दलीत युवकांना स्वावलंबी करण्यासाठी डिक्की आणि राजश्री शाहू समूह एकत्रित काम करणार – समरजित राजे घाटगे

Date:

पुणे- शंभर वर्षापूर्वी दलीत बहुजनांना नोकरीत आरक्षण व उद्योग व्यवसायात स्वावलंबी बनविण्याचे ऐतिहासिक कार्य राजश्री शाहू महाराज यांनी केले होते .आज  दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ,(डीक्की) हा विचार आणि कार्य पुढे नेताना दिसतेय म्हणूनच शाहू समूह यापुढे डीक्की संस्थेबरोबर एकत्रित काम करून राजश्री शाहू महाराज यांचे ,दलितांना उद्योगात स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणार असल्याचे कोल्हापूर – कागल संस्थानचे राजे, राजश्री शाहू महाराज यांचे वंशज समरजित राजे घाटगे यांनी डिक्की मुख्य कार्यालयास भेट दिली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी  जाहीर केले. 

  दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) च्या कार्यक्रमात  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचा कृतिशील वारसा या विषयावर संवाद साधला. दलित उद्योजकता विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत असणारी DICCI संस्था आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या बहुजन विकासाचे स्वप्न घेवून प्रयत्नशील असणारा आमचा शाहू समूह या दोन्ही संस्था या महापुरुषांचा कृतिशील वारसा पुढे चालवत आहेत. यापुढील काळात एकत्रित येवून बहुजन विकासाचे स्वप्न साकार करू, असा मानस यावेळी राजे घाटगे यांनी व्यक्त केला.           

डीक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले की ,,राजश्री शाहू महाराज यांनी दलीत  समाजाला व्यवसाय उभारण्यासाठी त्याकाळी मदत केली .गंगाराम कांबळे यांना हॉटेल सुरू करून दिले तसेच दलितांनी बनविलेला चप्पल हा ब्रँड जगभर पोहचविण्याचे कार्य  केले .त्यांना भेटायला येणाऱ्या देश ,विदेशातील पाहुण्यांना राजभेट म्हणून चप्पल ते देत असत .भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामजिक कार्यास राजश्री शाहू महाराज यांनी अतिशय भक्कम असा पाठिंबा दिला होता .शिवाय विविध प्रकारे अतिशय मोलाचे सहकार्य केले होते .आंबेडकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र  ” मूकनायक ” ला शाहू महाराज यांनी अतिशय मोलाची मदत केल्याचे  कांबळे यांनी यावेळी सांगितले   .शिवाय आज ही तोच वारसा राजे करीत आहेत.असे म्हणाले .यावेळी राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व भेटीचे अनेक प्रसंग कांबळे यांनी यावेळी सांगितले .
           राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी प्रगतिशील आणि विकसित समाजाचे स्वप्न पाहिले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार ” स्वप्न ते नव्हे जे झोपेत पडते तर स्वप्न ते असते जे झोप उडवून ते पूर्ण करायला आपल्याला भाग पाडते.” शाहू समूहाने आणि डिक्कीने ही शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन एक नवा इतिहास निर्माण करणार असल्याचे राजे घाटगे म्हणाले.
        यावेळी DICCI चे संस्थापक चेअरमन पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मा. रविकुमार नर्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. संजीव डांगी, वेस्ट इंडिया अध्यक्ष अविनाश जगताप, अनिल होवाळे शहराध्यक्ष ,राजेंद्र साळवे ,राष्ट्रीय मार्गदर्शिका ( महिला विभाग )श्रीमती सीमा कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष आणि समन्वयक ( वेस्टर्न इंडिया ) ,मुकुंद कमलाकर ,संतोष कांबळे, सतीश कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; राजमाची परिसरात व इंगळून घाटात दरड कोसळली

राजमाचीकडे जाणारा रस्ता बंद; जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू,...

विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘साहस फाउंडेशन’चे परिश्रम

पुणे | प्रतिनिधी विशेष गरजा असलेल्या मुलांकडे समाजात अनेकदा दयेच्या...