 2019 मध्ये, काही तंत्रज्ञांनी VVPAT द्वारे सर्व ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

याशिवाय असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने जुलै 2023 मध्ये मतांची जुळवाजुळव करण्यासाठी याचिकाही दाखल केली होती. ते फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते – कधी-कधी आपण निवडणुकांच्या निष्पक्षतेवर संशय घेऊ लागतो.

मोदी यांनी विकासाबरोबरच संस्कृती जपली व जोपासली – श्रीरंग बारणे

पनवेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशात विकास पर्व आणले नाही तर भारतीय संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे कामही केले आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे. आश्वासनांऐवजी कृतीवर भर असल्याने मोदी यांनी समस्त भारतीयांचा विश्वास जिंकला आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.

खासदार बारणे यांनी आज प्रचार दौऱ्यात पवनेलचा ग्रामीण भाग पिंजून काढला. या दौऱ्यात वाजे येथे झालेल्या चौक सभेत बारणे बोलत होते. या दौऱ्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे तालुका सचिव दिनेश मांडवकर तसेच प्रथमेश सोमण, सुरेश भोपे, सूरज पालकर, अक्षय म्हसकर, विकास नागे, भरत वाघ, बबन वाघ, सूरज करणूक, एकनाथ देसेकर, प्रल्हाद केणी, रामदास पाटील, दर्शन ठाकूर, भूपेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, विद्याधर चोरगे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

खासदार बारणे म्हणाले की, सुमारे 500 वर्षे जुना वाद निकाली काढत नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराची उभारणी करून जनभावनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले. केवळ अयोध्याच नाही तर देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा त्यांनी विकास केला. त्या माध्यमातून त्यांनी संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे कामही केले.

केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे.‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विविध लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहे. गेल्या पाच वर्षातील पहिली अडीच वर्षे सत्तेत असूनही विरोधी पक्षात असल्यासारखे वाटत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांसाठी खूप काही करता आल्याचे समाधान आहे, असे बारणे म्हणाले.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांसाठी प्रचंड पाठपुरावा करून पनवेल तालुक्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघर गॅस सिलेंडर, शौचालये, पिण्याचे पाणी दिले. देशात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. गरिबांची कदर करणारा हा पंतप्रधान आहे. महिलांना व शेतकऱ्यांना त्यांनी सन्मान दिला आहे. कोरोना काळात मोफत लस पुरवून तुम्ही आम्हाला त्यांनी जीवदान दिले आहे. तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे.

काँग्रेसने केवळ आश्वासने दिली तर शेतकरी कामगार पक्षाने वर्षांनुवर्षे मतदारांची केवळ फसवणूक केली, असा आरोपही आमदार ठाकूर यांनी यावेळी केला.

खासदार बारणे यांच्या विजयामध्ये पनवेलचा वाटा सिंहाचा असला पाहिजे, अशी अपेक्षा बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल मतदारसंघातून बारणे यांना किमान एक लाखाचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास अरुण भगत यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी शेडुंग, बेलवली, लोणीवली, वांगणी, आंबिवली, नेरे, वाजे, शिवणसई, दुंदरे, रिटघर, वाकडी, खानाव, मोरबे, महालुंगी, चिंधण, पालेखुर्द, वावंजे आदी गावांचा प्रचार दौरा केला. फटाके वाजवून, पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. औक्षण करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ‘माय व्होट इज माय फ्युचर, पॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणे, तसेच ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार :

मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणे, रा. तुकुम चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडाम, रा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडे, रा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

रिल्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, रा. टिळक वॉर्ड, बालाजी मंदीरजवळ, चिमूर यांना, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, रा. पालगाव, पो. आवाळपूर, ता. कोरपना यांना, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावी, रा. वॉटर सप्लाय कॉर्टर, गोपालनगर, तुकुम, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

पोस्टर्स स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडे, रा. नेहरू नगर, नवीन वस्ती, डीआरसी रोड, चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडे, रा. शासकीय कन्या वसतीगृह, भिवकुंड (विसापूर) यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिले, रा. तिलक वॉर्ड, बोर्डा, ता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

मिम्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुले, रा. सुब्बई, ता. राजुरा यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुने, रा. हुडको कॉलनी, अमर चौक, चंद्रपूर यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहा, रा. मच्छीनाला, मुक्तीकॉलनी, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात  सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी  ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ७.१८ टक्के

अकोला – ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा – ६.६१ टक्के

हिंगोली – ७.२३ टक्के

नांदेड – ७.७३ टक्के

परभणी – ९.७२ टक्के

यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली; डॉ.नीलम गोऱ्हे

  • गणेशोत्सव, दहीहंडीवरील निर्बंध महायुती सरकाने उठविले.

पुणे -, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा निवडणूक अर्ज भरण्यात आले. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे महायुतीचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

https://www.facebook.com/share/v/VcggytAhpvDj5vC7/?mibextid=oFDknk

पुणे शहरात आजवर सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचाही चांगला संपर्क राहिलेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्याद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो, सरकारी दवाखान्यांचे अद्ययावतीकरण यांसारखे विविध विकासात्मक कामे पुणे शहरात केलेली आहेत. पुण्याचा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गणेशोत्सवावेळी मंडळांना परवानगीसाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात पण ज्याक्षणी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दहीहंडी, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवाला असणाऱ्या अटी शिथिल करून त्या लोकाभिमुख केल्या आहेत. पाच वर्षांसाठी एकदाच परवाना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व मंडळांना विनासायास परवाना मिळाला आहे. दहीहंडी संदर्भातील नियमावलीत देखील बदल करून ज्या गोविंदाचा अपघात झाला त्यांना विमा कवच मिळवून दिले आहे. याखेरीज देहू, आळंदी, जेजुरी यांसह अनेक तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासोबतच जिल्हा नियोजनमधील निधी हा दुर्गकिल्ले यांच्या दुरुस्तीकरिता वापरण्याची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्यावतीने अनेक शैक्षणिक संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितच होणार आहे.

येथील केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, शिवसृष्टी, सावित्रीबाई फुले स्मारक यांसारखे अनेक गोष्टींच्या विकासाकरिता महायुती सरकारने निधी दिलेला आहे. पुणे शहरातील टेकड्या वाचविण्याचे काम सुद्धा पुणे महापालिकेने केलेले आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून टेकड्यांवर वन लावण्याच काम करण्यात आलेले आहे. वेताळ टेकडीवरील रस्त्याच्या मुद्द्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून त्या कामाला स्थगिती दिलेली आहे. टेकड्यांचं संरक्षण करण्याचं काम पुणे महानगरपालिका आणी राज्य सरकारने योग्यपणे केले आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्याचं काम ‘स्वच्छ’ या संस्थेला देण्यात आले. जेणेकरून शहरात स्वच्छता ठेवली जाईल.

महाराष्ट्रात ८ लाख ५० हजार कोटींच्या पायाभूत सुविधा निधी केंद्र सरकारने तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ लाख ४ हजार ५७६ घरे पूर्ण केलेली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता ३१ हजार कोटी रुपयांची शिष्यवृत्ती सरकारने दिली आहे. १२ लाख ५४ हजार ८३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. याखेरीज बार्टी, सारथी, महाज्योति यांच्या प्रश्नांबाबत देखील शासन संवेदनशील असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले-कामगार संघटना संयुक्त कृती‌समितीचा आरोप

पुणे-मोदी सरकारने केवळ बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खुश करण्यासाठी कामगारांची अधिकाधिक कोंडी करण्याचे धोरण अवलंबले आहे. मोदी सरकारने कामगार कायद्यात तस अन्यायकारक बदल करून गेल्या ७५ वर्षांत कामगारांसाठी असलेले संरक्षणाचे कायदे काढून कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम केले आहे. मोदी शहांनी कामगारांना गुलामगिरीत लोटले आहे, असा आरोप शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीच्या‌ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

असंघटित कामगारांबाबत पोकळ प्रचारी आणि बोगस घोषणाबाजी करण्यापलिकडे या सरकारने काहीही केलेले नाही. त्यामुळे आम्ही‌सर्व कामगार संघटनांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्याचा व त्यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचेही‌ त्यांनी सांगितले.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ‘देशातील सत्ताधारी पक्षाचे कामगार विरोधी धोरण’ या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ. अजीत अभ्यंकर, जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे, शिवसेना कामगार संघटनेचे रघुनाथ कुचिक, कृती समितीचे अघ्यक्ष व महाराष्ट्र इंटक संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम, कामगार नेते सुनिल शिंदे, यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

कॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडीत‌ जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या‌ कामगार कायद्यांचा फायदा कामगारांना होत होता. मात्र, आताच्या मोदी‌ सरकारने हे कायदे बदलून अन्यायकारक कायदे‌ लादले. कारखाना बंद करण्याचा कायदा ठाकरे सरकारने नाकारला होता, मात्र राज्यात घटनाबाह्य सरकार आल्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वीची तारीख टाकून तो मान्य केला. कारखान्यांना आगी लागतात, कामगार मरतात, मात्र, त्यावर काहीच केले जात नाही. हे सरकार कामगार विरोधी व कंत्राटदारांच्या बाजूने आहे.

रघुनाथ कुचिक म्हणाले, केंद्र सरकारने आचानक भारत बंद करून कामगारांचे अतोनात हाल केले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कामगारांना अनेक कष्ट घ्यावे लागले. केंद्राने मजुरांच्या‌ स्थलांतरासाठी एक हजार कोटी खर्च केल्याचे सांगितले. मात्र माहिती अधिकारात याबाबत काहीच माहिती देत नाहीत. इलेक्टोल बॉंडनंतर सर्वात मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून झाला आहे. कामगार कायदा संघर्षातून मिळाले आहेत, मात्र या कायद्यांचा मुडदा पाडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हे काम उद्योगपतींना खूश करण्यासाठी करण्यात आले. कामगारांच्या आत्महतेवर फारसे लिहीले व बोलले जात नाही. राज्यात आज रोजी रोज सात कामगार आत्महत्या करतात. कामगारांच्या‌ आत्महत्येवर मते मागता येत नाहीत, म्हणून त्यावर बोलले जात नाही. आत्महत्या‌ करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. सलगपणे कंत्राटीकरण करण्याचा झपाटा सरकारने लावला आहे.

किरण मोघे म्हणाल्या, घरेलू कामगारांमुळे कोवीडचा प्रसार होतो, असा गौरसमज पसरला होता, त्यामुळे त्या काळात घरेलू कामगारांना समस्यांचा‌ सामना करावा लागला. ही अडचण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतर‌ सरकारने मदतीसाठी योजना आणली. मात्र, राज्यातील सरकार बदलल्यानंतर ती बंद केली. कामगारांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम सरकारने केल्याने आम्ही घरेलू कामगारांनी भाजप महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचा प्रचार घरोघरी जावून करण्याचा निर्णय घेतला आहे.

कैलास‌ कदम म्हणाले, देशातील मोदी शहा सरकारने कामगारांच्या हक्कांवर घाला घातला. देशातील कामगार रस्त्यावर आणण्याचे काम मोदी शहांनी केले. कामगारांच्या ४४ कामगार कायद्यांएवजी चार श्रमसंहिता आणण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देशातील विविध कामगार संघटनांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे उमेदवार निवडून गेल्यानंतर कामगारांवर लादलेले अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आम्ही केली आहे. यावेळी प्रचारप्रमुख मोहन जोशी, पक्ष सरचिटणीस अजित दरेकर, राज अंबिके आदी उपस्थित होते राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ- अरविंद शिंदे

पुणे –भारताच्या संविधाना ने गेली 75 वर्ष भारतात लोकशाही आणि धर्म निरपेक्षता टिकवून ठेवली आहे त्यामुळे भारताचे संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ असून त्याच्या पुढे कोणताही ग्रंथ नाही आणि हाच राष्ट्रग्रंथ व घटना बदलण्याचे षडयंत्र आगामी काळात सत्तेच्या जोरावर भाजप करू पाहत आहे हे भाजपाचे कटू कारस्थान संविधान प्रेमी नागरिकांनी हाणूनपाडले पाहिजे व येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकित काँग्रेस पक्षालाव महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट च्या अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतदान करून भाजपाचा पराभव घडवीला पाहिजे असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले .

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज काँग्रेस भवन शिवाजीनगर नगर येथे महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ नियोजना साठी अनुसूचित विभागाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी पुणे शहरातील विविध भागात कॉर्नर बैठका, संविधान बचाव फेरी या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन   रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे या बैठकीत ठरले, सदर बैठकीला प्रदेश काँग्रेस चे सचिव गौतम अरकडे, प्रदेश अनुसूचित विभागाचे सरचिटणीस कवीराज संघेलिया,अजित दरेकर माजी नगरसेवक,प्रदेश काँग्रेस चे प्रतिनिधी मेहबूब नदाफ, राहुल तायडे आदींनी आपले विचार व्यक्त केले  या वेळी बैठकीस अजय खुडे, द. स पोळेकर, सुनील काळोखे, सुनील थोरात रवी आरडे, मुन्ना खंडेलवाल,अरविंद जाधव,गुलामहुसेन खान, कसबा ब्लॉक अध्यक्ष अनिल जाधव, वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष अमर मंडलिक, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष सनी कांबळे, शहर उपाध्यक्ष यश कांबळे, अरविंद जाधव, विनोद चौरे, सुरज कसबे, राजेश दांडगे, प्रभाकर भिंगारे, शाम गायकवाड गणेश कांबळे, निखिल चौरे, संतोष हंगरगी, राकेश माने या सह शहरातील विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते या वेळी काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहर अनुसूचित जाती विभाग अंतर्गत व भवानी ब्लॉक अंतर्गत शहराध्यक्ष  अरविंदजी शिंदे व उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले  या बैठकीचे आभार प्रदर्शन अमर मंडलिक यांनी केले तर सदर बैठकीचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष तथा भवानी ब्लॉक चे अध्यक्ष  सुजित यादव यांनी केले होते.

आढळराव पाटील डमी उमेदवार – डॉ. अमोल कोल्हे

शिरुर : आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना शिरुर मधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी केला. त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल. अस नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होत आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.

व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात – जयंत पाटील

भोसरी – व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सचिन अहिर, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशावर 210 लाख कोटीचे कर्ज आहे. देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं आहे. भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. जीएसटीचा विषय एवढा गहन केलाय की, चपलेपासून डोक्याच्या केसांपर्यत सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे.
देशातल्या जनतेकडून पैसे लुटण्याचे काम देशातल सरकार करत आहे, हे जनतेला सांगा, अस आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणूका ह्या जनतेने हातात घेतलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडण्याचे पाप हे भाजपने केलं. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भाजपचा पराभव करायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणून त्यांचाही पराभव करायचा आहे.,असेही जयंत पाटील म्हणाले.

घराघरात तुतारी पोहोचवा

डॉ. अमोल कोल्हे यांच मागचा वेळी घड्याळ हे चिन्ह होत. त्यामुळे विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याची शक्यता जास्त आहे. घड्याळ न्याय प्रविष्ट आहे, पण मतदारांना हे लक्षात येत नाही. म्हणून घराघरात जाऊन शरद पवारांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे सांगा.