फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा प्रक्रिया प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध

Date:

पुणे-फुरसुंगी-उरुळी देवाची कचराडेपोवर सुरु होणाऱ्या २०० मे.टन च्या भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सांगत हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

भौगोलिक दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या पुणे शहराचा बहुतांशी कचरा गेल्या २५ वर्षापासून फक्त उरळी फुरसुंगी कचरा डेपो येथे टाकण्यात येत आहे. न्यायालयीन आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्यसंस्थाना कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणे बंधनकारक केल्यावर शहराच्या विविध भागात लहान मोठ्या क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारले मात्र, उरुळीदेवाची-फुरसुंगी ग्रामस्थांवर २५-३० वर्षांपासून अन्याय करत फुरसुंगी मधे सर्वात मोठा कचरा प्रकल्प प्रशासनाने उभारला, लहान मोठया क्षमतेचे सर्व प्रकल्प पुणे मनपा साठी निरुपयोगी ठरले असुन सदर प्रकल्पांपैकी बहुतांशी प्रकल्प बंद अथवा खुप कमी कालावधी करता चालू असतात. याकाळात तेथील सर्व कचरा अव्याहतपणे उरळी फुरसुंगी डेपो येथे आणला जातो.आजतागायत कचरा डेपो च्या प्रादर्भावाने परिसरात वर्षाच्या १२ महीने २४ तास असणारी दुर्गंधी, कायमस्वरूपी दूषित झालेले पाणी स्त्रोत, वाहतूक कोंडी, धुळीचे लोट, नागरिकांना जडलेले गंभीर श्वसनाचे विकार, कचऱ्यातील भंगार वेचणाऱ्या लोकांच्या भांडणातून वाढलेली गुन्हेगारी, गावातील ओढ्यात सातत्याने बाहणारे लीचेड, परीसरात निर्माण होणारे डासांचे लोट यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थानी वारंवार केलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचे कबूल करत अन्यत्र शासकीय जमीन कचरा डेपो प्रयोजनकरतादेण्याचे कबूल केले, त्याप्रमाणे शासनाने पिंपरी-सांडस व अन्यत्र शासकीय जागा उपलब्ध केल्या, परंतु, अद्यापही दुर्दैवाने पुणे शहरात व इतर ठिकाणी राज्य शासनाने देवू केलेली जागा कचरा प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात महापालिका प्रशासनाला कोणतेही यश आलेले नाही.विषयांकित कचराडेपो वर २०० टनाचा १५ वर्ष मुदतीकरीता नवीन कचरा प्रकल्प सुरु करण्यासाठी मनपाने वर्कऑर्डर दिली आहे. यास माझा तीव्र आक्षेप आहे, २००५ पासून आजपर्यंत ३५ कि. मी. व्यासाच्या पुणे शहरातील सर्व कचरा या ना त्या प्रकारे विषयांकित ठिकाणी टाकला जात आहे. तसेच हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन व स्वत: सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अवमान करते सदर ठिकाणी राजरोसपणे कचरा ओपन डम्पिंग केलेला ९ लाख मे, टना पेक्षा अधिक कचरा आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सदरचा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याऐवजी आता नव्याने २०० मे. टनाच्या प्रकल्प चाल करण्यासाठी टेंडर प्रक्रियेला दि. २७.०२.२०२० रोजी पुणे मनपा स्थायी समितीने १५ वर्ष मुदतीकरता मंजूरी देऊन, कचराडेपो पुढील १५ वर्ष सुरू ठेवण्याचा कट रचला आहे. यास ऊरूळीदेवाची-फुरसुंगी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कचरा डेपोचा त्रास आम्ही ग्रामस्थ सहन करीत असल्यामुळे हा प्रकल्प आपण इतर ठिकाणी स्थलांतरीत करावा. आम्ही वारंवार विरोध करूनही गेली २५-३० वर्षांपासून हा पुणे शहराचा कचराडेपो व प्रकल्प आम्हा फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांच्या माथी मारले जात आहेत. ऊरूळी देवाची-फुरसुंगी व येथील कचरा डेपोच्या जागेवर कोणताही प्रक्रिया वा विनाप्रक्रिया स्वरूपाचा कचरा टाकू नये, याठिकाणी कोणतीही नविन टेंडर प्रकिया राबवून कचरा प्रकल्प राबवू नये, पुणे शहराच्या अन्य ठिकाणी नविन जागा शोधून तेथे कचराडेपो करावा, माझे प्रभागातील गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात कचरा टाकणेस व कचरा प्रकल्पास आम्ही या गावचे नागरिक व लोकप्रतिनिधी मज्जाव करत आहोत.सद्यस्थितीत राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून काही सशर्त अटी शर्तीवर सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवणेस मंजुरी घेतली आहे. सदर मंजुरी ही आक्षेपार्ह असून याठिकाणी कोणताही कचरा प्रक्रिया प्रकल्प करणेस आमचा आक्षेप आहे. तरीही सशर्त परबानगीमधील अटी शतीचेदेखील पालन न करता सदर जागेवर नाममात्र स्ट्रक्चर उभारले असताना ठेकेदारास ६. २५ कोटी रु. देण्याचा प्रशासनाने कट रचला आहे. याबाबत मी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ग्रामस्थांच्या वतीने तक्रार करणार आहे.समाविष्ट गावांना मुलभूत विकासकामांना नाममात्र निधी दिला जातो. या गानामधून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जाते त्याप्रमाणात विकासकामे होत नाहीत. एकीकडे मुलभूत विकासकामांसाठी तरतूद उपलब्ध नाही म्हणून कामे केली जात नाहीत. तर दुसरी कडे स्थानिक ग्रामस्थांचा २५ते ३० वर्षापासूनचा विरोध असताना देखील या प्रकल्पचालक, ठेकेदारांच्या हितासाठी त्यांची बिले आर्थिक तडजोडीने अदा केली जातात ही बाब आपण गांभीर्याने लक्ष देण्यासारखी आहे.तरी, गेले २५ वर्षांपासून आमच्या माथी मारला जाणारा विषयांकित कचराडेपो वर सद्यस्थितीत सुरु असलेले सर्व कचराप्रकल्प बंद करुन सदर कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा. तसेच मे.भूमिग्रीन कंपनीस दिलेल्या वर्क ऑर्डर रद्द करून सदर प्रकल्प अन्य ठिकाणी हलवावेत व त्यांची कोणतीही बिले अदा करू नयेत. अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...