सोडा राया नाद खुळा , दूरच्या रानात अशा लोकप्रिय गीतांचे संगीतकार हर्षित अभिराज यांच्या ” मैनेची हवा ” या गीताचे प्रकाशन प्रसिद्ध व्यंग चित्रकार मा. श्री. मंगेश्जी तेंडूलकर यांच्या हस्ते नुकतेच पर पडले . प्रकाशनानंतर अवघ्या काही तासात गीताला युटूब वर ५०,००० हून अधिक व्हिव मिळाले असुन सोशल साईट वर गाण लोकप्रियता मिळवत आहे, उदय गाडगीळ यांची निर्मिती असलेल्या या गीताचे गायक , गीतकार आणि संगीतकार हर्षित अभिराज आहेत . या प्रसंगी मंगेश तेंडूलकर म्हणाले , ” हर्षित अभिराज हे माझे आवडते संगीतकर आहेत . त्यांच्या रचना नेहमीच मनाला आनंद देतात , “मैनेची हवा ” हे गीत ठेका धरायला लावणारे आहे. या गीतात लोक संगीताच्या अनेक छटा आढळून येतात .” या गीताचे म्युझिक प्रोग्रेमिंग अभिषेक काटे यांचे आहे . अभिजित सराफ हे या गीताचे सावुंड इंजिनियर आहेत . तसेच श्रीनिवास कुलकर्णी , संजय पेटकर , ढोलकी वादक केदार मोरे यांचेही मोलाचे योगदान या गीताला लाभले.