रुग्णांना सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य द्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Date:

औरंगाबाद 26 :  सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा- सुविधा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून  साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरण, औषध साठा याचा वेळेत पुरवठा होत आहे. विविध योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रत्येकांनी रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिकलठाणा जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत केले.

यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, महापालिकेचे डॉ.पारस मडंलेजा, डॉ.मुखेडकर, अति जिल्हा चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, डॉ.रेखा भंडारे  यांच्या बरोबर विविध विभागाचे विभाग प्रमुख, परिचारिका, डॉक्टर्स, तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.

जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टरची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, आवश्यक असणारी यंत्र सामुग्री याचा विभागनिहाय आढावा टोपे यांनी घेतला. यामध्ये रुग्णवाहिका बदली वाहनचालक उपलब्धता, ब्लड बँक, क्ष-किरण व रेडिओलॉजी विभाग, सी टी स्कॅन मशिन,  लेप्रोस्कोपी उपकरण याबरोबरच स्वच्छता, वीज, सुरक्षा, विशेषज्ञ वैद्यकीय प्रशिक्षण, एमआरआय मशिन याबाबत आढावा घेऊन संबधित पदधिकाऱ्यांचा तात्काळ ह्या सुविधा अद्यावत करुन वाढ करण्या बाबत निर्देशित केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व लसीकरणाबाबत देखील आढावा घेतला.

मंत्री टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या सेवासुविधा बाबत पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील विभागात प्रत्यक्ष पाहणी केली तसेच जनरल वार्डातील रुग्णांसोबत संवाद साधला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाना  मिळणाऱ्या आरोग्य सुविधा विषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...