गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी सरकारी पाट्या केल्या ‘शुद्ध ” !
पुणे :
हिंजवडी चे हिंजेवाडी होऊ देणार नाही, मुळशी चे ” मुलशी ” होऊ देणार नाही, अशी भूमिका ” आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान ” ने घेतली आहे. अॅड.गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी या सरकारी पाट्या शनिवारी रात्री दुरूस्त केल्या. सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सरकारपासून खासगी आस्थापनांनी काळजी घ्यावी, अन्यथा मुळशीतील तरुण व्याकरणाचे धडे शिकवतील ” असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी यावेळी सांगितले
यावेळी निवृत्त्ती येवले, सीताराम तोंडे अनंत दहिभाते, लक्ष्मण कंधारे , भरत मराठे,राम गायकवाड , सुरेश साळुंखें, विकास ढोक उपस्थित होते.