वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथदालनात ३६५ दिवस कोणत्याही पुस्तकावर २५ टक्के सूट

Date:

पुणे- दिवाळीतील वसूबारसाचा मुहुर्त साधून नारायण पेठेत साहित्य-दर्शन या ग्रंथ दालनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी तसेच प्रसिध्द चित्रकार रविमुकुल यांच्या हस्ते संपन्न झाले. कोणतीही सुटी न घेता यापुढे दरवर्षी चालणार्‍या या नाविन्यपूर्ण उपक्रमात ग्रंथ दालनातील कोणत्याही पुस्तकावर २५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.
प्रा. जोशी व रविमुकुल यांच्या हस्ते उद्घाटन ग्रंथदालनातील गणेश व सरस्वतीच्या मूर्तीपूजनाने झाले. या अनौपचारिक सोहळ्यास अक्षरधारा ग‘ंथप्रदर्शनाचे रमेश राठीवडेकर, विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी, वरदा बुक्स प्रकाशन संस्थेचे गौरव भावे, अमोल प्रकाशनाचे संजय काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विक्रेते रविंद्र कासार आणि गणेश लोंढे यांनी सुरु केलेल्या या अभिनव दालनात एक लाख नव्या व जुन्या लेखकांची पुस्तके विक‘ीसाठी उपलब्ध असतील. पुणेकरांमध्ये व विशेषतः नवीन पिढीत मराठी पुस्तकांबद्दल प्रेम व त्याची व्यवस्था असावी तसेच वाचनसंस्कृती खोलवर रुजावी यातून साहित्य-दर्शनची योजना आकारास आल्याचे कासार आणि लोंढे यांनी सांगितले.
साहित्य-दर्शनला शुभेच्छा देताना प्रा. जोशी म्हणाले की, स्मार्ट पुण्यात स्मार्ट वाचक निर्माण होण्यासाठी साहित्य दर्शनसारखी अनेक ग्रंथदालने व्हायला हवीत. त्यातून मराठी लेखकांबरोबर मराठी वाचकही साहित्याभिमुख व्हायला मदत होईल. वाचनसंस्कृतीचा प्रवाह अधिक गतिमान व्हायला साहित्य व्यवहाराशी निगडीत सर्व घटकांशी एकत्र येऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. साहित्य-दर्शन ग्रंथदालनाची निर्मिती हा त्याचाच एक स्वागतार्ह भाग आहे.
रविमुकुल यांनी या दालनाला शुभेच्छा देताना सांगितले की, समाजात अन्नाइतकीच पुस्तकांची भूक असते. ती भागवण्याचे काम कासार आणि लोंढे हे तरुण व अनुभवीग्रंथ विक्रेते चांगल्या पध्दतीने करतील, अशी आपली खात्री आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ...

स्मार्ट मीटरबाबत पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती

७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमधील १ लाख ६६ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट संवाद पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडलातील विविध मंडलांचे अधिकारी व कर्मचारी दररोज विविध गृहनिर्माण सोसायट्या, निवासी परिसर आणि ग्राहकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देत आहेत. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे. पुणे परिमंडलात जुलै महिन्यात तब्बल ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १,२७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरविषयी माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुणे शहरात दोन ‘एलईडी व्हॅन’ गर्दीच्या ठिकाणी फिरत असून, त्याद्वारे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती व फायद्यांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवून ग्राहकांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट मीटरचे प्रमुख फायदे दिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...