पुणे- महापालिकेत विरोधीपक्षनेता म्हणून खऱ्या अर्थाने कारकीर्द गाजवली …आणि त्याचे परिणाम या विधानसभेत जाणवले असे म्हणता येईल किंवा मनसे च्या वसंत मोरे यांनी उठविलेले टिळेकर यांच्या घोटाळ्याविरूद्धचे काहूर यांच्या पथ्यावर पडले ..या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असे म्हणता येईल ..काहीही म्हणा …पण हडपसर ला खासदारकी दिलेल्या विठ्ठल पाटलांचे सुपुत्र चेतन पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे .हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी चे उमेदवार चेतन तुपे यांचा विजय झाला आहे . शरद पवार ,अमोल कोल्हे यांच्या भाषणांनी त्यांच्या विजयाला हाथभार लावला असे हि म्हणता येणार आहे.
भाजपच्या विद्यमान आमदारांच्या कारस्थानांचा गेली ५ वर्षे पर्दाफाश करण्यात येत होता त्यात मनसेच्या वसंत मोरेंची आघाडी असली तरी प्रत्यक्षात ते मतदानात आघाडी घेवू शकले नाहीत आणि चेतन पाटलांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानी वृत्ती विरोधा सह सार्वजनिक सुविधांसाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विजयी टप्पा प्राप्त करणे त्यांना प्राप्त झाले .
हडपसर मतदार संघ
1. चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी) – 92326 मते – विजयी झालेले उमेदवार
2. दिपक महादेव जाधव (बहुजन समाज पार्टी) – 1223 मते
3. योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप) – 89506 मते
4. वसंत कृष्णा मोरे (मनसे) – 34809 मते
5. कृपाल कृष्णराव पलुसकर (प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी) – 698 मते
6. घनशाम आनंद हाके (वंचित) – 7570 मते
7. जिहाद इब्राहिम शेख (एमआयएम)- 7901 मते
8. अंजुम झकेरिया इनामदार (अपक्ष) – 367 मते
9. अनुप जालिंदर शिंदे (अपक्ष) – 164 मते
10. अर्जुन लक्ष्मण सिरसाठ (अपक्ष) – 230 मते
11. अॅड. मोहम्मद जमिर शेख (अपक्ष) – 228 मते
12. अॅड. तोसिफ शेख (अपक्ष) – 164 मते
13. रेखा हाकरू वाल्मिकी (अपक्ष) – 256 मते
14. सुभाष काशिनाथ सरवदे (अपक्ष) – 253 मते
15. नोटा – 2474
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.