पुणे- आज दुपारी महापालिकेच्या मुख्य सभेच्या ऑनलाईन/ऑफलाईन च्या गोंधळातील मुख्य सभेची बातमी ‘माय मराठी ‘ने प्रसिद्ध करताच आज सायंकाळी राज्य शासनाच्या वतीने पुणे महापालिकेला मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्याचे आदेश काही अटी शर्ती घालून दिले आहेत आज रात्री याबाबतचे पत्र महापालिकेला उपलब्ध झाले. आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत आणि कोरोन प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून प्रत्यक्षात मुख्य सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहे . आपत्ती व्यवस्थापन खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी हे आदेश महापालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे दिले आहेत .