जयंत पाटलांना सांगूनही त्यांनी काही केले नाही आता अजितदादांना संजय राऊतांचं साकडं

Date:

पुणे :

खेडचे प्रकरण जयंत पाटलांच्या कानावर घातले होते पण त्यांनी काही केलेच नाही आता तरी अजित पवारांनी त्यात लक्ष घालाव अशी आमची अपेक्षा आहे असे येथे शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे ६ सदस्य फोडून खेड पंचायत समिती मधील शिवसेनेच्या सभापतीला खुर्चीवरून खेचण्यात आले होते या मागे राष्ट्रवादीच्या मोहितेंचा हाथ असल्याची चर्चा आहे .यावरून महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात खेड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यात आपण एकत्र असून समन्वयाने महाविकास आघाडी सरकार सुरु आहे. मात्र, याच दरम्यान खेडमध्ये असा प्रकार होणे योग्य नाही. हे प्रकरण पहिल्यांदा जयंत पाटलांना सांगितले होते. पण त्यांनी काहीच केले नाही. आता अजित पवारांनी तरी या प्रकरणात लक्ष घालावे अशी आमची अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर येथील पंचायत समितीतील राजकारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. हा स्थानिक पातळीवरचा वाद अगदी वरिष्ठांपर्यंत पोहचला आहे. याचवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून थेट खेड गाठले. आणि याबाबतीत त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत थेट अजित पवारांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

राऊत म्हणाले, खेड पंचायत समितीच्या सभापतींवर आलेला अविश्वास ठराव हा सरळसरळ शिवसेनेवर अन्याय आहे. सेनेचे सदस्य पळवून नेणं फोडणं हे कोणी आमिष दाखवलं? ज्यांच्याबरोबर गेले त्यांनी दाखवलं.कि अन्य कुणी ? अशी संधी आम्हांलाही मिळु शकते. पण आम्ही त्यांना त्यांच्या सरकारला समजावायला सांगू. या प्रकरणाचे आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यापैकी कोणावरही खापर फोडलेले नाही. फक्त अजित पवारांनी या प्रकरणी लक्ष घालावे एवढीच आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्याना आम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...