आमदार तापकीर व नगरसेवक वाबळेंकडून प्रोत्साहन !
पुणे- : ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हा पर्यावर णाचा महामंत्र संत तुकाराम महाराजांनी अवघ्या विश्वाला दिला. जागतिक पर्यावरण दिनी धनकवडी तील तळजाई भ्रमणग्रुपकडून हा मंत्र जपताना तळजाई वनक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर आणि नगरसेवक महेश वाबळे यांनी सक्रीय उपस्थितीने ग्रुपच्या सदस्यांना मोठे प्रोत्साहन दिले.
तळजाई टेकडी म्हणजे आँक्सिजनचा पुरवठा करणारे ‘पुणे शहराचे फुप्फुस’ होय. तळजाई भ्रमण ग्रुपकडून टेकडीवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. तसेच वर्षभर झाडांना पाणी घालून त्यांची निगाही राखली जाते. यंदा ग्रुपच्या सदस्यांनी …..झाडे लावली. यावेळी आमदार भिमराव तापकीर, नगरसेवक महेश वाबळे, वनअधिकारी दिपक पवार आणि तळजाई ट्रेकर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार भीमराव तापकीर म्हणाले, “पर्यावरणाचे संवर्धन करणे, ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जीवनशैलीतील बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा”
गेल्या अनेक वर्षांपासून तळजाई वनविभागात लावलेली असंख्य झाडे तळजाई भ्रमण ग्रुपचा माध्यमा तून जोपासण्यात येत आहेत. ग्रुपचे सदस्य झाडांना वर्षभर आळीपाळीने पाणी घालतात. अशाप्रकारे आम्ही वनदिन झाडांसोबत रोजच साजरा करत आसतो. या पर्यावरण दिनी सेव्ह अर्थ, सेव्ह वाॅटर, सेव्ह ट्री, सेव्ह फाॅरेस्ट अर्थात पृथ्वी, पाणी, वृक्ष आणि वने वाचवण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. – नगरसेवक महेश वाबळे