पुणे- अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व आय एस टी ई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी ‘इम्प्रोविंग एक्सलंस इन टीचिंग’ या विषयावर सहा दिवसीय ऑनलाईन रिफ्रेशर प्रोग्रामचे उद्घाटन डॉ. आर. के. शेवगावकर संचालक, आय आय टी मुंबई, डॉ. आर के सावंत सदस्य आय एस टी ई नवी दिल्ली, कर्नल बि. वेंकट संचालक फॅकल्टी डेव्हलपमेंट सेल एआयसीटीई व डॉ. एन. बी. पासलकर माजी संचालक, तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. उच्च तंत्रज्ञानामुळे शिक्षण पद्धतीमध्ये सुलभता आली आहे. ईलर्निंग शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना टिकवून ठेवण्यासाठी प्राध्यापकांनी अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करावे. असे प्रतिपादन केले. यावेळी अभियांत्रिकी शिक्षणातील बदलते प्रवाह, हायस्पीड ट्रान्सपोर्टेशन, इनोव्हेटिव अंतरप्रेन्युर, लाईफलॉंग लर्निंग, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, इंडस्ट्री ॲकॅडेमिया पार्टनरशिप, लिबरल आर्ट इन एज्युकेशन या विषयावर मार्गदर्शन करून मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञांनाचा वापर करण्याचे अवाहन या प्रसंगी केले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड, डॉ. आर. के. शेवगावकर, डॉ.आर.के.सावंत, कर्नल बि. वेंकट, डॉ. एन. बी. पासलकर, डॉ. ए. बी. मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. नियोजन डॉ. काशिनाथ मुंडे, व प्रा.सुप्रिया शिंदे व प्रा. सायली कोकणे यांनी केले तर सूत्र संचालन प्रा.प्रज्ञा शानबाग यांनी केले.

